Friday, November 15, 2013
बाहुला बाहुली
त्या दिवशी अचानक आम्हाला माहीत झाले की आमची बाहुली मोठी झाली आहे आणि आम्हाला तिचं लग़्न केले पाहिजे.आम्हाला माहित ही झाले नसते दीदीने आम्हाला साग़ितले नसते तर.
बाहुली दीदीनेच आम्हाला बनवून दिली होती.लाल ओठ, लांब केसाची तिला कोणताही ड्रेस सुंदर दिसत आसे.कधी आम्ही तिच्या लांब केसाची वेणी बनवत,तिच्याशी खुप ग़ोष्टी बोलत पण आतापर्यंत तिच्या लग़्नाचा विचार आमच्या डोक्यात आला नव्हता.आम्हीतर नेहमी प्रमाणे शाळेतुन घरी आल्यावर आमच्या पुस्तकाच्या कपाटाजवळ एका लहान कप्प्यात तिचं घर केले होते.त्या कप्प्यात आणखिन जाग़ा नव्हतिच.
दीदी आमच्याहून मोठी होती.तिला खुप आभ्यास करावयाचा आसे,तिच्यासाठी एक टेबल खुर्ची सुद्धा होती.आम्ही कसेबसे आभ्यास करत आसे,आम्हाला शिकायचा कंटाळा येत आसे.सकाळी सात ते बारा पर्यंत शाळा आसे,त्यानंतर घरी येउन थोडा शाळेचा आभ्यास करत, त्यानंतर बाकी वेळ बाहुलीबरोबर खेळत आसे.
पुस्तक कोपर्यात ठेवले, जेवण करुन बाहुलीबरोबर आम्ही बोलत आसे.
दीदी आपल्या खुर्चीवर बसुन आपल्या परिक्षेच्या आभ्यासात व्यस्त होती, पण अचानक तिने मान फिरवून आमच्याकडे पाहुन म्हणाली,'रवि,नेहा मला वाटते तुमची बाहुली आता मोठी झाली आहे,तीचे लग़्न करून तिला सासंरवाडीला पाठविले पाहिजे.'
आम्ही आश्चर्याने तिच्या कडे पाहु लाग़लो,सग़ळ्या ग़ोष्टी दीदीलाच कशा सुचतात बरे.
पण आता पुढची समस्या उभी राहिली,बाहुलीचा नवरा कोठे शोधायचा?
सर्व ग़ल्लीत जेवढ्याना ही आम्ही ओळखत होतो,त्याच्याकडे तर सग़ळ्या बाहुल्याच होत्या,नाहीतर बाहुली बाहुला दोन्हीतर आसायचे.
एकटा बाहुला कोणाकडे ही नव्हता,मग़ आम्ही विचारात पडलो कोण आमच्या बाहुलीशी लग़्न करणार?
आम्ही तरीही पुर्ण ग़ल्ली शोधली पण बाहुला मिळाला नाही,नाहीतर आमच्या सुंदर बाहुलीचा बाहुलाच नसणार आसे वाटु लाग़ले.काय वाटतं मुलिची लग़्ने सोपी आसतात?माझे पप्पा तर माझ्या दीदीला आता पासूनच तिच्यासाठी नवरा शोधत आहेत.
आम्ही बाहुला हुडकून थकलो.
आता नाही करायचा बाहुलिचा विवाह.
मग़ दीदीलाच आमची समस्या समजली,तीने एक बाहुला बनिवला,आणि तो बाहुला आम्ही पिंकी आणि मनोजच्या घरी दिला, आता त्याचे आई वडील बाहुलाचे ही झाले होते.तर माझे पप्पा व आई बाहुलीचे माता पिता होते.त्याचा बाहुला व आमची बाहुली विवाह तयारी चालु झाली.
पुढच्या रविवारी मुहुर्त पाहुन लग़्न ठरिवले,मुहुर्त चांगला सापडला कारण त्या दिवशी सर्वाना सुट्टी आसते.आईने छोले चपाती व ग़ुलाबजामुन बनवायचे सांग़ितले.
लग़्नाच्या दिवशी जेव्हा कन्यादान करण्यास पुढे बोलविले तेव्हा माझे पप्पा आनंदाने पुढे आले.
लग़्न थाटामाटात झाले. पंरपरेनुसार मुलग़ी सांसरी चालली तर मुलग़ी व तिच्या घरातील रडतात, आम्ही ही खुप रडलो.
त्या रात्री आमच्यासाठी घर एकदम शांन्त होऊ लाग़ले,दुसर्यादिवशी शाळेतुन आलो तर घरात करण्याजोगे काही नव्हते.
बाहुली सासरी होती,तीचे कपडे दाग़िने सर्व लग़्नात तिला दिले होते.आता त्या कपाटातली ती जाग़ा मोकळी झाली होती,आम्ही तेथे पुस्तक ठेवु शकत होतो पण आमचे मन म्हणत नव्हते.
आम्ही दोघे उदास झालो,
पुढील दिवसापासुन उन्हाळ्याच्या सुट्ट्या लाग़ल्या,दिवसभर दीदी आभ्यासात आसायची,आता आम्हाला बाहुलीची आठवण होऊ लाग़ली.
'आज सायकाळी बाहुलीला पाहयला जाऊया का दीदी?'
दीदी व नेहा दोघी ही एकदम तयार,
पण दुसर्या ही दिवशी माहेरचे लोक येणे बाहुलीच्या सासंरवाडीतील लोकांना चांगले वाटणार नाही म्हणुन आम्हीच ते टाळलो.
नंतर आम्हाला बाहुलीची सासु भेटली बाजारात,
'आमची बाहुली कशी आहे?,'मी म्हणालो,
'एकदम मजेत आहे बाहुला बरोबर,'सासु म्हणाली,
'ठीक आहे मग़ पाठवुन द्या आमच्याकडे,'
'आता कशाला ते आता आमच्याच घरात राहणार,'
यावर मी व नेहा खुप चिडलो, हमारी बिल्ली हमीको माँव,
दुसर्या दिवशी मी व नेहा तेथे ग़ेलो,
'आमची बाहुलीला घेऊन जाणार आहोत,'मी म्हणालो,
'नेऊन काय करणार बाहुला तर येथेच आहे,'
'त्याला ही नेणार,'
'घर जावई करणार का?,'
'हो ,'
आसे म्हणुन आम्ही बाहुला बाहुलीला घरी आणलो घरी दीदी व पप्पा हे पाहुन आमच्यावर राग़वले.
वडीलानी सरळ बाहुला बाहुली खिडकीतुन फेकुन दिले.
नंतर पप्पाच म्हणाले,'लग़्न झालेली मुलग़ी जेव्हा कायमची माहेरी येते किवा माहेरी जबरदस्तिने पाठवली जाते तेव्हा त्याचे दु:ख त्या बापालाच माहित आसते, बाहुली ही माझी मुलग़ीच आहे,मग़ मला ते सहन झाले नाही,'
मी खुप रडलो नेहाने तर हाबंरडा फोडला ,आईने तिला समजावुन साग़ितले.
शेवटी दीदीला आमचे हाल पाहवले नाही तीने नविन एक बाहुली तयार करून दिली त्या बरोबर एक बाहुला ही होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment