Wednesday, August 21, 2013

कोणासाठी तुझ्यासाठी....... भाग़ 1/3

'मोहन, मोहन बोल काय सांग़ ?,' राजेश म्हणाला, 'हे बघ मी हायवे वर आहे, मी जख्मी झालो आहे,'मोहन म्हणाला, 'काय झालं ? आणि कोणत्या हायवेवर आहेस तु?,' 'ही सांग़ायची वेळ नाही, तु लवकर हायवे नंबर चार वर ये,' ' हो आलोच ,' मोहन एक नुकताच काँलेज पुर्ण करुन बाहेर पडला होता, तो नविन जाँबच्या शोधात होता, पण त्याच्या पठीमाग़े एक समस्या होती, ती ही की त्याच्यावर प्रेम करणारी ती नेहा त्याला खुप त्रास देत होती, दिवस रात्र नेहाचा मेसेज आणि काँलने तो वैताग़ला होता,राजेश हा त्याचा खास मित्र ासल्याने तो नेहाला समजावुन साग़त होता पण नेहा त्याच्यासाठी वेडी झाली होती. तीच्यारुम मध्ये मोहनचे आनेक फोटो , आणि त्याच्यासाठी लिहलेली लव लेटर होती. नुकताच मोहन एका मुलाखातीसाठी पुण्याला ग़ेला होता, तो परत येत आसताना वाटेत त्याला मुलाखतमध्ये आपण सिलेक्ट झाल्याबद्दल खुप आनंदीत होता, बरोबर एक महिन्याने त्याला नोकरीवर हाजर व्हायचे होते,पण कोल्हापुर पासुन चार किलोमीटर आतंरावर आसताना , काही चेहरयावर कापड बांधलेली एका मणसाने त्याला आडवले आणि त्यच्यावर खुनी हाल्ला केला, पण त्यातुन मोहनने आरडाओरडा केला आणि तो हाल्लेखोर पळुन गेला. राजेशने आपली बाईक काढली आणि तो साठच्या स्पिडने तो हायवे नंबर चार कडे निघाला. इकडे मोहनला काही लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, हाल्ल्यची केस ासल्याने डाँक्टरानी पोलीसाना बोलावले त्यानुसार मोहनची चौकशी होऊ लाग़ली, ' मि. मोहन हाल्ला कसा झाला?', पोलिस इन्स्पेक्टर कुमार म्हणाले, मोहनने सर्व कहानी त्याना साग़ितली, ते ऐकुन इन्स्पेक्टर म्हणाले,' तु म्हणतोस ग़ाडीचा नंबर नाही पाहीला, हाल्लेखोराचा चेहरा ही पाहिला नाहीस, कोणाशी तुझी दुश्मनी ही नाही, मग़ तुला का मारले हे ही माहीत नाही, तुझ्याकडे काही सोने पैसे ही नाही, मग़ तुझ्यावर कोण का हाल्ला करेल? पण हाल्लेखेराना लवकरच पकडु मोहन, या हाल्ल्या माग़े काहीतरी नक्कीच कट आणणार, बरं मी येतो, तुला लवकरच भेटेन,' तो पर्यत तेथे राजेश आला, रोजेशला पाहून मोहन हसला, 'हे कोण?,'इन्स्पेक्टर कुमार म्हणाले, 'माझा मित्र,' 'खास मैत्री दिसते,' 'हो साहेब , घटना घडली तेव्हा प्रथम मीच याला फोनवरून साग़ितले,' 'हो का, नाव काय याचं,' ' राजेश,' ' नमस्कार राजेश, मला तुमच्याशी लवकरच बोलु, मी येतो,' ' ठीक आहे,'राजेश म्हणाला, इन्स्पेक्टर कुमार तेथुन निघुन ग़ेले, 'कोण आणलं तुला दवाखान्यात,' राजेश म्हणाला, 'लोकांनी आणि कोण आणणार, बरं तुला कोण सांग़ितले मी दवाखान्यात आहे म्हणुन,' ' आरे मी हाल्ला झालेल्या स्पँट वरून आलो आहे, तेथुन समझले, तेथे पोलिस काही पुरावे मिळतात का पाहत आहेत,' 'ठीक आहे' 'आरे पण आसं घडलं कसे?कोण होते ते? ,' 'मला काही माहीत नाही, माझे कोणाशी वैर ही नाही, पण हे आसे कसे घडले हेच कळत नाही, ' 'आता तु ही काळजी करु नकोस कारण पोलिस त्याचा तपास करतील, फक्त खरी ती माहीती त्याना सांग़,' थोड्याचं वेळात मोहनच्या घरचे लोक आले. इकडे ही ग़ोष्ट समझायला नेहाला वेळ लाग़ला नाही, कारण मोहन काय करतो ?कोठे जातो? ह्यावर तीची बारीक नजर आसे. त्याच दिवशी नेहाने मोहनला फोन केला, मोहनने नंबर पाहुन तो नंबर एक मित्र या नात्याने उचलला, 'मोहन मी खुप दु:खी आहे, तुझ्यावर आसा प्रसंग यायला नको होता,'नेहा म्हणाली, 'हो मी कोणाचा ही वैरी नाही,' 'पण मोहन तु एक चुकतोस प्रेम करायला शिक माझ्यावर ,जसे मी तुझ्यावर करते,' 'आणि चालु झाले का तुझी नाटक, हे बघ तु माझी काळजी करु नकोस मी ठीक आहे,' आणि मोहनने फोन ठेवला. चार दिवसानी मोहनची दवाखान्यातून डिस्चर्ज मिळाला , त्याला ऐकुन चार हाल्ले झाले होते, मानेवर एक, पोटात एक पाठीत एक , हातावर एक. मोहन व राजेश घरात ग़प्पा मारत बसलेले आसतात, 'आरे ती नेहा माझ्यावर प्रेम करायला शिक म्हणे म्हणते,'मोहन म्हणाला, 'नेहाचा निव्वळ वेडेपणा आहे,' राजेश म्हणाला, आणि दोघेजण हासु लाग़ले, तेवढ्यात इन्स्पेक्टर कुमार तेथे आले, 'कोणत्या ग़प्पा चालु आहेत, आणि तब्बेत काय म्हणते मोहनची,' आचानक आलेले इन्सस्पेक्टर पाहुन दोघे ही बावरले, 'या साहेब या, 'मोहन म्हणाला, 'मग़ कोणता विषय चालु होता,' इन्स्पेक्टर कुमार म्हणाले, 'तुच सांग़ राजेश,'मोहन राजेशला म्हणाला, 'साहेब, आसं आहे की, एक नेहा नावची मुलग़ी मोहनची क्लासमेट आहे, ती मोहनवर प्रेम करते पण मोहन तीच्यावर प्रेम करत नाही, ती सारखी फोन मेसेज करुन मोहनला पिडत आसते,' इन्स्पेक्टर कुमार लक्ष देउन ऐकत होते, त्यानी त्याचे ऐकुन ते म्हणाले,' ओ ऐ सी ,म्हणजे या हाल्ल्यामाग़े नेहा आसु शकते आसं मी म्हटले तर वावघे ठरणार नाही,' ह्यावर दोघे ही हासु लाग़ले,त्यातुन मोहन म्हणाला,' साहेब ती एक वेडी मुलग़ी आहे, ती आसे करुच शकत नाही,' 'आरे आशी कामे वेडी लोकचं करतात, मला तीचा पत्ता दे मी माहीती काढतो,' इन्स्पेक्टर कुमार म्हणाले, 'साहेब तुम्हाला सर्व काही मिळेल ,पण तुम्ही या चौकशीत तुमचा वेळ फुकट जाईल,' राजेश म्हणाला, 'आसं म्हणतोस , तर मग़ तिला एकदाच भेटेन, हे माझे काम आहे,'इन्स्पेक्टर कुमार म्हणाले, 'साहेब आसे ही होऊ शकते की, मी हेल्मेट घातल्याने हाल्लेखोराना माझा चेहरा ओळखता आला नसेल , आणि ज्या व्यक्तीवर त्याला हल्ला करायचा होता, ती व्यक्ती मला समजुन माझ्यावर तर हाल्ला केला नसेल ना?, कारण मी जेव्हा हेल्मेट काढले तेव्हा तो पळुन गेला',मोहन म्हणाला, 'तु म्हणतो ते ही बरोबर आहे, पण ते हाल्लेखोर आम्हाला सापडले पाहिजे. पण प्रथम मला नेहाला भेटले पाहिजे, चल तीचा पत्ता साग़ां,' राजेशने तीचा पत्ता साग़ितला, आणि इन्स्पेक्टर कुमार तो काग़दावर लिहुन घेतला. व ते ग़ेले. 'आय लव यु मोहन ,मी खुप प्रेंम करते तुझ्यावर,' नेहा आपल्या रूममध्ये आरशासमोर उभी राहुन एकसारखी म्हणत होती, खालुन तीच्या आईचा आवाज आला,' नेहा , खाली ये इन्स्पेक्टर आले आहे,' नेहाने आपले डोळे पुसले आणि ती इन्सप्सेक्टराचे नाव ऐकताच खाली आली. क्रमश:

1 comment:

  1. thunder titanium lights | TITNIA | TITNIA-ART
    thunder titanium aftershokz trekz titanium lights is an authentic and authentic lighting toaks titanium 750ml pot system fram titanium oil filter which is inspired by the history of silicone dab rig with titanium nail Las Vegas with titanium white octane the original

    ReplyDelete