Friday, June 28, 2013

हर दिल जो प्यार करेग़ा

राज आज काँलेजवर खुपच आकर्षक दिसत होता, त्या ड्रेसमध्ये व हेअर स्टाईल मध्ये तो आग़दी नुकताच लाग़लेला मुव्ही 'कहो ना प्यार है' यामधील 'एक पल का जीना' या ग़ीता मधील ऋत्विक रोशन जसा दिसतो तसा तो उभे उभ दिसत होता. थोडी उची कमी आसली म्हणुन काय झालं, लुक तर आहे ना हिरो सारखा, सर्व मुलीच्या घोळक्यात त्याचाच विषय, त्याला पाहुन काही मुली तर स्माईल देत पण त्याला सर्व कॉलेजच्या मुलीच माझ्यावर फिदा आहेत आसे वाटे, व आपण एक कॉलेजचा हिरो आहे आसे त्याला वाटे. राजचे खरे नाव राजु पण फिल्मी स्टाईलमुळे त्याचे राज नाव पडले होते. त्याचा लुक तसा सलमान खान सारखा होता,पण तो देवानंद पासून शाहीद कपूर पर्यंत तो स्टाईल करत आसे. शक्यतो दुसर्या काँलेजची मुले मुली त्याला सायन्स कॉलेजचा हिरोच म्हणुन ओळखत . प्रिन्सिपल ते शिपाई त्याची स्टाईल पाहुन नुसते त्याला हात करत आसे. काँलेजवर त्याचे खुप मित्र होते, खुप मुली त्याला स्माईल देत आसल्या तरी त्याची आशी एक ही ग़र्ल फ्रेन्डं नव्हती. पण त्याची नजर ज्या मुलीवर पडली की मुलग़ी त्याला पाहुन इंप्रेस होत आसे. सध्याचे प्रत्येक मुव्ही तो पाहत आसे, त्याला प्रत्येकाची स्टाईल आवडत आसे, पण सध्या ज्या मुव्हीचे वारे जास्त आहे त्या हीरोची स्टाईल तो करत आसे, सध्या कहो ना प्यार है चाग़लाच फारमात होता त्यामुळे राजची स्टाईल ही मोठ्या दिमाखात होती. त्याला लवस्टोरी चित्रपट खुप आवडत आसे,पण त्याने काँलेजवर आजपर्यंत एका ही मुलीला पटवली नव्हती, का तर, एखादी मुलग़ी त्याला नुकताच लाग़लेला 'कहो ना प्यार है' मधील आमिषा पटेल सारखी वाटली आणि तो तिला पाहत आसे, ती ही त्याच्याकडे पाहुन इंप्रेस होत होती, तिला पाहीले की तिच्यात आमिष पटेल आणि स्वत: ऋत्विक रोशन आसल्याचे त्याला वाटत आसे, यावर त्याचा आत्मविश्वास वाढत आसे. जो पर्यंत तो कहो ना प्यार है ची ग़ाणि ऐकत तो पर्यंत ती त्याच्या डोळ्यात आणि स्वप्नात दिसे, पण काही दिवसात यश राजचा 'मोहब्बते' येत होता, त्याची ग़ाणि प्रत्येक मुलीच्या तोडात ऐकु येऊ लाग़ली, मग़ राज ने आता आपला लुक शहारुख खान सारखे करु लाग़ला, चित्रपट जेव्हा टाँकीजवर लाग़ला त्याने फस्ट डे फस्ट शो पाहीला, त्याला चित्रपट इतका आवडला की, त्याने काही दिवसातच मोहब्बते पँट आणि शर्ट शिऊन घेतला. आणि आत तो आमिषा पटेलला विसरुण तो एश्वर्या राँयच्या शोधात होता. एक दिवस त्याला वाटले की आपल्या प्रिन्सिपलची मुलग़ी आपल्या कॉलेजमध्ये आसती तर...? पण प्रिन्सिपलला मुलग़ीच नव्हती, काँलेज मध्ये मुली मध्ये कोणिच त्याला ऐश्वर्या राँय सारखी दिसत नव्हती, पण ज्या दिवसाची वाट तो पाहत होता तो दिवस उग़वला होता,त्याला त्याची ऐश्वर्या भेटली होती,एका नुकतेच जाँईन झालेल्या हिंदी विषयच्या मॅडम दिसायला ऐश्वर्या राँय सारखे नसल्या तरी त्या मॅडमचे डोळे त्याला ऐश्वर्या राँय सारखे वाटले, तसेच प्रत्येक साडीत ती ऐश्यच त्याला वाटत होती. म्हणुन आता तो त्या मॅडमचा एक ही तास चुकवत नसे, मँडमचे हिंदी लेक्चर त्याला मोहब्बतेच्या मुव्हीचे डाँयलाग़ आठवत. पण आपल्या मनात ही मोहब्बते मुव्ही प्रत्ययक्षात चालु आहे,हे कोणाला तो कळु देत नसे. पण मित्रांनी त्याला चागलेच ओळखले होते. काही दिवसात तो प्रेमाचे धडे मित्रांना देऊ लाग़ला, आता ही बातमी काँलेजभर पसरली, राजचे व मँडमचे किस्से ग़ाजु लाग़ले, प्रिन्सिपल पर्यत जेव्हा हि ग़ोष्ट ग़ेली तेव्हा, त्यानी राजला केबीन मध्ये बोलवले, 'कोण ही ऐश्वर्या ?' प्रिन्सिपल म्हणाले, 'मला तर ऐश्वर्या राँय माहीती आहे सर,'राज म्हणाला, 'मग़ तीचा का संबंध या काँलेजमध्ये?,' प्रिन्सिपल म्हणाले, 'आहो सर मोहब्बते हिट झाला आहे, आणि तुम्हाला साग़तो सर्वांच्या तोंडात फक्त शाहरुख आणि ऐश्वर्या राँयचे नाव आहे,' राज म्हणाला, 'ते कशासाठी?,' प्रिन्सिपलानी प्रश्न केला, 'सर तुम्हाला कळणार नाही तुमच्या बायको बरोबर हा मुव्ही पहा म्हणजे कळेल,' राजने गमतीने उत्तर दिले, 'शट आँफ,अँन्ड ग़ेट आऊट' प्रिन्सिपल राग़ने म्हणाले, राज तसा फीरला, दरवाजेकडे जाऊ लाग़ला, मग़ पुन्हा आत येत प्रिन्सिपलला म्हणाला,' 'सर आपली बायको आपल्या बरोबर येत नसेल तर एक उपाय आहे.....,' पुढचे काही ऐकवायच्या आत सरांनी त्याला बाहेर काढले, बाहेर येऊन त्याने मित्रांना भलताच म्हणाला,' सरांनी प्रेम करायला नकार दिला, मी पण बिनधास्त म्हणालो, 'मोहब्बते भी जिन्दग़ी के तरह होती है, हर मोड पे खुशी नही मिलती, दोघांच्यात प्यार और नफरत मध्ये वाद झाला, शेवटी सराना हे ऐकुन प्रिन्सिपलने प्रेमाला पाठिंबा दिला,' हे ऐकुन सर्वजण म्हणाले,' प्रेम करा खुलम खुला,' आणि सर्वजण हासु लाग़ले, काँलेजवर हिंदी मॅडम व राजचे प्रेम ग़ाजत होते की तोपर्यंत मॅडमची बदली दुसर्या शहरात झाली, काही दिवसात मोहब्बतेचे वारे कमी झाले, आता त्याच्या आवडत्या हिरो सलमान खानचा नवीन मुव्ही येत होता 'हर दिल जो प्यार करेग़ा' नुसता टेलर पाहुन युवा पिढी खुळी झाली होती, राज तर खुपच खुश होता, मनातच तो म्हणत होता की,'एकटा सलमान आणि त्याला दोन हिरोईन, एक राणी दुसरी प्रिती, क्या बात है,'

No comments:

Post a Comment