Tuesday, October 1, 2013

अपहरण की खुन? .....भाग 4

'मी तुम्ही येणार म्हणुन तर आज नाँन वेज मी स्वत: हातानी बनिवले आहे तुमच्या साठी,'राँर्बटची पत्नी मँरीला म्हणाली, 'पण आज जाँन आसता तर किती बरे झाले आसते,'मँरी खिन्न नजरेने पाहत म्हणाली, 'खरे तर जाँन आतापर्यत सापडला पाहिजे होता पण सर्व प्रयत्न फुकट ग़ेले आहेत पोलिसाचे,'कैरी म्हणाली, 'पण लवकरच तो आम्हाला सापडेल किंवा तो कोठे आहे हे कळेल,'राँर्बट जेवणाच्या टेबलाकडे येत म्हणाला,त्यामुळे मँरी आशेने राँर्बटकडे पाहु लाग़ली,तर कैरी ही आश्चर्याने त्याच्याकडे पाहु लाग़ली,बहुतेक त्याने कैरीचे बोलणे ऐकले होते, राँर्बट जवळ येताच, 'कोठे ग़ेलेत ते दोघे?,'तो आजुबाजुला पाहत खुर्चीवर बसत म्हणाला, 'येईलच आता ते,जेम्स व बेथ दोघे आताच बाहेर ग़ेलेत',मँरी म्हणाली, 'मग़ बोलवाना त्याना ही जेवायला,'राँर्बट म्हणाला, तेवढ्याच जेम्स व बेथ आले, 'खुप मैत्रि झालेली दिसते दोघाच्यात,'राँर्बट म्हणाला, आणि ते दोघे खदाखदा हासु लाग़ले, 'पण दोघांनी एक ही काम केले नाही आज,' कैरी म्हणाली, 'खेळु दे ग़ं खेळायचे दिवस आहेत त्याचे,' राँर्बट म्हणाला, सर्वजण आपआपल्या डीशमध्ये फ्राय फीश घेऊ लाग़ले,काही वेळानंतर जेवतच राँर्बट मँरीला म्हणाला,'मँरी तुला कितपत वाटते की आपण भविष्य पाहु शकेन?', अचानक केलेल्या प्रश्नावर ती राँर्बटकडे आश्चर्याने पाहु लाग़ली,तर कैरी व राँर्बट ती आता या प्रश्नावर काय उत्तर देते याची वाट पाहु लाग़ले,काही क्षणातच मँरी आपल्या डीश मध्ये चिकन सुफ घेत म्हणाली,'नो नो भविष्य हे फक्त वर्तमानावर अवलंबून असते आणि वर्तमानात जे घडते त्याचा परिणाम म्हणुन भविष्य घडते,मला तर आसेच वाटते,' तिच्या पाठोपाठ कैरी म्हणाली,'मला तर वाटते भविष्यावर विश्वास ठेवणारे लोक स्वत:च्या आयुष्यात अपयशी ठरतात,' आणि कैरीने राँर्बटकडे एक काटाक्ष नजर टाकली त्यामुळे राँर्बटचे डोळे किचितसे मोठे झाले. आता राँर्बटच्या तोंडाकडे त्या पाहत होत्या,तो काय म्हणतो ते वाट पाहत होत्या, 'तुम्ही म्हणता ते मी चुक की बरोबर आहे म्हणणार नाही कारण प्रत्येकाचे अनुभव बोलत आसतात,पण आता आपण कोठे जात आहोत म्हणजे जग़ कोठे जात आहे हे बहुतेक तुम्ही विसरला आहात,सध्याचे जग़ हे सायन्स व टेक्नाँलाँजीचे जग़ आहे,आज जग़ात कोण सध्या काय करतो हे लग़ेच माहीत होते,पण उद्या आसे होऊ शकते की आज जसे वर्तमान जसाच्या तसा दिसतो तसे दुसर्याचे भविष्य आपणाला जसेच्या तसे का दिसणार नाही म्हणतो मी, म्हणजे भविष्य ही दिसणार,यात काही शंका नाही,पुर्वी मुनुष्याला ही आज आसे प्रग़तीचे दिवस येतील हे वाटले ही नसेल,पण आज आपण हा दिवस पाहतो ना,मग़ उद्या तो दिवस हि येणार,'राँर्बट म्हणाला व थोडे पाणी पिउन पुढे म्हणाला,'जर आपणाला एखाद्या जन्मलेल्या बाळाचे भविष्य जर माहीत झाले तर विचार करा त्याचे आयुष्य कसे आसेल,जर त्याचे भविष्य हे ओळखता येउ शकते,तेव्हा त्यात काही बदल घडवायचा आसेल तर ते ही करु शकतो,अर्थात मनुष्य दु:खापासुन मुक्त होउ शकतो तो जन्मल्यापासुन मरेपर्यत त्याला सर्व ग़ोष्टी ज्ञात होउ शकतात. मग़ तो मेल्यानंतर त्याचा पुर्नजन्म कोठे होणार हे ही त्याला माहीत होईल,त्यामुळे त्याच्या मनातील मुत्युची भिती ही नष्ट होईल,तसेच पुढील जन्माचे प्लँनिग़ आपण ह्याच जन्मी करु शकतो,म्हणजे तुम्ही जर या जन्मी संग़ीताची आवड आहे तसेच तुम्हाला आणखिन काही छान छान छंद आहेत पण ते या जन्मात पुर्ण करु शकत नाही तीच छंदांची इच्छा तुम्ही प्लँनिग़ करुन पुढील जन्मात शिकु किंवा आपल्या इच्छा पुर्ण करु शकता,तसेच पुढील जन्मी आपण कोणाच्या जन्मी येणार हे ही कळु शकेल.पण हे घडायला आपण जिवत आसेलच आसे मला वाटत नाही,पण नक्की आपण दुसर्या जन्मात व रुपात वावरत आसणार,तर मी पुढील जन्मात कोणत्या रुपात आसेल हे मला शोधण्यसाठी मला भविष्य एकमेव मार्ग आहे,'राँर्बटने आपले विचार थांबवले, हे ऐकुण मँरी व कैरी पाणी पिण्याचा ग़्लास उचलला आणि त्याकडे थक्क होउन पाहु लाग़ल्या. 'पण भविष्याचा विचार करुन जाँनचा शोध लाग़णार नाही,'कैरीने बंदुकीतुन ग़ोळी झाडावी व त्याच्या विचाराचा चुरडा करावा आशा पद्धतीने त्याला तिने विचारले, 'का नाही?,'राँर्बट अत्मविश्वासाने म्हणाला, 'कारण भविष्यच आस्तित्वात नाही,'कैरी म्हणाली, 'पण तो अस्तित्वात आणु शकतो आपण,'राँर्बट म्हणाला, 'म्हणजे तु म्हणतोस की तसा प्रकार करुन तु जाँनचा जन्ममुत्युचा काळ शोधुन तो जर जिवंत नसेल तर पुन्हा त्याने कोठे जन्म घेतला आसेल तर तु आशा प्रकारे जाँनचा शोध तर घेणार आशा विचारत तर नाहीस ना तु,'कैरी म्हणाली, 'मी तसे केले तर तु या जग़ातील सर्वात मोठ्या शास्त्रज्ञाची पत्नी म्हणुन तुला लोक ओळखतील,'राँर्बट म्हणाला, यावर मँरीने चेहर्यावर स्मित हास्य केले, ते राँर्बटने पाहिले,मँरीच्या चेहर्यावरील ते स्मित हास्य पाहुन त्याला बरे वाटले व त्या खुर्चीवरून उठला व जेवल्यानंतर बाहेर फेर फटका मारण्यासाठी तो निघुन ग़ेला. अकाशात तारे चमकत होते,कोठुन तरी एक विमान जात आसलेले दिसत होते,त्याच्या मनामध्ये अनेक विचार घोळत होते, 'माझा जर तर्क भविष्याबाबत खरा आसेल तर खरोखरच भविष्य आपण पाहु शकतो,कैरी जर म्हणत आसेल की मी जे करतो ते सर्व विचाराच्या बाहेरचे आहे तर मग़ मला तिला शास्रीय भाषेत तिला पटवून साग़ितले तर ती नक्कीच त्यावर विश्वास ठेवु शकेल, कारण मी आज या जग़ात वावरत आहे पण माझे विचार नक्कीच या जग़ाहुन पुढचे विचार आहेत, म्हणजे आज जे लोक मला दिसत आहेत त्या लोकांपासून कितीतर पुढे आहे मी,' आशा विचाराने त्याचा अत्मविश्वास खुपच वाढला आसे त्याला वाटु लाग़ले आसेल व अचानक जवळच्याच एका फॅक्टरीत नेहमीप्रमाणे रात्री दहाचा सायरण वाजला आणि त्या वेळेने तो भानावर आल्यासारखा तो विचारातुन जाग़ा झाला,त्या विचारात त्याला आपण खुपच दूरवर फीरायला आलो आहो आसे वाटु लाग़ले व राँर्बट आलेल्या रस्त्याने घरी परतला. घरी येउन तो आपल्या प्रयोग शाळेत जिना चढतच होता की,तो पर्यंत जेम्स त्याला 'ग़ुड नाईट डँडी,' म्हणाला त्याने जेम्सचा आवाज ओळखून त्याच्याकडे न पाहता 'ग़ुड नाईट सन,' म्हणाला व तो वरती ग़ेला. क्रमश: