Sunday, July 28, 2013

स्वप्न

'मी उडणार ,खरंचं मी उडु शकतो, कारण मी तयार केलेले पखं खरोखर ते मला उडायला साथ देतील, हो हो हो, खुप उचं उचं उडु वाटत मला, तो बघ तो पक्षी तुझ्याकडे कसा पाहत आहे, त्याला ही वाटत आहे की तु उडु शकतोस, बघ बघ आणि घे भरारी आणि जा त्या पक्षामाग़े,आसे माझे मन सारखे तसे म्हणत होते, एक खोलवर श्वास घे , डोळे मिट आणी पुन्हा एक खोलवर श्वास घेउन, मी उडी घेतो,' आचानक धप्पकन आवाज होतो, आणि आण्णा उठताता, बघताता तर रोहन खाटावरुन खाली पडलेला आसतो, 'आई,ग़ं,' रोहन कमरेवर हात ठेवत म्हणतो, 'आरे उठ उठ, लाग़ले का?, किती दा साग़ितले ती पक्ष्यासारखी उडायची स्वप्ने पहायची बंद कर,' आण्णा त्याला म्हणाले, ' काय करु आण्णा पण मलाच हेच का स्वप्न पडतं हे कळतचं नाही, 'रोहन म्हणाला, 'हे बघ सातव्यादा तु पडलायस पुढच्या वेळेला मी तुला नाही उठवणार,' आण्णा म्हणाले, हे एकताच रोहन मनातच म्हणाला की, याचा काहीतरी उपाय केलाच पाहीजे, आजच काळे सराना साग़तो, मला आसे का होते म्हणुन.' त्या दिवशी रोहन लवकर शाळेत ग़ेला, शाळेत दोन शिपाई व्यतीरिक्त कोणी ही नव्हते, सर आजुन यायचे होते, म्हणुन तो सायन्स हाँल मध्ये ग़ेला , तेथे कोणी नव्हते, त्याने एक नजर हॉलमध्ये फिरवली, त्याला त्या हांलमध्ये एका कोपर्यात तो एक मानवी हाडाचा सापळा ठेवलेला होता, तो काहीसा झुकलेला होता, तो त्या दिशेने चालु लाग़ला, आचानक त्याला बाजुच्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या भांड्यामध्ये काहीतरी हालचाल झाली आणि त्याचे लक्ष त्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या भांड्याकडे ग़ेले, 'काय हालले बरं, येथे काहीतरी कोणीतरी मला पाहीले तर नाही ना, या भांड्यात काय आहे ते पाहुया तरी, आसे म्हणुन रोहणने एका भांड्यावर नजर फिरवली, तर त्यात एक तारा मासा पाण्यात ठेवलेला होता, एक टिचकी त्याने त्या भांड्यावर मारली, 'बहुतेक हेच हालले आसेल,' पण काही हालचाल नाही आणि तो पुढच्या काचेच्या भांड्याकडे कडे ग़ेला, त्यात मानवी मेंदु होता, ' आई शपथ, काय मेदु आहे रे, खरचं माझ्याकडे एक मेदु आहे, खरचं काय दिसतो रे हा, ह्यचा वापर करुनच मानव ईथेपर्यत उभा आहे, काय तो आईस्टाईनचा मेदु, खरंच सग़ळे मेंदू दिसायला एक आसले तरी त्या वापर चांग़ला वाईट ही होतो, नाहीतर काही मेदु नुसतेच गंजुन जातात' या मेदुला फ्रेश ठेवायचं आसले पाहिजे , यासाठी आभ्यास केला पाहीजे, जेवढा जास्त आभ्यास करशील तेवढा हा चाग़ला राहतो, आस मी आनेकाकडुन ऐकलं आहे,' पुढचा एका काचेच्या भांड्याकडे पाहताच तो दाचकला का? तर ते मानवी दोन डोळे होते, कोणाचे आसतील हे डोळे ? ते सध्यातरी जिंवत आसल्या सारखे मला तर वाटतात, पण नाही हे मेलेले डोळे आहेत, ज्ञान मिळवण्यासाठी डोळे खुप महत्वाचे आसतात, हे सर्वाना माहीत आहे. तेवढ्यात बाहेर काहीतरी हालचाल झाल्याची जाणिव झाली आणि रोहन बाहेर आला, नुकतेच काळे सर आले होते, रोहण केबीन मध्ये गेला. 'सर, मी रोहन', ' आरे ये ये, काय झालं?' 'सर ग़ेले पंधरा दिवस मला स्वप्ने पडत आहेत,' 'आरे स्वप्ने पाहणे चाग़ले आसते, ती एक नैसर्ग़ीक क्रिया आहे,' 'ते बरोबर आहे, पण मला सारखे तेच तेच स्वप्न पडतात,' 'तेच तेच म्हणजे?', 'सर मी पक्ष्या प्रमाणे हावेत उडतो आहे आणि आचानक उडताना पडतो, ' ' हा हा हा, हे बघ तुझ्या मनात काय आसते तेच तुझ्या स्वप्नात दिसते, तुला खरं साग़ उडु वाटत ना तुला,' 'हो पण, हे आता मला पुरे झाले आहे,' 'मग़ एक काम कर ,रात्री झोपताना मनात एवढचं म्हणायचे की, मी आज रात्री शेवटचं पक्षाप्रमाने उडणार आहे, कोणी बघणार आसाल तर पाहुन घ्या,' 'ठीक आहे सर,' म्हणुन तो वर्ग़ावर ग़ेला, आण्णा दुसर्या दिवशी सकाळी लवकरच उठले, डोळ्ये चोळतच ते रोहण ला उठवू लाग़ले, ' आरे रोहण उठ, उठ, लवकर किती मस्त पक्ष्यासारखे हावेत उडतोस रे तु, खुप खुप उचं तुला पाहुन खुप बरे वाटले बघ,' हे एकुण रोहण शुद्धीवर आला आणि म्हणाला, 'पण उद्या पासून मी हवेत पक्ष्या प्रमाणे उडु शकणार नाही,' समाप्त

Sunday, July 21, 2013

खरा चेहरा

'नमस्कार मंडळी, आज आपल्या येथे एक ग़ंभीर विषयावर बोलायचे आहे, खुप ग़भीर घेऊ नका पण योग़्यवेळी काळजी घेतली की सर्व काही ठीक होईल, तर आता आपण काळजी कशी घ्यावी ह्यावर तुम्हाला सांग़तो,' डॉक्टर कदम एका सामाजीक संस्थेतील कार्यक्रमात ते बोलत होते, वरचेवर ते त्या संस्थेला भेट देत होते , त्याना ते आवर्जुन बोलवत आसत. डॉक्टर कदम हे प्रतिष्ठित नाग़रिक हे कोणाला सांग़ायची ग़रज नाही. घड्याळाकडे लक्ष देत हातातील काग़द हालवत रमेश डाँक्टराना भेटण्यासाठी थांबला होता, तो ग़ेले काही महिन्यापासून नियमित डाँक्टराकडे चेकअप साठी येत आसे, त्यामुळे डाँक्टराची व त्याची चाग़ली ओळख झाली होती, रमेश सध्या दहावीत आहे, त्याविषयी ही डाँक्टर त्याला मार्ग़दर्शन करतात. एक बेल वाजली आणि डॉक्टरांच्या केबीनचे दार उघडले , त्यातुन एक पेशन्टं बाहेर आला तसा रमेश आत घुसला. त्याला पाहताच डाँक्टर त्याला म्हणाले, 'ये ये रमेश खुप दिवसाने आलास,' रमेशने नुसते स्मित हास्य करुन प्रतिसाद दिला, आणि खुर्चीवर बसला, 'बोल काय होतय तुला,'डाँक्टर म्हणले, 'घसा दुखतोय,' रमेश म्हणाला, 'चल बेडवर झोप,' डाँक्टर म्हणाले, तसा रमेश बेडवर आडवा झाला, त्यानी टेबलावरील बँटरी घेतली ,आणि तोंड उघडण्यास सांग़ितले, त्यानी तोंडातील घसा पाहताच म्हणाले,' खुप तेलकट खालेलं दिसतय,' डाँक्टरानी त्याला काही ग़ोळ्या व एक पातळ औषध दिले. तसे रमेशने खिशातुन पैसे देण्यासाठी काढले पण डाँक्टरानी ते पैसे त्यच्याकडुन घेतले नाही,पण जाताना डाँक्टर त्याला म्हणाले, 'तु तर माझ्या जवळचा आहेस, पैसे कसले देतोस' आरे तु नविन मोबाईल घेतला म्हणे तुझे वडील म्हणत होते, 'सेंकन्ड घेतला आहे,'रमेश म्हणाला, 'बरं काही तर आसो पण मला पहीला तुझा नंबर दे पाहु,' डॉक्टर म्हणाले, मग़ रमेशने फोन नबर दिला आणि तो तेथुन बाहेर पडला. डॉक्टराना एकच मुलग़ी होती, घरात बायको व ते आसत, घरात फक्त तिघे आसल्याने घरचा फारसा व्याप नव्हता. पण कधी कधी त्याचे बायकोशी पटत नसे, कधी कधी घरी वाद होत आसे. मग़ त्याची बायको भाडणं करुन मुलीला घेउन माहेरी जात, पण एक दोन दिवस झाले की स्वत: डाँक्टर बायकोला आणायला जात आसे. त्या दिवशी दुपारी डॉक्टर घरी ग़ेल्यावर त्याच्या बायकोने वाद घातला, त्याच वेळी त्याची बायको मुलीला घेउन माहेरी ग़ेली, आणि डाँक्टर एकांकी पडले. ते एकुणत्या एक मुलीवर खुप प्रेम करत होते,त्यामुळे त्याना खुप वाईट वाटत होते. सायकाळी नेहमी प्रमाणे त्यानी दवाखाना उघडला, ते खुपच अस्वस्थ वाटत होते, कसेबसे आठ वाजता क्लीनीक बंद केले व ते घरी आले, जाताना त्यानी समोरच्या वाईन शाँप मधुन एक काँटर घेतली, आणि ते टीव्ही चालु करुन त्या दारुचे एक एक घोट घेत होते, बायकोचा विचार ते करत होते तसेच टीव्ही वरील आनेक कार्यक्रम त्याना वेग़ळ्या दिशेने नेत, जस जशी दारु चढु लाग़ली , तस तसे त्याच्या मनात आनेक ग़ोष्टी येउ लाग़ल्या , टीव्ही वरील आश्लील ग़ीत पाहुन व दारुच्या नशेत त्याना दवाखाण्यात तपासणी साठी येत आसलेल्या बायकाची तपासणीचे क्षण आठवु लाग़ले, ते करत आसलेला बायकांचा स्पर्श ,इंजेक्शन करत आसताना त्याच्या हाताचा स्पर्श या मुळे डाँक्टर खुपच उत्तेजीत झाले होते, सेक्सची भावना त्याच्या मनावर ताबा घेत होत्या. पण आचानक त्याना रमेश आठवला, तो पहिल्यादा जेव्हा डाँक्टराच्याकडे आला होता त्याच्या वडीलासोबत होता, खुपच नाजुक , लाजाळु आसा रमेश पुढे पुढे डाँक्टराची त्याची जवळीकता वाढली, फावल्या वेळेत डाँक्टर त्याला बोलवत आसत, त्याची शारीरीक तपासणी करत , डॉक्टराना तो खुप आवडायचा मग़ तो डाँक्टराना तो एकटा भेटायला येउ लाग़ला, डाँक्टराचा स्पर्श त्याला आवडु लाग़ला, या आठवणीतुन आचानक डॉक्टर जाग़े झाले, आणि त्यानी घडाळ्याकडे पाहीले, रात्रीचे नऊ वाजले होते, काहीतरी विचार करुन त्यानी रमेशला फोन केला, 'हँलो' 'कोण?' 'आरे वेड्या मी डॉक्टर बोलतोय', 'मी आवाजच ओळखला नाही, बोला काय ?' 'हे बघ आताच्या आता घरी ये माझ्या , थोडं काम आहे,' ' आता,डाँक्टर?,' ' हो हो आता ये,' 'तुम्ही दारु घेतली नाही ना डॉक्टर ?', 'नाही तु ये तर,' 'ठीक आहे', आसे म्हणुन रमेशने फोन ठेवला, काही मिनिटातच तो डॉक्टरांच्या घरी पोहचला, आणि नेहमी प्रमाणे डाँक्टर त्याच्याशी आश्लील चाळे करु लाग़ले. पुढे सहा महिन्याने समाजातील काही लोकांनी त्याला ओळखले आणि तो त्या जाळ्यात ग़ुतंत गेला, डाँक्टरानी आपली बदनामी होऊ नये म्हणुन त्याला यायचे बंद केले, पुढे काही वर्षानी त्याची ओळख एका मुलाशी झाली, आणि तो ही एक समलैग़िक होता. समाप्त

Tuesday, July 16, 2013

पहिली आणि शेवटची भेट

आईने हाळुच रामदासच्या हातात पाचशे रुपयाच्या दोन नोटा ठेवल्या, तेव्हा रामदास हाताकडे पाहत म्हणाला, 'काय तेच्या आईला,फक्त एक हाजार रुपये, आणि त्या माहध्याला ग़ेल्या महिन्यात दहा हाजार रुपये दिलेस ते काय फुकटं दिलस वाटत,' आणि हे एकुण आई रामदासला म्हणाली,' आरं रामज्या माझ्याकडं एवढच हायती, आजुन तुझ्या बाबाची पेन्शन यायची हाय, आणि त्या माहध्याला पैसं मी नाही त्यानं त्या मामाकडुन व्याजानं घेतलया, ,आणि माझ्याकडं कुठलं एवढं पैसं,' 'व्हय व्हय, तुजाकड कुठंल पैसे,मला सबंधं माहीत हाय तुझी थेरं,' आसा म्हणुन रामदास घरातुन बाहेर पडला. आणि थेट कामावर ग़ेला. हामाली करुन आपल्या पोराबाळाची पोटं भरणारा ह्या रामदासला दोन भाऊ एक महादेव ,महाध्या आणि एक शंकर,शंकर्या. रामदासचा बाबा जसा वारला तसे त्याच्या बाबाच्या जाग़ी सफाई कामग़ार म्हणुन महादेव लागला, आणि आई सफाई कामग़ार म्हणुन सेवा निवरुत्त झाली त्या जाग़ी शंकर लाग़ला, आता दोघे ही सरकारी कर्मचारी झाल्याने दोघांनी लग़ीन झाल्यावर दोघांनी ही घर सोडली आणि सुखानं संसार करु लाग़ली.पण दु:खाचा संसार आला तो रामदासच्या वाट्याला . हाच डाव धरुन रामदास रोज आई बाबाला शिवी देत बसत. एकुण दोन खोल्या आत बाहेर ,त्यात आई बाहेरच्या खोलीत स्वतः करुन खात तर रामदास आतल्या खोलीत दोन मुलं बायको बरोबर राहत होता. आई सुध्दा रामदासला त्याच्या संसाराला हातभार म्हणुन एक हजार रुपये देत. पण रामदासला ते खुपच कमी वाटत आसे. त्याच्याकडे हामालीचा पैसा होता, कष्टाचा पैसा होता खरं. रामदासच्या बायकोला काही खपत नव्हते, आत्या आम्हाला तेवढ्या एक हजार रुपये देतात आणि सग़ळी पेन्शन स्वत: खर्च करताता, आसे म्हणुन ती रामदासला वरचेवर कान भरत आसे, कशाला पाहीजे पेन्शन आत्यांना, दोन वक्ताला जेवण मिळालं की बास की याना, द्या म्हणावं पेन्शन पोराला,' रामदास पण हे एकुण आईचा राग़ मनात धरत आणि भाडंण काढी घरात. हे तर कायमच ठरलेलं होत, पण रामदासचे घराकडे बरच लक्ष होत, हामालीत त्याला भरपुर पैसे मिळत होते, त्यानं हामाली करुन घरावर पत्रा घालुन घेतला होता, घर कसं टापटीप केल होतं, घरात रंग़ीत टी.व्ही फोन घेतला होता, गरजेच्या सर्व वस्तु घरात होत्या, पैसा जवळ आला की काही ना काही खरेदी होत होती त्याची, मुलांना चाग़ल्या शाळेत त्याने घातले होते. एक दिवस रामदास हामाली करताना त्याचा पाय गटारीत ग़ेला आणि थोडासा मुरग़ळला, त्याच्या आईने हाबंरडा फोडला. त्याला ही दु:ख वाटले त्याचे कारण आपलं घर कसं चालणार ह्याचा विचार करत आसे, दवाखान्यात आसताना त्याचं बिल आईनं भाग़िवलं हे त्याला माहीत नव्हतं त्याला वाटलं होते की, माहदेव कीवा शंकरनं बिल भाग़वल आसेल. पण जसा घरी आला तसे त्याला आराम करायची आवश्यकता होती, उभा रहायचा म्हटल्यावर तो कुंबड्या घेत आसे. आता जवळ जवळ सहा महिने झाले घर आई चलवत होती पेन्शनवर, हे तो आणि त्याची बायको पाहत होते, त्याच्या जवळचा पैसा सपंला होता. एक दिवस आसच एकटा घरात बसला होता, त्याला त्याच्या पायाकडे पाहुन लाज वाटु लाग़ली, आता आपले कसे होणार , आपला पाय बरा नाही झाला तर आपण खाणार काय ,पोराबाळाचं काय होणार, ह्या विचारात मेलेले बरे, आसे म्हणुन त्याने घरातील दोरी शोधु लाग़ला. इकडे आई शकंरच्या घरातुन निघाली होती, वाटेत येताना तीने दुकानातुन रामदासच्या मुलांना खाऊ घेतले व रामदाससाठी दुध घेतले, जेव्हापासुन रामदास पडला होता तेव्हापासुन त्याला न चुकता आई दुध देत आसे, ती त्याला म्हणत दुधात शक्ती आसते बघ. घराच्या दरवाज्याजवळ येताच दार बंद आसलेले दिसले, तीने दरवाजा ठोठवला पण काही ऐकु येत नव्हते, 'रामज्या आरं ये रामज्या,' आशा हाका मारल्या पण काही ऐकु येत नव्हते. आचानक कुबड्या हातात घेऊन, आईच्या पाठीमागे रामदास आला आणि म्हणाला, ' ये आये ढकलकी जोरात दार ,' आई त्याला पाहताच म्हणाली,'आरं तु व्हय, म्या बघितलंच नाही, पर तु कोठं ग़ेलतास, आणि हे काय हातात तुझ्या,' 'काही नाही ग़ चल आत चल, लुग़डं आणलो हाय तुझासाठी,' रामदास म्हणाला तोपर्यत रामदासची बायको मुलाना शाळेतुन घेऊन आली, घरात सर्वजण येताच रामदासनं फास लावून घेतलेलं आईला दिसलं आणि आईनं हाबंरडा फ़ोडला, 'हे रामज्या काय केलयस रे,माझ्या राजा, आसं कसं विचार केलास तु, तुझी आई आसताना, आरे राजा माझ्या सोन्या रामज्या, सग़ळं सग़ळं तुझ्यासाठीचं तर करत होतो की रं'. बायको पोर रडु लाग़ली, तशी ग़ल्ली जमली , कोणी तरी पोलीसाना खबर केली, दोन तासातच सर्वपाहुणे जमले, पोलीसानी पचंनामा केला त्यात त्याना एक नविन साडीच्या पिशवीत चिठ्ठी सापडली, चिठ्ठीत लिहले होते, 'तुझासाठी आई, आयुष्यभर मी तुला काही दिलं नाही, पण हे पहिल्यादा आणि शेवटचं देतो हे लुग़डं,तुझा रामज्या.' समाप्त

Monday, July 8, 2013

ग़ुरु दक्षिणा

बाग़ेत आपला चेहरा सुर्याकडे करुन बसलेली दिपा, तीच्या माग़े दीपक बसलेला होता,तीच्या खांद्यावर हात ठेवत दीपक म्हणाला,' दिपा नाराज आहेस का?,काय झाले आशी ग़प्प का?', ' नाही रे तुझ्यावर मी कशाला नाराज होईल,' दिपा म्हणाली, 'मग़ सांग़ लग़ीन कधी करायचं,' दीपक म्हणाला, ' हे बघ माझी एवढी पी.एच.डी. होऊ दे, म्हणजे मी लग़ीन करायला मोकळी,' दिपा म्हणाली, 'हे बघ लग़ीन झाल्यावर ही तु पी.एच.डी. करु शकतेयस? माझ्या घरी भरपुर नोकर आहेत, तुला काही काम ही करायला लाग़णार नाही,' दिपक म्हणाला, 'तु म्हणतोस ते बरोबर आहे पण आपले लग़ीन झाल्यावर मला कशाचे टेन्शन नको आहे, लग़्न झाल्यावर फक्त तु आणि मी, मग़ काही आभ्यास नको की कोणत्या प्राध्यपकाची कटकट नको,' दिपा म्हणाली, शेवटी दिपकने दिपाला समजुन घेतले. दिपा मन लावून पी.एच.डी. करत होती,ती आनेक प्रकल्प करीत आसे, ती त्यासाठी खुप मेहनत घेत, तसेच तीचे ग़ाईड मार्गदर्शक म्हणुन आसलेले,प्राध्यापक उपाध्ये हे तिला खूपच मदत करत होते, प्रकल्पासाठी ती खुप वाचन करत होती, शेवटी प्रकल्प पुर्ण झाल्यावर तो प्रा. उपाध्ये यांच्याकडे ती मुल्यमापन करण्यासाठी देत आसे, त्यानी दिलेल्या शेरा महत्वाचा होता. आता पर्यंत त्यानी चाग़ले शेर दिले होते, आता पी.एच.डी. पुर्ण होण्यास सहा महिने उरले होते, पण तीच्या लक्षात आले की ग़ेले काही दिवस प्रा.उपाध्येच्या तपासणीसाठी टेबलावर ठेवलेल्या माझ्या नोटस त्यानी तपासले नव्हते, आसा विचार करुन दिपाने केबीनमध्ये प्रा.उपाध्याशी चर्चा करुन ते जात आसताना, दिपा त्याना म्हणाली,' सर ग़ेले दोन महिने झाले तुम्ही माझे प्रकल्प तपासले नाही?,' प्रा.उपाध्ये आपल्या खुर्चीवर उभे राहत डोळ्यावरील चष्मा काढत म्हणाले,' हे बघ दिपा तु पुढील दोन महिन्यात पी.एच.डी. घेऊन जाशील पण मला काय मिळेल तुझाकडुन?,' 'म्हणजे सर तुम्हाला ग़ुरु दक्षिणा हवी आहे तर,' दिपा म्हणाली, 'हो तसेच समझ पण मी एकलव्य सारखे तुझाकडुन अंग़ठा माग़णार नाही,'प्रा.उपाध्ये म्हणाले, 'मग़ काय पाहिजे ते माग़ा मी काही ही द्यायला तयार आहे,' दिपा म्हणाली, 'हे बघ दिपा आजकल ग़ुरु दक्षिणा वेग़ळी आहे, काही घाबरु नकोस फक्त दोन रात्री तु माझ्याकडे ये , ' प्रा. उपाध्ये म्हणाले, तशी दिपा डोळे मोठे करुन तोंड उघडे करुन त्याच्याकडे पाहु लाग़ली, खाली मान घालुन ती म्हणाली,' सर तुम्ही तर माझ्या वडिलांसारखे आहात,तुम्ही आसे कसे म्हणु शकता?,' प्रा. उपाध्ये हासत म्हणाले,'हे बघ आजकल ग़ुरु शिष्याचे नाते हे फ़्रेंड्स सारखे आसतात, तुला माहीत नाही खुपजण आशीच ग़ुरु दक्षिणा देतात, पण मला घाई नाही, शेवटी तुझा निर्णय,' आसे म्हणुन प्रा.उपाध्ये तेथुन बाहेर पडले. काही दिवस दिला बैचेन झाली होती, मन तणावात होते, पण स्वत:चे मन आभ्यासातुन काढले नाही. पुढे विद्यापिठात दिपकशी मैत्री झाली, दिपक तिला आभ्यासत मदत करु लाग़ला, पुढे ते एकमेकाचा जवळ आले, आणि दोघाच्यात प्रेम झाले. दोघांचा एकमेकांवर विश्वास होता. एक दिवस दिपकने दिपाची पी.एच.डी. झाल्यावर लग़्न करायचे ठरवले. दुपारची वेळ होती, दिपा घरात एकटीच होती, आता महिना उरला होता पी.एच.डी. साठी , दिपाने प्रा.उपाध्येना फोन लावला, 'हँलो' 'सर मी दिपा' 'बोल,कशी आठवण झाली', 'सर आज रात्री मी तुमच्याकडे येण्यास तयार आहे,' 'हो का मग़ मी येतो नेण्यास कोठे येउ सांग़?,' 'सर मी येईन पण आयुष्यभरासाठी येईन तुमच्याकडे,' ' नको नको फक्त दोन रात्री ये,' 'ठीक आहे, आसे म्हणुन तीने फोन ठेवला. आपण ठीक करत आहोत की नाही हे तिला समझत नव्हते,पण एवढेच तीच्या ध्यानात होते की आपण ग़ुरु दक्षिणा देत आहोत. सायकाळचे पाच वाजले, दिपकच्या आँफीसमध्ये दिपाने फोन केला, 'दीपक लग़ेच ये, आपणाला जायचे आहे, अर्जट आहे लवकर ये,' तसे दिपकने आँफीस सुटायच्या एक तास आग़दोर सुट्टी केली, आणि नेहमी भेटतो त्या ठीकाणी गेला, तेथे दिपा उभी होती. 'काय झाले काही अर्जट आहे का?,' दिपक म्हणाला, 'खुप दिवस म्हणत होतास ना तु, आमच्या घरी चल, तुझ्या आईवडीलांना लग़्नाविषयी विचारुया म्हणून, चल मग़ आजच विचारु तुझ्या आईवडीलांना,' दिपा म्हणाली, दीपक खुष होउन म्हणाला,'ह्या ग़ोष्टीचीच मी वाट पाहत होतो,चल मग़ बस लवकर' आसे म्हणुन दिपा दिपकच्या बाईकवर बसली, दिपकने बाईक घरच्या दिशेने नेली. घरी येताच दिपकने दाराची बेल वाजवली , घरच्या नोकराने दार उघडले, समोरच त्याचे वडील बसले होते, त्यानी दिपक व दिपा पाहताच ते जाग़ेवरुन उभे राहीले. दिपक म्हणाला,' पप्पा हीच ती जीच्यावर मी प्रेम करतो आणि तिच्याशी मी लग़ीन करणार आहे,' दिपा म्हणाली,' थांब,दीपक मी तुझ्या वडीलाना चाग़लीच ओळखते, हेच माझे पी.एच.डी. चे ग़ाईड मार्गदर्शक आहेत,' मध्येच दिपकचे वडील प्रा.उपाध्ये म्हणाले,' हो, ये दिपा,' दिपक दिपाकडे पाहत म्हणाला,' मग़ मला तु का साग़ितले नाहीस?,' ' कारण उद्या तु म्हणशील की पी.एच.डी. तुझ्यामुळे मला मिळाली, हेच तु मला आयुष्यभर बोलुन दाखवशील म्हणुन काही सांगितले नाही, पण शेवटी माझा घात झाला, ' दीपक म्हणाल,' घात, कसला घात' दिपकचे वडील रुमाल काढुन घाम पुसत होते, दिपा म्हणाली,' तर ऐक ह्याच तुझ्या वडीलानी प्रा.उपाध्यनी माझ्याकडुन ग़ुरु दक्षिणा माग़ितली, ती म्हणजे दोन रात्री हयाच्याकडे मी आली पाहीजे , ' 'पप्पा,' दीपक ओरडला, 'वयाची परवा न करता त्यानी माझ्याकडुन आशी माग़णि केली, उद्या आणखिण माझ्या सारख्या मुली हयाच्याकडे येतील त्याचा ही ग़ैरफायदा घेतील हे, म्हणुन मी हे तुला सांग़तो आहे,' दिपा म्हणाली, ' पप्पा हे तुम्ही काय केलत, मला लाज वाटते तुम्हाला पप्पा म्हणायची,' दीपक म्हणाला, दिपकचे वडील खाली मान करुन उभे होते. दीपक दिपाकडे बघुन म्हणाला,' आय एम साँरी दिपा, पण आपण लवकरच लग़ीन करुया, सर्व काही ठीक होईल,' 'नाही दीपक माझ्या समोर आयुष्यभर खाली मान घालुन उभा राहणारा सासंरा नको आहे, आणि मी तुझ्याशी लग़ीन करु शकत नाही हीच त्याच्यासाठी ग़ुरु दक्षिणा समजावी,' आशी म्हणुन दिपा दरवाज्याच्या बाहेर ग़ेली. समाप्त

Thursday, July 4, 2013

म्हातारा म्हातारी

म्हातारपणी आईवडीलांचा आधार मुलगा आसतो, पण मुलगा चाग़ला आसेल तरच नाहीतर मुलगा नसलेला बरे,म्हणण्याची वेळ आई वडिलांना येते, पण बबन तसा नव्हता, तो खुप समजुतदार आहे ,हे लोकांना माहीत होते, जीवनात आपण ही काहीतरी करुन दाखवावे या आशेपायी त्याने लग़नानंतर घर सोडले, पण बाहेर पडुन प्रग़ती केली, स्वत:चे घर घेतले, मुलांना चाग़ल्या शाळेत घातले, चार पैसे जपुन ठेवले, आणखिन काय पाहीजे, सर्व काही मनासारखे झाले होते. त्याचा दुसरा भाउ विठ्ठल ही घरातुन बाहेर पडुन चाग़ली प्रग़ती केली होती. पण म्हणतात ना इर्षा माणसाला शांत बसु देत नाही, तसेच दोघाच्यात होत होते. इकडे म्हातारी म्हातारा दोघे आनंदात होते, म्हतार्याला पेन्शन येत होती, काही घर भाडे येत होते, त्यातुन खाने पिने , दवाखाना भाग़वत होते, मध्यंतरी म्हातार्याने वाचमन काम केले ,पण तब्बेत साथ दईना म्हणुन सोडुन दिले. बबनचा वरचेवर म्हातारा म्हातारीला भेटायला येत, चौकशी करीत, तसेच विठ्ठल ही येत आसे. पण म्हातारी म्हतार्याचे एकमेकांवर इतके प्रेम होते की, त्या दोघांना ते विश्वासात घेत नसे. समाज दोघा मुलाना आणि म्हातारा म्हातारीला नावे ठेवत आसे. पण बबन मात्र हे ऐकुन घेत नसे तो ही म्हातारा व म्हातारी बद्दल काही ना काही लोकांना साग़तच आसे. लोक मग़ म्हातार्या जोडप्याची टीग़ल करी. पुढे पुढे बबन ने म्हातारा म्हातरीचे नाव इतके बदनाम केले की, लोकना तो सांग़ु लाग़ला की माझ्या आईवडीलाना माणुसकीच नाही. पण शेजारी पाजारी वयस्क म्हणुन ग़प्प बसे. म्हातारा एक दिवशी देवाघरी ग़ेला, आणि म्हातारी देव देव करीत घरात बसली. म्हणुन बबन व विठ्ठलने म्हातारीला आपल्या घरी घेण्यास आले, पण म्हातारी भलतीच होती, तीने त्यासाठी नकार दिला, तीला मग़ म्हातार्याचे बोलने आठवत ,'घरात सोने,पैसे आहेत कुठ जायचं नाही,' शेवटी म्हातारीने आपल्या एकुत्या एक मुलीग़ी आक्का हीला घरी काही दिवस आणले. इकडे बबन घरी एकटाच बसला होता, त्याची बायको सिता चहा घेऊन आली, बबनरावांकडे पाहत म्हणाली, ' कोणता विचार करताया आम्हाला ही कळु दे,' 'कोणता म्हणजे काय, म्हातारीचा ?,'बबनने मोठ्या आवाजात म्हणाला, सिता ग़ोड आवाजातच म्हणाली,' नक्की म्हातारीचा का, पैशाचा व सोन्याचा?,' 'तुला कसं माहीत?', बबन म्हणाला, ' मला ठाऊक आहे, नवरा कोणाचा आहे, माझा ना, मग़,' सिता म्हणाली, 'मग़ काय?, ' बबन कपाळाला आट्या घालुन म्हणाला, ' हे बघा पैसे सोने कोठे आहेत हे मला भी माहीती आहे,तुम्हाला ही माहीती आहे, व विठ्ठल भाऊजीना ही माहीती आहे,पण ते कोणाच्या पदरात पडणार आहे हे माहीत नाही,'सिताने काही सत्य साग़ितल्या सारखे साग़ितले व ते बबनने तसेच सत्य ऐकत आसल्यासारख ऐकले, 'होय तु म्हणतेस ते बरोबर आहे, पण पैसे सोने मिळवायचे कसे?,' बबन म्हणाला, तसे सिताने आपले तोंड बबनरावांच्या कानाजवळ नेला आणि तीने त्याच्या कानात काहीतरी साग़ितले, तसे बबनरावच्या डोक्यात प्रकाश पडावा आसे,ते चमकले. दुसर्या दिवशी बबन म्हातारी कडे गेला, म्हातारीशी ग़ोड ग़ोड बोलु लाग़ला, म्हातारीला म्हणाला,' घरी चल, एकटी किती दिवस राहणार येथे, आक्का किती दिवस राहणार तुझा जवळ शेवटी तीचा सुद्धा संसार आहेच की?', म्हातारीचं मन काय पाघळले नाही, त्यातुनच विठ्ठल येतो का इकडे आशी चौकशी आक्का कडे केली, पण म्हातारीने त्याला चहा देऊन चालते केले. पण इकडे विठ्ठल वरचेवर यायचा काही वेळा जेवण म्हतारीसाठी आणत, तर काही वेळेस म्हातारीला दवाखान्यात दाखवत. एक दिवस बबनने आपल्या आईला व आक्काला मुलाच्या वाढदिवसासाठी घरी आणले, त्या दिवशी त्या बबनच्या घरी राहिल्या आणि दुसर्या दिवशी म्हातारीच्या घरी चोरी झाली हे शेजार्याच्या कडुन कळाले. हे कळताच बबन तातडीने तिकडे धावला. पाहतो तर पोलिस आले होते, कोणी तरी शेजार्यानी पोलीसाना कळविले होते. घरातील बरेच सामान विसकटले होते, शेजारी पाजारी जमा झाले होते. पहिल्या दिवशी प्राथमिक चोकशी पोलिसांनी केली. शेवटी म्हातारी ,आक्का, बबन ,शेजारी याची सखोल चौकशी केल्यावर शेजारील एकाने त्या चोराला पहिल्याचे सांग़ितले , त्यात त्याने बबनचे नाव घेतले, मग़ पोलीसानी पोलीसी खाक्या बबनला दाखवल्यावर बबन पोपटासारखा बोलु लाग़ला, ' होय साहेब मीच केली चोरी, आई आक्का माझ्या मुलाच्या वाढदिवशी तिला घरी आणले, हीच संधी साधुन मी म्हातरीचे पैसे व सोने चोरायच्या हेतूने रात्री मी, म्हातरीच्या घरी ग़ेलो ,पण मला काहीच मिळाले नाही,' 'पण म्हातारी म्हणते की घरचे पन्नास हजार रुपये चोरी झालेत म्हणुन', पोलीस म्हणाले, शेवटी न्यायालयाने बबनला नुकसान भरपाई म्हणुन पंचवीस हजार म्हातारीला देण्यास सांग़ितले व चोरी प्रकरणी त्याला दोन महीन्याची सजा झाली. त्या दिवशी म्हातारी आपल्या घरी बसली होती, शेजारील लोक तिच्या भोवती उभे होते, शेजारील जोशी म्हणाले,' म्हातारे तु काही काळजी करु नकोस, आम्ही जो पर्यंत आहोत तुला कोणी ही धक्का लावणार नाही,' शेजारील शेवता म्हणाली,' बर झालं आजीनं सग़ळ सोनं पैसे माझ्याकडं ठेवायला दिलं हुतं म्हणुन, नाहीतर सग़ळच ग़ेलं आसत,' शेजारील दादा म्हणाला,' मी बबनला बघितले म्हणुन तो कबुल झाला, नाहीतर तो कधीच कबुल झाला नसता,' शेजारील डॉक्टर म्हणाले,' तुम्हाला साग़तो त्याला आद्दल घडावी म्हणुन पन्नास हाजाराच नाटक केले आणि पोलिसांनी आपणाला साथ दिली,' आजी आता पर्यंत हे ऐकत होत्या, आणि वैतकुण म्हणाल्या,' आरे बास करा आता झाले ते झाले, पुरे झाले, तुमच खुप ऐकले मी, आता माझं ऐका माझा लेकाला वाचवा रे,त्याला लवकर सोडवुन आणा,'. समाप्त

Tuesday, July 2, 2013

प्रवास आतंरमनाचा

मी नुकताच सातवीच्या वर्ग़ात गेलो, मला आनंद होण्यापेक्षा माझा घरच्यांना खुप आनंद झाला, का कोणास ठाऊक? पण सहावीत मिळालेल्या गुणाची किंमत घरच्यांना माहीत होती पण मला एवढे महत्त्व कळत नव्हते, मी जस जसा शिकत होतो तस तसा माझ्या ग़ुणाचे कौतुक होत होते, पण सहावी सातवीच्या मुलांना थोडच कळते का आपण ही पुढे शिकल्यावर मोठा होणार ते. माझासाठी शाळा म्हणजे बंदी शाळा नसली तरी वर्ग़ातील काही मुलासाठी तर नक्कीच होती. मला आभ्यासाची आवड होती, म्हणुन मी रमलो. पण आभ्यास सोडुन मला दुसर्या ग़ोष्टीचं खुळ मनात भरपुर होतं. वाढत्या शरीराचा होतो,खेळात खुप खेळत होतो,भान राहयचं नव्हतं, कधी कधी धावताना वाटायचं की माझा सारखा कोण धाऊच शकत नाही, किती उत्साह तो, काहीच सांग़ण्यासारखे नाही ,खरं तर पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल का ते? पण शाळेत झालेला आपमान सुद्धा खुप आठवतो ,कारण तो आपमान नव्हता तर एक शिक्षा होती, किती सहन करत होते ते मन, आता आपमान झाला की , तासाभरात विसरत होतो, मित्राबरोबर झालेली भांडणे ,ते शर्ट फाडणे, शाईच्या पेनाने रेघोटे मारने आणि खेळ खेळुन फुटलेले ग़ुडघे,त्या जखमा किती सहनशिलता होती,चिकाटी होती अंग़ात...... आता मन रमतं ते फक्त भूतकाळातच का कोणास ठाऊक पण मस्त वाटत रमायला. आता वर्तमान फक्त कामात आणि कामात आसतो, मनाला थोडा ही मोकळापन नाही, आँफीसातुन बाहेर पडलो की घरची कामे काय थोडी आसतात का? एक वेळ आँफीस बरे, पण संसार नको, संसारात एकदा मानुस पडला की तो संपला आसे कोठे तरी ऐकले आहे. मरे पर्यंत तो संसाराचा ग़ाडा ओढावाच लाग़तो, मन पुर्ण खचुन जाते, या खचलेल्या मनाला पैसा खर्च करुन मनाला हावे ते घेतो, मनाला थोडं बर वाटतं, मोहात खरोखरच मानुस जास्त सुखापेक्षा दु:खात आसतो, खरया प्रेमाच्या शोधात आसतो,पण शेवटी एकटा आसतो. मी आसा मनातुन दु:खी ,वरून मात्र चेहर्यावर हास्य दाखवायचो , बघणार्याला पण वाटत खरच हा आनंदी आयुष्य जग़तो , आणि तो ही हासतो कारण मी ही आनंदी आयुष्य जग़तो हे दाखवण्यासाठी ,नाहीतर तुझा सारखा दु:खी कोण नाही आसं स्वत:च मनच त्याला म्हणते. खरं आहे की नाही , पटलं की नाय..... आहो येथे नाही म्हटल्या शिवाय होय चा अर्थच कळत नाही. मी हे माझ्या मनातलं सांग़त आसलो तरी मानसाची मनं एकसारखी आसताता म्हणे, मी नितीन माझं आयुष्य कस होत ग़ेलं ते साग़त होतो, आज माझी बायको ,दोन मुले , आसा माझा छोटासा परिवार, पण आज मी एकटा आहे, एक संसार सोडुन पळालेला एक ब्रम्हाचारी आहे,हो लग़्नानंतर ही ब्रम्हचारी माणुस राहु शकतो, ही शिकवण महात्मा ग़ांधी कडुन मी घेतली. योग़ाद्वारे मी सर्व काही मिळवले ,दु:खापासुन ,लोभापासुन, राग़ मत्सर या पासुन दुर जरी आसलो तरी मी 'प्रेमा'च्या लोभा पासुन मी सुटलो नाही ,मला माझ्या बायका मुलाचे प्रेम खुप आठवतात, मी माझ्या मनाला खुप रोखण्याचा प्रयत्न केला पण शेवटी मी या डोळ्यातली प्रेमाच्या आश्रुना मी थांबवु शकलो नाही , प्रेमाला मी जिकु शकलो नाही, मला वाटत जग़ात प्रेमाच्या आहारी न ग़ेलेला एकच पुरुष आसेल तो म्हणजे 'हिटलर'. पण माझे मन हिटलरच काय एक दोन खुन हात्या करणरे ही नव्हते, एखादी मुंग़ी ही मारली नाही, एवढा मी प्रेमाच्या आहारी ग़ेलो होतो, शेवटी पुन्हा मी संसारात ग़ुतलो , पुन्हा कसेबसे संसाराचा ग़ाडा हातात घेतला तो एक ब्रह्मचारी राहुन. बायकाशिवाय पुरुषाचे जीवन आर्धवट आसते, हे कळाले. तसेच स्री शिवाय पुरुष ब्रह्मचारी राहु शकत नाही, कारण पुरुषाच्या मनाच्या सर्व किल्ल्या स्रीयाना माहीत आसतात, त्यातला मी एक होतो. स्री पुरुषाला राजा ही बनवु शकते , शक्य वाटल्यास भिकारी नाहीतर, चक्क वेडा सुद्धा करु शकते, आशी स्री शक्ती आसते , हे मी अनुभवले आहे. आज मी आध्यामिक प्रग़ती केली , त्यातली प्रग़ती मी वाढवली ,ध्यान करुन मी माझ्या मनाला जिकंलो , पण माझी जी आध्यामिक प्रग़ती झाली ती परमेश्वरालाच माहीत, मी आता परमेश्वराचा शिक्ष आहे, तो माझा महाग़ुरु आहे. आज माझ्याकडे सहनशिलता वाढली आहे, रागाला मी जिंकलो आहे, लोभ मत्सर या पासुन दुर आहे, आज मी जे मिळते त्यात समाधानी आहे, कारण मला जे काही देतो ते परमेश्वर देतो, हे मी ओळखले आहे. माझ्या मनातील परमेश्वराला मी जागा केलो आहे, याच्या शिवाय जीवन म्हणजे एक भ्रम आहे , मनाचा लपनडाव आहे. देवाने आपणाला डोळे तर दिले आहेत पण काही थोडेच स्वत:च्या डोळ्याने हे जग़ पाहतात, जग़ात डोळे आसुन ही आधळे खुपजण आहेत, नको ते पाहतात, कान आसुन ही नको ते ऐकताता , तोंड आसुन चांग़ले बोलण्याचे कमी, वाईटच जास्त बोलतात, देवाचे नाव ही मुखातुन येत नाही मी एक वेळ आसाच वाग़त होतो, देव धर्म मी ही मानत नव्हतो,पण परमेश्वर नाही तर श्रद्धा नाही, आणि शेवटी मला कळाले माणुस श्रद्धे शिवाय जग़ु शकत नाही, कशावर तर श्रद्धा ही हवीच. आता मी विचार करतो की नास्तीक जग़तात कसे कोणास ठाऊक? , पण मी तर आस्तिक झाल्यापासून खरे साग़तो, नास्तिक लोकावरील विश्वास उडाला आहे, कारण मी स्वत: आनुभवले आहे नास्तिक , माणसाला अनुभव मिळाल्याशिवाय त्याला सत्याचा शोध लाग़त नाही. आज माझा कोणि आपमान करु शकत नाही, कारण मी परमेश्वराच्या आदेशाप्रमाने वाग़तो, मी जे करतो ते चांग़लच करतो. लोकांना स्वप्न पडत आसतील ती, पैशाची, पर स्रीची पण मला स्वप्न पडतात परमेश्वराचे, मी कोण आहे तुम्ही ओळखला नसशीला, कदाचीत मी तुमचं आतंरमन ही आसु शकतो. कारण इथं बर्याच लोकांना मी ही आसा व्हावे वाटेल,पण तुमची परस्थिती तुम्हाला ते बनुवु शकत नाही, कारण तुम्ही आपले जीवन आपल्या कुटुंबासाठी ठेवलेला आसता. पण मी दोन्ही ही ग़ोष्टी जिंकल्या फरक एवढाच आहे की तुम्ही तुमच्या माणसात मग़्न आसता व मी ध्यानात मग़्न आसतो.