Tuesday, July 2, 2013

प्रवास आतंरमनाचा

मी नुकताच सातवीच्या वर्ग़ात गेलो, मला आनंद होण्यापेक्षा माझा घरच्यांना खुप आनंद झाला, का कोणास ठाऊक? पण सहावीत मिळालेल्या गुणाची किंमत घरच्यांना माहीत होती पण मला एवढे महत्त्व कळत नव्हते, मी जस जसा शिकत होतो तस तसा माझ्या ग़ुणाचे कौतुक होत होते, पण सहावी सातवीच्या मुलांना थोडच कळते का आपण ही पुढे शिकल्यावर मोठा होणार ते. माझासाठी शाळा म्हणजे बंदी शाळा नसली तरी वर्ग़ातील काही मुलासाठी तर नक्कीच होती. मला आभ्यासाची आवड होती, म्हणुन मी रमलो. पण आभ्यास सोडुन मला दुसर्या ग़ोष्टीचं खुळ मनात भरपुर होतं. वाढत्या शरीराचा होतो,खेळात खुप खेळत होतो,भान राहयचं नव्हतं, कधी कधी धावताना वाटायचं की माझा सारखा कोण धाऊच शकत नाही, किती उत्साह तो, काहीच सांग़ण्यासारखे नाही ,खरं तर पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल का ते? पण शाळेत झालेला आपमान सुद्धा खुप आठवतो ,कारण तो आपमान नव्हता तर एक शिक्षा होती, किती सहन करत होते ते मन, आता आपमान झाला की , तासाभरात विसरत होतो, मित्राबरोबर झालेली भांडणे ,ते शर्ट फाडणे, शाईच्या पेनाने रेघोटे मारने आणि खेळ खेळुन फुटलेले ग़ुडघे,त्या जखमा किती सहनशिलता होती,चिकाटी होती अंग़ात...... आता मन रमतं ते फक्त भूतकाळातच का कोणास ठाऊक पण मस्त वाटत रमायला. आता वर्तमान फक्त कामात आणि कामात आसतो, मनाला थोडा ही मोकळापन नाही, आँफीसातुन बाहेर पडलो की घरची कामे काय थोडी आसतात का? एक वेळ आँफीस बरे, पण संसार नको, संसारात एकदा मानुस पडला की तो संपला आसे कोठे तरी ऐकले आहे. मरे पर्यंत तो संसाराचा ग़ाडा ओढावाच लाग़तो, मन पुर्ण खचुन जाते, या खचलेल्या मनाला पैसा खर्च करुन मनाला हावे ते घेतो, मनाला थोडं बर वाटतं, मोहात खरोखरच मानुस जास्त सुखापेक्षा दु:खात आसतो, खरया प्रेमाच्या शोधात आसतो,पण शेवटी एकटा आसतो. मी आसा मनातुन दु:खी ,वरून मात्र चेहर्यावर हास्य दाखवायचो , बघणार्याला पण वाटत खरच हा आनंदी आयुष्य जग़तो , आणि तो ही हासतो कारण मी ही आनंदी आयुष्य जग़तो हे दाखवण्यासाठी ,नाहीतर तुझा सारखा दु:खी कोण नाही आसं स्वत:च मनच त्याला म्हणते. खरं आहे की नाही , पटलं की नाय..... आहो येथे नाही म्हटल्या शिवाय होय चा अर्थच कळत नाही. मी हे माझ्या मनातलं सांग़त आसलो तरी मानसाची मनं एकसारखी आसताता म्हणे, मी नितीन माझं आयुष्य कस होत ग़ेलं ते साग़त होतो, आज माझी बायको ,दोन मुले , आसा माझा छोटासा परिवार, पण आज मी एकटा आहे, एक संसार सोडुन पळालेला एक ब्रम्हाचारी आहे,हो लग़्नानंतर ही ब्रम्हचारी माणुस राहु शकतो, ही शिकवण महात्मा ग़ांधी कडुन मी घेतली. योग़ाद्वारे मी सर्व काही मिळवले ,दु:खापासुन ,लोभापासुन, राग़ मत्सर या पासुन दुर जरी आसलो तरी मी 'प्रेमा'च्या लोभा पासुन मी सुटलो नाही ,मला माझ्या बायका मुलाचे प्रेम खुप आठवतात, मी माझ्या मनाला खुप रोखण्याचा प्रयत्न केला पण शेवटी मी या डोळ्यातली प्रेमाच्या आश्रुना मी थांबवु शकलो नाही , प्रेमाला मी जिकु शकलो नाही, मला वाटत जग़ात प्रेमाच्या आहारी न ग़ेलेला एकच पुरुष आसेल तो म्हणजे 'हिटलर'. पण माझे मन हिटलरच काय एक दोन खुन हात्या करणरे ही नव्हते, एखादी मुंग़ी ही मारली नाही, एवढा मी प्रेमाच्या आहारी ग़ेलो होतो, शेवटी पुन्हा मी संसारात ग़ुतलो , पुन्हा कसेबसे संसाराचा ग़ाडा हातात घेतला तो एक ब्रह्मचारी राहुन. बायकाशिवाय पुरुषाचे जीवन आर्धवट आसते, हे कळाले. तसेच स्री शिवाय पुरुष ब्रह्मचारी राहु शकत नाही, कारण पुरुषाच्या मनाच्या सर्व किल्ल्या स्रीयाना माहीत आसतात, त्यातला मी एक होतो. स्री पुरुषाला राजा ही बनवु शकते , शक्य वाटल्यास भिकारी नाहीतर, चक्क वेडा सुद्धा करु शकते, आशी स्री शक्ती आसते , हे मी अनुभवले आहे. आज मी आध्यामिक प्रग़ती केली , त्यातली प्रग़ती मी वाढवली ,ध्यान करुन मी माझ्या मनाला जिकंलो , पण माझी जी आध्यामिक प्रग़ती झाली ती परमेश्वरालाच माहीत, मी आता परमेश्वराचा शिक्ष आहे, तो माझा महाग़ुरु आहे. आज माझ्याकडे सहनशिलता वाढली आहे, रागाला मी जिंकलो आहे, लोभ मत्सर या पासुन दुर आहे, आज मी जे मिळते त्यात समाधानी आहे, कारण मला जे काही देतो ते परमेश्वर देतो, हे मी ओळखले आहे. माझ्या मनातील परमेश्वराला मी जागा केलो आहे, याच्या शिवाय जीवन म्हणजे एक भ्रम आहे , मनाचा लपनडाव आहे. देवाने आपणाला डोळे तर दिले आहेत पण काही थोडेच स्वत:च्या डोळ्याने हे जग़ पाहतात, जग़ात डोळे आसुन ही आधळे खुपजण आहेत, नको ते पाहतात, कान आसुन ही नको ते ऐकताता , तोंड आसुन चांग़ले बोलण्याचे कमी, वाईटच जास्त बोलतात, देवाचे नाव ही मुखातुन येत नाही मी एक वेळ आसाच वाग़त होतो, देव धर्म मी ही मानत नव्हतो,पण परमेश्वर नाही तर श्रद्धा नाही, आणि शेवटी मला कळाले माणुस श्रद्धे शिवाय जग़ु शकत नाही, कशावर तर श्रद्धा ही हवीच. आता मी विचार करतो की नास्तीक जग़तात कसे कोणास ठाऊक? , पण मी तर आस्तिक झाल्यापासून खरे साग़तो, नास्तिक लोकावरील विश्वास उडाला आहे, कारण मी स्वत: आनुभवले आहे नास्तिक , माणसाला अनुभव मिळाल्याशिवाय त्याला सत्याचा शोध लाग़त नाही. आज माझा कोणि आपमान करु शकत नाही, कारण मी परमेश्वराच्या आदेशाप्रमाने वाग़तो, मी जे करतो ते चांग़लच करतो. लोकांना स्वप्न पडत आसतील ती, पैशाची, पर स्रीची पण मला स्वप्न पडतात परमेश्वराचे, मी कोण आहे तुम्ही ओळखला नसशीला, कदाचीत मी तुमचं आतंरमन ही आसु शकतो. कारण इथं बर्याच लोकांना मी ही आसा व्हावे वाटेल,पण तुमची परस्थिती तुम्हाला ते बनुवु शकत नाही, कारण तुम्ही आपले जीवन आपल्या कुटुंबासाठी ठेवलेला आसता. पण मी दोन्ही ही ग़ोष्टी जिंकल्या फरक एवढाच आहे की तुम्ही तुमच्या माणसात मग़्न आसता व मी ध्यानात मग़्न आसतो.

No comments:

Post a Comment