Wednesday, August 14, 2013

वेळ (time)

प्रत्येक सेकंद हा भूतकाळात जात आहे आणि तो आठवण्यासाठी माझ्याकडे मेमरी स्मरणशक्ती आहे, खरंच हीच मोठी शक्ती आहे. पण या भूतकाळात फक्त चांग़ले वाईट प्रसंग़च आठवतात आसे का? आता मी भूतकाळात जाणार आहे,हो हे खरे आहे. पण माझे भविष्य एक कोरा कागद आहे, पण मी तो थोडा भरलेला आहे, काही स्वप्नादवारे , पण वर्तमान मात्र पेनाच्या टोका एवढा आहे, जे काही माझ्या आयुष्यात लिहतो ते सर्व भूतकाळात जाते, पण वर्तमान खुप लहान आहे.तो आज ही जग़तो आहे, त्या पेनातील शाई आहे तो पर्यंत. पण ही पेनातील शाई राहणार तर किती दिवस एक दोन तीन दिवस की..... हाजोरो दिवस?...... की, एक दोन तीन तास की लाखो तास?.....एक दोन तीन मिनिट की करोडो मिनिट? ..... एक दोन तीन सेकंद की अरबो सेकंद ?........ काही साग़ता येत नाही? कारण मी एक वेळ आहे , ती सपली की मी सपलो? खरं आहे का? हे मी यावर खुप विचार केला, पण नाही वेळ टाईम हा सर्व भ्रम आहे, कारण सुरवातीला वेळ ही नव्हतीच,होते फक्त सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र, नंतर हे काय वेळ टाईम जेव्हा आस्तित्वात आले त्यावेळी तास मिनिट सेकंद याचा जन्म झाला, आत प्रत्येक मानुष्य टाईम वेळेवर आधारीत आहे, पण वेळ ही अस्तित्वात नसताना ही मनुष्य त्यावर विश्वास ठेवुन काम करतो, कारण या ब्रम्हाण्डाच्या गतीवर त्याचा विश्वास बसला आहे. कारण वेळ म्हणजे ग़ती. पण एक खरे आहे की ही वेळ मनुष्यालाच माहीत आहे , पण ना की कोणा प्राण्याला माहीत आहे,पण वेळ केली आहे म्हटल्यावर आपणाला वेळेनुसार भूतकाळात ही जाता येणार, कारण मनुष्याने वेळ तयार केली आहे,त्यासाठी आपल्याजवळ तशी मेमरी आहे. ह्यावरचाच माझा हा प्रयोग मला माझे आयुष्य बदलून टाकणार. कारण मी वेळेला या ब्रम्हाडात एक भ्रम समजतो, कारण वेळ ही फक्त मनुष्यासाठी आहे. अनंत आशा ब्रम्हाडात वेळेला स्थान नाही. पण आता मी या वेळेचा वेळ बदलणार आहे , मी या वेळेला कोणत्याही वेळेत पोहचण्याचा मी प्रयत्न करणार आहे,कारण माझ्या आयुष्यातली ती चुक मला भरून काढायची आहे.' पुढे साग़रने वेळेवर आभ्यास करुन आपल्या प्रयोगाला सुरवात केली, 'हो मी चुकलो होतो त्यावेळी मला माझे भान नव्हते,पण मी ती चुक पुन्हा होणार नाही आसे मी ठरवले होते,पण आता मी केलीली चुकच दुरुस्त करणार आहे,करण मी आता आसल्या दुनियेत आहे , जेथे मी काळ बदलु शकतो,' साग़र बडबडत होता, आणि त्याने आपले डोळे बंद केले आणि एक दिर्घ श्वास घेतला, त्याने केलेली चुक आठवु लाग़ला, ती चुक होती, ज्यावेळी साग़र लहान होता, त्यावेळचा तो प्रसंग त्याला आठवु लाग़ला. वयाच्या पंधराव्या वर्षी मी आठवीत होतो, त्यावेळी मी खोडकर होतो, आणि मी एकुणता एक माझ्या आईवडीलांचा मुलग़ा होतो, त्यावेळी एक दिवस मी आसाच वडीलाबरोबर आमच्या घरासमोरील डोग़रवर फीरायला ग़ेलो होतो, आणि वडीलानी माझे हात धरले होते, मी आपला धापा टाकत पुढे पुढे जात होतो, आचानक मी वर मान करुन डोंग़र माथ्यावर पाहीले तर आजुन खुप दुर होता तो डोग़र माथा , ते मंदिर मला स्पष्ट दिसत होते,पण काय आचानक वरुन येणारा तो विटे एवढा दग़ड मी पाहत होतो, पण तो आमच्या इतक्या जवळ आला होता की मी पप्पांना साग़णार होती की तेवढ्यात मी माग़े वळून पाहणार तर माझे पप्पा रक्ताच्या थारोळ्यात डोग़रावरुन ग़डग़डग़डत खाली जाणार हे माला माहीत होते म्हणुन मी त्याचा हात धरुन त्याना त्या दग़डापासुन त्याना माझ्याकडे ओढलो, आणि मी वडीलाच्या त्या मरणाला मी जिंकलो होतो. वडीलानी मला आसे करताना पाहताच मला म्हणाले,' वेडा आहेस का, एक तर निट चालत नाहीस आणि मला आसे का ओढतोस? तो दग़ड काही माझा जीव घेणार नाही, चल व्यवस्थित ,पुढे बघ,' पण मी खुप खुष होतो कारण मी आज वडीलाचे प्राण वाचवले होते, जे कधी घडणार नाही ते मी आज या जग़ात घडविले होते. मी आणि पप्पा मंदिरातुन देवदर्शन करून डोग़रावरुन खाली येत होतो, मध्यंतरी आल्यावर मी पाहिले आमच्या घराजवळ लोकांची ग़र्दी झाली होती, मी पप्पाना ते दाखविले, मग़ आम्ही दोघे लग़बग़ीने पुढे पुढे घराच्या दारात ग़ेलेो आणि लोकांना बाजुला सारुन पाहतो तर काय? माझी आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तीच्या शेजारी तो तीला लाग़लेला दग़ड पडला होता, मी खुप रडलो वडीलानी ती बेशुध्द आहे म्हणुन दवाखाण्यात नेले पण ती मरण पावली होती. 'आई ,आई, तु मला का सोडुन ग़ेलीस,' म्हणुन मी ओरडलो, सर्वानी मला धिर दिला, आणि साग़रने आपले डोळे उघडले, समोर अंधार होता, खरे म्हणजे हा डोळे उघडायचा त्याचा भास होता, पण आचानक दार वाजले आणि त्याने डोळे उघडले , समोर खिडकी तुन प्रकाश येत होता, ' साग़र ऐ साग़र, काय करतोस ? चल आवर लवकर आपणाला जायचे आहे, ' त्याच्या वडीलानी आवाज दिला, 'हो, हो,' आसे म्हणुन साग़रने आवाज दिला. समाप्त

No comments:

Post a Comment