Saturday, September 28, 2013

अपहरण की खुन?..... भाग़ 3

'महिना झाला आजुन जाँनचा पत्ता नाही,हे आसे कसे होऊ शकते,'मँरी जाँनची बायको राँर्बटला म्हणाली, 'हो पण आम्ही त्याच्या शोधात आहोत, पण मला तर वाटते तो नक्कीच जिवंत आसला पाहिजे,'राँर्बट खिन्न नजरेने म्हणाला, 'बेथला माँम कडे सोडले आहे,म्हणुन बरे नाहीतर आता पर्यंत पप्पा पप्पा करत मला खुप ताप दिला आसता,' 'तु काळजी करु नकोस तो आला की दोघे ही आमच्याकडे चला म्हणजे तुला ही जरा बरे वाटेल,'आसे म्हणुन राँर्बटने तिचा निरोप घेतला. * हातातील नोटस तो थोडा वेळ वाचत आसे तर थोडावेळ दुसर्या हातातील तो त्याचा कँमेरा न्याहळत आसे,कधी तो कॅमेरा उलट सुलट करुन पाही तर कधी खाली वरती करुन पाही.बहुतेक नोटस मध्ये साग़ितल्या प्रमाणे तो ती क्रिया करत आसे. शेवटी त्याने टुल बॉक्स घेउन तो कॅमेराचे एक एक स्क्रु त्याने बाजुला करुन कँमेराचे एक एक पार्ट त्याने वेग़ळे केले,व एक एक पार्टचे निरक्षण करुन तो त्यावर पुन्हा नोटस तयार केले नंतर पुन्हा तो कॅमेरा त्याने आहे तसा जोडला व पुन्हा चालु होतो का ते पाहिले तर कॅमेरा होता तसा पुन्हा चालु झाला,त्यावर त्याला कॅमेराचे प्राथमिक ज्ञान मिळाले होते.त्यावर तो खुष होता. * 'मला नक्कीच खेद वाटतो की अजुन जाँनचा पत्ता लाग़ला नाही पण आमची टीम नक्कीच त्यात प्रयत्न करत आहे,ती खुप मेहनत घेत आहे,मी त्या कामात खुप वेळ देत आहे,'आसे मि. सिमेननी एका मीडीया न्युज चँनेलवर साग़ितले. ते राँर्बटने न्युज चँनेलवर पाहिले. दुसर्या दिवशी राँर्बटच्या घरी अनेक मिडीयावाले जमा झाले,त्यानी अनेक प्रश्नाचा भिडीमार राँर्बटवर केला. जाँन अजुन कसा सापडला नाही? त्या बोटीचे काय झाले?तो बोट मालक त्याच दिवशी कसा मेला? रेड झोनवर मेलेल्याचे काय झाले?जाँनचे ही तसेच झाले आसे समजावे का? आशा प्रकारच्या अनेक प्रश्नावर राँर्बटने थोडक्यात उत्तर दिले, 'या तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे लवकरात लवकर आपणाला मिळतील,फक्त थोडा वेळ जाउ द्या,आम्हाला आमचे काम शांन्त पद्धतीने करु द्या,' यावर मिडीयावाल्यानी ही शान्त प्रतिक्रिया दिल्या. * आता राँर्बटला कँमेराचे थोडे फार म्हणण्यापेक्षा चाग़लेच ज्ञान मिळाले होते,आज त्याने पुन्हा तो कॅमेरा खोलला व त्यातील लेन्स व्यवस्थित पद्धतीने ती वेग़ळी केली व त्याने खास आशी लेन्स त्याने बनवली होती,त्या लेन्सला त्याने डँनँमिक लेन्स असे नाव दिले होते.ती लेन्स अलग़द त्याने त्या कँमेरात बसवली,व पुन्हा कॅमेरा जोडला. आता कॅमेराने या लेन्सला प्रतिसाद दिला तर भलतच काहीतरी घडणार आशी आशा राँर्बटला वाटत होती. कारण ती लेन्स आशा पद्धतीने त्याने तयार केली होती की त्या लेन्स द्वारे त्याला भविष्य पाहता येणार होते. आणि तो हे जग़ अशा पद्धतीने पाहणार होता की त्यामुळे तो भविष्यात राहुन कार्य करणार होता. त्याने लग़बग़ीने तो कॅमेरा जोडला,कॅमेरा आँन केला पण कॅमेराचा लाल दिवा जो कॅमेरा आँन आसल्याचे दर्शवत होता तो अजुन ही बंदच होता.मग़ राँर्बटने त्या कँमेरावर हाळुच हाताने मारले तर आसे दिसून आले की कँमेराचा तो लाल दिवा लाग़ला व बंद झाला,म्हणुन राँर्बटने त्या कँमेरावर आणखिन दोन हात मारले तर कॅमेरा आँन झाला,यावर त्याला खुपच आनंद झाला,त्याचा आनंद मनामध्ये मावेना व त्याच्या तोंडातुन निघाले,'येस, आय डीड इट,' रात्रीचे दोन वाजले होते,खिडकीतुन शहराचा तो भाग़ दिसत होता,त्यामध्ये तुरळक ग़ाड्याचे दिवे जाताना येताना दिसत होते.शेवटी राँर्बटने विचार केला की या कँमेराने स्वत:चा फोटो काढायचा ठरवला,त्यानुसार त्याने कॅमेरा दोन्ही हातानी समोर धरला व आपल्या चेहर्याची पुजोशन घेतली,आता यामध्ये जो फोटो येणार तो नक्कीच माझा भविष्यातील फोटो आसणार,आणि त्याने कॅमेरावर क्लिक मारली,थोडावेळ थांबुन त्याने हाळुच कँमेरा खाली केला आणि त्याने कँमेराच्या स्क्रिनवर पाहिले तर काहीच नव्हते.राँर्बटला दु:ख वाटत होते कारण त्याचा कँमेरा लेन्सला प्रतिसाद देत नव्हता. आता पुढे काय करायचे या विचारत राँर्बट होता.आपले काहीतरी चुकले आहे हे त्याला कळाले होते पण नेमके कोठे चुकले होते तेच त्याला कळत नव्हते. * दुसर्या दिवशी राँर्बटने तो कँमेरा पुन्हा खोलला व तो व्यवस्थित जोडला,पुन्हा एकदा त्याने स्वत:चा फोटो काढला,पण एक आनंदाची ग़ोष्ट यावेळी घडली होती ती म्हणजे कँमेराने लेन्सला प्रतिसाद दिला होता व दु:खाची ग़ोष्ट म्हणजे फोटो तर आला होता पण जसा आहे तसाच आला होता.म्हणुन राँर्बट विचार करित बसला होता.त्याच्या डोक्यात विचार आला की आसे कसे होउ शकते. * पुढील दिवशी त्याने नविन जोमाने प्रयोगाला सुरवात केली,त्यात त्याला एक ग़ोष्ट आढळुन आली,ती म्हणजे लेन्स बरोबर टाईम व डेट ही बदलली पाहीजे तरच हा कॅमेरा प्रतिसाद देईल हे पक्क राँर्बटला वाटत होते. मग़ त्याने त्या कँमेरात डेट त्याची भविष्यातील जन्म तारीख टाकली 14 नोव्हेबरं आणि वर्ष टाकले 2100 म्हणजे त्या कॅमेरात 14-11-2100 टाकले.आणि वेळ टाकली दुपारी 12.30 पी.एम. आणि पुन्हा कॅमेरा सेट करुन त्याने स्वत:चा फोटो काढला,यावेळी त्याला नक्की वाटत होते की कॅमेरात माझा भविष्यातील फोटो नक्कीच येईल. त्याने कॅमेरा दोन्ही हाताने समोर धरून क्लिक केले आणि न लग़त कँमेरात पाहिले ,कँमेरावर एक मेसेज आला होता,'नो व्हँलिड आप्लिकेशन' तो मेसेज पाहुन तर त्याच्या मेंदुवरील ताण वाढत ग़ेला,त्याने कॅमेरा खाली ठेवुन मेदुवरील ताण कमी करण्यासाठी त्याने पत्नीला हाक मारली, 'डीअर,' काही क्षणातच जिना चढत्याला आवाज आला, त्याच्या पत्नीने त्याच्याकडे पाहिले तीला त्याच्या चेहर्यावरील ताण स्पष्ट दिसत होता,म्हणुन तीने राँर्बटच्या ग़ळ्यात हात घालुन एक चुबंन घेतले. राँर्बटने तिला व्हीसकीचा ग़्लास भरण्यास सांग़ितले व ती तसे करुन ती खाली निघून ग़ेली. आता एक एक हळुवार व्हीस्कीचा घोट घेत होता,आता त्याच्या मेदुवरिल ताण कमी झाला होता आणि त्या प्रयोगावर विचार करत होता. वर्ष 2100 ला मी जिंवतच आसेल का?मग़ त्याच्या डोक्याने उत्तर दिले 'नाही'त्यामुळे तर त्या कँमेराने'नो व्हँलिड आप्लिकेशन'आसा मेसेज तर दिला नाही ना? क्रमश:

No comments:

Post a Comment