Thursday, July 4, 2013

म्हातारा म्हातारी

म्हातारपणी आईवडीलांचा आधार मुलगा आसतो, पण मुलगा चाग़ला आसेल तरच नाहीतर मुलगा नसलेला बरे,म्हणण्याची वेळ आई वडिलांना येते, पण बबन तसा नव्हता, तो खुप समजुतदार आहे ,हे लोकांना माहीत होते, जीवनात आपण ही काहीतरी करुन दाखवावे या आशेपायी त्याने लग़नानंतर घर सोडले, पण बाहेर पडुन प्रग़ती केली, स्वत:चे घर घेतले, मुलांना चाग़ल्या शाळेत घातले, चार पैसे जपुन ठेवले, आणखिन काय पाहीजे, सर्व काही मनासारखे झाले होते. त्याचा दुसरा भाउ विठ्ठल ही घरातुन बाहेर पडुन चाग़ली प्रग़ती केली होती. पण म्हणतात ना इर्षा माणसाला शांत बसु देत नाही, तसेच दोघाच्यात होत होते. इकडे म्हातारी म्हातारा दोघे आनंदात होते, म्हतार्याला पेन्शन येत होती, काही घर भाडे येत होते, त्यातुन खाने पिने , दवाखाना भाग़वत होते, मध्यंतरी म्हातार्याने वाचमन काम केले ,पण तब्बेत साथ दईना म्हणुन सोडुन दिले. बबनचा वरचेवर म्हातारा म्हातारीला भेटायला येत, चौकशी करीत, तसेच विठ्ठल ही येत आसे. पण म्हातारी म्हतार्याचे एकमेकांवर इतके प्रेम होते की, त्या दोघांना ते विश्वासात घेत नसे. समाज दोघा मुलाना आणि म्हातारा म्हातारीला नावे ठेवत आसे. पण बबन मात्र हे ऐकुन घेत नसे तो ही म्हातारा व म्हातारी बद्दल काही ना काही लोकांना साग़तच आसे. लोक मग़ म्हातार्या जोडप्याची टीग़ल करी. पुढे पुढे बबन ने म्हातारा म्हातरीचे नाव इतके बदनाम केले की, लोकना तो सांग़ु लाग़ला की माझ्या आईवडीलाना माणुसकीच नाही. पण शेजारी पाजारी वयस्क म्हणुन ग़प्प बसे. म्हातारा एक दिवशी देवाघरी ग़ेला, आणि म्हातारी देव देव करीत घरात बसली. म्हणुन बबन व विठ्ठलने म्हातारीला आपल्या घरी घेण्यास आले, पण म्हातारी भलतीच होती, तीने त्यासाठी नकार दिला, तीला मग़ म्हातार्याचे बोलने आठवत ,'घरात सोने,पैसे आहेत कुठ जायचं नाही,' शेवटी म्हातारीने आपल्या एकुत्या एक मुलीग़ी आक्का हीला घरी काही दिवस आणले. इकडे बबन घरी एकटाच बसला होता, त्याची बायको सिता चहा घेऊन आली, बबनरावांकडे पाहत म्हणाली, ' कोणता विचार करताया आम्हाला ही कळु दे,' 'कोणता म्हणजे काय, म्हातारीचा ?,'बबनने मोठ्या आवाजात म्हणाला, सिता ग़ोड आवाजातच म्हणाली,' नक्की म्हातारीचा का, पैशाचा व सोन्याचा?,' 'तुला कसं माहीत?', बबन म्हणाला, ' मला ठाऊक आहे, नवरा कोणाचा आहे, माझा ना, मग़,' सिता म्हणाली, 'मग़ काय?, ' बबन कपाळाला आट्या घालुन म्हणाला, ' हे बघा पैसे सोने कोठे आहेत हे मला भी माहीती आहे,तुम्हाला ही माहीती आहे, व विठ्ठल भाऊजीना ही माहीती आहे,पण ते कोणाच्या पदरात पडणार आहे हे माहीत नाही,'सिताने काही सत्य साग़ितल्या सारखे साग़ितले व ते बबनने तसेच सत्य ऐकत आसल्यासारख ऐकले, 'होय तु म्हणतेस ते बरोबर आहे, पण पैसे सोने मिळवायचे कसे?,' बबन म्हणाला, तसे सिताने आपले तोंड बबनरावांच्या कानाजवळ नेला आणि तीने त्याच्या कानात काहीतरी साग़ितले, तसे बबनरावच्या डोक्यात प्रकाश पडावा आसे,ते चमकले. दुसर्या दिवशी बबन म्हातारी कडे गेला, म्हातारीशी ग़ोड ग़ोड बोलु लाग़ला, म्हातारीला म्हणाला,' घरी चल, एकटी किती दिवस राहणार येथे, आक्का किती दिवस राहणार तुझा जवळ शेवटी तीचा सुद्धा संसार आहेच की?', म्हातारीचं मन काय पाघळले नाही, त्यातुनच विठ्ठल येतो का इकडे आशी चौकशी आक्का कडे केली, पण म्हातारीने त्याला चहा देऊन चालते केले. पण इकडे विठ्ठल वरचेवर यायचा काही वेळा जेवण म्हतारीसाठी आणत, तर काही वेळेस म्हातारीला दवाखान्यात दाखवत. एक दिवस बबनने आपल्या आईला व आक्काला मुलाच्या वाढदिवसासाठी घरी आणले, त्या दिवशी त्या बबनच्या घरी राहिल्या आणि दुसर्या दिवशी म्हातारीच्या घरी चोरी झाली हे शेजार्याच्या कडुन कळाले. हे कळताच बबन तातडीने तिकडे धावला. पाहतो तर पोलिस आले होते, कोणी तरी शेजार्यानी पोलीसाना कळविले होते. घरातील बरेच सामान विसकटले होते, शेजारी पाजारी जमा झाले होते. पहिल्या दिवशी प्राथमिक चोकशी पोलिसांनी केली. शेवटी म्हातारी ,आक्का, बबन ,शेजारी याची सखोल चौकशी केल्यावर शेजारील एकाने त्या चोराला पहिल्याचे सांग़ितले , त्यात त्याने बबनचे नाव घेतले, मग़ पोलीसानी पोलीसी खाक्या बबनला दाखवल्यावर बबन पोपटासारखा बोलु लाग़ला, ' होय साहेब मीच केली चोरी, आई आक्का माझ्या मुलाच्या वाढदिवशी तिला घरी आणले, हीच संधी साधुन मी म्हातरीचे पैसे व सोने चोरायच्या हेतूने रात्री मी, म्हातरीच्या घरी ग़ेलो ,पण मला काहीच मिळाले नाही,' 'पण म्हातारी म्हणते की घरचे पन्नास हजार रुपये चोरी झालेत म्हणुन', पोलीस म्हणाले, शेवटी न्यायालयाने बबनला नुकसान भरपाई म्हणुन पंचवीस हजार म्हातारीला देण्यास सांग़ितले व चोरी प्रकरणी त्याला दोन महीन्याची सजा झाली. त्या दिवशी म्हातारी आपल्या घरी बसली होती, शेजारील लोक तिच्या भोवती उभे होते, शेजारील जोशी म्हणाले,' म्हातारे तु काही काळजी करु नकोस, आम्ही जो पर्यंत आहोत तुला कोणी ही धक्का लावणार नाही,' शेजारील शेवता म्हणाली,' बर झालं आजीनं सग़ळ सोनं पैसे माझ्याकडं ठेवायला दिलं हुतं म्हणुन, नाहीतर सग़ळच ग़ेलं आसत,' शेजारील दादा म्हणाला,' मी बबनला बघितले म्हणुन तो कबुल झाला, नाहीतर तो कधीच कबुल झाला नसता,' शेजारील डॉक्टर म्हणाले,' तुम्हाला साग़तो त्याला आद्दल घडावी म्हणुन पन्नास हाजाराच नाटक केले आणि पोलिसांनी आपणाला साथ दिली,' आजी आता पर्यंत हे ऐकत होत्या, आणि वैतकुण म्हणाल्या,' आरे बास करा आता झाले ते झाले, पुरे झाले, तुमच खुप ऐकले मी, आता माझं ऐका माझा लेकाला वाचवा रे,त्याला लवकर सोडवुन आणा,'. समाप्त

No comments:

Post a Comment