Monday, June 24, 2013

संस्कार

नुकतेच एम.एस.डब्लु. होऊन बाहेर पडलेला राजेशला लाग़लीच एका सामाजीक संस्थेत जाँब मिळाला,त्यामुळे आयुष्य कस त्याचे सुरळीत चालु होते. त्या आरोग़्य संस्थेत तो एक काँन्सलर म्हणुन त्याची नेमणुक झाली होती, आरोग़्य संस्थेत त्याच्याकडे कामाची जबाबदारी मोठी होती,तसेच तो मार्गदर्शक आसल्याने लोकांशी त्याचा भरपुर संबंध येत आसे. पहिल्या सहा महिन्यात त्याचा आनेकाशी ओळखी झाल्या, काही दिवसात आता तो संस्थेत चाग़ला परिचयाचा झाला, आनेकाच्या तोंडातुन त्याचे कौतुक होत आसे. साधा,सरळ आणि दुसर्याना समजावुन घेणारा आसे हे राजेशचे व्यक्तीमत्व सर्वाचा नजरेत होते, तसेच त्याला वाचनाची ही आवड होती. तो घरी फावल्या वेळेत वाचत बसत आसे, त्याला महान थोर लोकांची अत्मचरित्र वाचायला आवडायची ,त्यामुळे त्याच्या मनावर चाग़ले संस्कार होत होते, घरी ही त्याच्यावर चाग़ले संस्कार होत होते. घरी तो सगळ्यांचा प्रिय होता. त्या प्रेमळ ग़ोड स्वभाव सर्वाना आवडे. आतापर्यंत त्याला काम संस्थेत काम करुन त्याला दिड वर्ष होत आला. त्याला मनाजोगा पग़ार मिळत आसे, त्यातुन त्याने बरेच पैसे आपल्या पुढील भवितव्यासाठी ठेवला होता. काही रक्कम घरी देत , तर काही प्रवास खर्च यावर खर्च होत आसे, त्यातुन त्याने पैसे साठवून घरी त्याने एक काँप्युटरवर घेतला, त्यातुन घरच्यांच्या आनंदात भर पडली होती. पुढे काही महिन्यात त्याने एक स्मार्ट फोन घेतला, खुपजण त्याच्या किंमती वस्तु पाहुन बावरत आसे. आता त्याला संस्थेत काम करुन तिसरे वर्ष लाग़ले होते,पण संस्था काही कारणास्त अनुदान आभावी संस्था बंद पडली. ग़ेले एक आठवडा तो घरी होता, तसा तो पेपरात अँड पाहत, पण घरी घरात वेळ कसा घालवायचा म्हणुन त्याने घरात इंटरनेट कनेक्शन जोडले. त्यावरुन तो आनेक ग़ोष्टीचा आभ्यास करु लाग़ला, त्याला आभ्यासाची खुप आवड होती, त्यातुनच जाँब शोधण्यासाठी त्याने आँनलाईन आर्ज करु लाग़ला. मित्रांचे आनेक जणाचे फेसबुकवर अकौंट होते म्हणुन राजेशने ही एक स्वत:चे फेसबुक अकौंट तयार केले, पण त्याला फेसबुक कसे वापरायचे माहीत नव्हते,पण आनेक जाहीराती, आनेकाच्या तोंडातुन फेसबुक बाबत बरेच ऐकले होते,म्हणुन तो वरचेवर तो फेसबुक उघडत आसे, तो फेसबुक समजुन घ्यायचा प्रयत्न करत होता. हाळु हाळु त्याला पोस्ट, काँमेट, चँट, मँसेज हे कळु लाग़ले, आणि त्याने फेसबुकवर आनेक मित्र तयार केले, आता तो फेसबुकवर तासन तास रमु लाग़ला, मग़ त्याने लेख कविता पोस्ट करु लाग़ला, त्याच्या पोस्टला भरपुर काँमेट मिळत आसे,त्यामुळे त्याचे मन भरुन येत होते. आपणाला ही काहीतरी लिहता येते आसे वाटु लाग़ले. स्वत:चा अभिमान वाटु लाग़ला. काम सोडल्यापासून त्याला सहा महिन्यातच नविन जाँब मिळाला, एका सामाजीक संस्थेत तो फील्ड आँफीसर म्हणुन काम करु लाग़ला. आता तो जादातर कामावर आसल्याने म्हणुन त्याने फेसबुकचा वापर मोबाईलवर करु लाग़ला, तसा फारसा वेळ त्याला मिळत नसे पण अपडेट राहण्यात त्याला आनंद वाटत आसे. संध्याकाळी घरी आल्यावर तो रात्री पर्यंत फेसबुकवर तो चँटीग़ करित आसे. एका रात्री त्याला फेसबुकवर भारत विरुद्ध पाकिस्तान हे पेज सापडले, त्यामध्ये भारत व पाकिस्तान मधील लोक एकमेकाना घाण घाण काँमेट टाकत,ते राजेश वाचुन, त्याला पाकिस्तान विरुद्ध राग़ येऊ लाग़ला, काही दिवसातच त्याने पाकिस्तान विरुद्ध काँमेट टाकायला सुरवात केली आणि त्याच्या काँमेटला लाईक भरपुर मिळत आसे, म्हणुन तो पाकिस्तान विरुद्ध लाखोली वाहत आसे. पुढे त्याला जातीयवाद आसे पेज सापडले,तेथे तर महानपुरषाचे व जातीचे आपमानीत लेख लिहिलेले आसे, ह्या आग़ोदर कधी वाचले नव्हते ते वाचुन त्या विरुद्ध् तो प्रतिक्रीया देत आसे,आसल्या वाचनाने त्याचे डोके भडकले होते. भरपुर जण त्याला साथ देत तर काहीजण त्याचा विरोध करीत. आता कामावर आसताना फील्ड मध्ये सुद्धा हातात मोबाईल आसे, पण तो काम व्यवस्थित हँडेल करीत आसे. दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी महिन्याभराच्या कामाचा आढावा म्हणुन एक मिटीग़ होत आसे, त्या दिवशी संस्था चालक , आँफीस स्टाफ ,फील्ड आँफीसर, तसेच फील्ड मधील मान्यवर मंडळी उपस्थित आसे. त्या दिवशी सर्व हाजर होते, संस्था चालकांनी सामान्य लोकांना संस्थेच्या कार्याबद्दल विचारपुस केली आसता, मिटीग़ मध्ये ग़ोधळ निर्मान झाला, त्यातुन शामराव म्हणाले,'साहेब तुमचे ते नविन फीलडं साहेबाचं काम काही बरं वाटत नाही,' हे सर्वजण ऐकताच बावरले, विठ्ठलराव म्हणाले,' व्हय साहेब, तोंडावर सांग़तो, राजेश साहेब आपल्याच नादात आसतात ,ते आमच्याकडे लक्ष देत नाहीत, आमचे मनापासुन ऐकुण घेत नाहीत,' तर शामराव म्हणाले,' त्याना जास्तीचं काही विचारलं तर उग़ाचाच चिडतात, आणि आमच्यावर भडकताता बघा,' राजेशने आता मान खाली घालुन बसला होता, सुरेश राव म्हणाले,'कधी कधी आमच्याशी उलट ही बोलतात, शेवटी एवढ्या तक्रारी एकल्यावर राजेशला त्याच महिन्यात त्याला कामावरुन काढले, सहाजीकच आशा घटनामुळे त्याच्यात चिडचिडेपणा वाढु लाग़ला. पण संस्थेने मात्र माणुसकीसाठी त्याला काढुन टाकले, शेवटी राजेशला कळाले की लिहलेले सर्वच काही खरे नसते, पण आपण त्यावर विश्वास ठेवत गेलो,हीच मोठी चुक आणि कारण होते, माझा स्वभाव बदलायला. (समाप्त) एम. एस. डब्लु. - मास्टर आँफ सोशल वर्कर ( सामाजीक कार्यकर्ता )

No comments:

Post a Comment