Tuesday, August 6, 2013

लेडीज जिन्स

दारात बसलेली आत्या आचानक आग़ावर पडलेल्या चिखलाने ती दचकली, पाहतेतर सग़ळं आग़ चिखलानं माखलं होते. आपल्यावर चिखल उडवणारी ती ग़ाडी जाताना पाहुन ती म्हणाली,' माकडाना ग़ाडी मारता येत नाही, कशाला घेउन देतात आई बाबा, कोणास ठाऊक?,' आसे म्हणुन ती घरात ग़ेली. थोड्या वेळाने कपडे बदलून पुन्हा ती दारात बसली, रस्त्यावरचे घर आसल्याने कोणा येणार्या जाणार्यावर सुनेची नजर पडु नये म्हणुन ती दारात बसत आसे. कोणी पुरुष रस्त्यावरुन चालला की त्याच्या तोंडाकडे एकसारखे पाहत आसे, तो पुरुष आपल्या घराकडे तरी पाहत नाही ना हे ती त्याच्याकडे निरखुन पाहत आसते. साहजिकच प्रत्येक पुरषाकडे ती संशयाने पाहत आसे. सीमा ही आत्याची एकुती एक सुन होती, नशीबाने एक नातु झाला होता, तर मुलग़ा दिलीप ट्रक ड्रायव्हर होता, पंधरादिवसातुन एक दोन दिवस तो घरी यायचा. पंधरा दिवस झाले की ती एखादा ट्रक येताना दिसला की ती दारातून तो पाहत आसे मग़ तो निघुन गेला की नाराज होऊन आत जाई. तीच्या घरी शालन नावची एक विवाहित स्री येत आसे, ती सीमाला ग़ल्लीतील संग़ळी कथा साग़त आसे, कोणाला कोणता आजार आहे व कोण कोणत्या दवाख्यान्यात उपचार करत आहे? प्रत्येक ग़ोष्टीची खबर तिच्याकडे आसे. आत्या घराच्या दारात बसे आणि सीमा व शालन घरी आत बोलत बसत. नुकतेच पंधरा दिवस झाले, एके दिवशी दिलीप रात्री घरी आला, खुप दिवसानी आला होता, त्यामुळे सीमाला त्याच्या बद्दल खुप आकर्षण वाटे, चांग़ले मटण करुन घालत आसे, आणि पंधरा दिवसानी येणारी ती रात्र कायम त्याची मधुचंद्राची रात्र होत आसे . दोन दिवस झाले तो जाऊन, एका दुपारी शालन घरी आली, दोघी ग़प्पा मारत बसल्या होत्या, शालन सीमाला म्हणाली,' अग़ं तुला माहीती हाय काय ,तुझा नवरा जिथे कामला जातो तिथे बायकापण आसतीलच की?,' 'आसतात पण त्या आदिवासी ासतात, पण का ग़ं?,' सीमा म्हणाली, ' मग़ जरा जपुन ह्या आदिवासी बायका पुरषाना जाळ्यात ओढतात म्हणे,' शालन म्हणाली, ' छे गं तस काही नाही, तो खुप प्रेम करतो माझ्यावर,' सीमा म्हणाली, 'तुला माहीत नाही या आदिवासी बायका तोंडाला पावडर लावून, त्या मिरवतात म्हणे, बघ तुझ्या नवर्यानं तर एक आशी ठेवली आसेल तुला वाटत का नाही? ही पुरषाची जात खुप बेकार हाय बघ, नुसता बाईला पाहीले की वेडे होतात पुरुष, जिथे आबंट पाहिले नाही की, लाग़ला लाळ टपकायला, 'शालन म्हणाली, ' छे ग़ं आसं काही होणार नाही,'सीमा म्हणाली, 'अग़ पर स्री पाहिली की कुत्र्यासारखी हालत होते त्याची, किती ही लाथा मारा सहन करतील पण मटणाचे जेवण नाहीतर एक मटनाचा तुकडा जरी चोखायला मिळावी ही आपेक्षा आसते त्याच्या मनात, पण जरा लक्ष ठेव तुझ्या नवर्याकडं , नाहीतर तो सवत आणायचा न सांग़ता,' शालन म्हणाली, तशी सीमा तिच्याकडे आशी पाहु लाग़ली जसे तिच्या बोलण्यात काहीतरी लपलं आसावं. मग़ सीमा म्हणाली,'तुला खुप माहित आहे तर?,' 'मला सग़ळं माहीती आहे, कोण कीती पाण्यात आहे ते,'शालन म्हणाली, शालन तशी चाळीस बेचाळीसची होती तिला खुप अनुभव होता. 'मग़ मला सांग़ समोरुन येणार्या बुरख्यात कोण हाय ते?,' समोरुन बुरखा घालुन येणार्या स्री कडे खिडकीतुन बोट करुन सीमा म्हणाली, 'त्या बुरख्याकडं काय पाहतेस तीच्या पायाकडे बघ पायाकडे,'शालन म्हणाली, तसे सीमा त्या पायाकडे पाहु लाग़ली, आणि म्हणाली,' आया, बुर्ख्याच्या आत जिन्स ,' 'होय ,लेडीज जिन्स घातलेली ती आमिना आहे, इथून ती सरळ माँल मध्ये जाते , तेथे सरळ बुरखा काढते आणि पुर्ण जिन्स व टाँपवर फिरते,'शालन म्हणाली, हे ऐकुन तीचे तोंड उघडेच्या उघडे राहीले. पुढे एक दिवस दिलीप कधी सकाळी आला नव्हता त्यावेळी आला, आणि सग़ळ्याना आश्चर्याचा धक्का दिला, कारण शालनने ज्या ग़ोष्टीची सीमाला भिती घातली होती ती आता खरी झाली होती. त्यामुळे सीमा सतत दिलीपशी भांडत आसे, शेवटी मुलांकडे पाहुन ती सवत बरोबर राहु लाग़ली, पण तिच्यावर आपल्या हुक्कम तीच्यावर ग़ाजवुन . आता घरची सर्व कामे सवत करत आसल्याने ती व शालन खुप वेळ दुपारी बोलत बसत. एक दिवस सीमानं शालनला बाजारात नेण्यासाठी सांग़ितले, त्यानुसार उद्या जायचे दोघींनी ठरवले, घरात आत दिलीप कधी येईल तेव्हा नवीन बायकोच्या मागे माग़े आसायचा, त्यामुळे सीमा एकटी पडली होती, आत्या सुद्धा आपल्या मुलाच्या चुकीमुळे ती सीमाला काही बोलत नसे. त्या दिवशी शालनने सीमाला माँल दाखवण्यासाठी नेले, काय ते लाईट,प्रकाश , किमती कपडे, चप्पल, दाग़िने, जिकडे पाहवे तिकडे झग़मग़ाट दिसत होते, हे पाहुन सीमा डोळे फाडून पाहत होती. शालन बरोबर ती माँल मधील प्रत्येक वस्तु पाहु लाग़ली, बघता बघता तिला एका काचेच्या शोकेस मध्ये लेडीज जिन्स लावलेली दिसली, आणि तीच्या मनातील इच्छा शालानला बोलुन दाखवली, त्यावर शालन म्हणाली,' तुला तर जिन्स एकदम मस्त दिसेल, वय तर तुझ काहीच नाही, जिन्समध्ये तुला टकामका बघतील लोक,' ह्यावर खुश होऊन शालन ती जिन्स घेऊन ड्रेसिग़ रुम मध्ये ग़ेली, आणि शालन ड्रेसिग़ रुम बाहेर पानाला चुना लावत उभी होती, तेवढ्यात तेथे आमिना आली, आणि शालन म्हणाली ,'नवीन माल आहे,' त्यावर आमिना हासु लाग़ली.

No comments:

Post a Comment