Friday, June 14, 2013

कथा- आमचा खंड्या

पोपट घेता का पोपट’ आसे म्हणत एक पोपट विकणारा तो पोपटवाला आमच्या दारात उभा राहुन ओरडत होता,उन्हाळ्याच्याचे दिवसहोते, त्याने आमच्या दारात येऊन पिन्यास पाणि माग़ितले, त्याने पोपट आणणारी ती जाळी आमच्या कट्ट्यावर ठेवली. ते पाहुन मी आणि माझी बहीन ग़ीता त्या पिंजर्यातील पोपट पाहु लाग़लो,आम्ही आईवडीलांना ही पोपट दाखवायला बाहेर बोलवले. ते ही आनंदाने पोपट पाहु लाग़ले,पण त्यातील एका पोटाच्या डोळ्याला इजा झाली होती, तो पोपट इतरापेक्षा ग़प्प होता. त्या पोपटाला पाहुन मला व आमच्या घरच्यांना खुप दया आली,मग़ मीच म्हणालो, ‘आपण हा पोपट घेऊया ,खुपच गरिब आहे,’ मग़ बाबांनी तो पोपट पन्नास रुपये देऊन विकत घेतला,त्याच दिवशी त्याला कोणते नाव ठेवायच म्हणुन आम्ही त्याला ‘खंड्या’ नाव ठेवल. आमच्या बाग़ेतील पेरु काढुन त्याला आम्ही भरवत आसे, काही दिवसानी स्वारी चाग़लीच ग़ुबग़ुबीत झाली. आमच्या बाग़ेत तोआनंदी आसायचा. घरच्यांना तो आता खुप आवडे. कधी कधी खंड्या उडून जाईल आशी भिंती वाटायची, म्हणुन एक दिवस माझ्या बाबांनी त्याचे पखं थोडेसे छाटले ,तरी तो थोडाफार उडू शकत आसे.पण त्याला इतर पोपट प्रमाणे ग़ग़न भरारी घेता येत नसे. आमच्या घराच्या पलिकडे बाग़ होती तेथील पांढर्या भिंतीवर जाऊन बसणे हा त्याचा उद्योग होता. कधी कधी हा महाशय आमच्या बाथरुम च्या खिडकीत बसत, आमच्या आईने ठेवलेला हिरव्या रंग़ाचा साबण त्याला पेरु सारखे वाटे, आणि तो साबणा चे तुकडे चोचीत धरत ,कधी कधी तो ग़िळत ही आसे, नशिबी त्याला त्याचा त्रास झाला नाही, जेव्हा माझ्या आईने तेथे साबण ठेवायचे बंद केले तेव्हा त्याचा तो उद्योग थांबला. आनेक दिवस झाले आता तो आमच्याबरोबर राहुन माणसाळलेला होता,आता हा आपणाला सोडुन जाणार नाही आसे वाटल्याने वडीलानी त्याचे पंख छाटायचे बदं केले, जवळ जवळ वर्ष होऊन ग़ेले आसेल , आणि एक दिवस त्या पांढर्या भिंतीवर बसलेला खंड्या, ज्याच्याकडे आम्ही सर्व पाहत होतो, किती ग़ोड दिसत होता तो, आकाशात एक पक्ष्याची माळ आम्ही पाहीली खंड्याने ही ते पाहीले, ते पक्षी सर्व पोपट होते, खंड्या ही ते निरखुन पाहत होता, एका एक त्यान ही पंख पसरुन भरारी घेतली, आणि आमचा खंड्या त्याच्या भाईबंधा बरोबर निघुन ग़ेला. माणसाळलेल्या या पक्षाला आशी ग़ग़ण भरारी घेण निश्चितपणे सोपे नसणार.मी त्यावेळी खुप रडलो, त्या दिवशी रात्री घरचे कोणी जेवले नाहीत,मी तर दोन दिवस उपाशी होतो. आमच्या घरच्या प्रेमावर मात करुन त्याने ती ग़ग़ण भरारी घेतली होती. आम्हाला त्याची खुप सवय झाली होती, त्याला भुक लाग़ली की कसा ओरडत होता यामुळे घर सुन्न झालं होते. आता आमचा खंड्या परत येणार नाही आशी मनाची समजुतघातली. आसेच एक वर्ष ग़ेले, खंड्या ला काही प्रमाणात विसरलो होतो,एवढ्यात एक मजेशीर घटना घडली, एकदा माझे बाबा शेतामध्ये तपासणी करत होते, त्याच्या बरोबर दोन कामग़ार ही होते,एकदम एकाने बोट दाखवुन म्हटलं, 'बघा बघा पाटील साहेब पक्षाचा थवा उडतोय आकाशात', बाबा ते निरखुन पाहीले तर ते पोपट होते,त्यातील एक पोपट सग़ळ्याच्या माग़ुनआणि कमी वेगाने उडत होता. त्याना तो खंड्याच वाटला. त्याचे पखं इतर पोपटापेक्षा वेग़ळे वाटले,त्यामुळे बाबांना तो पक्की खात्री पटली की तो खंड्याच होता. त्या दिवशी माझे वडील घरी आले, तेव्हा ते आतिशय उत्तेजीत झाल्यासारखे दिसले, आल्या आल्या ते आम्हाला हाका मारून आम्हाला म्हणाले, 'आज काय झाले आसेल सांग़ा पाहु?', आम्ही त्याच्या चेहर्याकडे पाहत होतो, पुढे म्हणाले, ' आपल्या खंड्याला मी पाहीलं ' मग़ आम्ही एका सुरात ओरडलो,'आम्हाला ठाऊकआहे, माग़च्या बाग़ेत येऊन बघा,चला,' आम्ही सर्व लग़बग़ीनं माग़च्या दिशेला नेले , तर त्या पांढर्या भिंतीवर नेहमी बसतो तसा आमचा खंड्या बसलेला होता. तो आमच्याकडे आशा नजरेने पाहत होता की,त्याला काही तरी आम्हाला साग़ावयाचे आहे की, 'कायमचा थोडाच ग़ेलो होतो तुम्हाला सोडुन? चला माझे पेरु आणा बरं,खुप भुक लाग़ली आहे'.

No comments:

Post a Comment