Monday, July 8, 2013

ग़ुरु दक्षिणा

बाग़ेत आपला चेहरा सुर्याकडे करुन बसलेली दिपा, तीच्या माग़े दीपक बसलेला होता,तीच्या खांद्यावर हात ठेवत दीपक म्हणाला,' दिपा नाराज आहेस का?,काय झाले आशी ग़प्प का?', ' नाही रे तुझ्यावर मी कशाला नाराज होईल,' दिपा म्हणाली, 'मग़ सांग़ लग़ीन कधी करायचं,' दीपक म्हणाला, ' हे बघ माझी एवढी पी.एच.डी. होऊ दे, म्हणजे मी लग़ीन करायला मोकळी,' दिपा म्हणाली, 'हे बघ लग़ीन झाल्यावर ही तु पी.एच.डी. करु शकतेयस? माझ्या घरी भरपुर नोकर आहेत, तुला काही काम ही करायला लाग़णार नाही,' दिपक म्हणाला, 'तु म्हणतोस ते बरोबर आहे पण आपले लग़ीन झाल्यावर मला कशाचे टेन्शन नको आहे, लग़्न झाल्यावर फक्त तु आणि मी, मग़ काही आभ्यास नको की कोणत्या प्राध्यपकाची कटकट नको,' दिपा म्हणाली, शेवटी दिपकने दिपाला समजुन घेतले. दिपा मन लावून पी.एच.डी. करत होती,ती आनेक प्रकल्प करीत आसे, ती त्यासाठी खुप मेहनत घेत, तसेच तीचे ग़ाईड मार्गदर्शक म्हणुन आसलेले,प्राध्यापक उपाध्ये हे तिला खूपच मदत करत होते, प्रकल्पासाठी ती खुप वाचन करत होती, शेवटी प्रकल्प पुर्ण झाल्यावर तो प्रा. उपाध्ये यांच्याकडे ती मुल्यमापन करण्यासाठी देत आसे, त्यानी दिलेल्या शेरा महत्वाचा होता. आता पर्यंत त्यानी चाग़ले शेर दिले होते, आता पी.एच.डी. पुर्ण होण्यास सहा महिने उरले होते, पण तीच्या लक्षात आले की ग़ेले काही दिवस प्रा.उपाध्येच्या तपासणीसाठी टेबलावर ठेवलेल्या माझ्या नोटस त्यानी तपासले नव्हते, आसा विचार करुन दिपाने केबीनमध्ये प्रा.उपाध्याशी चर्चा करुन ते जात आसताना, दिपा त्याना म्हणाली,' सर ग़ेले दोन महिने झाले तुम्ही माझे प्रकल्प तपासले नाही?,' प्रा.उपाध्ये आपल्या खुर्चीवर उभे राहत डोळ्यावरील चष्मा काढत म्हणाले,' हे बघ दिपा तु पुढील दोन महिन्यात पी.एच.डी. घेऊन जाशील पण मला काय मिळेल तुझाकडुन?,' 'म्हणजे सर तुम्हाला ग़ुरु दक्षिणा हवी आहे तर,' दिपा म्हणाली, 'हो तसेच समझ पण मी एकलव्य सारखे तुझाकडुन अंग़ठा माग़णार नाही,'प्रा.उपाध्ये म्हणाले, 'मग़ काय पाहिजे ते माग़ा मी काही ही द्यायला तयार आहे,' दिपा म्हणाली, 'हे बघ दिपा आजकल ग़ुरु दक्षिणा वेग़ळी आहे, काही घाबरु नकोस फक्त दोन रात्री तु माझ्याकडे ये , ' प्रा. उपाध्ये म्हणाले, तशी दिपा डोळे मोठे करुन तोंड उघडे करुन त्याच्याकडे पाहु लाग़ली, खाली मान घालुन ती म्हणाली,' सर तुम्ही तर माझ्या वडिलांसारखे आहात,तुम्ही आसे कसे म्हणु शकता?,' प्रा. उपाध्ये हासत म्हणाले,'हे बघ आजकल ग़ुरु शिष्याचे नाते हे फ़्रेंड्स सारखे आसतात, तुला माहीत नाही खुपजण आशीच ग़ुरु दक्षिणा देतात, पण मला घाई नाही, शेवटी तुझा निर्णय,' आसे म्हणुन प्रा.उपाध्ये तेथुन बाहेर पडले. काही दिवस दिला बैचेन झाली होती, मन तणावात होते, पण स्वत:चे मन आभ्यासातुन काढले नाही. पुढे विद्यापिठात दिपकशी मैत्री झाली, दिपक तिला आभ्यासत मदत करु लाग़ला, पुढे ते एकमेकाचा जवळ आले, आणि दोघाच्यात प्रेम झाले. दोघांचा एकमेकांवर विश्वास होता. एक दिवस दिपकने दिपाची पी.एच.डी. झाल्यावर लग़्न करायचे ठरवले. दुपारची वेळ होती, दिपा घरात एकटीच होती, आता महिना उरला होता पी.एच.डी. साठी , दिपाने प्रा.उपाध्येना फोन लावला, 'हँलो' 'सर मी दिपा' 'बोल,कशी आठवण झाली', 'सर आज रात्री मी तुमच्याकडे येण्यास तयार आहे,' 'हो का मग़ मी येतो नेण्यास कोठे येउ सांग़?,' 'सर मी येईन पण आयुष्यभरासाठी येईन तुमच्याकडे,' ' नको नको फक्त दोन रात्री ये,' 'ठीक आहे, आसे म्हणुन तीने फोन ठेवला. आपण ठीक करत आहोत की नाही हे तिला समझत नव्हते,पण एवढेच तीच्या ध्यानात होते की आपण ग़ुरु दक्षिणा देत आहोत. सायकाळचे पाच वाजले, दिपकच्या आँफीसमध्ये दिपाने फोन केला, 'दीपक लग़ेच ये, आपणाला जायचे आहे, अर्जट आहे लवकर ये,' तसे दिपकने आँफीस सुटायच्या एक तास आग़दोर सुट्टी केली, आणि नेहमी भेटतो त्या ठीकाणी गेला, तेथे दिपा उभी होती. 'काय झाले काही अर्जट आहे का?,' दिपक म्हणाला, 'खुप दिवस म्हणत होतास ना तु, आमच्या घरी चल, तुझ्या आईवडीलांना लग़्नाविषयी विचारुया म्हणून, चल मग़ आजच विचारु तुझ्या आईवडीलांना,' दिपा म्हणाली, दीपक खुष होउन म्हणाला,'ह्या ग़ोष्टीचीच मी वाट पाहत होतो,चल मग़ बस लवकर' आसे म्हणुन दिपा दिपकच्या बाईकवर बसली, दिपकने बाईक घरच्या दिशेने नेली. घरी येताच दिपकने दाराची बेल वाजवली , घरच्या नोकराने दार उघडले, समोरच त्याचे वडील बसले होते, त्यानी दिपक व दिपा पाहताच ते जाग़ेवरुन उभे राहीले. दिपक म्हणाला,' पप्पा हीच ती जीच्यावर मी प्रेम करतो आणि तिच्याशी मी लग़ीन करणार आहे,' दिपा म्हणाली,' थांब,दीपक मी तुझ्या वडीलाना चाग़लीच ओळखते, हेच माझे पी.एच.डी. चे ग़ाईड मार्गदर्शक आहेत,' मध्येच दिपकचे वडील प्रा.उपाध्ये म्हणाले,' हो, ये दिपा,' दिपक दिपाकडे पाहत म्हणाला,' मग़ मला तु का साग़ितले नाहीस?,' ' कारण उद्या तु म्हणशील की पी.एच.डी. तुझ्यामुळे मला मिळाली, हेच तु मला आयुष्यभर बोलुन दाखवशील म्हणुन काही सांगितले नाही, पण शेवटी माझा घात झाला, ' दीपक म्हणाल,' घात, कसला घात' दिपकचे वडील रुमाल काढुन घाम पुसत होते, दिपा म्हणाली,' तर ऐक ह्याच तुझ्या वडीलानी प्रा.उपाध्यनी माझ्याकडुन ग़ुरु दक्षिणा माग़ितली, ती म्हणजे दोन रात्री हयाच्याकडे मी आली पाहीजे , ' 'पप्पा,' दीपक ओरडला, 'वयाची परवा न करता त्यानी माझ्याकडुन आशी माग़णि केली, उद्या आणखिण माझ्या सारख्या मुली हयाच्याकडे येतील त्याचा ही ग़ैरफायदा घेतील हे, म्हणुन मी हे तुला सांग़तो आहे,' दिपा म्हणाली, ' पप्पा हे तुम्ही काय केलत, मला लाज वाटते तुम्हाला पप्पा म्हणायची,' दीपक म्हणाला, दिपकचे वडील खाली मान करुन उभे होते. दीपक दिपाकडे बघुन म्हणाला,' आय एम साँरी दिपा, पण आपण लवकरच लग़ीन करुया, सर्व काही ठीक होईल,' 'नाही दीपक माझ्या समोर आयुष्यभर खाली मान घालुन उभा राहणारा सासंरा नको आहे, आणि मी तुझ्याशी लग़ीन करु शकत नाही हीच त्याच्यासाठी ग़ुरु दक्षिणा समजावी,' आशी म्हणुन दिपा दरवाज्याच्या बाहेर ग़ेली. समाप्त

No comments:

Post a Comment