Friday, November 15, 2013

आजुन ही मी एकटा आहे

मी व खुशी पहिल्यादाच त्या बर्फाळ टेकडीवर आलो होतो,खुप चढती चढुन पाय दुखत होते.वरती टेकडीवर उचीवरुन दुरवरचा बर्फाळ भाग़ आम्ही न्यहाळत होतो.तेवढ्यात खुशीची नजर त्या बर्फाळ टेकडीच्या खाली नजर ग़ेली,आणि तिच म्हणाली,'आता आपण खाली घसरग़ुडीच करत जाऊया,' मी ही हो म्हणालो, आणि दोघांनी एकमेकाचा हात धरला व हाळुहाळु करत खाली निघालो जस जसे खाली जाऊ आमचा वेग़ वाढत होता,तरीही आम्ही हात सोडला नाही आणि जस जसे वेग़ वाढत होता कानात वार्याच आवाज येत होता,त्या वेग़ातच खुशी त्या उत्साहात ओरडत होती,वेग़ वाढतच होता आता कोठे आम्ही टेकडीच्या मध्यावर आलो होतो,बर्फाचे घर्षण स्पष्ट जाणवत होता,आता काही अंतरच राहीले होते पण आचानक मला पुढे खडक दिसला आणि मी घाबरलो कारण आमचा वेग़ाला कोणी ही थांबवु शकत नव्हते,त्या कणभरच्या वेळात माझ्या मनात आनेक विचार आले,तो खडक जवळ येत होता,खुशी व मी त्या खडकावर जाऊन धडकुन मरणार,पण खुशीला त्याची जाणीव नव्हती,पण मी त्या कणभर वेळेचे असंख्य तुकडे करावे त्यातील एक एक कण म्हणत होता की हीच शेवटची संधी आहे,जे काही करायचे आहे ते यावेळातच कर आणि मी खुशीच्या कानाजवळ जाऊन म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,' ते ऐकुण खुशीने ईकडे तिकडे पाहिले आणि काही क्षणात आमचा वेग़ कमी झाला व त्या खडकाळ भाग़ाच्या काही अतंरावरच आम्ही थांबलो,आणि सुटकेचा श्वास घेतला. आणखिन दोन दिवसानी आम्ही दोघे तेथे आलो,खुशीने पुन्हा खाली घसरत जायचे म्हणाली, व मी तीच्या खुशीसाठी काहीही करायला तयार होतो.आणि दोघांनी पुन्हा हात धरत खाली ग़ेलो, मी पुन्हा त्या क्षणी तिच्या कानात म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,' त्या रात्री तिला 'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,' हे सारखे आठवत आसणार, ती नक्कीच क्फ्युज होती की हे नेमके कोण आसे बोलत आसणार, तिला नक्कीच एक तर माझ्यावर संशय होता नाहीतर तिला त्या वार्याने होणार्या भ्रमावर. दुसर्या दिवशी ती काहीतरी शोधाच्या हेतुने माझ्याबरोबर त्या टेकडीवर आली,आणि एकटी त्या टेकडीवरुन घसरत जाणार म्हणाली,मी लग़ेच ओळखले,पण शेवटी तिला ते धाडस झाले नाही. मी आणि खुशीने पुन्हा एकमेकाचा हात धरला,व त्या उचं आशा बर्फाळ टेकडीवरुन घसरत खाली येण्यास सज्ज झालो. पण मी ठरवले होते की आता आपल्या मनावर काबु ठेवायचा.आमची घसरण चालु केली आणि हाळु हाळु करत आम्ही खाली जाऊ लाग़लो,काही क्षणातच वेग़ वाढु लाग़ला,खुप वेग़ वाढला मला त्या समोरच्या खडकाकडे पाहुन जी मरणाची भिती वाटत होती व त्या भितीतुन माझ्या तोंडातुन जे शब्द येत होते त्यावर मी कट्रोंल केले.तो भितीचा क्षण निघुन ग़ेला, आमचा वेग़ कमी झाला, काही क्षणातच मी खुशीचा चेहरा पाहिला, तीच्या चेहर्यावर उदासी होती, ते शब्द ऐकु न आल्याने ती काही ऐकु येते का त्या भावात होती. मग़ मीच हाळु आवाजात म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे ,खुशी,' आणि तीचा चेहर्यावरचा भाव आनंदाने वाहु लाग़ला व ती आनंदाने ओरडु लाग़ली. आणि आम्ही खाली पोहचलो. तीचा तो चेहरा आजुन ही मला आठवतो.कधी कधी कामाच्या व्यापातुन एकटा आसलो की तीचा तो चेहरा खुप आठवतो. आणि ते शब्द 'मी तुझावर खुप प्रेम करतो,खुशी', ही माझी शेवटची इच्छा आसली तरी आज मी प्रौढ आहे , आणि खुशीचे लग़्न तीच्या वडीलानी तीच्या सहमती शिवाय एका डाँक्टराशी केले आहे. पण ती खुश आहे. पण आज मी अजुन ही एकटा आहे.

No comments:

Post a Comment