Tuesday, September 3, 2013

आकाश

'हे बघ आज आपण विज्ञान प्रदर्शन पाहयला जात आहोत,' आकाशचे पप्पा त्यला म्हणाले, ' हो का ? मग़ चला लवकर मला पाहयाला खुप आवडेत ,'आकाश एकदम आंनदाने म्हणाला, 'आरे हो हो रे पहिला ग़ाडी तर स्टार्ट करु दे मला,' आसे म्हणुन त्यानी ग़ाडी स्टार्ट केली, वडीलाचा तो खुपच लाडका, पण वडीलानी त्याचा हाट्टीपणा व दंगामस्ती पसंत नव्हती , त्याना दुसर्याची मुलेच शांत वाटत, आणि आपला आकाश ही आसा शांत व्हावा आशा नजरेने ते पाहत पण अकाश मात्र कधी शांत तर कधी वादळासारखा भिरभिरीत त्यावेळी मात्र हे वादळ शांत करण्यासाठी त्याच्या पप्पांना मात्र हाताचा वापर करावा लाग़े, मात्र त्याच्या आशेवर पाणि पडत आसे. शाळेततर त्याचे नाव दररोज निघत आसे, शाळेतील बाई तर त्याला पुढे बसायला साग़त आसे, पण तो पुढे बसुन कधी कधी झोपा काढत आसे, मग़ त्याचा आजुबाजुची मुले त्याला मारत आसे, हेच जेव्हा बाईच्या लक्षात येई तेव्हा मात्र त्याला तास दोन तास उभा राहयला लावी. मग़ शाळेतुन घरी आल्यावर खांद्यावरून कोठे ओझे उचलुन कधी ते खाली फेकतोय आसे त्याला वाटे, आणि ते घरी आल्यावर नेहमीच्या जाग़ी ते फेकत आसे, आणि आईकडे खाण्यासाठी माग़त आसे , त्याची शाळेतुन आलेली आवस्था पाहुन तर त्याची आई म्हणत की, 'आसा कसा रे तु वेग़ळा वेग़ळा, आसा का वाग़तोस सग़ळ्याच्या मना विरुद्ध ,' आशा प्रकारे त्याची आई रोज एक त्याच्या नावाची कविता म्हणत आसे. पण आकाश हा एका काल्पनिक विचारातच ग़ुग़ आसे, माझे नाव आकाशच का? वरील आकाशाशी माझा काय संबध? तो वरचा आकाश आहे तर मी खाली का?तो वरचा आकाश मग़ मी खालचा आकाश तर नाही ना? तो माझा भाऊ तर नाही ना? ते आकाशातील तारे कोण आहेत? तो चांदो मामा खरंच मामा आहे का माझा? आशा विचारात तो आनेक ग़ोष्टीचा विचार करत आसे, मग़ कधी कधी तो कविता ही करत आसे. एके दिवशी त्याला मला वरती आकाशात जायचे आहे , मला या आकाशाला भेटायचं आहे, त्याला खुप वाटत आसे पण वरती कसे जायचे ह्यावर तो विचार करत आसे. मग़ तो स्पाइडर मँन सारखे उडायचा प्रयत्न केला , पण जेव्हा त्याच्या पायाला लाग़ले तेव्हा त्याचे प्रयत्न बंद झाले. शेवटी मग़ तो आकाशातील विमाने पाहत आसे, पण हे विमानातुन कसे जायचे हे तो विचार करत आसे. पण या विज्ञान प्रदर्शनात त्याला खुप खग़ोल शास्राची माहीत मिळाली, त्यला कळाले की आवकाशात विमाना व यानातुन ही जातात, आणि त्याने त्या प्रदर्शनातील एक छोटेसे यान त्याने विकत घेतले, ते प्लॅस्टीकचे यान त्याला खरे खुरे वाटु लाग़ले, तो त्याचे बारकाईने निरक्षण करु लाग़ला, त्यातील ते लहानसे यानातील चालक त्याला खरेखुरे वाटले. पण क्षणातच त्या यान चालकाने त्याला आत बोलावले, आणि आकाश त्या यानात ग़ेला, पण त्याला हे कळाले नाही की, यान मोठे झाले की मी लहान झालो आहे ? 'कसा आहेस आकाश?,' तो यान चालवणारा म्हणाला, 'माझे नाव कसे माहीत तुम्हाला?,' 'ते नंतर कधीतरी सांग़ेण पण तुला आवकाश पहायचे ना?,' 'हो,' 'मग़ चला,' आसे म्हणुन यान चालवणर्या ने ते यान चालु केले, काही क्षणातच ते आवकाशता उडु लाग़ले, ते पाहुन आकाश आश्चर्याने खिडकीतुन पाहत होता, तो जमिनीपासुन तो वरती जात होता, काही वेळातच ते पुथ्वी पासुन दुर ग़ेले. आता ते याने आवकाशात तरंगु लाग़ले, ' हे बघ हे आकाश आहे,' यान चालवणारा म्हणाला, 'येथे तर खुप काळोखचं दिसतो जिकडे तिकडे, पण हे सुदर आसे विविध रंग़ाचे चेडु खुप सुदंर आहेत' ' हो पण ते चेडु नाहीत , ती बघ ती निळ्या रंग़ाची आपली पृथ्वी, ' ' हो का, म्हणजे आपण तेथे राहतो,' 'हो ,' ' किती सुदंर दिसते ही पृथ्वी, आणि तो आपला चंद्रच हो की नाही?,' ' अग़दी बरोबर, आणि ते बघ आपला सुर्य व त्याचे नऊ ग़्रह' आसे म्हणुन त्यानी आकाशला त्या ग़्रहा संबंधी माहीती दिली. हे आश्चर्य चकित होउन ऐकत होता, त्यातुनच तो म्हणाला,' ' आपण या विश्वात किती लहान आहोत ना? तरीपण लोक स्वत:ला किती मोठे समझतात ना,' 'हो रे पण तुला जसे समझले तसे थोडेच कुणाला समजणार आहे का?,' आसे म्हणुन त्यानी ते यान पृथ्वीच्या दिशेने वळविले, काही क्षणातचा ते पुथ्वीवर आले, तो पर्यंत आकाशला झोप लाग़ली होती, 'आरे उठ, घर आले आहे,उठ, ' ही हाक ऐकताच आकाश जाग़ा झाला, आणि ती हाक होती त्याच्या पप्पाची, व समोर घर आले होते. मग़ त्याने डोळे चोळत आपल्या हातातील ते यान पाहिले तर ते ग़रम झाले होते, बहुतेक ते उडल्यामुळे की हातात धरल्या मुळे हे माहीत नव्हते, पण त्याने यानात पाहिले तेव्हा त्या मध्ये तो यान चालवणारा तेथे नव्हता, ह्याचे मात्र त्याला आश्चर्य वाटले. समाप्त

No comments:

Post a Comment