Sunday, July 28, 2013

स्वप्न

'मी उडणार ,खरंचं मी उडु शकतो, कारण मी तयार केलेले पखं खरोखर ते मला उडायला साथ देतील, हो हो हो, खुप उचं उचं उडु वाटत मला, तो बघ तो पक्षी तुझ्याकडे कसा पाहत आहे, त्याला ही वाटत आहे की तु उडु शकतोस, बघ बघ आणि घे भरारी आणि जा त्या पक्षामाग़े,आसे माझे मन सारखे तसे म्हणत होते, एक खोलवर श्वास घे , डोळे मिट आणी पुन्हा एक खोलवर श्वास घेउन, मी उडी घेतो,' आचानक धप्पकन आवाज होतो, आणि आण्णा उठताता, बघताता तर रोहन खाटावरुन खाली पडलेला आसतो, 'आई,ग़ं,' रोहन कमरेवर हात ठेवत म्हणतो, 'आरे उठ उठ, लाग़ले का?, किती दा साग़ितले ती पक्ष्यासारखी उडायची स्वप्ने पहायची बंद कर,' आण्णा त्याला म्हणाले, ' काय करु आण्णा पण मलाच हेच का स्वप्न पडतं हे कळतचं नाही, 'रोहन म्हणाला, 'हे बघ सातव्यादा तु पडलायस पुढच्या वेळेला मी तुला नाही उठवणार,' आण्णा म्हणाले, हे एकताच रोहन मनातच म्हणाला की, याचा काहीतरी उपाय केलाच पाहीजे, आजच काळे सराना साग़तो, मला आसे का होते म्हणुन.' त्या दिवशी रोहन लवकर शाळेत ग़ेला, शाळेत दोन शिपाई व्यतीरिक्त कोणी ही नव्हते, सर आजुन यायचे होते, म्हणुन तो सायन्स हाँल मध्ये ग़ेला , तेथे कोणी नव्हते, त्याने एक नजर हॉलमध्ये फिरवली, त्याला त्या हांलमध्ये एका कोपर्यात तो एक मानवी हाडाचा सापळा ठेवलेला होता, तो काहीसा झुकलेला होता, तो त्या दिशेने चालु लाग़ला, आचानक त्याला बाजुच्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या भांड्यामध्ये काहीतरी हालचाल झाली आणि त्याचे लक्ष त्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या भांड्याकडे ग़ेले, 'काय हालले बरं, येथे काहीतरी कोणीतरी मला पाहीले तर नाही ना, या भांड्यात काय आहे ते पाहुया तरी, आसे म्हणुन रोहणने एका भांड्यावर नजर फिरवली, तर त्यात एक तारा मासा पाण्यात ठेवलेला होता, एक टिचकी त्याने त्या भांड्यावर मारली, 'बहुतेक हेच हालले आसेल,' पण काही हालचाल नाही आणि तो पुढच्या काचेच्या भांड्याकडे कडे ग़ेला, त्यात मानवी मेंदु होता, ' आई शपथ, काय मेदु आहे रे, खरचं माझ्याकडे एक मेदु आहे, खरचं काय दिसतो रे हा, ह्यचा वापर करुनच मानव ईथेपर्यत उभा आहे, काय तो आईस्टाईनचा मेदु, खरंच सग़ळे मेंदू दिसायला एक आसले तरी त्या वापर चांग़ला वाईट ही होतो, नाहीतर काही मेदु नुसतेच गंजुन जातात' या मेदुला फ्रेश ठेवायचं आसले पाहिजे , यासाठी आभ्यास केला पाहीजे, जेवढा जास्त आभ्यास करशील तेवढा हा चाग़ला राहतो, आस मी आनेकाकडुन ऐकलं आहे,' पुढचा एका काचेच्या भांड्याकडे पाहताच तो दाचकला का? तर ते मानवी दोन डोळे होते, कोणाचे आसतील हे डोळे ? ते सध्यातरी जिंवत आसल्या सारखे मला तर वाटतात, पण नाही हे मेलेले डोळे आहेत, ज्ञान मिळवण्यासाठी डोळे खुप महत्वाचे आसतात, हे सर्वाना माहीत आहे. तेवढ्यात बाहेर काहीतरी हालचाल झाल्याची जाणिव झाली आणि रोहन बाहेर आला, नुकतेच काळे सर आले होते, रोहण केबीन मध्ये गेला. 'सर, मी रोहन', ' आरे ये ये, काय झालं?' 'सर ग़ेले पंधरा दिवस मला स्वप्ने पडत आहेत,' 'आरे स्वप्ने पाहणे चाग़ले आसते, ती एक नैसर्ग़ीक क्रिया आहे,' 'ते बरोबर आहे, पण मला सारखे तेच तेच स्वप्न पडतात,' 'तेच तेच म्हणजे?', 'सर मी पक्ष्या प्रमाणे हावेत उडतो आहे आणि आचानक उडताना पडतो, ' ' हा हा हा, हे बघ तुझ्या मनात काय आसते तेच तुझ्या स्वप्नात दिसते, तुला खरं साग़ उडु वाटत ना तुला,' 'हो पण, हे आता मला पुरे झाले आहे,' 'मग़ एक काम कर ,रात्री झोपताना मनात एवढचं म्हणायचे की, मी आज रात्री शेवटचं पक्षाप्रमाने उडणार आहे, कोणी बघणार आसाल तर पाहुन घ्या,' 'ठीक आहे सर,' म्हणुन तो वर्ग़ावर ग़ेला, आण्णा दुसर्या दिवशी सकाळी लवकरच उठले, डोळ्ये चोळतच ते रोहण ला उठवू लाग़ले, ' आरे रोहण उठ, उठ, लवकर किती मस्त पक्ष्यासारखे हावेत उडतोस रे तु, खुप खुप उचं तुला पाहुन खुप बरे वाटले बघ,' हे एकुण रोहण शुद्धीवर आला आणि म्हणाला, 'पण उद्या पासून मी हवेत पक्ष्या प्रमाणे उडु शकणार नाही,' समाप्त

No comments:

Post a Comment