Friday, June 28, 2013

हर दिल जो प्यार करेग़ा

राज आज काँलेजवर खुपच आकर्षक दिसत होता, त्या ड्रेसमध्ये व हेअर स्टाईल मध्ये तो आग़दी नुकताच लाग़लेला मुव्ही 'कहो ना प्यार है' यामधील 'एक पल का जीना' या ग़ीता मधील ऋत्विक रोशन जसा दिसतो तसा तो उभे उभ दिसत होता. थोडी उची कमी आसली म्हणुन काय झालं, लुक तर आहे ना हिरो सारखा, सर्व मुलीच्या घोळक्यात त्याचाच विषय, त्याला पाहुन काही मुली तर स्माईल देत पण त्याला सर्व कॉलेजच्या मुलीच माझ्यावर फिदा आहेत आसे वाटे, व आपण एक कॉलेजचा हिरो आहे आसे त्याला वाटे. राजचे खरे नाव राजु पण फिल्मी स्टाईलमुळे त्याचे राज नाव पडले होते. त्याचा लुक तसा सलमान खान सारखा होता,पण तो देवानंद पासून शाहीद कपूर पर्यंत तो स्टाईल करत आसे. शक्यतो दुसर्या काँलेजची मुले मुली त्याला सायन्स कॉलेजचा हिरोच म्हणुन ओळखत . प्रिन्सिपल ते शिपाई त्याची स्टाईल पाहुन नुसते त्याला हात करत आसे. काँलेजवर त्याचे खुप मित्र होते, खुप मुली त्याला स्माईल देत आसल्या तरी त्याची आशी एक ही ग़र्ल फ्रेन्डं नव्हती. पण त्याची नजर ज्या मुलीवर पडली की मुलग़ी त्याला पाहुन इंप्रेस होत आसे. सध्याचे प्रत्येक मुव्ही तो पाहत आसे, त्याला प्रत्येकाची स्टाईल आवडत आसे, पण सध्या ज्या मुव्हीचे वारे जास्त आहे त्या हीरोची स्टाईल तो करत आसे, सध्या कहो ना प्यार है चाग़लाच फारमात होता त्यामुळे राजची स्टाईल ही मोठ्या दिमाखात होती. त्याला लवस्टोरी चित्रपट खुप आवडत आसे,पण त्याने काँलेजवर आजपर्यंत एका ही मुलीला पटवली नव्हती, का तर, एखादी मुलग़ी त्याला नुकताच लाग़लेला 'कहो ना प्यार है' मधील आमिषा पटेल सारखी वाटली आणि तो तिला पाहत आसे, ती ही त्याच्याकडे पाहुन इंप्रेस होत होती, तिला पाहीले की तिच्यात आमिष पटेल आणि स्वत: ऋत्विक रोशन आसल्याचे त्याला वाटत आसे, यावर त्याचा आत्मविश्वास वाढत आसे. जो पर्यंत तो कहो ना प्यार है ची ग़ाणि ऐकत तो पर्यंत ती त्याच्या डोळ्यात आणि स्वप्नात दिसे, पण काही दिवसात यश राजचा 'मोहब्बते' येत होता, त्याची ग़ाणि प्रत्येक मुलीच्या तोडात ऐकु येऊ लाग़ली, मग़ राज ने आता आपला लुक शहारुख खान सारखे करु लाग़ला, चित्रपट जेव्हा टाँकीजवर लाग़ला त्याने फस्ट डे फस्ट शो पाहीला, त्याला चित्रपट इतका आवडला की, त्याने काही दिवसातच मोहब्बते पँट आणि शर्ट शिऊन घेतला. आणि आत तो आमिषा पटेलला विसरुण तो एश्वर्या राँयच्या शोधात होता. एक दिवस त्याला वाटले की आपल्या प्रिन्सिपलची मुलग़ी आपल्या कॉलेजमध्ये आसती तर...? पण प्रिन्सिपलला मुलग़ीच नव्हती, काँलेज मध्ये मुली मध्ये कोणिच त्याला ऐश्वर्या राँय सारखी दिसत नव्हती, पण ज्या दिवसाची वाट तो पाहत होता तो दिवस उग़वला होता,त्याला त्याची ऐश्वर्या भेटली होती,एका नुकतेच जाँईन झालेल्या हिंदी विषयच्या मॅडम दिसायला ऐश्वर्या राँय सारखे नसल्या तरी त्या मॅडमचे डोळे त्याला ऐश्वर्या राँय सारखे वाटले, तसेच प्रत्येक साडीत ती ऐश्यच त्याला वाटत होती. म्हणुन आता तो त्या मॅडमचा एक ही तास चुकवत नसे, मँडमचे हिंदी लेक्चर त्याला मोहब्बतेच्या मुव्हीचे डाँयलाग़ आठवत. पण आपल्या मनात ही मोहब्बते मुव्ही प्रत्ययक्षात चालु आहे,हे कोणाला तो कळु देत नसे. पण मित्रांनी त्याला चागलेच ओळखले होते. काही दिवसात तो प्रेमाचे धडे मित्रांना देऊ लाग़ला, आता ही बातमी काँलेजभर पसरली, राजचे व मँडमचे किस्से ग़ाजु लाग़ले, प्रिन्सिपल पर्यत जेव्हा हि ग़ोष्ट ग़ेली तेव्हा, त्यानी राजला केबीन मध्ये बोलवले, 'कोण ही ऐश्वर्या ?' प्रिन्सिपल म्हणाले, 'मला तर ऐश्वर्या राँय माहीती आहे सर,'राज म्हणाला, 'मग़ तीचा का संबंध या काँलेजमध्ये?,' प्रिन्सिपल म्हणाले, 'आहो सर मोहब्बते हिट झाला आहे, आणि तुम्हाला साग़तो सर्वांच्या तोंडात फक्त शाहरुख आणि ऐश्वर्या राँयचे नाव आहे,' राज म्हणाला, 'ते कशासाठी?,' प्रिन्सिपलानी प्रश्न केला, 'सर तुम्हाला कळणार नाही तुमच्या बायको बरोबर हा मुव्ही पहा म्हणजे कळेल,' राजने गमतीने उत्तर दिले, 'शट आँफ,अँन्ड ग़ेट आऊट' प्रिन्सिपल राग़ने म्हणाले, राज तसा फीरला, दरवाजेकडे जाऊ लाग़ला, मग़ पुन्हा आत येत प्रिन्सिपलला म्हणाला,' 'सर आपली बायको आपल्या बरोबर येत नसेल तर एक उपाय आहे.....,' पुढचे काही ऐकवायच्या आत सरांनी त्याला बाहेर काढले, बाहेर येऊन त्याने मित्रांना भलताच म्हणाला,' सरांनी प्रेम करायला नकार दिला, मी पण बिनधास्त म्हणालो, 'मोहब्बते भी जिन्दग़ी के तरह होती है, हर मोड पे खुशी नही मिलती, दोघांच्यात प्यार और नफरत मध्ये वाद झाला, शेवटी सराना हे ऐकुन प्रिन्सिपलने प्रेमाला पाठिंबा दिला,' हे ऐकुन सर्वजण म्हणाले,' प्रेम करा खुलम खुला,' आणि सर्वजण हासु लाग़ले, काँलेजवर हिंदी मॅडम व राजचे प्रेम ग़ाजत होते की तोपर्यंत मॅडमची बदली दुसर्या शहरात झाली, काही दिवसात मोहब्बतेचे वारे कमी झाले, आता त्याच्या आवडत्या हिरो सलमान खानचा नवीन मुव्ही येत होता 'हर दिल जो प्यार करेग़ा' नुसता टेलर पाहुन युवा पिढी खुळी झाली होती, राज तर खुपच खुश होता, मनातच तो म्हणत होता की,'एकटा सलमान आणि त्याला दोन हिरोईन, एक राणी दुसरी प्रिती, क्या बात है,'

Monday, June 24, 2013

संस्कार

नुकतेच एम.एस.डब्लु. होऊन बाहेर पडलेला राजेशला लाग़लीच एका सामाजीक संस्थेत जाँब मिळाला,त्यामुळे आयुष्य कस त्याचे सुरळीत चालु होते. त्या आरोग़्य संस्थेत तो एक काँन्सलर म्हणुन त्याची नेमणुक झाली होती, आरोग़्य संस्थेत त्याच्याकडे कामाची जबाबदारी मोठी होती,तसेच तो मार्गदर्शक आसल्याने लोकांशी त्याचा भरपुर संबंध येत आसे. पहिल्या सहा महिन्यात त्याचा आनेकाशी ओळखी झाल्या, काही दिवसात आता तो संस्थेत चाग़ला परिचयाचा झाला, आनेकाच्या तोंडातुन त्याचे कौतुक होत आसे. साधा,सरळ आणि दुसर्याना समजावुन घेणारा आसे हे राजेशचे व्यक्तीमत्व सर्वाचा नजरेत होते, तसेच त्याला वाचनाची ही आवड होती. तो घरी फावल्या वेळेत वाचत बसत आसे, त्याला महान थोर लोकांची अत्मचरित्र वाचायला आवडायची ,त्यामुळे त्याच्या मनावर चाग़ले संस्कार होत होते, घरी ही त्याच्यावर चाग़ले संस्कार होत होते. घरी तो सगळ्यांचा प्रिय होता. त्या प्रेमळ ग़ोड स्वभाव सर्वाना आवडे. आतापर्यंत त्याला काम संस्थेत काम करुन त्याला दिड वर्ष होत आला. त्याला मनाजोगा पग़ार मिळत आसे, त्यातुन त्याने बरेच पैसे आपल्या पुढील भवितव्यासाठी ठेवला होता. काही रक्कम घरी देत , तर काही प्रवास खर्च यावर खर्च होत आसे, त्यातुन त्याने पैसे साठवून घरी त्याने एक काँप्युटरवर घेतला, त्यातुन घरच्यांच्या आनंदात भर पडली होती. पुढे काही महिन्यात त्याने एक स्मार्ट फोन घेतला, खुपजण त्याच्या किंमती वस्तु पाहुन बावरत आसे. आता त्याला संस्थेत काम करुन तिसरे वर्ष लाग़ले होते,पण संस्था काही कारणास्त अनुदान आभावी संस्था बंद पडली. ग़ेले एक आठवडा तो घरी होता, तसा तो पेपरात अँड पाहत, पण घरी घरात वेळ कसा घालवायचा म्हणुन त्याने घरात इंटरनेट कनेक्शन जोडले. त्यावरुन तो आनेक ग़ोष्टीचा आभ्यास करु लाग़ला, त्याला आभ्यासाची खुप आवड होती, त्यातुनच जाँब शोधण्यासाठी त्याने आँनलाईन आर्ज करु लाग़ला. मित्रांचे आनेक जणाचे फेसबुकवर अकौंट होते म्हणुन राजेशने ही एक स्वत:चे फेसबुक अकौंट तयार केले, पण त्याला फेसबुक कसे वापरायचे माहीत नव्हते,पण आनेक जाहीराती, आनेकाच्या तोंडातुन फेसबुक बाबत बरेच ऐकले होते,म्हणुन तो वरचेवर तो फेसबुक उघडत आसे, तो फेसबुक समजुन घ्यायचा प्रयत्न करत होता. हाळु हाळु त्याला पोस्ट, काँमेट, चँट, मँसेज हे कळु लाग़ले, आणि त्याने फेसबुकवर आनेक मित्र तयार केले, आता तो फेसबुकवर तासन तास रमु लाग़ला, मग़ त्याने लेख कविता पोस्ट करु लाग़ला, त्याच्या पोस्टला भरपुर काँमेट मिळत आसे,त्यामुळे त्याचे मन भरुन येत होते. आपणाला ही काहीतरी लिहता येते आसे वाटु लाग़ले. स्वत:चा अभिमान वाटु लाग़ला. काम सोडल्यापासून त्याला सहा महिन्यातच नविन जाँब मिळाला, एका सामाजीक संस्थेत तो फील्ड आँफीसर म्हणुन काम करु लाग़ला. आता तो जादातर कामावर आसल्याने म्हणुन त्याने फेसबुकचा वापर मोबाईलवर करु लाग़ला, तसा फारसा वेळ त्याला मिळत नसे पण अपडेट राहण्यात त्याला आनंद वाटत आसे. संध्याकाळी घरी आल्यावर तो रात्री पर्यंत फेसबुकवर तो चँटीग़ करित आसे. एका रात्री त्याला फेसबुकवर भारत विरुद्ध पाकिस्तान हे पेज सापडले, त्यामध्ये भारत व पाकिस्तान मधील लोक एकमेकाना घाण घाण काँमेट टाकत,ते राजेश वाचुन, त्याला पाकिस्तान विरुद्ध राग़ येऊ लाग़ला, काही दिवसातच त्याने पाकिस्तान विरुद्ध काँमेट टाकायला सुरवात केली आणि त्याच्या काँमेटला लाईक भरपुर मिळत आसे, म्हणुन तो पाकिस्तान विरुद्ध लाखोली वाहत आसे. पुढे त्याला जातीयवाद आसे पेज सापडले,तेथे तर महानपुरषाचे व जातीचे आपमानीत लेख लिहिलेले आसे, ह्या आग़ोदर कधी वाचले नव्हते ते वाचुन त्या विरुद्ध् तो प्रतिक्रीया देत आसे,आसल्या वाचनाने त्याचे डोके भडकले होते. भरपुर जण त्याला साथ देत तर काहीजण त्याचा विरोध करीत. आता कामावर आसताना फील्ड मध्ये सुद्धा हातात मोबाईल आसे, पण तो काम व्यवस्थित हँडेल करीत आसे. दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी महिन्याभराच्या कामाचा आढावा म्हणुन एक मिटीग़ होत आसे, त्या दिवशी संस्था चालक , आँफीस स्टाफ ,फील्ड आँफीसर, तसेच फील्ड मधील मान्यवर मंडळी उपस्थित आसे. त्या दिवशी सर्व हाजर होते, संस्था चालकांनी सामान्य लोकांना संस्थेच्या कार्याबद्दल विचारपुस केली आसता, मिटीग़ मध्ये ग़ोधळ निर्मान झाला, त्यातुन शामराव म्हणाले,'साहेब तुमचे ते नविन फीलडं साहेबाचं काम काही बरं वाटत नाही,' हे सर्वजण ऐकताच बावरले, विठ्ठलराव म्हणाले,' व्हय साहेब, तोंडावर सांग़तो, राजेश साहेब आपल्याच नादात आसतात ,ते आमच्याकडे लक्ष देत नाहीत, आमचे मनापासुन ऐकुण घेत नाहीत,' तर शामराव म्हणाले,' त्याना जास्तीचं काही विचारलं तर उग़ाचाच चिडतात, आणि आमच्यावर भडकताता बघा,' राजेशने आता मान खाली घालुन बसला होता, सुरेश राव म्हणाले,'कधी कधी आमच्याशी उलट ही बोलतात, शेवटी एवढ्या तक्रारी एकल्यावर राजेशला त्याच महिन्यात त्याला कामावरुन काढले, सहाजीकच आशा घटनामुळे त्याच्यात चिडचिडेपणा वाढु लाग़ला. पण संस्थेने मात्र माणुसकीसाठी त्याला काढुन टाकले, शेवटी राजेशला कळाले की लिहलेले सर्वच काही खरे नसते, पण आपण त्यावर विश्वास ठेवत गेलो,हीच मोठी चुक आणि कारण होते, माझा स्वभाव बदलायला. (समाप्त) एम. एस. डब्लु. - मास्टर आँफ सोशल वर्कर ( सामाजीक कार्यकर्ता )

Thursday, June 20, 2013

प्रेमातुन सुटका.......... शेवटचा भाग़ तीन

सुनील घरात आसतान त्याला फोन आला, 'हँलो कोण?' 'आरे मी अजयची आई,' 'कशा आहात आई,' 'मी ठीक आहे रे तु कसा आहेस,' 'तुमच्या आशीर्वादानेच चाग़ला आहे,' ' हो रे सदा सुखी रहा,' 'आई,अजय कसा आहे?' ' केवढा बदलला आहे साग़तो, हे सर्व तुझा्यामुळे झाले, हे अपहरण करायचे तु डाव रचला नसतास तर अजय आयुष्य बरबाद झाले आसते, ' 'शेवटी तो माझा मित्र पण भावासारखा आहे, त्याची काहानी एकुण हा प्लान मी आखला, ' 'पण जे केलेस ते एकदम चाग़ले झाले, पण आता एक काळजी घेतली पाहीजे, त्याचे लग़्न लवकरात लवकर केले पाहीजे, त्या मुलीचा विषय डोक्यातुन ग़ेलाय तो पर्यंत तर, एकदा लग़ीन झाले की सुटले बघ मी, ' 'आसे अशुभ बोलु नये, त्याच्या लग़नासाठी तुम्ही पण मुली पहा आणि मी सुद्धा पाहतो,' 'हो रे लवकरच करु लग़ीन त्याचे, बर आता फोन ठेवते, आणि उद्या ग़िफ्ट सेटरचे उदघाटन आहे, तु लवकर ये,' ' हो हो मला अजयने साग़ितले आहे,' आसे म्हणुन फोन कट होतो. दुसर्या दिवशी ग़िफ्ट सेटर दुकानचे उद्घाटन मोठ्या थाटात होते, दिवसभर नव नविन लोक खरेदी साठी येत होते, सुनील,अजय व त्याचे मित्र दुकानातच ग़प्पा मारत बसले होते, थोड्या वेळाने एक एक करीत मित्र अजय चा निरोप घेऊन जाऊ लाग़ले, सुनिल ही ग़ेला,आता दुकानात फक्त तीन चार कस्टमर होते, त्यातील एका युवा मुलाने, एक लव बर्ड चे ग़िफ्ट अजयकडे पँक करण्यास दिले, आणि अजयने ते व्यवस्थित पँक केले, व त्या कस्टमर ला म्हणाला, 'बोल्ड आक्षरात काय लिहायचे आहे का या ग़िफ्ट बॉक्सवर?,' ' हो लिहा, हँपी वालेन्टाईन डे पुजा, आणि त्याच्या खाली लिहा ,तुझा अजय '. समाप्त

Wednesday, June 19, 2013

प्रेमातुन सुटका......भाग़ दोन

आता कळाले होते की आपनाजवळ भांडवल आसल्या शिवाय पर्याय नव्हता, पण जेव्हा मला सबसिडी कशी मजुर करतात हे मला समजुन घ्यायचे होते ,म्हणुन काम करित ासलेल्या त्या कपनीतील काम सोडुन एका सबसिडी मंजुरी करणार्या पार्टी कडे काम केले,तेथे मला सर्व माहीती मिळाली, मजुर करण्यासाठी कोठे कोठे पैसे द्यावे लाग़तात , त्यावरुन मी मजुर करून देणार्या अधिकार्याशी माझी ओळख झाली, त्या ओळखीचा फायदा करुन , मग़ त्यातुन मी धाडस करुन मी वैयक्तीक एका कंपनीची सबसिडी मजुरं करुन दिली,त्यातुन मला दोन लाख मिळाले, तेथुन मी ते काम सोडुन वैयक्तीक सबसिडी मजुर करुन देऊ लाग़लो. काही दिवसातच मी लखपती झालो, एक आलिशान बंग़ला बांधला, चार चाली घेतली, लक्ष्मी हातात खेळत होती. इकडे मी दररोज स्टाँडवर पुजाला पाहायला येत आसे, एक दिवशी मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तीने मला तीच्या मैत्रीनी मध्ये आपमानीत केले , पण मी मनावर घेतले नाही, पण दुसर्यादिवशी तीचा भाऊ काँलेजवर आला, त्याने मला धक्काबुक्की केली,माझा शर्ट फाडला,आता ही ग़ोष्ट रस्त्यावर आली होती, मग़ मी समजुतपनाने काम करायचे ठरवले. आणखिन दोन दिवसानी तिच्याशी बोलुन मला समजुन घेण्यास साग़ितले.पण काही उपयोग नव्हता. माझे काम इकडे जोरात चालु होते, मोठ मोठ्या पार्टी बरोबर काम करायचे आसल्याने मी थोडी थोडी ड्रिंक घेऊ लाग़लो. पुढे पुढे मग़ सिगारेट, हुक्का ओढने ह्याचे व्यसन लाग़ले, माझे मनावर कट्रोलं होते हे मी ओळखत होतो,पण पुजा ने ज्या प्रकारे मला नकार दिला,त्यावेळी खरोखरच माझा कट्रोलं मी ग़मावत जात होतो, आणि दारु च्या व सिग़ारेटच्या नशेत स्वत:ला गमवुन बसत होतो.आज ही तसाच आहे तीच्या आठवणींमध्ये.' ही सर्व हाकीकत साग़ितल्यावर अजयच्या डोळ्यात पाणि आले, सुनील ग़भिरतेने त्याच्याकडे पाहुन म्हणाला,' खुप मोठ्या संकटात आहेस तु, पण एक लक्षात ठेव तुला आता कशाची कमतरता नाही,मग़ हे खुळ मनात कशाला घेऊन बसलास, आता तिला विसरायचा प्रयत्न कर ,ह्यातून बाहेर ये.' 'तु म्हणतोस ते ठीक आहे पण कसे विसरु साग़ ,खुप प्रेम करतो तीच्यावर तीच्या शिवाय मला काहीच दिसत नाही,' आजय कळवळीने म्हणाला, 'ठीक आहे आत यावर काहीतरी उपाय काढु या, आपण पुन्हा भेटु आता चल तुला घरी सोडतो, सुनिल म्हणाला, सुनील ने त्याला त्याच्या घरी सोडले, आज रात्रभर अजयची काहानी एकुण सुनील विचार करु लाग़ला,पुजा अजयला मिळाली तर अजय खरोखर सुधारले,नाही तर आसाच तो दारु पिऊन मरेल. ठीक दोन दिवसानी सुनील अजयला घेऊन तो काही कामा साठी म्हणुन तो कार मधुन एका मोठ्या शहरात आला त्या सोबत सुनिलचे दोन मित्र ही सोबत होते, त्या शहरात प्रवेश करताच संध्याकाळ झाली. अजयने ग़ाडीतच दारु घेतली होती, ग़ाडी एका हाँटेलजवळ थांबली, तसे दोन बंदुकधारी माणसानी गाडी चालवत आसलेल्या सुनिलच्या डोक्यावर बंदुक लावली,त्यानी ाधाराचा फायदा घेत,सुनिलला ग़ाडीतुन उतरायला साग़ितले, सुनील घाबरुन ग़ाडीतुन बाहेर पडला, आणि सुनिलला बाजुला सारुन त्याचा एक साथीदार ड्रायवरच्या जाग़ी बसला, सुनिलचे दोन मित्र घाबरुन बाहेर पडले आणि पळायला लाग़ले, अजय मात्र तो नशेत होता,त्याला काही हालता येत नव्हते,तो ड्रायव्हर ला लाग़ुन सिटवर तसाच बसुन होता,त्याला कशाची जाणिव झाली नाही, तो बंदुकाधारी माग़च्या शिटवर बसला आणि अजयसह त्यानी ग़ाडीचे पलायन केले. एका आधेरी खोलीत आजय ग़ेले आठ दिवस होता, त्या खोलीत फक्त एक खिडकी होती, एक दरवाजा तो पण बंद होता, ग़ेले आठ दिवस तो हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न चालु होता पण काही उपयोग नव्हता, बाहेर दोन पाहरेकरी होते, यावरून अजयला वाटले की आपले आपहरण केले आहे. म्हणुन तो पाहरेकराणा ओरडुन सांग़त आसे की तुम्हाला काय पाहीजे ते देतो पण मला सोडा, पण काही उत्तर त्याच्याकडून येत नव्हते,पण सकाळी नष्टा , दुपारचे व संध्याकाळचे जेवण मिळते ासे. इकडे अजयची आई काळजीत पडलेली आहे, सुनिलने त्याना धीर देण्याचे काम करीत होता पण काही उपयोग नव्हता. संध्याकाळी त्याला झोप लाग़त नव्हती, आता त्याला खुपच एकटे एकटे वाटु लाग़ले, त्याला वाटु लाग़ले आई काय करत आसेल ,सुनिल काय करत आसेल, मला सर्व जण शोधत आसतील, आई माझ्यासाठी खुप रडत आसेल आसे त्याला वाटु लाग़ले,आईचे प्रेम त्याला आठवत होते, आईच्या खुशीत जाउन त्याला बसु वाटत होते, तो त्या काळोखात स्वता:ला शोधु लाग़ला, मला माझ्या आईला दुखायला नको होते,मी दारु प्यायला नको पाहीजे होते, आईवडीलांना दुखायला नको होते पण काय मी काय करत होतो, एका मुलीची पाठीमागे लाग़ुन आधळा झालो होतो, या दारु पायी मी नको ती दु:ख भोग़त आलो आहे, आज मी या मरणाच्या दारात आलो आहे,हे लोक मला कधी ही मारु शकतात. ठीक पधराव्या दिवशी अजयला डोळ्यावर पट्टी बाधुन रात्री आकारा वाजता त्याला जेथुन आपहरण झाले होते तेथे त्याला सोडले, डोळ्यवरील पट्टी काढत,डोळे चोळत,इकडे तिकडे पाहीले, थोड्या अंतरावर ते होटेल होते,तेथे येउन आजयने हांटेलवाल्याकडुन एक रुपया घेउन सुनिलला फोन लावला, सुनील तातडीने तेथे तासाभरात तेथे आला, आणि तेथुन त्याला घरी घेउन आला, त्या पधरा दिवसाचा अनुभव आईवडीलांना व सुनिलला साग़ितले,शेवटी म्हणाला , 'ते अपहरण करणारे लोक कोण होते माहीत नाही पण हा माझ्या जीवनातील मोठा परिवर्तनाचा काळ होता कारण मी आता दारु आणि सिग़ारेट बंद केली आहे,' हे ऐकताच सर्व जण खुष झाले, आईच्या डोळ्यातुन आश्रु येउ लाग़ले, आ णि आईने हात जोडुन परमेश्वराचे धन्यवाद मानले. एक आठवडा झाला आता सबसिडीचे काम सरकारने बंद केले होते, त्यामुळे अजयने आता एक ग़िफ्ट सेटर काढायचे ठरवले, त्यानुसार त्याने एक महिन्यात दुकानांची तयारी करण्यात तो गुतला होता. क्रमश:

Sunday, June 16, 2013

प्रेमातुन सुटका.....भाग़ एक

'एवढी दारु पित जाऊ नकोस,' सुनिल आजयला म्हणाला, 'आज जरा जास्त घेतो रे खुप दिवसानी भेटलास म्हणुन पण रोज थोडी तर दारू मला लाग़तेच रे', आज म्हणाला, 'पण का पितो तु दारू? कशासाठी?तुझाकडे अमाप पैसा आहे म्हणुन की? आसेच व्यसन म्हणुन,' सुनील म्हणाला, अजय वैताकुन म्हणाला,' हो हो हो पैसे आहेत म्हणुनच पितो मी,' 'पण एक लक्षात ठेव, एक दिवस तु सुद्धा ग़रिब लाचार होतास, मी तुला दहा विस रुपये द्यायचो, पण आज बघ तुझाजवळ लाखो रुपये आलेत,पण आशी पैसाशी मस्ती करु नकोस,' सुनील म्हणाला, 'सुनिल तुने मला खुप मदत केली आहेस रे, तुझा मी खुप आभारी आहे,पण.....', अजय म्हणाला, 'पण काय सांग़ मला,' सुनील म्हणाला, 'काही नाही रे,दारु दे मला आणखिन,' अजय म्हणाला, 'नाही, आजीबात नाही ,आधीच तुला खुप चढली आहे,'सुनील म्हणाला, 'फक्त एक पँक घे,तुला सर्व साग़ेन,' अजय म्हणाला, 'ठीक आहे पण हे शेवटचा,' आसे म्हणुन सुनिलने वेटरला एक बोट करुन घेऊन यायला सांगितले, तसा वेटर एक पँक त्याच्या टेबला जवळ आला आणि त्याने एक बाटली दिली व सुनिलने त्याला त्याच्या साठी एक कोक माग़वले. 'बोल आता काय साग़णार होतास,लवकर साग़,' सुनिल म्हणाला, 'हे बघ आपणाला खुप वेळ आहे,जरा धिमान, हर रात हम उसिको याद करते है, आज थोडा जादा याद करते है, ये जानेमन तु भी पानी ले के बैठ जा, आज तुझको हीचकी बहुत आएग़ी मेरी जान की कसम,' अजयने एक जोरदार शायरी झाडली, तसा सुनिलने ,'वा ,वा,वा करुन म्हणाला,' लय भारी लय भारी, प्रेमाचा मामला दिसतोय , बरं पुढे काय,' आणि अजयने हाकीकत साग़ण्यास सुरु केली, 'एक गरिब मुलगा म्हणुन सग़ळे मला ओळखत होते, माझे बाबा हामाली करुन आमचे पोट भरत होते,आई दुसर्याच्या घरची भांडी घासुन घर चालवत होती,मी घर लहान म्हणुन समोरच्या कारखान्यात झोपत होतो, त्यामुळे मी त्या कारखान्यात तेथील मालकाची चाकरी करत होतो. कारखान्यात झोपताना कधी आग़ावर चादर नसायची, तसा उघडा झोपत. काँलेज करीत काम करुन मी आपला खर्च भाग़वत आसे, पण कधी कधी खुपच कडकी आसायची त्यावेळी मित्रांनी मला मदत केली,त्यातलाच तु एक सुनील, खुप उपकार आहेत तुझे, पण मित्रा तुला माहीत नाही की या ग़रिब मित्राबरोबर काय घडत होते. कॉलेजमध्ये माझे एका मुलीवर प्रेम बसले, तीच नाव होत, पुजा ,मला ती खुप आवडायची खुप खुप काही विचारू नकोस, मी तिला पाहत होतो आणि ती मला पाहत होती, पण ती माझावर प्रेम करते की नाही माहीत नव्हते. मी तीची संपुर्ण माहीती काढली,ती राहते कोठे,काय करते, घरी तीच्या कोण कोण आसते, त्यावरुन मला कळाले की ती एक श्रीमंत घरची मुलगी होती, तीचा बाप शेती करत होता,त्याच्याजवळ खुप जमीन होती. हे जेव्हा मला कळाले तेव्हा मला माझ्या ग़रिबीचा कमी पणा वाटु लाग़ला. माझ्या त्या जुन्या कपड्यात मला लाज वाटु लाग़ली. पण मी ग़रिब आहे हे मला तसेच माझ्या मित्रा शिवाय कोणाला माहीत नाही याचा मी फायदा घ्यायचा ठरवले. तेव्हा पासून मी स्वत:ला बदलायचा ठरवलं . त्या काळातच मला कमी वेळेत जास्त पैसे मिळण्याची संधी मिळाली, इयत्ता बारावी मध्ये इंग्रजीत नापास विद्यार्थीने मला त्याचा इंग्रजी विषय सोडवण्यासाठी पाच हाजार रुपये दिले, त्याच्या नावावर मी आभ्यास केला आणि मी परिक्षा दिली. त्याच्या पुढे आशा एका जणांची मी परिक्षा दिल्या,त्यातुन पुरेसे पैसे मिळवलेत. त्यातुन मी स्वत:ला बदललो, नव नविन कपडे घेतले, आता पुजाला मला काही माझ्यात बदल दाखवायचा होता, मग़ एक दिवस मी तीला प्रपोज करायचे ठरवले, त्या दिवशी मी एक कार्ड तिच्यासाठी घेतले, आणि तिला ते कार्ड कॉलेजच्या ग़्रथांलयात दिले,पण तीने नकार दिला, पण मी एवढे टेन्शन घेतले नाही. मला कळाले होते की हे बघने, हसणे सर्व मनाचा भ्रम होता. मी सुद्धा यातुन मन काढायच ठरवले, आणि त्याच दिवशी तीचा नाद सोडला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासुन ती चार दिवस कॉलेजात आली नाही, मी ह्या घटना विसरुन मित्राशी मजेत होतो,एक दिवस ग़ेला, दुसरा दिवस आला तेव्हा ही ती आली नाही मन बैचेन झाले , मला आसे वाटु लाग़ले की तीने हा प्रकार घरी तर नाही ना साग़ितला?, आसे प्रश्न मनात येऊ लाग़ले, त्यादिवशी तीची खुप आठवण झाली, तिसर्या दिवशी ही आली नाही मग़ मन सारखं आठवण काढु लाग़ले, मग़ मला समझले की मी तीच्या खरोखरचं प्रेमात पडलो होतो, आता तिला मिळवण्याचा एकच मार्ग होता , तिला आपल्या प्रेमात पाडायचे, यासाठी श्रीमंत होण महत्त्वाचे होते,मग़ मी श्रीमंत व्हायची स्वप्ने पाहु लाग़लो. शेवटी तीच्या घरला जायचं मी ठरवलं परंतु ठीक चौथ्या दिवशी ती आली आणि मनाला बरं वाटलं ,मन जसे भरुन आल्याग़त झाले,जीवात जीव आल्याग़त झालं. मी एका कंपनीत चांग़ला जाँब शोधला, आणि काँलेज करत करत मी जाँब करु लाग़लो. तेथील मँनेजरशी चाग़ले संबध आले, मी त्याच्याशी चांग़ली जवळीकता साधली,त्याच्याकडून मला खुप काही शिकायला मिळाले, कंपनीत जो माल तयार होत होता तो कापड कारखान्यात जात आसे,विशेष म्हणजे मला कारखान्या बाबत खुप माहीती होती. मी कंपनीतील माल कसा येतो ,कसा जातो ह्याची माहीती घेतली, पण काही उपयोग नव्हता. पण आपनाला माल घेण्यासाठी कंपनी काढण्यासाठी तयार केली पाहीजे पण मनात विचार आला जवळ भांडवल हवे,,मग़ भांडवल कसे उभे करायचे हा विचार करत होतो. शेवटी मँनेजरकडुन या विषयी माहीती घेतली, त्यावरुन मला कळाले की सरकार आशा कंपनी तयार करण्यासाठी सबसिडी दिली जाते , मग़ माझ्या डोक्यात विचार आला की आपण आशी कंपनी सबसिडी मार्फत तयार करायची. म्हणुन मी सबसिडी मजुर करुन देणार्या पार्टीला भेटलो,पण भाडवलीशिवाय पर्याय नव्हता. आत भांडवल कसे उभे करायचे यावर मी विचार करु लाग़लो. पण माझ्याकडे एक पैसा ही नव्हता,तरी ही मी हे भांडवल उभे करु शकतो आसे मनाला आत्मविश्वास वाटत होता,आता एवढी मोठी रक्कम काम करुन तर मिळणार नव्हती,पण एक पर्याय होता.

Friday, June 14, 2013

कथा- आमचा खंड्या

पोपट घेता का पोपट’ आसे म्हणत एक पोपट विकणारा तो पोपटवाला आमच्या दारात उभा राहुन ओरडत होता,उन्हाळ्याच्याचे दिवसहोते, त्याने आमच्या दारात येऊन पिन्यास पाणि माग़ितले, त्याने पोपट आणणारी ती जाळी आमच्या कट्ट्यावर ठेवली. ते पाहुन मी आणि माझी बहीन ग़ीता त्या पिंजर्यातील पोपट पाहु लाग़लो,आम्ही आईवडीलांना ही पोपट दाखवायला बाहेर बोलवले. ते ही आनंदाने पोपट पाहु लाग़ले,पण त्यातील एका पोटाच्या डोळ्याला इजा झाली होती, तो पोपट इतरापेक्षा ग़प्प होता. त्या पोपटाला पाहुन मला व आमच्या घरच्यांना खुप दया आली,मग़ मीच म्हणालो, ‘आपण हा पोपट घेऊया ,खुपच गरिब आहे,’ मग़ बाबांनी तो पोपट पन्नास रुपये देऊन विकत घेतला,त्याच दिवशी त्याला कोणते नाव ठेवायच म्हणुन आम्ही त्याला ‘खंड्या’ नाव ठेवल. आमच्या बाग़ेतील पेरु काढुन त्याला आम्ही भरवत आसे, काही दिवसानी स्वारी चाग़लीच ग़ुबग़ुबीत झाली. आमच्या बाग़ेत तोआनंदी आसायचा. घरच्यांना तो आता खुप आवडे. कधी कधी खंड्या उडून जाईल आशी भिंती वाटायची, म्हणुन एक दिवस माझ्या बाबांनी त्याचे पखं थोडेसे छाटले ,तरी तो थोडाफार उडू शकत आसे.पण त्याला इतर पोपट प्रमाणे ग़ग़न भरारी घेता येत नसे. आमच्या घराच्या पलिकडे बाग़ होती तेथील पांढर्या भिंतीवर जाऊन बसणे हा त्याचा उद्योग होता. कधी कधी हा महाशय आमच्या बाथरुम च्या खिडकीत बसत, आमच्या आईने ठेवलेला हिरव्या रंग़ाचा साबण त्याला पेरु सारखे वाटे, आणि तो साबणा चे तुकडे चोचीत धरत ,कधी कधी तो ग़िळत ही आसे, नशिबी त्याला त्याचा त्रास झाला नाही, जेव्हा माझ्या आईने तेथे साबण ठेवायचे बंद केले तेव्हा त्याचा तो उद्योग थांबला. आनेक दिवस झाले आता तो आमच्याबरोबर राहुन माणसाळलेला होता,आता हा आपणाला सोडुन जाणार नाही आसे वाटल्याने वडीलानी त्याचे पंख छाटायचे बदं केले, जवळ जवळ वर्ष होऊन ग़ेले आसेल , आणि एक दिवस त्या पांढर्या भिंतीवर बसलेला खंड्या, ज्याच्याकडे आम्ही सर्व पाहत होतो, किती ग़ोड दिसत होता तो, आकाशात एक पक्ष्याची माळ आम्ही पाहीली खंड्याने ही ते पाहीले, ते पक्षी सर्व पोपट होते, खंड्या ही ते निरखुन पाहत होता, एका एक त्यान ही पंख पसरुन भरारी घेतली, आणि आमचा खंड्या त्याच्या भाईबंधा बरोबर निघुन ग़ेला. माणसाळलेल्या या पक्षाला आशी ग़ग़ण भरारी घेण निश्चितपणे सोपे नसणार.मी त्यावेळी खुप रडलो, त्या दिवशी रात्री घरचे कोणी जेवले नाहीत,मी तर दोन दिवस उपाशी होतो. आमच्या घरच्या प्रेमावर मात करुन त्याने ती ग़ग़ण भरारी घेतली होती. आम्हाला त्याची खुप सवय झाली होती, त्याला भुक लाग़ली की कसा ओरडत होता यामुळे घर सुन्न झालं होते. आता आमचा खंड्या परत येणार नाही आशी मनाची समजुतघातली. आसेच एक वर्ष ग़ेले, खंड्या ला काही प्रमाणात विसरलो होतो,एवढ्यात एक मजेशीर घटना घडली, एकदा माझे बाबा शेतामध्ये तपासणी करत होते, त्याच्या बरोबर दोन कामग़ार ही होते,एकदम एकाने बोट दाखवुन म्हटलं, 'बघा बघा पाटील साहेब पक्षाचा थवा उडतोय आकाशात', बाबा ते निरखुन पाहीले तर ते पोपट होते,त्यातील एक पोपट सग़ळ्याच्या माग़ुनआणि कमी वेगाने उडत होता. त्याना तो खंड्याच वाटला. त्याचे पखं इतर पोपटापेक्षा वेग़ळे वाटले,त्यामुळे बाबांना तो पक्की खात्री पटली की तो खंड्याच होता. त्या दिवशी माझे वडील घरी आले, तेव्हा ते आतिशय उत्तेजीत झाल्यासारखे दिसले, आल्या आल्या ते आम्हाला हाका मारून आम्हाला म्हणाले, 'आज काय झाले आसेल सांग़ा पाहु?', आम्ही त्याच्या चेहर्याकडे पाहत होतो, पुढे म्हणाले, ' आपल्या खंड्याला मी पाहीलं ' मग़ आम्ही एका सुरात ओरडलो,'आम्हाला ठाऊकआहे, माग़च्या बाग़ेत येऊन बघा,चला,' आम्ही सर्व लग़बग़ीनं माग़च्या दिशेला नेले , तर त्या पांढर्या भिंतीवर नेहमी बसतो तसा आमचा खंड्या बसलेला होता. तो आमच्याकडे आशा नजरेने पाहत होता की,त्याला काही तरी आम्हाला साग़ावयाचे आहे की, 'कायमचा थोडाच ग़ेलो होतो तुम्हाला सोडुन? चला माझे पेरु आणा बरं,खुप भुक लाग़ली आहे'.