Sunday, June 16, 2013

प्रेमातुन सुटका.....भाग़ एक

'एवढी दारु पित जाऊ नकोस,' सुनिल आजयला म्हणाला, 'आज जरा जास्त घेतो रे खुप दिवसानी भेटलास म्हणुन पण रोज थोडी तर दारू मला लाग़तेच रे', आज म्हणाला, 'पण का पितो तु दारू? कशासाठी?तुझाकडे अमाप पैसा आहे म्हणुन की? आसेच व्यसन म्हणुन,' सुनील म्हणाला, अजय वैताकुन म्हणाला,' हो हो हो पैसे आहेत म्हणुनच पितो मी,' 'पण एक लक्षात ठेव, एक दिवस तु सुद्धा ग़रिब लाचार होतास, मी तुला दहा विस रुपये द्यायचो, पण आज बघ तुझाजवळ लाखो रुपये आलेत,पण आशी पैसाशी मस्ती करु नकोस,' सुनील म्हणाला, 'सुनिल तुने मला खुप मदत केली आहेस रे, तुझा मी खुप आभारी आहे,पण.....', अजय म्हणाला, 'पण काय सांग़ मला,' सुनील म्हणाला, 'काही नाही रे,दारु दे मला आणखिन,' अजय म्हणाला, 'नाही, आजीबात नाही ,आधीच तुला खुप चढली आहे,'सुनील म्हणाला, 'फक्त एक पँक घे,तुला सर्व साग़ेन,' अजय म्हणाला, 'ठीक आहे पण हे शेवटचा,' आसे म्हणुन सुनिलने वेटरला एक बोट करुन घेऊन यायला सांगितले, तसा वेटर एक पँक त्याच्या टेबला जवळ आला आणि त्याने एक बाटली दिली व सुनिलने त्याला त्याच्या साठी एक कोक माग़वले. 'बोल आता काय साग़णार होतास,लवकर साग़,' सुनिल म्हणाला, 'हे बघ आपणाला खुप वेळ आहे,जरा धिमान, हर रात हम उसिको याद करते है, आज थोडा जादा याद करते है, ये जानेमन तु भी पानी ले के बैठ जा, आज तुझको हीचकी बहुत आएग़ी मेरी जान की कसम,' अजयने एक जोरदार शायरी झाडली, तसा सुनिलने ,'वा ,वा,वा करुन म्हणाला,' लय भारी लय भारी, प्रेमाचा मामला दिसतोय , बरं पुढे काय,' आणि अजयने हाकीकत साग़ण्यास सुरु केली, 'एक गरिब मुलगा म्हणुन सग़ळे मला ओळखत होते, माझे बाबा हामाली करुन आमचे पोट भरत होते,आई दुसर्याच्या घरची भांडी घासुन घर चालवत होती,मी घर लहान म्हणुन समोरच्या कारखान्यात झोपत होतो, त्यामुळे मी त्या कारखान्यात तेथील मालकाची चाकरी करत होतो. कारखान्यात झोपताना कधी आग़ावर चादर नसायची, तसा उघडा झोपत. काँलेज करीत काम करुन मी आपला खर्च भाग़वत आसे, पण कधी कधी खुपच कडकी आसायची त्यावेळी मित्रांनी मला मदत केली,त्यातलाच तु एक सुनील, खुप उपकार आहेत तुझे, पण मित्रा तुला माहीत नाही की या ग़रिब मित्राबरोबर काय घडत होते. कॉलेजमध्ये माझे एका मुलीवर प्रेम बसले, तीच नाव होत, पुजा ,मला ती खुप आवडायची खुप खुप काही विचारू नकोस, मी तिला पाहत होतो आणि ती मला पाहत होती, पण ती माझावर प्रेम करते की नाही माहीत नव्हते. मी तीची संपुर्ण माहीती काढली,ती राहते कोठे,काय करते, घरी तीच्या कोण कोण आसते, त्यावरुन मला कळाले की ती एक श्रीमंत घरची मुलगी होती, तीचा बाप शेती करत होता,त्याच्याजवळ खुप जमीन होती. हे जेव्हा मला कळाले तेव्हा मला माझ्या ग़रिबीचा कमी पणा वाटु लाग़ला. माझ्या त्या जुन्या कपड्यात मला लाज वाटु लाग़ली. पण मी ग़रिब आहे हे मला तसेच माझ्या मित्रा शिवाय कोणाला माहीत नाही याचा मी फायदा घ्यायचा ठरवले. तेव्हा पासून मी स्वत:ला बदलायचा ठरवलं . त्या काळातच मला कमी वेळेत जास्त पैसे मिळण्याची संधी मिळाली, इयत्ता बारावी मध्ये इंग्रजीत नापास विद्यार्थीने मला त्याचा इंग्रजी विषय सोडवण्यासाठी पाच हाजार रुपये दिले, त्याच्या नावावर मी आभ्यास केला आणि मी परिक्षा दिली. त्याच्या पुढे आशा एका जणांची मी परिक्षा दिल्या,त्यातुन पुरेसे पैसे मिळवलेत. त्यातुन मी स्वत:ला बदललो, नव नविन कपडे घेतले, आता पुजाला मला काही माझ्यात बदल दाखवायचा होता, मग़ एक दिवस मी तीला प्रपोज करायचे ठरवले, त्या दिवशी मी एक कार्ड तिच्यासाठी घेतले, आणि तिला ते कार्ड कॉलेजच्या ग़्रथांलयात दिले,पण तीने नकार दिला, पण मी एवढे टेन्शन घेतले नाही. मला कळाले होते की हे बघने, हसणे सर्व मनाचा भ्रम होता. मी सुद्धा यातुन मन काढायच ठरवले, आणि त्याच दिवशी तीचा नाद सोडला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासुन ती चार दिवस कॉलेजात आली नाही, मी ह्या घटना विसरुन मित्राशी मजेत होतो,एक दिवस ग़ेला, दुसरा दिवस आला तेव्हा ही ती आली नाही मन बैचेन झाले , मला आसे वाटु लाग़ले की तीने हा प्रकार घरी तर नाही ना साग़ितला?, आसे प्रश्न मनात येऊ लाग़ले, त्यादिवशी तीची खुप आठवण झाली, तिसर्या दिवशी ही आली नाही मग़ मन सारखं आठवण काढु लाग़ले, मग़ मला समझले की मी तीच्या खरोखरचं प्रेमात पडलो होतो, आता तिला मिळवण्याचा एकच मार्ग होता , तिला आपल्या प्रेमात पाडायचे, यासाठी श्रीमंत होण महत्त्वाचे होते,मग़ मी श्रीमंत व्हायची स्वप्ने पाहु लाग़लो. शेवटी तीच्या घरला जायचं मी ठरवलं परंतु ठीक चौथ्या दिवशी ती आली आणि मनाला बरं वाटलं ,मन जसे भरुन आल्याग़त झाले,जीवात जीव आल्याग़त झालं. मी एका कंपनीत चांग़ला जाँब शोधला, आणि काँलेज करत करत मी जाँब करु लाग़लो. तेथील मँनेजरशी चाग़ले संबध आले, मी त्याच्याशी चांग़ली जवळीकता साधली,त्याच्याकडून मला खुप काही शिकायला मिळाले, कंपनीत जो माल तयार होत होता तो कापड कारखान्यात जात आसे,विशेष म्हणजे मला कारखान्या बाबत खुप माहीती होती. मी कंपनीतील माल कसा येतो ,कसा जातो ह्याची माहीती घेतली, पण काही उपयोग नव्हता. पण आपनाला माल घेण्यासाठी कंपनी काढण्यासाठी तयार केली पाहीजे पण मनात विचार आला जवळ भांडवल हवे,,मग़ भांडवल कसे उभे करायचे हा विचार करत होतो. शेवटी मँनेजरकडुन या विषयी माहीती घेतली, त्यावरुन मला कळाले की सरकार आशा कंपनी तयार करण्यासाठी सबसिडी दिली जाते , मग़ माझ्या डोक्यात विचार आला की आपण आशी कंपनी सबसिडी मार्फत तयार करायची. म्हणुन मी सबसिडी मजुर करुन देणार्या पार्टीला भेटलो,पण भाडवलीशिवाय पर्याय नव्हता. आत भांडवल कसे उभे करायचे यावर मी विचार करु लाग़लो. पण माझ्याकडे एक पैसा ही नव्हता,तरी ही मी हे भांडवल उभे करु शकतो आसे मनाला आत्मविश्वास वाटत होता,आता एवढी मोठी रक्कम काम करुन तर मिळणार नव्हती,पण एक पर्याय होता.

No comments:

Post a Comment