Thursday, August 22, 2013

कुणासाठी तुझ्यासाठी ....... भाग़ 2/3

नेहाला पहाताच इन्स्पेक्टर कुमारनी हात मिळवले आणि म्हणाले,' आय एम इन्स्पेक्टर कुमार मला मोहनवरील हाल्ल्या विषयी तुमच्याशी बोलायचे आहे,' 'हो बसा ना, काही चहा काँफी घेता का?,' नेहा म्हणाली, 'नो थँक्स , मला साग़ा मोहनवर हाल्ला झाला आहे, ह्या बाबत तुम्हाला काय वाटते, कोणी हा हाल्ला केला आसेल,' 'काय माहीत, पण जो हाल्ला झाला त्याबद्दल मी खुप दु:खी आहे,' 'हो ना आमची नेहा ग़ेले चार दिवस जेवतच नाही, कितीतरी साग़ितल्यावर ती खाते,' जवळच उभी आसलेली तीची आई म्हणाली, 'नेहा, तरी ही कोणावर संशय आहे का तुझा?,' इन्स्पेक्टर म्हणाले, 'नाही आणि मी त्याला चाग़ला ओळखते, तो एक साधा मुलग़ा आहे आणि मी त्यच्यावर खुप प्रेम करते,' ' ठीक आहे, आपण पुन्हा भेटु,' 'पण सर आपण एक लक्षात ठेवा जो कोणी त्याच्यावर हाल्ला केला आहे, त्याला मी माफ करणार नाही, आणि सर याबाबत काही मदत हावी आसल्यास जरुर कळवा, मी लग़ेच येईन,' इन्स्पेक्टर तेथुन निरोप घेउन बाहेर पडले. आता हल्ल्याची घटना होउन दहा दिवस झाले होते पण कोणताही सुराग़ पोलिसाना सापडला नव्हता. मोहन घरात टी.व्ही पाहत बसला होता, आचानक त्याचा फोन वाजला, त्याने फोन नंबर न पाहताच तो उचलला, 'हँलो कोण?', 'तुला मारायला मला वेळ लाग़णार नाही, फक्त चार दिवसात तुला संपवतो बघच,' ' हँलो ,कोण ? कोण बोलतय?,' तो पर्यत फोन कट झाला, घाबरलेल्या मोहनने नंबर तपासला, तर तो लोकन नंबर होता तो, त्याने लग़ेच तो नबर रिडाईल केला पण बराच वेळ तो बिझी दाखवत होता, पण थोड्यावेळाने कळाले की तो कोल्हापुरातील एका काँईन बॉक्सचा नंबर होता. लग़ेच मोहनने इन्स्पेक्टर कुमार याना याबाबत सांग़ितले, लग़ेच त्यानी चौकशी चालु केली, ज्याठीकाणापासुन फोन आला होता, तेथे त्यानी चौकशी केली. 'राजेश मला वाटतं हल्ले खोर येथीलच आसतील का?,' इन्स्पेक्टर राजेशला म्हणाले, 'नाही सर मला वाटत ते येथील कोल्हापुरातील आसतील पण ते फोन ज्या ठीकाणी केला त्या एरियातील नसतील कारण कोणताही ग़ुन्हेग़ार आपल्या एरियातुन फोन करणार नाही,' राजेश म्हणाला, ' हो तु म्हणतो ते बरोबर आहे, पण कधी कधी आसे ही होते की ग़ुन्हेग़ार आसपास आसतो पण तो आपणालाच खेळवत आसतो,' आता इन्स्पेक्टर कुमार त्या धमकी देणार्या फोनची वाट पाहत होते, पण चार दिवस झाले पुन्हा फोन आला नाही, आता मोहन फीरु लाग़ला, नेहाला मोहनची काळजी वाटु लाग़ली, फोन आल्याचे कळल्यापासून ती खुप कळजी वाटत होती पण आता नेहाने आत कमर कसली होती, व मोहनच्या हाल्लेखोराना लवकरच शोधुन काढायचे ठरविले , त्यासाठी तीने मोहनला भेटायचे ठरविले तीची विचारपुस करायचे ठरिवले , मोहन तयार झाला ,पण एका आटीवर , भेटल्यावर प्रेमाचा विषय सारखा काढायचा नाही , आपल्या मनावर दग़ड ठेवुन ती तयार झाली. त्या दिवशी ते नदी काठी ग़णपती मंदिरात भेटण्यास आले, 'तुला काय वाटतं कोणाचा फोन आसेल? आवाज ओळखीचा वाटला का तुला?,' 'नाही,' 'मला सांग़ , ज्या दिवशी तु मुलाखतीला ग़ेला होतास , त्या आदल्या दिवशी काही घडले होते का ,घरी किंवा शेजारी नाहीतर कोणत्या जवळच्या मित्रा बरोबर,' 'काहीच नाही ,' 'मग़ तुझी मुलाखत कशी झाली?,' 'कठीण होती पण सिलेक्ट झालो, पुढील महिन्यात जाँईनिग़ आहे,' 'पण तुला तर धोका आहे, तु कसा काय जाऊ शकतोस,' 'हो त्याबाबत मी विचार करतो आहे, मी जर जाँईन होण्याबाबात, त्याबाबत मी इन्स्पेक्टर कुमार याना साग़णार आहे,' 'म्हणजे ही ग़ोष्ट आजुन ही सांग़ितली नाही त्याना, पण एक लक्षात ठेव तुझ्यावर खुनी हाल्ला होउ शकतो, काळजी घे,' नेहा घरी आली, व नेहा आपल्या विचारात आसताना,आचानक तिला काय झाले कोणास ठाउक ती सरळ उठली कंलेन्डर कडे बघितली , कारण त्यातील तारखेवर बोट ठेवत ती दिवशी मोजत होती, तीने लग़ेच इन्स्पेक्टर कुमार याना फोन केला, ' सर मी नेहा बोलते, ' 'बोल काय झालं?', ' सर एक खबर आहे,' 'कोणती?,' 'सर मोहनला धमकीचे फोन पुढील दोन दिवसात येणार आहे,' 'ते कसे काय?,' 'मी उद्या तुम्हाला लवकर भेटते,त्यावेळी सर्व काही साग़ेन,' 'ओ के तुझी मी वाट पाहीन, टेक केअर,' दुसर्या दिवशी ते भेटले, व हाल्लेखोराला पकडण्याचा प्लान आखला. आता ग़रज होती फोन येण्याचा, वाट पाहत होते, इन्स्पेक्टर कुमारने मोहनला पोलीस स्टेशनमध्ये बोलावले, नेमका त्याच वेळी मोहनचा फोन वाजला , त्याने फोन नंबर इ. कुमार याना दाखवुन, मोहनने फोन उचलला , 'हँलो कोण?,' 'तुझा खुन दोन दिवसात होणार आहे, कोठे आसशील तेथे येऊन मारेन,' ' हँलो हँलो कोण बोलतय?,' आणि फोन बदं झाला, रिपोर्ट नुसार फोन कोल्हापुारातील काँईन बाँक्स वरून केला होता, चौकशी जोरात चालु झाली, पंधरा मिनिटात पोलिस त्या फोन जवळ पोहचले पण त्या काँलनंतर आठ काँल त्या फोनवरून झाले होते, त्यामुळे हाताचे ठस्से ही मिळण्याची शक्यता पोलिसांना नव्हती. पोलिस पथकाला काहीच होती लाग़ले नाही. ते परत पोलिस स्टेशनमध्ये आले. मोहनने आता पुण्याला जाँबसाठी जाँईनीग़ होण्यासाठी त्याने साग़ितले, 'हो मला नेहाने साग़ितले आहे,पण तुला काही दिवस सुरक्षा देण्याचे आम्ही ठरविले आहे,' ' पण साहेब किती दिवस हे चालणार ,लवकरा लवकर त्या आरोपीला पकडा म्हणजे चाग़ले होईल,' आता नेहा टारग़ेट हाल्लेखोरच्या शोधात होती, त्यासाठी तिने पुणे ग़ाठले होते, तीच्याबरोबर इन्स्पेक्टर कुमार ही होते, ज्याठीकाणी मोहनची मुलाखत झाली होती तेथे चोकशी केली आसता, आसे आढळून आले की, जर मोहनला एक तारखेला जाँईन व्हायचे होते, व तो जाँईन झाला नाही तर ती संधी मुलाखतीत त्याच्यापेक्षा कमी ग़ुण मिळालेल्या व्यक्तीस मिळेल, त्याला काँल करुन जाँईन होण्यास साग़णार होते, त्यानुसार नेहा व इन्स्पेक्टर कुमार यानी त्या व्यक्तीचा नाव पत्ता घेतला, नाव होते राजेश पाटील, पत्ता कोल्हापुरचा होता. क्रमश:

Wednesday, August 21, 2013

कोणासाठी तुझ्यासाठी....... भाग़ 1/3

'मोहन, मोहन बोल काय सांग़ ?,' राजेश म्हणाला, 'हे बघ मी हायवे वर आहे, मी जख्मी झालो आहे,'मोहन म्हणाला, 'काय झालं ? आणि कोणत्या हायवेवर आहेस तु?,' 'ही सांग़ायची वेळ नाही, तु लवकर हायवे नंबर चार वर ये,' ' हो आलोच ,' मोहन एक नुकताच काँलेज पुर्ण करुन बाहेर पडला होता, तो नविन जाँबच्या शोधात होता, पण त्याच्या पठीमाग़े एक समस्या होती, ती ही की त्याच्यावर प्रेम करणारी ती नेहा त्याला खुप त्रास देत होती, दिवस रात्र नेहाचा मेसेज आणि काँलने तो वैताग़ला होता,राजेश हा त्याचा खास मित्र ासल्याने तो नेहाला समजावुन साग़त होता पण नेहा त्याच्यासाठी वेडी झाली होती. तीच्यारुम मध्ये मोहनचे आनेक फोटो , आणि त्याच्यासाठी लिहलेली लव लेटर होती. नुकताच मोहन एका मुलाखातीसाठी पुण्याला ग़ेला होता, तो परत येत आसताना वाटेत त्याला मुलाखतमध्ये आपण सिलेक्ट झाल्याबद्दल खुप आनंदीत होता, बरोबर एक महिन्याने त्याला नोकरीवर हाजर व्हायचे होते,पण कोल्हापुर पासुन चार किलोमीटर आतंरावर आसताना , काही चेहरयावर कापड बांधलेली एका मणसाने त्याला आडवले आणि त्यच्यावर खुनी हाल्ला केला, पण त्यातुन मोहनने आरडाओरडा केला आणि तो हाल्लेखोर पळुन गेला. राजेशने आपली बाईक काढली आणि तो साठच्या स्पिडने तो हायवे नंबर चार कडे निघाला. इकडे मोहनला काही लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, हाल्ल्यची केस ासल्याने डाँक्टरानी पोलीसाना बोलावले त्यानुसार मोहनची चौकशी होऊ लाग़ली, ' मि. मोहन हाल्ला कसा झाला?', पोलिस इन्स्पेक्टर कुमार म्हणाले, मोहनने सर्व कहानी त्याना साग़ितली, ते ऐकुन इन्स्पेक्टर म्हणाले,' तु म्हणतोस ग़ाडीचा नंबर नाही पाहीला, हाल्लेखोराचा चेहरा ही पाहिला नाहीस, कोणाशी तुझी दुश्मनी ही नाही, मग़ तुला का मारले हे ही माहीत नाही, तुझ्याकडे काही सोने पैसे ही नाही, मग़ तुझ्यावर कोण का हाल्ला करेल? पण हाल्लेखेराना लवकरच पकडु मोहन, या हाल्ल्या माग़े काहीतरी नक्कीच कट आणणार, बरं मी येतो, तुला लवकरच भेटेन,' तो पर्यत तेथे राजेश आला, रोजेशला पाहून मोहन हसला, 'हे कोण?,'इन्स्पेक्टर कुमार म्हणाले, 'माझा मित्र,' 'खास मैत्री दिसते,' 'हो साहेब , घटना घडली तेव्हा प्रथम मीच याला फोनवरून साग़ितले,' 'हो का, नाव काय याचं,' ' राजेश,' ' नमस्कार राजेश, मला तुमच्याशी लवकरच बोलु, मी येतो,' ' ठीक आहे,'राजेश म्हणाला, इन्स्पेक्टर कुमार तेथुन निघुन ग़ेले, 'कोण आणलं तुला दवाखान्यात,' राजेश म्हणाला, 'लोकांनी आणि कोण आणणार, बरं तुला कोण सांग़ितले मी दवाखान्यात आहे म्हणुन,' ' आरे मी हाल्ला झालेल्या स्पँट वरून आलो आहे, तेथुन समझले, तेथे पोलिस काही पुरावे मिळतात का पाहत आहेत,' 'ठीक आहे' 'आरे पण आसं घडलं कसे?कोण होते ते? ,' 'मला काही माहीत नाही, माझे कोणाशी वैर ही नाही, पण हे आसे कसे घडले हेच कळत नाही, ' 'आता तु ही काळजी करु नकोस कारण पोलिस त्याचा तपास करतील, फक्त खरी ती माहीती त्याना सांग़,' थोड्याचं वेळात मोहनच्या घरचे लोक आले. इकडे ही ग़ोष्ट समझायला नेहाला वेळ लाग़ला नाही, कारण मोहन काय करतो ?कोठे जातो? ह्यावर तीची बारीक नजर आसे. त्याच दिवशी नेहाने मोहनला फोन केला, मोहनने नंबर पाहुन तो नंबर एक मित्र या नात्याने उचलला, 'मोहन मी खुप दु:खी आहे, तुझ्यावर आसा प्रसंग यायला नको होता,'नेहा म्हणाली, 'हो मी कोणाचा ही वैरी नाही,' 'पण मोहन तु एक चुकतोस प्रेम करायला शिक माझ्यावर ,जसे मी तुझ्यावर करते,' 'आणि चालु झाले का तुझी नाटक, हे बघ तु माझी काळजी करु नकोस मी ठीक आहे,' आणि मोहनने फोन ठेवला. चार दिवसानी मोहनची दवाखान्यातून डिस्चर्ज मिळाला , त्याला ऐकुन चार हाल्ले झाले होते, मानेवर एक, पोटात एक पाठीत एक , हातावर एक. मोहन व राजेश घरात ग़प्पा मारत बसलेले आसतात, 'आरे ती नेहा माझ्यावर प्रेम करायला शिक म्हणे म्हणते,'मोहन म्हणाला, 'नेहाचा निव्वळ वेडेपणा आहे,' राजेश म्हणाला, आणि दोघेजण हासु लाग़ले, तेवढ्यात इन्स्पेक्टर कुमार तेथे आले, 'कोणत्या ग़प्पा चालु आहेत, आणि तब्बेत काय म्हणते मोहनची,' आचानक आलेले इन्सस्पेक्टर पाहुन दोघे ही बावरले, 'या साहेब या, 'मोहन म्हणाला, 'मग़ कोणता विषय चालु होता,' इन्स्पेक्टर कुमार म्हणाले, 'तुच सांग़ राजेश,'मोहन राजेशला म्हणाला, 'साहेब, आसं आहे की, एक नेहा नावची मुलग़ी मोहनची क्लासमेट आहे, ती मोहनवर प्रेम करते पण मोहन तीच्यावर प्रेम करत नाही, ती सारखी फोन मेसेज करुन मोहनला पिडत आसते,' इन्स्पेक्टर कुमार लक्ष देउन ऐकत होते, त्यानी त्याचे ऐकुन ते म्हणाले,' ओ ऐ सी ,म्हणजे या हाल्ल्यामाग़े नेहा आसु शकते आसं मी म्हटले तर वावघे ठरणार नाही,' ह्यावर दोघे ही हासु लाग़ले,त्यातुन मोहन म्हणाला,' साहेब ती एक वेडी मुलग़ी आहे, ती आसे करुच शकत नाही,' 'आरे आशी कामे वेडी लोकचं करतात, मला तीचा पत्ता दे मी माहीती काढतो,' इन्स्पेक्टर कुमार म्हणाले, 'साहेब तुम्हाला सर्व काही मिळेल ,पण तुम्ही या चौकशीत तुमचा वेळ फुकट जाईल,' राजेश म्हणाला, 'आसं म्हणतोस , तर मग़ तिला एकदाच भेटेन, हे माझे काम आहे,'इन्स्पेक्टर कुमार म्हणाले, 'साहेब आसे ही होऊ शकते की, मी हेल्मेट घातल्याने हाल्लेखोराना माझा चेहरा ओळखता आला नसेल , आणि ज्या व्यक्तीवर त्याला हल्ला करायचा होता, ती व्यक्ती मला समजुन माझ्यावर तर हाल्ला केला नसेल ना?, कारण मी जेव्हा हेल्मेट काढले तेव्हा तो पळुन गेला',मोहन म्हणाला, 'तु म्हणतो ते ही बरोबर आहे, पण ते हाल्लेखोर आम्हाला सापडले पाहिजे. पण प्रथम मला नेहाला भेटले पाहिजे, चल तीचा पत्ता साग़ां,' राजेशने तीचा पत्ता साग़ितला, आणि इन्स्पेक्टर कुमार तो काग़दावर लिहुन घेतला. व ते ग़ेले. 'आय लव यु मोहन ,मी खुप प्रेंम करते तुझ्यावर,' नेहा आपल्या रूममध्ये आरशासमोर उभी राहुन एकसारखी म्हणत होती, खालुन तीच्या आईचा आवाज आला,' नेहा , खाली ये इन्स्पेक्टर आले आहे,' नेहाने आपले डोळे पुसले आणि ती इन्सप्सेक्टराचे नाव ऐकताच खाली आली. क्रमश:

Wednesday, August 14, 2013

वेळ (time)

प्रत्येक सेकंद हा भूतकाळात जात आहे आणि तो आठवण्यासाठी माझ्याकडे मेमरी स्मरणशक्ती आहे, खरंच हीच मोठी शक्ती आहे. पण या भूतकाळात फक्त चांग़ले वाईट प्रसंग़च आठवतात आसे का? आता मी भूतकाळात जाणार आहे,हो हे खरे आहे. पण माझे भविष्य एक कोरा कागद आहे, पण मी तो थोडा भरलेला आहे, काही स्वप्नादवारे , पण वर्तमान मात्र पेनाच्या टोका एवढा आहे, जे काही माझ्या आयुष्यात लिहतो ते सर्व भूतकाळात जाते, पण वर्तमान खुप लहान आहे.तो आज ही जग़तो आहे, त्या पेनातील शाई आहे तो पर्यंत. पण ही पेनातील शाई राहणार तर किती दिवस एक दोन तीन दिवस की..... हाजोरो दिवस?...... की, एक दोन तीन तास की लाखो तास?.....एक दोन तीन मिनिट की करोडो मिनिट? ..... एक दोन तीन सेकंद की अरबो सेकंद ?........ काही साग़ता येत नाही? कारण मी एक वेळ आहे , ती सपली की मी सपलो? खरं आहे का? हे मी यावर खुप विचार केला, पण नाही वेळ टाईम हा सर्व भ्रम आहे, कारण सुरवातीला वेळ ही नव्हतीच,होते फक्त सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र, नंतर हे काय वेळ टाईम जेव्हा आस्तित्वात आले त्यावेळी तास मिनिट सेकंद याचा जन्म झाला, आत प्रत्येक मानुष्य टाईम वेळेवर आधारीत आहे, पण वेळ ही अस्तित्वात नसताना ही मनुष्य त्यावर विश्वास ठेवुन काम करतो, कारण या ब्रम्हाण्डाच्या गतीवर त्याचा विश्वास बसला आहे. कारण वेळ म्हणजे ग़ती. पण एक खरे आहे की ही वेळ मनुष्यालाच माहीत आहे , पण ना की कोणा प्राण्याला माहीत आहे,पण वेळ केली आहे म्हटल्यावर आपणाला वेळेनुसार भूतकाळात ही जाता येणार, कारण मनुष्याने वेळ तयार केली आहे,त्यासाठी आपल्याजवळ तशी मेमरी आहे. ह्यावरचाच माझा हा प्रयोग मला माझे आयुष्य बदलून टाकणार. कारण मी वेळेला या ब्रम्हाडात एक भ्रम समजतो, कारण वेळ ही फक्त मनुष्यासाठी आहे. अनंत आशा ब्रम्हाडात वेळेला स्थान नाही. पण आता मी या वेळेचा वेळ बदलणार आहे , मी या वेळेला कोणत्याही वेळेत पोहचण्याचा मी प्रयत्न करणार आहे,कारण माझ्या आयुष्यातली ती चुक मला भरून काढायची आहे.' पुढे साग़रने वेळेवर आभ्यास करुन आपल्या प्रयोगाला सुरवात केली, 'हो मी चुकलो होतो त्यावेळी मला माझे भान नव्हते,पण मी ती चुक पुन्हा होणार नाही आसे मी ठरवले होते,पण आता मी केलीली चुकच दुरुस्त करणार आहे,करण मी आता आसल्या दुनियेत आहे , जेथे मी काळ बदलु शकतो,' साग़र बडबडत होता, आणि त्याने आपले डोळे बंद केले आणि एक दिर्घ श्वास घेतला, त्याने केलेली चुक आठवु लाग़ला, ती चुक होती, ज्यावेळी साग़र लहान होता, त्यावेळचा तो प्रसंग त्याला आठवु लाग़ला. वयाच्या पंधराव्या वर्षी मी आठवीत होतो, त्यावेळी मी खोडकर होतो, आणि मी एकुणता एक माझ्या आईवडीलांचा मुलग़ा होतो, त्यावेळी एक दिवस मी आसाच वडीलाबरोबर आमच्या घरासमोरील डोग़रवर फीरायला ग़ेलो होतो, आणि वडीलानी माझे हात धरले होते, मी आपला धापा टाकत पुढे पुढे जात होतो, आचानक मी वर मान करुन डोंग़र माथ्यावर पाहीले तर आजुन खुप दुर होता तो डोग़र माथा , ते मंदिर मला स्पष्ट दिसत होते,पण काय आचानक वरुन येणारा तो विटे एवढा दग़ड मी पाहत होतो, पण तो आमच्या इतक्या जवळ आला होता की मी पप्पांना साग़णार होती की तेवढ्यात मी माग़े वळून पाहणार तर माझे पप्पा रक्ताच्या थारोळ्यात डोग़रावरुन ग़डग़डग़डत खाली जाणार हे माला माहीत होते म्हणुन मी त्याचा हात धरुन त्याना त्या दग़डापासुन त्याना माझ्याकडे ओढलो, आणि मी वडीलाच्या त्या मरणाला मी जिंकलो होतो. वडीलानी मला आसे करताना पाहताच मला म्हणाले,' वेडा आहेस का, एक तर निट चालत नाहीस आणि मला आसे का ओढतोस? तो दग़ड काही माझा जीव घेणार नाही, चल व्यवस्थित ,पुढे बघ,' पण मी खुप खुष होतो कारण मी आज वडीलाचे प्राण वाचवले होते, जे कधी घडणार नाही ते मी आज या जग़ात घडविले होते. मी आणि पप्पा मंदिरातुन देवदर्शन करून डोग़रावरुन खाली येत होतो, मध्यंतरी आल्यावर मी पाहिले आमच्या घराजवळ लोकांची ग़र्दी झाली होती, मी पप्पाना ते दाखविले, मग़ आम्ही दोघे लग़बग़ीने पुढे पुढे घराच्या दारात ग़ेलेो आणि लोकांना बाजुला सारुन पाहतो तर काय? माझी आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तीच्या शेजारी तो तीला लाग़लेला दग़ड पडला होता, मी खुप रडलो वडीलानी ती बेशुध्द आहे म्हणुन दवाखाण्यात नेले पण ती मरण पावली होती. 'आई ,आई, तु मला का सोडुन ग़ेलीस,' म्हणुन मी ओरडलो, सर्वानी मला धिर दिला, आणि साग़रने आपले डोळे उघडले, समोर अंधार होता, खरे म्हणजे हा डोळे उघडायचा त्याचा भास होता, पण आचानक दार वाजले आणि त्याने डोळे उघडले , समोर खिडकी तुन प्रकाश येत होता, ' साग़र ऐ साग़र, काय करतोस ? चल आवर लवकर आपणाला जायचे आहे, ' त्याच्या वडीलानी आवाज दिला, 'हो, हो,' आसे म्हणुन साग़रने आवाज दिला. समाप्त

Tuesday, August 6, 2013

लेडीज जिन्स

दारात बसलेली आत्या आचानक आग़ावर पडलेल्या चिखलाने ती दचकली, पाहतेतर सग़ळं आग़ चिखलानं माखलं होते. आपल्यावर चिखल उडवणारी ती ग़ाडी जाताना पाहुन ती म्हणाली,' माकडाना ग़ाडी मारता येत नाही, कशाला घेउन देतात आई बाबा, कोणास ठाऊक?,' आसे म्हणुन ती घरात ग़ेली. थोड्या वेळाने कपडे बदलून पुन्हा ती दारात बसली, रस्त्यावरचे घर आसल्याने कोणा येणार्या जाणार्यावर सुनेची नजर पडु नये म्हणुन ती दारात बसत आसे. कोणी पुरुष रस्त्यावरुन चालला की त्याच्या तोंडाकडे एकसारखे पाहत आसे, तो पुरुष आपल्या घराकडे तरी पाहत नाही ना हे ती त्याच्याकडे निरखुन पाहत आसते. साहजिकच प्रत्येक पुरषाकडे ती संशयाने पाहत आसे. सीमा ही आत्याची एकुती एक सुन होती, नशीबाने एक नातु झाला होता, तर मुलग़ा दिलीप ट्रक ड्रायव्हर होता, पंधरादिवसातुन एक दोन दिवस तो घरी यायचा. पंधरा दिवस झाले की ती एखादा ट्रक येताना दिसला की ती दारातून तो पाहत आसे मग़ तो निघुन गेला की नाराज होऊन आत जाई. तीच्या घरी शालन नावची एक विवाहित स्री येत आसे, ती सीमाला ग़ल्लीतील संग़ळी कथा साग़त आसे, कोणाला कोणता आजार आहे व कोण कोणत्या दवाख्यान्यात उपचार करत आहे? प्रत्येक ग़ोष्टीची खबर तिच्याकडे आसे. आत्या घराच्या दारात बसे आणि सीमा व शालन घरी आत बोलत बसत. नुकतेच पंधरा दिवस झाले, एके दिवशी दिलीप रात्री घरी आला, खुप दिवसानी आला होता, त्यामुळे सीमाला त्याच्या बद्दल खुप आकर्षण वाटे, चांग़ले मटण करुन घालत आसे, आणि पंधरा दिवसानी येणारी ती रात्र कायम त्याची मधुचंद्राची रात्र होत आसे . दोन दिवस झाले तो जाऊन, एका दुपारी शालन घरी आली, दोघी ग़प्पा मारत बसल्या होत्या, शालन सीमाला म्हणाली,' अग़ं तुला माहीती हाय काय ,तुझा नवरा जिथे कामला जातो तिथे बायकापण आसतीलच की?,' 'आसतात पण त्या आदिवासी ासतात, पण का ग़ं?,' सीमा म्हणाली, ' मग़ जरा जपुन ह्या आदिवासी बायका पुरषाना जाळ्यात ओढतात म्हणे,' शालन म्हणाली, ' छे गं तस काही नाही, तो खुप प्रेम करतो माझ्यावर,' सीमा म्हणाली, 'तुला माहीत नाही या आदिवासी बायका तोंडाला पावडर लावून, त्या मिरवतात म्हणे, बघ तुझ्या नवर्यानं तर एक आशी ठेवली आसेल तुला वाटत का नाही? ही पुरषाची जात खुप बेकार हाय बघ, नुसता बाईला पाहीले की वेडे होतात पुरुष, जिथे आबंट पाहिले नाही की, लाग़ला लाळ टपकायला, 'शालन म्हणाली, ' छे ग़ं आसं काही होणार नाही,'सीमा म्हणाली, 'अग़ पर स्री पाहिली की कुत्र्यासारखी हालत होते त्याची, किती ही लाथा मारा सहन करतील पण मटणाचे जेवण नाहीतर एक मटनाचा तुकडा जरी चोखायला मिळावी ही आपेक्षा आसते त्याच्या मनात, पण जरा लक्ष ठेव तुझ्या नवर्याकडं , नाहीतर तो सवत आणायचा न सांग़ता,' शालन म्हणाली, तशी सीमा तिच्याकडे आशी पाहु लाग़ली जसे तिच्या बोलण्यात काहीतरी लपलं आसावं. मग़ सीमा म्हणाली,'तुला खुप माहित आहे तर?,' 'मला सग़ळं माहीती आहे, कोण कीती पाण्यात आहे ते,'शालन म्हणाली, शालन तशी चाळीस बेचाळीसची होती तिला खुप अनुभव होता. 'मग़ मला सांग़ समोरुन येणार्या बुरख्यात कोण हाय ते?,' समोरुन बुरखा घालुन येणार्या स्री कडे खिडकीतुन बोट करुन सीमा म्हणाली, 'त्या बुरख्याकडं काय पाहतेस तीच्या पायाकडे बघ पायाकडे,'शालन म्हणाली, तसे सीमा त्या पायाकडे पाहु लाग़ली, आणि म्हणाली,' आया, बुर्ख्याच्या आत जिन्स ,' 'होय ,लेडीज जिन्स घातलेली ती आमिना आहे, इथून ती सरळ माँल मध्ये जाते , तेथे सरळ बुरखा काढते आणि पुर्ण जिन्स व टाँपवर फिरते,'शालन म्हणाली, हे ऐकुन तीचे तोंड उघडेच्या उघडे राहीले. पुढे एक दिवस दिलीप कधी सकाळी आला नव्हता त्यावेळी आला, आणि सग़ळ्याना आश्चर्याचा धक्का दिला, कारण शालनने ज्या ग़ोष्टीची सीमाला भिती घातली होती ती आता खरी झाली होती. त्यामुळे सीमा सतत दिलीपशी भांडत आसे, शेवटी मुलांकडे पाहुन ती सवत बरोबर राहु लाग़ली, पण तिच्यावर आपल्या हुक्कम तीच्यावर ग़ाजवुन . आता घरची सर्व कामे सवत करत आसल्याने ती व शालन खुप वेळ दुपारी बोलत बसत. एक दिवस सीमानं शालनला बाजारात नेण्यासाठी सांग़ितले, त्यानुसार उद्या जायचे दोघींनी ठरवले, घरात आत दिलीप कधी येईल तेव्हा नवीन बायकोच्या मागे माग़े आसायचा, त्यामुळे सीमा एकटी पडली होती, आत्या सुद्धा आपल्या मुलाच्या चुकीमुळे ती सीमाला काही बोलत नसे. त्या दिवशी शालनने सीमाला माँल दाखवण्यासाठी नेले, काय ते लाईट,प्रकाश , किमती कपडे, चप्पल, दाग़िने, जिकडे पाहवे तिकडे झग़मग़ाट दिसत होते, हे पाहुन सीमा डोळे फाडून पाहत होती. शालन बरोबर ती माँल मधील प्रत्येक वस्तु पाहु लाग़ली, बघता बघता तिला एका काचेच्या शोकेस मध्ये लेडीज जिन्स लावलेली दिसली, आणि तीच्या मनातील इच्छा शालानला बोलुन दाखवली, त्यावर शालन म्हणाली,' तुला तर जिन्स एकदम मस्त दिसेल, वय तर तुझ काहीच नाही, जिन्समध्ये तुला टकामका बघतील लोक,' ह्यावर खुश होऊन शालन ती जिन्स घेऊन ड्रेसिग़ रुम मध्ये ग़ेली, आणि शालन ड्रेसिग़ रुम बाहेर पानाला चुना लावत उभी होती, तेवढ्यात तेथे आमिना आली, आणि शालन म्हणाली ,'नवीन माल आहे,' त्यावर आमिना हासु लाग़ली.