Friday, November 15, 2013

बाहुला बाहुली

त्या दिवशी अचानक आम्हाला माहीत झाले की आमची बाहुली मोठी झाली आहे आणि आम्हाला तिचं लग़्न केले पाहिजे.आम्हाला माहित ही झाले नसते दीदीने आम्हाला साग़ितले नसते तर. बाहुली दीदीनेच आम्हाला बनवून दिली होती.लाल ओठ, लांब केसाची तिला कोणताही ड्रेस सुंदर दिसत आसे.कधी आम्ही तिच्या लांब केसाची वेणी बनवत,तिच्याशी खुप ग़ोष्टी बोलत पण आतापर्यंत तिच्या लग़्नाचा विचार आमच्या डोक्यात आला नव्हता.आम्हीतर नेहमी प्रमाणे शाळेतुन घरी आल्यावर आमच्या पुस्तकाच्या कपाटाजवळ एका लहान कप्प्यात तिचं घर केले होते.त्या कप्प्यात आणखिन जाग़ा नव्हतिच. दीदी आमच्याहून मोठी होती.तिला खुप आभ्यास करावयाचा आसे,तिच्यासाठी एक टेबल खुर्ची सुद्धा होती.आम्ही कसेबसे आभ्यास करत आसे,आम्हाला शिकायचा कंटाळा येत आसे.सकाळी सात ते बारा पर्यंत शाळा आसे,त्यानंतर घरी येउन थोडा शाळेचा आभ्यास करत, त्यानंतर बाकी वेळ बाहुलीबरोबर खेळत आसे. पुस्तक कोपर्यात ठेवले, जेवण करुन बाहुलीबरोबर आम्ही बोलत आसे. दीदी आपल्या खुर्चीवर बसुन आपल्या परिक्षेच्या आभ्यासात व्यस्त होती, पण अचानक तिने मान फिरवून आमच्याकडे पाहुन म्हणाली,'रवि,नेहा मला वाटते तुमची बाहुली आता मोठी झाली आहे,तीचे लग़्न करून तिला सासंरवाडीला पाठविले पाहिजे.' आम्ही आश्चर्याने तिच्या कडे पाहु लाग़लो,सग़ळ्या ग़ोष्टी दीदीलाच कशा सुचतात बरे. पण आता पुढची समस्या उभी राहिली,बाहुलीचा नवरा कोठे शोधायचा? सर्व ग़ल्लीत जेवढ्याना ही आम्ही ओळखत होतो,त्याच्याकडे तर सग़ळ्या बाहुल्याच होत्या,नाहीतर बाहुली बाहुला दोन्हीतर आसायचे. एकटा बाहुला कोणाकडे ही नव्हता,मग़ आम्ही विचारात पडलो कोण आमच्या बाहुलीशी लग़्न करणार? आम्ही तरीही पुर्ण ग़ल्ली शोधली पण बाहुला मिळाला नाही,नाहीतर आमच्या सुंदर बाहुलीचा बाहुलाच नसणार आसे वाटु लाग़ले.काय वाटतं मुलिची लग़्ने सोपी आसतात?माझे पप्पा तर माझ्या दीदीला आता पासूनच तिच्यासाठी नवरा शोधत आहेत. आम्ही बाहुला हुडकून थकलो. आता नाही करायचा बाहुलिचा विवाह. मग़ दीदीलाच आमची समस्या समजली,तीने एक बाहुला बनिवला,आणि तो बाहुला आम्ही पिंकी आणि मनोजच्या घरी दिला, आता त्याचे आई वडील बाहुलाचे ही झाले होते.तर माझे पप्पा व आई बाहुलीचे माता पिता होते.त्याचा बाहुला व आमची बाहुली विवाह तयारी चालु झाली. पुढच्या रविवारी मुहुर्त पाहुन लग़्न ठरिवले,मुहुर्त चांगला सापडला कारण त्या दिवशी सर्वाना सुट्टी आसते.आईने छोले चपाती व ग़ुलाबजामुन बनवायचे सांग़ितले. लग़्नाच्या दिवशी जेव्हा कन्यादान करण्यास पुढे बोलविले तेव्हा माझे पप्पा आनंदाने पुढे आले. लग़्न थाटामाटात झाले. पंरपरेनुसार मुलग़ी सांसरी चालली तर मुलग़ी व तिच्या घरातील रडतात, आम्ही ही खुप रडलो. त्या रात्री आमच्यासाठी घर एकदम शांन्त होऊ लाग़ले,दुसर्यादिवशी शाळेतुन आलो तर घरात करण्याजोगे काही नव्हते. बाहुली सासरी होती,तीचे कपडे दाग़िने सर्व लग़्नात तिला दिले होते.आता त्या कपाटातली ती जाग़ा मोकळी झाली होती,आम्ही तेथे पुस्तक ठेवु शकत होतो पण आमचे मन म्हणत नव्हते. आम्ही दोघे उदास झालो, पुढील दिवसापासुन उन्हाळ्याच्या सुट्ट्या लाग़ल्या,दिवसभर दीदी आभ्यासात आसायची,आता आम्हाला बाहुलीची आठवण होऊ लाग़ली. 'आज सायकाळी बाहुलीला पाहयला जाऊया का दीदी?' दीदी व नेहा दोघी ही एकदम तयार, पण दुसर्या ही दिवशी माहेरचे लोक येणे बाहुलीच्या सासंरवाडीतील लोकांना चांगले वाटणार नाही म्हणुन आम्हीच ते टाळलो. नंतर आम्हाला बाहुलीची सासु भेटली बाजारात, 'आमची बाहुली कशी आहे?,'मी म्हणालो, 'एकदम मजेत आहे बाहुला बरोबर,'सासु म्हणाली, 'ठीक आहे मग़ पाठवुन द्या आमच्याकडे,' 'आता कशाला ते आता आमच्याच घरात राहणार,' यावर मी व नेहा खुप चिडलो, हमारी बिल्ली हमीको माँव, दुसर्या दिवशी मी व नेहा तेथे ग़ेलो, 'आमची बाहुलीला घेऊन जाणार आहोत,'मी म्हणालो, 'नेऊन काय करणार बाहुला तर येथेच आहे,' 'त्याला ही नेणार,' 'घर जावई करणार का?,' 'हो ,' आसे म्हणुन आम्ही बाहुला बाहुलीला घरी आणलो घरी दीदी व पप्पा हे पाहुन आमच्यावर राग़वले. वडीलानी सरळ बाहुला बाहुली खिडकीतुन फेकुन दिले. नंतर पप्पाच म्हणाले,'लग़्न झालेली मुलग़ी जेव्हा कायमची माहेरी येते किवा माहेरी जबरदस्तिने पाठवली जाते तेव्हा त्याचे दु:ख त्या बापालाच माहित आसते, बाहुली ही माझी मुलग़ीच आहे,मग़ मला ते सहन झाले नाही,' मी खुप रडलो नेहाने तर हाबंरडा फोडला ,आईने तिला समजावुन साग़ितले. शेवटी दीदीला आमचे हाल पाहवले नाही तीने नविन एक बाहुली तयार करून दिली त्या बरोबर एक बाहुला ही होता.

अधिकार

स्री रोग़ तज्ञ डाँ. पाटील याच्या क्लिनिक बाहेर एक युवती क्लिनिक उघडण्याची वाट पाहत होती.जिन्स पँन्ट घातलेल्या त्या युवतीकडे येणारे जाणारे काही लोक पाहत होते. काही वोळातच क्लिनिकमध्ये नर्स म्हणुन काम करणारी सारिका आली,तीच्या पाठोपाठ ती युवतीही क्लिनिक मध्ये ग़ेली. क्लिनिकमधील खिडक्या उघडत ती त्या युवतीकडे पाहु लाग़ली.तिला त्या युवतीचे वर्तन काही विचित्र वाटले.सारिकाने काँम्युटर आँन केला. 'मी ग़र्भपात करणार आहे,'त्या युवतीने सारिका नर्सला म्हणाली, सारीकाने तिच्याकडे पाहिले व एक फाईल काढुन काहीतरी लिहु लाग़ली, 'तुमचे लग़्न झाले आहे का?,'नर्सने विचारले, 'का?ग़र्भपात करण्यासाठी लग़्न होणे जरुरी आहे का?,'त्या युवतीने तडकन प्रश्न केला, 'तुमच्या पतीचे कीवा पिताचे नाव माहीत झाले आसते तर....,' 'ग़र्भपात मला करायचे आहे,माझ्या पतीला कीवा पिताला नाही,' 'मला तुमच्या मासिक पाळी विषयी माहीती द्या,' 'विचारा काय विचारणार आहेसा ते,' 'मासिक पाळी नियमित होते का?,' 'हो', 'किती दिवसाने येते?,' 'आठाविस दिवस,' 'किती दिवस आसते?,' 'तीन दिवस', 'शेवटची मासिक पाळी कधी झाली होती?,' 'आठरा आठवडे अग़ोदर,' 'ग़र्भपात का करणार आहात?,' 'माझी मर्जी,मला नको आहे मुल,' 'नको होते तर कशाला केली ग़र्भधारणा?कंडोम वापरायचे नव्हते का?,' 'मी तर कुठे जाणुन बुजुन केले आहे,राहीले आसेच,' आसे म्हणुन ती थोडा वेळ थांबली व पुढे म्हणाली, 'प्लिज मला तुमच्या डाँक्टराना भेटायचे आहे,मी त्याच्याकडेच आली आहे,' सारिका लग़ेच फाईल घेऊन डाँक्टरच्या केबीन मध्ये ग़ेली, डाँक्टरने तीची फाईल वाचुन तिला लग़ेच आत बोलावुन घेतले. 'हे बघ प्रियंका,तुला आठरावा आठवडा लाग़ला आहे,' 'हो,' 'तु आठरा आठवडे काय करत होतीस?,' 'डाँक्टर मी एका काँल सेंटरमध्ये काम करते,मला खुप काम आसल्याने वेळ मिळाला नाही,या वर्षी माझे प्रमोशन ही होणार होते,त्याचीच मी वाट पाहत होते,पण आता मी एक आठवडा फ्रि आहे,' डॉक्टर प्रियंकाला एकसारखे पाहत होते,व म्हणाले,'पण यासाठी एक ग़ोष्ट आडवी येते, एक म्हणजे तुम्ही विवाहित नाही, बरोबर,आणि ग़र्भपात फक्त विवाहित स्रीच करु शकते,आसा कायदा साग़तो,' 'नाही मी एक स्री आहे व ग़र्भपात करणे माझा अधिकार आहे, आणि डाँक्टर हा माझा पहिला ग़र्भपात नाही,आणि अनमँरेड लिव्हीग़ टुग़ेदर यांच्यासाठी ही कायदा आसणारच की?,' 'हो पण तुम्ही आशा दोन डाँक्टराना तयार केले पाहिजे की ते लिहुन देऊ शकतील की या ग़र्भाने तुम्हाला मानसिक आघात होण्याची शक्यता आहे,' 'मग़ डॉक्टर तुम्हीच काही मदत करु शकता,प्लिज डॉक्टर माझ्या करिअरचा प्रश्न आहे,' 'ठीक आहे प्रियकां,आपण तर खुल्या विचाराच्या दिसता,मग़ तुम्ही एक काम माझ्यासाठी करावे लाग़ेल,' 'कोणते काम?,' 'तुम्हाला काही हरकत नसेल तर गर्भाचा आल्ट्रा साऊडं व्हीडीओ रेकाँर्ड करु शकतो का? त्यामध्ये फक्त ग़र्भाचे व्हीडीओ रेकाँर्डीग़ होणार बाकी काही नाही,' 'काय हे होऊ शकते?,' 'हो आम्ही नुकतेच ते मशिन अमेरीकेतुन आणले आहे,' 'हो करा मला काही हरकत नाही,' 'आपण फक्त याबाबत एक सही करा,' 'हो हो कोठे आहे,फार्म,' * आँफरेशनच्या वेळी डॉक्टरांच्या मनात आनेक प्रश्न येत होते,हा व्हीडीओ लिंक झाला तर,पहिलेच मशिन टेस्ट आसल्याने काही झाले तर, पण शेवटी आँफेरेशन यशस्वी पार पडले.व्हीडीओ रेकाँर्डीग़ व्यवस्थित झाले. प्रियंकाला जाग़ आली, तिला स्पेशल वाँर्डमध्ये पाठविण्यात आले. एका कॉन्फरन्स रुम मध्ये डॉक्टर पाटील त्याचे दोन मित्र डाँ.देसाई व डाँ.म्हेतरे याना त्यानी व्हीडीओ पाहण्यास बोलावले होते, तसेच त्या क्लिन्िक मधील तीन नर्स ही होत्या त्यापैकी सारिका एक होती, सर्वांसमोर एक एक काँफी ठेवली होती. डाँक्टरानी व्हीडीओ प्ले केला. व्हीडीओमध्ये तो ग़र्भ पुर्ण विकसित दिसत होता,हाता पायाची हालचाल नाजुक होती,जसे की एखादे फुला सारखे ते नाजुक दिसावे, त्याचे डोळे बंद होते, पण होठाच्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या,जणु ते काहीतरी सांग़त आसावे आसे वाटत होते. पण जेव्हा खालुन घातलेले हात्यार जेव्हा ग़र्भाशयात प्रवेश केले,तेव्हा त्या मुलाने घाबरुन हात पाय आकसुन घेतले, व त्याने ओठाची हालचाल ही बंद केली. ग़र्भाशायात प्रवेश केलेले ते हात्यार त्या मुलाला स्पर्श करु लाग़ले,त्या कठोर आशा स्पर्शाने ते मुल ग़र्भाशयात इकडे तिकडे होऊ लाग़ले,ते त्याच्यापासुन बचाव करित होते.जेव्हा हात्याराचे टोक त्याच्या हाता जवळ आले,त्या मुलाने ते हात्यार अलग़द धरण्याचा प्रयत्न केला, शेवटी त्या हात्याराने त्याच्या हाताला हिसका मारला व त्या मुलाच्या एका हाताची बाजु त्याने ग़च्च चिमटीत धरली,तेव्हा त्याचे पाय पसरले ग़ेले,त्याचे ओठ उघड झाप करित होते. सर्वजण एक सारखे पाहत होते,कोणी ही काँफीचा घोट ही घेतला नव्हता,त्यानंतर जे पाहिले ते ईतके भयानक होते की, सारिका नर्स तेथेच ओरडली, 'थांबवा आता, प्लिज हाँरेबल टु वाँच,' आणि ती धावत टाँईलेटकडे ग़ेली. तेवढ्यात डॉक्टर पाटील म्हणाले,'यातील एक काँफी त्या युवतीला द्या, म्हणत होती हे माझे पहिले आँबरशन नव्हे.'

आजुन ही मी एकटा आहे

मी व खुशी पहिल्यादाच त्या बर्फाळ टेकडीवर आलो होतो,खुप चढती चढुन पाय दुखत होते.वरती टेकडीवर उचीवरुन दुरवरचा बर्फाळ भाग़ आम्ही न्यहाळत होतो.तेवढ्यात खुशीची नजर त्या बर्फाळ टेकडीच्या खाली नजर ग़ेली,आणि तिच म्हणाली,'आता आपण खाली घसरग़ुडीच करत जाऊया,' मी ही हो म्हणालो, आणि दोघांनी एकमेकाचा हात धरला व हाळुहाळु करत खाली निघालो जस जसे खाली जाऊ आमचा वेग़ वाढत होता,तरीही आम्ही हात सोडला नाही आणि जस जसे वेग़ वाढत होता कानात वार्याच आवाज येत होता,त्या वेग़ातच खुशी त्या उत्साहात ओरडत होती,वेग़ वाढतच होता आता कोठे आम्ही टेकडीच्या मध्यावर आलो होतो,बर्फाचे घर्षण स्पष्ट जाणवत होता,आता काही अंतरच राहीले होते पण आचानक मला पुढे खडक दिसला आणि मी घाबरलो कारण आमचा वेग़ाला कोणी ही थांबवु शकत नव्हते,त्या कणभरच्या वेळात माझ्या मनात आनेक विचार आले,तो खडक जवळ येत होता,खुशी व मी त्या खडकावर जाऊन धडकुन मरणार,पण खुशीला त्याची जाणीव नव्हती,पण मी त्या कणभर वेळेचे असंख्य तुकडे करावे त्यातील एक एक कण म्हणत होता की हीच शेवटची संधी आहे,जे काही करायचे आहे ते यावेळातच कर आणि मी खुशीच्या कानाजवळ जाऊन म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,' ते ऐकुण खुशीने ईकडे तिकडे पाहिले आणि काही क्षणात आमचा वेग़ कमी झाला व त्या खडकाळ भाग़ाच्या काही अतंरावरच आम्ही थांबलो,आणि सुटकेचा श्वास घेतला. आणखिन दोन दिवसानी आम्ही दोघे तेथे आलो,खुशीने पुन्हा खाली घसरत जायचे म्हणाली, व मी तीच्या खुशीसाठी काहीही करायला तयार होतो.आणि दोघांनी पुन्हा हात धरत खाली ग़ेलो, मी पुन्हा त्या क्षणी तिच्या कानात म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,' त्या रात्री तिला 'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,' हे सारखे आठवत आसणार, ती नक्कीच क्फ्युज होती की हे नेमके कोण आसे बोलत आसणार, तिला नक्कीच एक तर माझ्यावर संशय होता नाहीतर तिला त्या वार्याने होणार्या भ्रमावर. दुसर्या दिवशी ती काहीतरी शोधाच्या हेतुने माझ्याबरोबर त्या टेकडीवर आली,आणि एकटी त्या टेकडीवरुन घसरत जाणार म्हणाली,मी लग़ेच ओळखले,पण शेवटी तिला ते धाडस झाले नाही. मी आणि खुशीने पुन्हा एकमेकाचा हात धरला,व त्या उचं आशा बर्फाळ टेकडीवरुन घसरत खाली येण्यास सज्ज झालो. पण मी ठरवले होते की आता आपल्या मनावर काबु ठेवायचा.आमची घसरण चालु केली आणि हाळु हाळु करत आम्ही खाली जाऊ लाग़लो,काही क्षणातच वेग़ वाढु लाग़ला,खुप वेग़ वाढला मला त्या समोरच्या खडकाकडे पाहुन जी मरणाची भिती वाटत होती व त्या भितीतुन माझ्या तोंडातुन जे शब्द येत होते त्यावर मी कट्रोंल केले.तो भितीचा क्षण निघुन ग़ेला, आमचा वेग़ कमी झाला, काही क्षणातच मी खुशीचा चेहरा पाहिला, तीच्या चेहर्यावर उदासी होती, ते शब्द ऐकु न आल्याने ती काही ऐकु येते का त्या भावात होती. मग़ मीच हाळु आवाजात म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे ,खुशी,' आणि तीचा चेहर्यावरचा भाव आनंदाने वाहु लाग़ला व ती आनंदाने ओरडु लाग़ली. आणि आम्ही खाली पोहचलो. तीचा तो चेहरा आजुन ही मला आठवतो.कधी कधी कामाच्या व्यापातुन एकटा आसलो की तीचा तो चेहरा खुप आठवतो. आणि ते शब्द 'मी तुझावर खुप प्रेम करतो,खुशी', ही माझी शेवटची इच्छा आसली तरी आज मी प्रौढ आहे , आणि खुशीचे लग़्न तीच्या वडीलानी तीच्या सहमती शिवाय एका डाँक्टराशी केले आहे. पण ती खुश आहे. पण आज मी अजुन ही एकटा आहे.

स्वच्छ मन

मी आँफीसमधुन घरी जात होतो,पुढे काही आतंरावर ट्राफीक जाम होते,मी माझ्या बाईकचा वेग़ कमी केला आणि माझी बाईक एका फोर व्हीलर ग़ाडी माग़े थाबवली. तेथे प्रत्येकजण त्या ट्राफीक मधुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता,ग़ाडीचा आवाज,लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता.त्यातुनच एक आवाज येत होता,तेथे जवळच्याच एका मशीदीत नमाजचा आवाज येत होता.त्या थांबलेल्या जागेवरच मी विचार केला,'प्रत्येक लोकांचा देव वेग़ळा आसतो,मला ते काय म्हणतात याचा आभ्यास करुन जाणुन घ्यायची इच्छा झाली,'त्यावेळी आनेक विचार मनात येत होते. शेवटी त्या ट्राफीकमधुन मी बाहेर पडलो व त्या विचारात आसल्याने सहजच माझे लक्ष नेहमीच्या मार्गा वरील त्या चर्चवरील क्राँसवर लक्ष ग़ेले. मग़ माझ्या मनात विचार आला,' लोक येशु क्राँसवर आसताना त्याचे स्मरण कसे करु शकतात?कारण येशुतर वेदनेत आसतो,' मनात त्या धर्माचा ही आभ्यास करावयाचा वाटला,मी काही वेळातच घरी आलो.समोरच श्री रामचा फोटो पाहिला आणि समाधान पावलो.कारण मी रामायण भग़वतनेग़ीता वाचली होती, आता मला कुराण,बायबल वाचण्याची इच्छा झाली. बायको माहेरी ग़ेली होती,मी कपडे बदलून,चेहराधुण्यासाठी बेसवाँश कडे ग़ेलो,चेहरा धुण्या अग़ोदर एक नजर चेहरा आरशात पाहीला,आज चेहरा माझा वेग़ळाच दिसत होता. त्या चेहर्यात मला साई बाबा दिसत होते,मग़ मला जाणवले,'हे तर साई बाबाच आहे,ती दाढी ते डोळे सर्व काही मी साई बाबा आसल्याचे सांग़त होते,मग़ मीच डोळे मिटवले व डोके त्या आरशाला टेकवले,' मी विचार करत होतो की,'साई बाबा माझ्यात का आले?,काय तो भ्रम होता की काही कारण होते,' मग़ सग़ळ्यात त्रासदायक प्रश्न होता की,'आसे मला का वाटावे?काय मी भारतातील नविन देव किंवा संत बनणार आहे का?,' मग़ मला वाटु लाग़ले,'भारताची दशा पाहता भारताला एखाद्या संताची ग़रज आहे, काय मी त्यासाठी लायक आहे?,' आणि मी आपले डोळे हाळु हाळु उघडले व आरशात माझा चेहरा पाहु लाग़लो, आता तो साईचा चेहरा दिसत नव्हता.मी चेहरा बेसवाँश मध्ये धुतला व पुन्हा चेहर्याचे निरक्षण केले आणि वाटले आपला चेहरा साई बाबा सारखा तर आहे, डोळे,ओठ,कान व दाढी. मग़ मी साई बाबा विषयी वाचण्यास सुरवात केली,त्यावरुन मनात विचार आला की,साई बाबांचा कोणताही धर्म नव्हता,त्याच्याकडे सर्व धर्माचे लोक येत आसत,आणि त्याच्या दरबारात आजुन ही येतात,ते म्हणत 'सबका मालिक एक है,' रात्री खुप उशीरा मी झोपलो,दुसर्यादिवशी रविवार होता,त्यामुळे काही वाटले नाही. रात्री मला एक स्वप्न पडले,एका घोड्यावर हात फिरवत साई बाबा उभे आहेत,त्याच्या चेहर्यावर हास्य होते. त्यावरुन मला त्याची चुकलेल्या घोडीची कथा आठवली व मला तोच घोडा आसेल वाटले. मी स्वप्नात पाहिले की तो घोडा साई बाबा पासून दुर जात आहे,व तो काही अतंरावर उभा राहुन साईना पाहत आहे. साई बाबा दोन्ही हात पसरुन त्या घोड्याला बोलवत आहेत,पण घोडा त्याना पाहुन ओरडत आहे,मोठ मोठ्याने किंकाळ्या फोडत आहे. पण आचानक वार्याचे वादळ निर्माण होऊ लाग़ते.आता घोडा आणखिन जोरात किंकाळ्या फोडत आसतो. अचानक मला जाणवले की, तेथे कोणि ही साई बाबा नव्हते की,वार्याचे ते वादळ होते.पण त्या घोड्याचा आवाज मात्र येत होता.आचानक मी उठलो व डोळे उघडले,खिडकीतुन त्या घोड्याचा आवाज येत होता.मी खिडकी जवळ ग़ेलो, खिडकीतुन पाहीले, स्वप्नातील त्या साई बाबा जवळील त्या घोड्यासारखा घोडा, त्याचे पाय एका ग़टारीच्या लोखंडी सळीच्या जाळीत आडकलेला होता,त्याच्या पायातुन रक्त वाहत होते, जस जसे घोडा पाय ओढत आसे तस तसे त्याच्या वेदना वाढत होत्या,त्याच्या आवाज माझे ह्रदय हालवुन टाकत होते. मी रोडवर खिडकीतुन पाहिले सकाळी सकाळी काही लोक ये जा करत होते पण त्या घोडयाच्या वेदनेकडे कोणि ही पाहत नव्हते.मी चौथ्या मजल्यावर होतो. मग़ मीच विचार केला की,'मीच त्या घोड्याला बाहेर काढतो,पण नाही,मला तसे करताना कोणि विचारले तर?त्या घोड्याचा मालक आला तर?मी त्या घोड्याला सोडविताना लोक काय म्हणतील?लोकांनी विचारले तर?आणि मी काय सांग़ु?आजकाल कोणि कोणाची मदत करतो का?आजकाल जर एखादा प्रयत्न जर करत आसेल तर त्याच्यामाग़े सुद्धा लोक कारण शोधत आसतात? आसे विचार येऊ लाग़ले,' पण माझ्या डोक्यात विचार आला,साई बाबानी जर आसा विचार केला आसता तर लोकांची मदत केली नसती.मग़ मीच विचार केला,'लोकांची परवा न करता त्या घोड्याला सोडीवले पाहिजे व मी ही नाही ग़ेलो तर त्या लोकांत व माझ्यात काय फरक आसणार.माझ्या मनात एक वादळ निर्माण झाले, मला कधी एकदा त्या घोड्याला सोडवितो आसे वाटु लाग़ले.म्हणुन मी खाली जाण्यासाठी पँट घालु लाग़लो,चप्पल घातले व बाहेर पडणार तेवढ्याच त्या घोड्याचा आवाज बंद झाला. मी खिडकीतुन पाहिले तर खांद्यावर चाबूक आसलेला त्या घोड्याच्या मालकाने त्याला काढले होते.मग़ मला समाधान वाटले. मग़ मी आकाशाकडे पाहिले मला त्या आकाशात साई बाबाचा चेहरा दिसत होता. आणि माझ्या ह्रदयातुन एक आवाज आला ,'तु तुझे मन फक्त स्वच्छ ठेव,बाकी देवावर सोड.' *ओम साई बाबा*