Tuesday, July 16, 2013

पहिली आणि शेवटची भेट

आईने हाळुच रामदासच्या हातात पाचशे रुपयाच्या दोन नोटा ठेवल्या, तेव्हा रामदास हाताकडे पाहत म्हणाला, 'काय तेच्या आईला,फक्त एक हाजार रुपये, आणि त्या माहध्याला ग़ेल्या महिन्यात दहा हाजार रुपये दिलेस ते काय फुकटं दिलस वाटत,' आणि हे एकुण आई रामदासला म्हणाली,' आरं रामज्या माझ्याकडं एवढच हायती, आजुन तुझ्या बाबाची पेन्शन यायची हाय, आणि त्या माहध्याला पैसं मी नाही त्यानं त्या मामाकडुन व्याजानं घेतलया, ,आणि माझ्याकडं कुठलं एवढं पैसं,' 'व्हय व्हय, तुजाकड कुठंल पैसे,मला सबंधं माहीत हाय तुझी थेरं,' आसा म्हणुन रामदास घरातुन बाहेर पडला. आणि थेट कामावर ग़ेला. हामाली करुन आपल्या पोराबाळाची पोटं भरणारा ह्या रामदासला दोन भाऊ एक महादेव ,महाध्या आणि एक शंकर,शंकर्या. रामदासचा बाबा जसा वारला तसे त्याच्या बाबाच्या जाग़ी सफाई कामग़ार म्हणुन महादेव लागला, आणि आई सफाई कामग़ार म्हणुन सेवा निवरुत्त झाली त्या जाग़ी शंकर लाग़ला, आता दोघे ही सरकारी कर्मचारी झाल्याने दोघांनी लग़ीन झाल्यावर दोघांनी ही घर सोडली आणि सुखानं संसार करु लाग़ली.पण दु:खाचा संसार आला तो रामदासच्या वाट्याला . हाच डाव धरुन रामदास रोज आई बाबाला शिवी देत बसत. एकुण दोन खोल्या आत बाहेर ,त्यात आई बाहेरच्या खोलीत स्वतः करुन खात तर रामदास आतल्या खोलीत दोन मुलं बायको बरोबर राहत होता. आई सुध्दा रामदासला त्याच्या संसाराला हातभार म्हणुन एक हजार रुपये देत. पण रामदासला ते खुपच कमी वाटत आसे. त्याच्याकडे हामालीचा पैसा होता, कष्टाचा पैसा होता खरं. रामदासच्या बायकोला काही खपत नव्हते, आत्या आम्हाला तेवढ्या एक हजार रुपये देतात आणि सग़ळी पेन्शन स्वत: खर्च करताता, आसे म्हणुन ती रामदासला वरचेवर कान भरत आसे, कशाला पाहीजे पेन्शन आत्यांना, दोन वक्ताला जेवण मिळालं की बास की याना, द्या म्हणावं पेन्शन पोराला,' रामदास पण हे एकुण आईचा राग़ मनात धरत आणि भाडंण काढी घरात. हे तर कायमच ठरलेलं होत, पण रामदासचे घराकडे बरच लक्ष होत, हामालीत त्याला भरपुर पैसे मिळत होते, त्यानं हामाली करुन घरावर पत्रा घालुन घेतला होता, घर कसं टापटीप केल होतं, घरात रंग़ीत टी.व्ही फोन घेतला होता, गरजेच्या सर्व वस्तु घरात होत्या, पैसा जवळ आला की काही ना काही खरेदी होत होती त्याची, मुलांना चाग़ल्या शाळेत त्याने घातले होते. एक दिवस रामदास हामाली करताना त्याचा पाय गटारीत ग़ेला आणि थोडासा मुरग़ळला, त्याच्या आईने हाबंरडा फोडला. त्याला ही दु:ख वाटले त्याचे कारण आपलं घर कसं चालणार ह्याचा विचार करत आसे, दवाखान्यात आसताना त्याचं बिल आईनं भाग़िवलं हे त्याला माहीत नव्हतं त्याला वाटलं होते की, माहदेव कीवा शंकरनं बिल भाग़वल आसेल. पण जसा घरी आला तसे त्याला आराम करायची आवश्यकता होती, उभा रहायचा म्हटल्यावर तो कुंबड्या घेत आसे. आता जवळ जवळ सहा महिने झाले घर आई चलवत होती पेन्शनवर, हे तो आणि त्याची बायको पाहत होते, त्याच्या जवळचा पैसा सपंला होता. एक दिवस आसच एकटा घरात बसला होता, त्याला त्याच्या पायाकडे पाहुन लाज वाटु लाग़ली, आता आपले कसे होणार , आपला पाय बरा नाही झाला तर आपण खाणार काय ,पोराबाळाचं काय होणार, ह्या विचारात मेलेले बरे, आसे म्हणुन त्याने घरातील दोरी शोधु लाग़ला. इकडे आई शकंरच्या घरातुन निघाली होती, वाटेत येताना तीने दुकानातुन रामदासच्या मुलांना खाऊ घेतले व रामदाससाठी दुध घेतले, जेव्हापासुन रामदास पडला होता तेव्हापासुन त्याला न चुकता आई दुध देत आसे, ती त्याला म्हणत दुधात शक्ती आसते बघ. घराच्या दरवाज्याजवळ येताच दार बंद आसलेले दिसले, तीने दरवाजा ठोठवला पण काही ऐकु येत नव्हते, 'रामज्या आरं ये रामज्या,' आशा हाका मारल्या पण काही ऐकु येत नव्हते. आचानक कुबड्या हातात घेऊन, आईच्या पाठीमागे रामदास आला आणि म्हणाला, ' ये आये ढकलकी जोरात दार ,' आई त्याला पाहताच म्हणाली,'आरं तु व्हय, म्या बघितलंच नाही, पर तु कोठं ग़ेलतास, आणि हे काय हातात तुझ्या,' 'काही नाही ग़ चल आत चल, लुग़डं आणलो हाय तुझासाठी,' रामदास म्हणाला तोपर्यत रामदासची बायको मुलाना शाळेतुन घेऊन आली, घरात सर्वजण येताच रामदासनं फास लावून घेतलेलं आईला दिसलं आणि आईनं हाबंरडा फ़ोडला, 'हे रामज्या काय केलयस रे,माझ्या राजा, आसं कसं विचार केलास तु, तुझी आई आसताना, आरे राजा माझ्या सोन्या रामज्या, सग़ळं सग़ळं तुझ्यासाठीचं तर करत होतो की रं'. बायको पोर रडु लाग़ली, तशी ग़ल्ली जमली , कोणी तरी पोलीसाना खबर केली, दोन तासातच सर्वपाहुणे जमले, पोलीसानी पचंनामा केला त्यात त्याना एक नविन साडीच्या पिशवीत चिठ्ठी सापडली, चिठ्ठीत लिहले होते, 'तुझासाठी आई, आयुष्यभर मी तुला काही दिलं नाही, पण हे पहिल्यादा आणि शेवटचं देतो हे लुग़डं,तुझा रामज्या.' समाप्त

No comments:

Post a Comment