Friday, November 15, 2013

स्वच्छ मन

मी आँफीसमधुन घरी जात होतो,पुढे काही आतंरावर ट्राफीक जाम होते,मी माझ्या बाईकचा वेग़ कमी केला आणि माझी बाईक एका फोर व्हीलर ग़ाडी माग़े थाबवली. तेथे प्रत्येकजण त्या ट्राफीक मधुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता,ग़ाडीचा आवाज,लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता.त्यातुनच एक आवाज येत होता,तेथे जवळच्याच एका मशीदीत नमाजचा आवाज येत होता.त्या थांबलेल्या जागेवरच मी विचार केला,'प्रत्येक लोकांचा देव वेग़ळा आसतो,मला ते काय म्हणतात याचा आभ्यास करुन जाणुन घ्यायची इच्छा झाली,'त्यावेळी आनेक विचार मनात येत होते. शेवटी त्या ट्राफीकमधुन मी बाहेर पडलो व त्या विचारात आसल्याने सहजच माझे लक्ष नेहमीच्या मार्गा वरील त्या चर्चवरील क्राँसवर लक्ष ग़ेले. मग़ माझ्या मनात विचार आला,' लोक येशु क्राँसवर आसताना त्याचे स्मरण कसे करु शकतात?कारण येशुतर वेदनेत आसतो,' मनात त्या धर्माचा ही आभ्यास करावयाचा वाटला,मी काही वेळातच घरी आलो.समोरच श्री रामचा फोटो पाहिला आणि समाधान पावलो.कारण मी रामायण भग़वतनेग़ीता वाचली होती, आता मला कुराण,बायबल वाचण्याची इच्छा झाली. बायको माहेरी ग़ेली होती,मी कपडे बदलून,चेहराधुण्यासाठी बेसवाँश कडे ग़ेलो,चेहरा धुण्या अग़ोदर एक नजर चेहरा आरशात पाहीला,आज चेहरा माझा वेग़ळाच दिसत होता. त्या चेहर्यात मला साई बाबा दिसत होते,मग़ मला जाणवले,'हे तर साई बाबाच आहे,ती दाढी ते डोळे सर्व काही मी साई बाबा आसल्याचे सांग़त होते,मग़ मीच डोळे मिटवले व डोके त्या आरशाला टेकवले,' मी विचार करत होतो की,'साई बाबा माझ्यात का आले?,काय तो भ्रम होता की काही कारण होते,' मग़ सग़ळ्यात त्रासदायक प्रश्न होता की,'आसे मला का वाटावे?काय मी भारतातील नविन देव किंवा संत बनणार आहे का?,' मग़ मला वाटु लाग़ले,'भारताची दशा पाहता भारताला एखाद्या संताची ग़रज आहे, काय मी त्यासाठी लायक आहे?,' आणि मी आपले डोळे हाळु हाळु उघडले व आरशात माझा चेहरा पाहु लाग़लो, आता तो साईचा चेहरा दिसत नव्हता.मी चेहरा बेसवाँश मध्ये धुतला व पुन्हा चेहर्याचे निरक्षण केले आणि वाटले आपला चेहरा साई बाबा सारखा तर आहे, डोळे,ओठ,कान व दाढी. मग़ मी साई बाबा विषयी वाचण्यास सुरवात केली,त्यावरुन मनात विचार आला की,साई बाबांचा कोणताही धर्म नव्हता,त्याच्याकडे सर्व धर्माचे लोक येत आसत,आणि त्याच्या दरबारात आजुन ही येतात,ते म्हणत 'सबका मालिक एक है,' रात्री खुप उशीरा मी झोपलो,दुसर्यादिवशी रविवार होता,त्यामुळे काही वाटले नाही. रात्री मला एक स्वप्न पडले,एका घोड्यावर हात फिरवत साई बाबा उभे आहेत,त्याच्या चेहर्यावर हास्य होते. त्यावरुन मला त्याची चुकलेल्या घोडीची कथा आठवली व मला तोच घोडा आसेल वाटले. मी स्वप्नात पाहिले की तो घोडा साई बाबा पासून दुर जात आहे,व तो काही अतंरावर उभा राहुन साईना पाहत आहे. साई बाबा दोन्ही हात पसरुन त्या घोड्याला बोलवत आहेत,पण घोडा त्याना पाहुन ओरडत आहे,मोठ मोठ्याने किंकाळ्या फोडत आहे. पण आचानक वार्याचे वादळ निर्माण होऊ लाग़ते.आता घोडा आणखिन जोरात किंकाळ्या फोडत आसतो. अचानक मला जाणवले की, तेथे कोणि ही साई बाबा नव्हते की,वार्याचे ते वादळ होते.पण त्या घोड्याचा आवाज मात्र येत होता.आचानक मी उठलो व डोळे उघडले,खिडकीतुन त्या घोड्याचा आवाज येत होता.मी खिडकी जवळ ग़ेलो, खिडकीतुन पाहीले, स्वप्नातील त्या साई बाबा जवळील त्या घोड्यासारखा घोडा, त्याचे पाय एका ग़टारीच्या लोखंडी सळीच्या जाळीत आडकलेला होता,त्याच्या पायातुन रक्त वाहत होते, जस जसे घोडा पाय ओढत आसे तस तसे त्याच्या वेदना वाढत होत्या,त्याच्या आवाज माझे ह्रदय हालवुन टाकत होते. मी रोडवर खिडकीतुन पाहिले सकाळी सकाळी काही लोक ये जा करत होते पण त्या घोडयाच्या वेदनेकडे कोणि ही पाहत नव्हते.मी चौथ्या मजल्यावर होतो. मग़ मीच विचार केला की,'मीच त्या घोड्याला बाहेर काढतो,पण नाही,मला तसे करताना कोणि विचारले तर?त्या घोड्याचा मालक आला तर?मी त्या घोड्याला सोडविताना लोक काय म्हणतील?लोकांनी विचारले तर?आणि मी काय सांग़ु?आजकाल कोणि कोणाची मदत करतो का?आजकाल जर एखादा प्रयत्न जर करत आसेल तर त्याच्यामाग़े सुद्धा लोक कारण शोधत आसतात? आसे विचार येऊ लाग़ले,' पण माझ्या डोक्यात विचार आला,साई बाबानी जर आसा विचार केला आसता तर लोकांची मदत केली नसती.मग़ मीच विचार केला,'लोकांची परवा न करता त्या घोड्याला सोडीवले पाहिजे व मी ही नाही ग़ेलो तर त्या लोकांत व माझ्यात काय फरक आसणार.माझ्या मनात एक वादळ निर्माण झाले, मला कधी एकदा त्या घोड्याला सोडवितो आसे वाटु लाग़ले.म्हणुन मी खाली जाण्यासाठी पँट घालु लाग़लो,चप्पल घातले व बाहेर पडणार तेवढ्याच त्या घोड्याचा आवाज बंद झाला. मी खिडकीतुन पाहिले तर खांद्यावर चाबूक आसलेला त्या घोड्याच्या मालकाने त्याला काढले होते.मग़ मला समाधान वाटले. मग़ मी आकाशाकडे पाहिले मला त्या आकाशात साई बाबाचा चेहरा दिसत होता. आणि माझ्या ह्रदयातुन एक आवाज आला ,'तु तुझे मन फक्त स्वच्छ ठेव,बाकी देवावर सोड.' *ओम साई बाबा*

No comments:

Post a Comment