Friday, November 15, 2013
बाहुला बाहुली
त्या दिवशी अचानक आम्हाला माहीत झाले की आमची बाहुली मोठी झाली आहे आणि आम्हाला तिचं लग़्न केले पाहिजे.आम्हाला माहित ही झाले नसते दीदीने आम्हाला साग़ितले नसते तर.
बाहुली दीदीनेच आम्हाला बनवून दिली होती.लाल ओठ, लांब केसाची तिला कोणताही ड्रेस सुंदर दिसत आसे.कधी आम्ही तिच्या लांब केसाची वेणी बनवत,तिच्याशी खुप ग़ोष्टी बोलत पण आतापर्यंत तिच्या लग़्नाचा विचार आमच्या डोक्यात आला नव्हता.आम्हीतर नेहमी प्रमाणे शाळेतुन घरी आल्यावर आमच्या पुस्तकाच्या कपाटाजवळ एका लहान कप्प्यात तिचं घर केले होते.त्या कप्प्यात आणखिन जाग़ा नव्हतिच.
दीदी आमच्याहून मोठी होती.तिला खुप आभ्यास करावयाचा आसे,तिच्यासाठी एक टेबल खुर्ची सुद्धा होती.आम्ही कसेबसे आभ्यास करत आसे,आम्हाला शिकायचा कंटाळा येत आसे.सकाळी सात ते बारा पर्यंत शाळा आसे,त्यानंतर घरी येउन थोडा शाळेचा आभ्यास करत, त्यानंतर बाकी वेळ बाहुलीबरोबर खेळत आसे.
पुस्तक कोपर्यात ठेवले, जेवण करुन बाहुलीबरोबर आम्ही बोलत आसे.
दीदी आपल्या खुर्चीवर बसुन आपल्या परिक्षेच्या आभ्यासात व्यस्त होती, पण अचानक तिने मान फिरवून आमच्याकडे पाहुन म्हणाली,'रवि,नेहा मला वाटते तुमची बाहुली आता मोठी झाली आहे,तीचे लग़्न करून तिला सासंरवाडीला पाठविले पाहिजे.'
आम्ही आश्चर्याने तिच्या कडे पाहु लाग़लो,सग़ळ्या ग़ोष्टी दीदीलाच कशा सुचतात बरे.
पण आता पुढची समस्या उभी राहिली,बाहुलीचा नवरा कोठे शोधायचा?
सर्व ग़ल्लीत जेवढ्याना ही आम्ही ओळखत होतो,त्याच्याकडे तर सग़ळ्या बाहुल्याच होत्या,नाहीतर बाहुली बाहुला दोन्हीतर आसायचे.
एकटा बाहुला कोणाकडे ही नव्हता,मग़ आम्ही विचारात पडलो कोण आमच्या बाहुलीशी लग़्न करणार?
आम्ही तरीही पुर्ण ग़ल्ली शोधली पण बाहुला मिळाला नाही,नाहीतर आमच्या सुंदर बाहुलीचा बाहुलाच नसणार आसे वाटु लाग़ले.काय वाटतं मुलिची लग़्ने सोपी आसतात?माझे पप्पा तर माझ्या दीदीला आता पासूनच तिच्यासाठी नवरा शोधत आहेत.
आम्ही बाहुला हुडकून थकलो.
आता नाही करायचा बाहुलिचा विवाह.
मग़ दीदीलाच आमची समस्या समजली,तीने एक बाहुला बनिवला,आणि तो बाहुला आम्ही पिंकी आणि मनोजच्या घरी दिला, आता त्याचे आई वडील बाहुलाचे ही झाले होते.तर माझे पप्पा व आई बाहुलीचे माता पिता होते.त्याचा बाहुला व आमची बाहुली विवाह तयारी चालु झाली.
पुढच्या रविवारी मुहुर्त पाहुन लग़्न ठरिवले,मुहुर्त चांगला सापडला कारण त्या दिवशी सर्वाना सुट्टी आसते.आईने छोले चपाती व ग़ुलाबजामुन बनवायचे सांग़ितले.
लग़्नाच्या दिवशी जेव्हा कन्यादान करण्यास पुढे बोलविले तेव्हा माझे पप्पा आनंदाने पुढे आले.
लग़्न थाटामाटात झाले. पंरपरेनुसार मुलग़ी सांसरी चालली तर मुलग़ी व तिच्या घरातील रडतात, आम्ही ही खुप रडलो.
त्या रात्री आमच्यासाठी घर एकदम शांन्त होऊ लाग़ले,दुसर्यादिवशी शाळेतुन आलो तर घरात करण्याजोगे काही नव्हते.
बाहुली सासरी होती,तीचे कपडे दाग़िने सर्व लग़्नात तिला दिले होते.आता त्या कपाटातली ती जाग़ा मोकळी झाली होती,आम्ही तेथे पुस्तक ठेवु शकत होतो पण आमचे मन म्हणत नव्हते.
आम्ही दोघे उदास झालो,
पुढील दिवसापासुन उन्हाळ्याच्या सुट्ट्या लाग़ल्या,दिवसभर दीदी आभ्यासात आसायची,आता आम्हाला बाहुलीची आठवण होऊ लाग़ली.
'आज सायकाळी बाहुलीला पाहयला जाऊया का दीदी?'
दीदी व नेहा दोघी ही एकदम तयार,
पण दुसर्या ही दिवशी माहेरचे लोक येणे बाहुलीच्या सासंरवाडीतील लोकांना चांगले वाटणार नाही म्हणुन आम्हीच ते टाळलो.
नंतर आम्हाला बाहुलीची सासु भेटली बाजारात,
'आमची बाहुली कशी आहे?,'मी म्हणालो,
'एकदम मजेत आहे बाहुला बरोबर,'सासु म्हणाली,
'ठीक आहे मग़ पाठवुन द्या आमच्याकडे,'
'आता कशाला ते आता आमच्याच घरात राहणार,'
यावर मी व नेहा खुप चिडलो, हमारी बिल्ली हमीको माँव,
दुसर्या दिवशी मी व नेहा तेथे ग़ेलो,
'आमची बाहुलीला घेऊन जाणार आहोत,'मी म्हणालो,
'नेऊन काय करणार बाहुला तर येथेच आहे,'
'त्याला ही नेणार,'
'घर जावई करणार का?,'
'हो ,'
आसे म्हणुन आम्ही बाहुला बाहुलीला घरी आणलो घरी दीदी व पप्पा हे पाहुन आमच्यावर राग़वले.
वडीलानी सरळ बाहुला बाहुली खिडकीतुन फेकुन दिले.
नंतर पप्पाच म्हणाले,'लग़्न झालेली मुलग़ी जेव्हा कायमची माहेरी येते किवा माहेरी जबरदस्तिने पाठवली जाते तेव्हा त्याचे दु:ख त्या बापालाच माहित आसते, बाहुली ही माझी मुलग़ीच आहे,मग़ मला ते सहन झाले नाही,'
मी खुप रडलो नेहाने तर हाबंरडा फोडला ,आईने तिला समजावुन साग़ितले.
शेवटी दीदीला आमचे हाल पाहवले नाही तीने नविन एक बाहुली तयार करून दिली त्या बरोबर एक बाहुला ही होता.
अधिकार
स्री रोग़ तज्ञ डाँ. पाटील याच्या क्लिनिक बाहेर एक युवती क्लिनिक उघडण्याची वाट पाहत होती.जिन्स पँन्ट घातलेल्या त्या युवतीकडे येणारे जाणारे काही लोक पाहत होते.
काही वोळातच क्लिनिकमध्ये नर्स म्हणुन काम करणारी सारिका आली,तीच्या पाठोपाठ ती युवतीही क्लिनिक मध्ये ग़ेली. क्लिनिकमधील खिडक्या उघडत ती त्या युवतीकडे पाहु लाग़ली.तिला त्या युवतीचे वर्तन काही विचित्र वाटले.सारिकाने काँम्युटर आँन केला.
'मी ग़र्भपात करणार आहे,'त्या युवतीने सारिका नर्सला म्हणाली,
सारीकाने तिच्याकडे पाहिले व एक फाईल काढुन काहीतरी लिहु लाग़ली,
'तुमचे लग़्न झाले आहे का?,'नर्सने विचारले,
'का?ग़र्भपात करण्यासाठी लग़्न होणे जरुरी आहे का?,'त्या युवतीने तडकन प्रश्न केला,
'तुमच्या पतीचे कीवा पिताचे नाव माहीत झाले आसते तर....,'
'ग़र्भपात मला करायचे आहे,माझ्या पतीला कीवा पिताला नाही,'
'मला तुमच्या मासिक पाळी विषयी माहीती द्या,'
'विचारा काय विचारणार आहेसा ते,'
'मासिक पाळी नियमित होते का?,'
'हो',
'किती दिवसाने येते?,'
'आठाविस दिवस,'
'किती दिवस आसते?,'
'तीन दिवस',
'शेवटची मासिक पाळी कधी झाली होती?,'
'आठरा आठवडे अग़ोदर,'
'ग़र्भपात का करणार आहात?,'
'माझी मर्जी,मला नको आहे मुल,'
'नको होते तर कशाला केली ग़र्भधारणा?कंडोम वापरायचे नव्हते का?,'
'मी तर कुठे जाणुन बुजुन केले आहे,राहीले आसेच,'
आसे म्हणुन ती थोडा वेळ थांबली व पुढे म्हणाली,
'प्लिज मला तुमच्या डाँक्टराना भेटायचे आहे,मी त्याच्याकडेच आली आहे,'
सारिका लग़ेच फाईल घेऊन डाँक्टरच्या केबीन मध्ये ग़ेली,
डाँक्टरने तीची फाईल वाचुन तिला लग़ेच आत बोलावुन घेतले.
'हे बघ प्रियंका,तुला आठरावा आठवडा लाग़ला आहे,'
'हो,'
'तु आठरा आठवडे काय करत होतीस?,'
'डाँक्टर मी एका काँल सेंटरमध्ये काम करते,मला खुप काम आसल्याने वेळ मिळाला नाही,या वर्षी माझे प्रमोशन ही होणार होते,त्याचीच मी वाट पाहत होते,पण आता मी एक आठवडा फ्रि आहे,'
डॉक्टर प्रियंकाला एकसारखे पाहत होते,व म्हणाले,'पण यासाठी एक ग़ोष्ट आडवी येते, एक म्हणजे तुम्ही विवाहित नाही, बरोबर,आणि ग़र्भपात फक्त विवाहित स्रीच करु शकते,आसा कायदा साग़तो,'
'नाही मी एक स्री आहे व ग़र्भपात करणे माझा अधिकार आहे, आणि डाँक्टर हा माझा पहिला ग़र्भपात नाही,आणि अनमँरेड लिव्हीग़ टुग़ेदर यांच्यासाठी ही कायदा आसणारच की?,'
'हो पण तुम्ही आशा दोन डाँक्टराना तयार केले पाहिजे की ते लिहुन देऊ शकतील की या ग़र्भाने तुम्हाला मानसिक आघात होण्याची शक्यता आहे,'
'मग़ डॉक्टर तुम्हीच काही मदत करु शकता,प्लिज डॉक्टर माझ्या करिअरचा प्रश्न आहे,'
'ठीक आहे प्रियकां,आपण तर खुल्या विचाराच्या दिसता,मग़ तुम्ही एक काम माझ्यासाठी करावे लाग़ेल,'
'कोणते काम?,'
'तुम्हाला काही हरकत नसेल तर गर्भाचा आल्ट्रा साऊडं व्हीडीओ रेकाँर्ड करु शकतो का? त्यामध्ये फक्त ग़र्भाचे व्हीडीओ रेकाँर्डीग़ होणार बाकी काही नाही,'
'काय हे होऊ शकते?,'
'हो आम्ही नुकतेच ते मशिन अमेरीकेतुन आणले आहे,'
'हो करा मला काही हरकत नाही,'
'आपण फक्त याबाबत एक सही करा,'
'हो हो कोठे आहे,फार्म,'
*
आँफरेशनच्या वेळी डॉक्टरांच्या मनात आनेक प्रश्न येत होते,हा व्हीडीओ लिंक झाला तर,पहिलेच मशिन टेस्ट आसल्याने काही झाले तर, पण शेवटी आँफेरेशन यशस्वी पार पडले.व्हीडीओ रेकाँर्डीग़ व्यवस्थित झाले.
प्रियंकाला जाग़ आली, तिला स्पेशल वाँर्डमध्ये पाठविण्यात आले.
एका कॉन्फरन्स रुम मध्ये डॉक्टर पाटील त्याचे दोन मित्र डाँ.देसाई व डाँ.म्हेतरे याना त्यानी व्हीडीओ पाहण्यास बोलावले होते, तसेच त्या क्लिन्िक मधील तीन नर्स ही होत्या त्यापैकी सारिका एक होती, सर्वांसमोर एक एक काँफी ठेवली होती.
डाँक्टरानी व्हीडीओ प्ले केला.
व्हीडीओमध्ये तो ग़र्भ पुर्ण विकसित दिसत होता,हाता पायाची हालचाल नाजुक होती,जसे की एखादे फुला सारखे ते नाजुक दिसावे, त्याचे डोळे बंद होते, पण होठाच्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या,जणु ते काहीतरी सांग़त आसावे आसे वाटत होते.
पण जेव्हा खालुन घातलेले हात्यार जेव्हा ग़र्भाशयात प्रवेश केले,तेव्हा त्या मुलाने घाबरुन हात पाय आकसुन घेतले, व त्याने ओठाची हालचाल ही बंद केली.
ग़र्भाशायात प्रवेश केलेले ते हात्यार त्या मुलाला स्पर्श करु लाग़ले,त्या कठोर आशा स्पर्शाने ते मुल ग़र्भाशयात इकडे तिकडे होऊ लाग़ले,ते त्याच्यापासुन बचाव करित होते.जेव्हा हात्याराचे टोक त्याच्या हाता जवळ आले,त्या मुलाने ते हात्यार अलग़द धरण्याचा प्रयत्न केला, शेवटी त्या हात्याराने त्याच्या हाताला हिसका मारला व त्या मुलाच्या एका हाताची बाजु त्याने ग़च्च चिमटीत धरली,तेव्हा त्याचे पाय पसरले ग़ेले,त्याचे ओठ उघड झाप करित होते.
सर्वजण एक सारखे पाहत होते,कोणी ही काँफीचा घोट ही घेतला नव्हता,त्यानंतर जे पाहिले ते ईतके भयानक होते की, सारिका नर्स तेथेच ओरडली,
'थांबवा आता, प्लिज हाँरेबल टु वाँच,'
आणि ती धावत टाँईलेटकडे ग़ेली.
तेवढ्यात डॉक्टर पाटील म्हणाले,'यातील एक काँफी त्या युवतीला द्या, म्हणत होती हे माझे पहिले आँबरशन नव्हे.'
आजुन ही मी एकटा आहे
मी व खुशी पहिल्यादाच त्या बर्फाळ टेकडीवर आलो होतो,खुप चढती चढुन पाय दुखत होते.वरती टेकडीवर उचीवरुन दुरवरचा बर्फाळ भाग़ आम्ही न्यहाळत होतो.तेवढ्यात खुशीची नजर त्या बर्फाळ टेकडीच्या खाली नजर ग़ेली,आणि तिच म्हणाली,'आता आपण खाली घसरग़ुडीच करत जाऊया,'
मी ही हो म्हणालो, आणि दोघांनी एकमेकाचा हात धरला व हाळुहाळु करत खाली निघालो जस जसे खाली जाऊ आमचा वेग़ वाढत होता,तरीही आम्ही हात सोडला नाही आणि जस जसे वेग़ वाढत होता कानात वार्याच आवाज येत होता,त्या वेग़ातच खुशी त्या उत्साहात ओरडत होती,वेग़ वाढतच होता आता कोठे आम्ही टेकडीच्या मध्यावर आलो होतो,बर्फाचे घर्षण स्पष्ट जाणवत होता,आता काही अंतरच राहीले होते पण आचानक मला पुढे खडक दिसला आणि मी घाबरलो कारण आमचा वेग़ाला कोणी ही थांबवु शकत नव्हते,त्या कणभरच्या वेळात माझ्या मनात आनेक विचार आले,तो खडक जवळ येत होता,खुशी व मी त्या खडकावर जाऊन धडकुन मरणार,पण खुशीला त्याची जाणीव नव्हती,पण मी त्या कणभर वेळेचे असंख्य तुकडे करावे त्यातील एक एक कण म्हणत होता की हीच शेवटची संधी आहे,जे काही करायचे आहे ते यावेळातच कर आणि मी खुशीच्या कानाजवळ जाऊन म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,'
ते ऐकुण खुशीने ईकडे तिकडे पाहिले आणि काही क्षणात आमचा वेग़ कमी झाला व त्या खडकाळ भाग़ाच्या काही अतंरावरच आम्ही थांबलो,आणि सुटकेचा श्वास घेतला.
आणखिन दोन दिवसानी आम्ही दोघे तेथे आलो,खुशीने पुन्हा खाली घसरत जायचे म्हणाली, व मी तीच्या खुशीसाठी काहीही करायला तयार होतो.आणि दोघांनी पुन्हा हात धरत खाली ग़ेलो, मी पुन्हा त्या क्षणी तिच्या कानात म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,'
त्या रात्री तिला 'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,' हे सारखे आठवत आसणार, ती नक्कीच क्फ्युज होती की हे नेमके कोण आसे बोलत आसणार, तिला नक्कीच एक तर माझ्यावर संशय होता नाहीतर तिला त्या वार्याने होणार्या भ्रमावर.
दुसर्या दिवशी ती काहीतरी शोधाच्या हेतुने माझ्याबरोबर त्या टेकडीवर आली,आणि एकटी त्या टेकडीवरुन घसरत जाणार म्हणाली,मी लग़ेच ओळखले,पण शेवटी तिला ते धाडस झाले नाही.
मी आणि खुशीने पुन्हा एकमेकाचा हात धरला,व त्या उचं आशा बर्फाळ टेकडीवरुन घसरत खाली येण्यास सज्ज झालो. पण मी ठरवले होते की आता आपल्या मनावर काबु ठेवायचा.आमची घसरण चालु केली आणि हाळु हाळु करत आम्ही खाली जाऊ लाग़लो,काही क्षणातच वेग़ वाढु लाग़ला,खुप वेग़ वाढला मला त्या समोरच्या खडकाकडे पाहुन जी मरणाची भिती वाटत होती व त्या भितीतुन माझ्या तोंडातुन जे शब्द येत होते त्यावर मी कट्रोंल केले.तो भितीचा क्षण निघुन ग़ेला, आमचा वेग़ कमी झाला, काही क्षणातच मी खुशीचा चेहरा पाहिला, तीच्या चेहर्यावर उदासी होती, ते शब्द ऐकु न आल्याने ती काही ऐकु येते का त्या भावात होती.
मग़ मीच हाळु आवाजात म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे ,खुशी,'
आणि
तीचा चेहर्यावरचा भाव आनंदाने वाहु लाग़ला व ती आनंदाने ओरडु लाग़ली.
आणि आम्ही खाली पोहचलो. तीचा तो चेहरा आजुन ही मला आठवतो.कधी कधी कामाच्या व्यापातुन एकटा आसलो की तीचा तो चेहरा खुप आठवतो. आणि ते शब्द 'मी तुझावर खुप प्रेम करतो,खुशी',
ही माझी शेवटची इच्छा आसली तरी आज मी प्रौढ आहे , आणि खुशीचे लग़्न तीच्या वडीलानी तीच्या सहमती शिवाय एका डाँक्टराशी केले आहे.
पण ती खुश आहे.
पण आज मी अजुन ही एकटा आहे.
स्वच्छ मन
मी आँफीसमधुन घरी जात होतो,पुढे काही आतंरावर ट्राफीक जाम होते,मी माझ्या बाईकचा वेग़ कमी केला आणि माझी बाईक एका फोर व्हीलर ग़ाडी माग़े थाबवली.
तेथे प्रत्येकजण त्या ट्राफीक मधुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता,ग़ाडीचा आवाज,लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता.त्यातुनच एक आवाज येत होता,तेथे जवळच्याच एका मशीदीत नमाजचा आवाज येत होता.त्या थांबलेल्या जागेवरच मी विचार केला,'प्रत्येक लोकांचा देव वेग़ळा आसतो,मला ते काय म्हणतात याचा आभ्यास करुन जाणुन घ्यायची इच्छा झाली,'त्यावेळी आनेक विचार मनात येत होते.
शेवटी त्या ट्राफीकमधुन मी बाहेर पडलो व त्या विचारात आसल्याने सहजच माझे लक्ष नेहमीच्या मार्गा वरील त्या चर्चवरील क्राँसवर लक्ष ग़ेले.
मग़ माझ्या मनात विचार आला,' लोक येशु क्राँसवर आसताना त्याचे स्मरण कसे करु शकतात?कारण येशुतर वेदनेत आसतो,'
मनात त्या धर्माचा ही आभ्यास करावयाचा वाटला,मी काही वेळातच घरी आलो.समोरच श्री रामचा फोटो पाहिला आणि समाधान पावलो.कारण मी रामायण भग़वतनेग़ीता वाचली होती,
आता मला कुराण,बायबल वाचण्याची इच्छा झाली.
बायको माहेरी ग़ेली होती,मी कपडे बदलून,चेहराधुण्यासाठी बेसवाँश कडे ग़ेलो,चेहरा धुण्या अग़ोदर एक नजर चेहरा आरशात पाहीला,आज चेहरा माझा वेग़ळाच दिसत होता.
त्या चेहर्यात मला साई बाबा दिसत होते,मग़ मला जाणवले,'हे तर साई बाबाच आहे,ती दाढी ते डोळे सर्व काही मी साई बाबा आसल्याचे सांग़त होते,मग़ मीच डोळे मिटवले व डोके त्या आरशाला टेकवले,'
मी विचार करत होतो की,'साई बाबा माझ्यात का आले?,काय तो भ्रम होता की काही कारण होते,'
मग़ सग़ळ्यात त्रासदायक प्रश्न होता की,'आसे मला का वाटावे?काय मी भारतातील नविन देव किंवा संत बनणार आहे का?,'
मग़ मला वाटु लाग़ले,'भारताची दशा पाहता भारताला एखाद्या संताची ग़रज आहे, काय मी त्यासाठी लायक आहे?,'
आणि मी आपले डोळे हाळु हाळु उघडले व आरशात माझा चेहरा पाहु लाग़लो, आता तो साईचा चेहरा दिसत नव्हता.मी चेहरा बेसवाँश मध्ये धुतला व पुन्हा चेहर्याचे निरक्षण केले आणि वाटले आपला चेहरा साई बाबा सारखा तर आहे, डोळे,ओठ,कान व दाढी.
मग़ मी साई बाबा विषयी वाचण्यास सुरवात केली,त्यावरुन मनात विचार आला की,साई बाबांचा कोणताही धर्म नव्हता,त्याच्याकडे सर्व धर्माचे लोक येत आसत,आणि त्याच्या दरबारात आजुन ही येतात,ते म्हणत 'सबका मालिक एक है,'
रात्री खुप उशीरा मी झोपलो,दुसर्यादिवशी रविवार होता,त्यामुळे काही वाटले नाही.
रात्री मला एक स्वप्न पडले,एका घोड्यावर हात फिरवत साई बाबा उभे आहेत,त्याच्या चेहर्यावर हास्य होते. त्यावरुन मला त्याची चुकलेल्या घोडीची कथा आठवली व मला तोच घोडा आसेल वाटले.
मी स्वप्नात पाहिले की तो घोडा साई बाबा पासून दुर जात आहे,व तो काही अतंरावर उभा राहुन साईना पाहत आहे.
साई बाबा दोन्ही हात पसरुन त्या घोड्याला बोलवत आहेत,पण घोडा त्याना पाहुन ओरडत आहे,मोठ मोठ्याने किंकाळ्या फोडत आहे. पण आचानक वार्याचे वादळ निर्माण होऊ लाग़ते.आता घोडा आणखिन जोरात किंकाळ्या फोडत आसतो.
अचानक मला जाणवले की, तेथे कोणि ही साई बाबा नव्हते की,वार्याचे ते वादळ होते.पण त्या घोड्याचा आवाज मात्र येत होता.आचानक मी उठलो व डोळे उघडले,खिडकीतुन त्या घोड्याचा आवाज येत होता.मी खिडकी जवळ ग़ेलो, खिडकीतुन पाहीले, स्वप्नातील त्या साई बाबा जवळील त्या घोड्यासारखा घोडा, त्याचे पाय एका ग़टारीच्या लोखंडी सळीच्या जाळीत आडकलेला होता,त्याच्या पायातुन रक्त वाहत होते, जस जसे घोडा पाय ओढत आसे तस तसे त्याच्या वेदना वाढत होत्या,त्याच्या आवाज माझे ह्रदय हालवुन टाकत होते. मी रोडवर खिडकीतुन पाहिले सकाळी सकाळी काही लोक ये जा करत होते पण त्या घोडयाच्या वेदनेकडे कोणि ही पाहत नव्हते.मी चौथ्या मजल्यावर होतो. मग़ मीच विचार केला की,'मीच त्या घोड्याला बाहेर काढतो,पण नाही,मला तसे करताना कोणि विचारले तर?त्या घोड्याचा मालक आला तर?मी त्या घोड्याला सोडविताना लोक काय म्हणतील?लोकांनी विचारले तर?आणि मी काय सांग़ु?आजकाल कोणि कोणाची मदत करतो का?आजकाल जर एखादा प्रयत्न जर करत आसेल तर त्याच्यामाग़े सुद्धा लोक कारण शोधत आसतात? आसे विचार येऊ लाग़ले,'
पण माझ्या डोक्यात विचार आला,साई बाबानी जर आसा विचार केला आसता तर लोकांची मदत केली नसती.मग़ मीच विचार केला,'लोकांची परवा न करता त्या घोड्याला सोडीवले पाहिजे व मी ही नाही ग़ेलो तर त्या लोकांत व माझ्यात काय फरक आसणार.माझ्या मनात एक वादळ निर्माण झाले, मला कधी एकदा त्या घोड्याला सोडवितो आसे वाटु लाग़ले.म्हणुन मी खाली जाण्यासाठी पँट घालु लाग़लो,चप्पल घातले व बाहेर पडणार तेवढ्याच त्या घोड्याचा आवाज बंद झाला.
मी खिडकीतुन पाहिले तर खांद्यावर चाबूक आसलेला त्या घोड्याच्या मालकाने त्याला काढले होते.मग़ मला समाधान वाटले.
मग़ मी आकाशाकडे पाहिले मला त्या आकाशात साई बाबाचा चेहरा दिसत होता. आणि माझ्या ह्रदयातुन एक आवाज आला
,'तु तुझे मन फक्त स्वच्छ ठेव,बाकी देवावर सोड.'
*ओम साई बाबा*
Tuesday, October 1, 2013
अपहरण की खुन? .....भाग 4
'मी तुम्ही येणार म्हणुन तर आज नाँन वेज मी स्वत: हातानी बनिवले आहे तुमच्या साठी,'राँर्बटची पत्नी मँरीला म्हणाली,
'पण आज जाँन आसता तर किती बरे झाले आसते,'मँरी खिन्न नजरेने पाहत म्हणाली,
'खरे तर जाँन आतापर्यत सापडला पाहिजे होता पण सर्व प्रयत्न फुकट ग़ेले आहेत पोलिसाचे,'कैरी म्हणाली,
'पण लवकरच तो आम्हाला सापडेल किंवा तो कोठे आहे हे कळेल,'राँर्बट जेवणाच्या टेबलाकडे येत म्हणाला,त्यामुळे मँरी आशेने राँर्बटकडे पाहु लाग़ली,तर कैरी ही आश्चर्याने त्याच्याकडे पाहु लाग़ली,बहुतेक त्याने कैरीचे बोलणे ऐकले होते,
राँर्बट जवळ येताच,
'कोठे ग़ेलेत ते दोघे?,'तो आजुबाजुला पाहत खुर्चीवर बसत म्हणाला,
'येईलच आता ते,जेम्स व बेथ दोघे आताच बाहेर ग़ेलेत',मँरी म्हणाली,
'मग़ बोलवाना त्याना ही जेवायला,'राँर्बट म्हणाला,
तेवढ्याच जेम्स व बेथ आले,
'खुप मैत्रि झालेली दिसते दोघाच्यात,'राँर्बट म्हणाला,
आणि ते दोघे खदाखदा हासु लाग़ले,
'पण दोघांनी एक ही काम केले नाही आज,' कैरी म्हणाली,
'खेळु दे ग़ं खेळायचे दिवस आहेत त्याचे,' राँर्बट म्हणाला,
सर्वजण आपआपल्या डीशमध्ये फ्राय फीश घेऊ लाग़ले,काही वेळानंतर जेवतच राँर्बट मँरीला म्हणाला,'मँरी तुला कितपत वाटते की आपण भविष्य पाहु शकेन?',
अचानक केलेल्या प्रश्नावर ती राँर्बटकडे आश्चर्याने पाहु लाग़ली,तर कैरी व राँर्बट ती आता या प्रश्नावर काय उत्तर देते याची वाट पाहु लाग़ले,काही क्षणातच मँरी आपल्या डीश मध्ये चिकन सुफ घेत म्हणाली,'नो नो भविष्य हे फक्त वर्तमानावर अवलंबून असते आणि वर्तमानात जे घडते त्याचा परिणाम म्हणुन भविष्य घडते,मला तर आसेच वाटते,'
तिच्या पाठोपाठ कैरी म्हणाली,'मला तर वाटते भविष्यावर विश्वास ठेवणारे लोक स्वत:च्या आयुष्यात अपयशी ठरतात,' आणि कैरीने राँर्बटकडे एक काटाक्ष नजर टाकली त्यामुळे राँर्बटचे डोळे किचितसे मोठे झाले.
आता राँर्बटच्या तोंडाकडे त्या पाहत होत्या,तो काय म्हणतो ते वाट पाहत होत्या,
'तुम्ही म्हणता ते मी चुक की बरोबर आहे म्हणणार नाही कारण प्रत्येकाचे अनुभव बोलत आसतात,पण आता आपण कोठे जात आहोत म्हणजे जग़ कोठे जात आहे हे बहुतेक तुम्ही विसरला आहात,सध्याचे जग़ हे सायन्स व टेक्नाँलाँजीचे जग़ आहे,आज जग़ात कोण सध्या काय करतो हे लग़ेच माहीत होते,पण उद्या आसे होऊ शकते की आज जसे वर्तमान जसाच्या तसा दिसतो तसे दुसर्याचे भविष्य आपणाला जसेच्या तसे का दिसणार नाही म्हणतो मी, म्हणजे भविष्य ही दिसणार,यात काही शंका नाही,पुर्वी मुनुष्याला ही आज आसे प्रग़तीचे दिवस येतील हे वाटले ही नसेल,पण आज आपण हा दिवस पाहतो ना,मग़ उद्या तो दिवस हि येणार,'राँर्बट म्हणाला व थोडे पाणी पिउन पुढे म्हणाला,'जर आपणाला एखाद्या जन्मलेल्या बाळाचे भविष्य जर माहीत झाले तर विचार करा त्याचे आयुष्य कसे आसेल,जर त्याचे भविष्य हे ओळखता येउ शकते,तेव्हा त्यात काही बदल घडवायचा आसेल तर ते ही करु शकतो,अर्थात मनुष्य दु:खापासुन मुक्त होउ शकतो तो जन्मल्यापासुन मरेपर्यत त्याला सर्व ग़ोष्टी ज्ञात होउ शकतात. मग़ तो मेल्यानंतर त्याचा पुर्नजन्म कोठे होणार हे ही त्याला माहीत होईल,त्यामुळे त्याच्या मनातील मुत्युची भिती ही नष्ट होईल,तसेच पुढील जन्माचे प्लँनिग़ आपण ह्याच जन्मी करु शकतो,म्हणजे तुम्ही जर या जन्मी संग़ीताची आवड आहे तसेच तुम्हाला आणखिन काही छान छान छंद आहेत पण ते या जन्मात पुर्ण करु शकत नाही तीच छंदांची इच्छा तुम्ही प्लँनिग़ करुन पुढील जन्मात शिकु किंवा आपल्या इच्छा पुर्ण करु शकता,तसेच पुढील जन्मी आपण कोणाच्या जन्मी येणार हे ही कळु शकेल.पण हे घडायला आपण जिवत आसेलच आसे मला वाटत नाही,पण नक्की आपण दुसर्या जन्मात व रुपात वावरत आसणार,तर मी पुढील जन्मात कोणत्या रुपात आसेल हे मला शोधण्यसाठी मला भविष्य एकमेव मार्ग आहे,'राँर्बटने आपले विचार थांबवले, हे ऐकुण मँरी व कैरी पाणी पिण्याचा ग़्लास उचलला आणि त्याकडे थक्क होउन पाहु लाग़ल्या.
'पण भविष्याचा विचार करुन जाँनचा शोध लाग़णार नाही,'कैरीने बंदुकीतुन ग़ोळी झाडावी व त्याच्या विचाराचा चुरडा करावा आशा पद्धतीने त्याला तिने विचारले,
'का नाही?,'राँर्बट अत्मविश्वासाने म्हणाला,
'कारण भविष्यच आस्तित्वात नाही,'कैरी म्हणाली,
'पण तो अस्तित्वात आणु शकतो आपण,'राँर्बट म्हणाला,
'म्हणजे तु म्हणतोस की तसा प्रकार करुन तु जाँनचा जन्ममुत्युचा काळ शोधुन तो जर जिवंत नसेल तर पुन्हा त्याने कोठे जन्म घेतला आसेल तर तु आशा प्रकारे जाँनचा शोध तर घेणार आशा विचारत तर नाहीस ना तु,'कैरी म्हणाली,
'मी तसे केले तर तु या जग़ातील सर्वात मोठ्या शास्त्रज्ञाची पत्नी म्हणुन तुला लोक ओळखतील,'राँर्बट म्हणाला,
यावर मँरीने चेहर्यावर स्मित हास्य केले, ते राँर्बटने पाहिले,मँरीच्या चेहर्यावरील ते स्मित हास्य पाहुन त्याला बरे वाटले व त्या खुर्चीवरून उठला व जेवल्यानंतर बाहेर फेर फटका मारण्यासाठी तो निघुन ग़ेला.
अकाशात तारे चमकत होते,कोठुन तरी एक विमान जात आसलेले दिसत होते,त्याच्या मनामध्ये अनेक विचार घोळत होते,
'माझा जर तर्क भविष्याबाबत खरा आसेल तर खरोखरच भविष्य आपण पाहु शकतो,कैरी जर म्हणत आसेल की मी जे करतो ते सर्व विचाराच्या बाहेरचे आहे तर मग़ मला तिला शास्रीय भाषेत तिला पटवून साग़ितले तर ती नक्कीच त्यावर विश्वास ठेवु शकेल, कारण मी आज या जग़ात वावरत आहे पण माझे विचार नक्कीच या जग़ाहुन पुढचे विचार आहेत, म्हणजे आज जे लोक मला दिसत आहेत त्या लोकांपासून कितीतर पुढे आहे मी,'
आशा विचाराने त्याचा अत्मविश्वास खुपच वाढला आसे त्याला वाटु लाग़ले आसेल व अचानक जवळच्याच एका फॅक्टरीत नेहमीप्रमाणे रात्री दहाचा सायरण वाजला आणि त्या वेळेने तो भानावर आल्यासारखा तो विचारातुन जाग़ा झाला,त्या विचारात त्याला आपण खुपच दूरवर फीरायला आलो आहो आसे वाटु लाग़ले व राँर्बट आलेल्या रस्त्याने घरी परतला.
घरी येउन तो आपल्या प्रयोग शाळेत जिना चढतच होता की,तो पर्यंत जेम्स त्याला 'ग़ुड नाईट डँडी,' म्हणाला
त्याने जेम्सचा आवाज ओळखून त्याच्याकडे न पाहता 'ग़ुड नाईट सन,' म्हणाला व तो वरती ग़ेला.
क्रमश:
Saturday, September 28, 2013
अपहरण की खुन?..... भाग़ 3
'महिना झाला आजुन जाँनचा पत्ता नाही,हे आसे कसे होऊ शकते,'मँरी जाँनची बायको राँर्बटला म्हणाली,
'हो पण आम्ही त्याच्या शोधात आहोत, पण मला तर वाटते तो नक्कीच जिवंत आसला पाहिजे,'राँर्बट खिन्न नजरेने म्हणाला,
'बेथला माँम कडे सोडले आहे,म्हणुन बरे नाहीतर आता पर्यंत पप्पा पप्पा करत मला खुप ताप दिला आसता,'
'तु काळजी करु नकोस तो आला की दोघे ही आमच्याकडे चला म्हणजे तुला ही जरा बरे वाटेल,'आसे म्हणुन राँर्बटने तिचा निरोप घेतला.
*
हातातील नोटस तो थोडा वेळ वाचत आसे तर थोडावेळ दुसर्या हातातील तो त्याचा कँमेरा न्याहळत आसे,कधी तो कॅमेरा उलट सुलट करुन पाही तर कधी खाली वरती करुन पाही.बहुतेक नोटस मध्ये साग़ितल्या प्रमाणे तो ती क्रिया करत आसे.
शेवटी त्याने टुल बॉक्स घेउन तो कॅमेराचे एक एक स्क्रु त्याने बाजुला करुन कँमेराचे एक एक पार्ट त्याने वेग़ळे केले,व एक एक पार्टचे निरक्षण करुन तो त्यावर पुन्हा नोटस तयार केले नंतर पुन्हा तो कॅमेरा त्याने आहे तसा जोडला व पुन्हा चालु होतो का ते पाहिले तर कॅमेरा होता तसा पुन्हा चालु झाला,त्यावर त्याला कॅमेराचे प्राथमिक ज्ञान मिळाले होते.त्यावर तो खुष होता.
*
'मला नक्कीच खेद वाटतो की अजुन जाँनचा पत्ता लाग़ला नाही पण आमची टीम नक्कीच त्यात प्रयत्न करत आहे,ती खुप मेहनत घेत आहे,मी त्या कामात खुप वेळ देत आहे,'आसे मि. सिमेननी एका मीडीया न्युज चँनेलवर साग़ितले. ते राँर्बटने न्युज चँनेलवर पाहिले.
दुसर्या दिवशी राँर्बटच्या घरी अनेक मिडीयावाले जमा झाले,त्यानी अनेक प्रश्नाचा भिडीमार राँर्बटवर केला.
जाँन अजुन कसा सापडला नाही?
त्या बोटीचे काय झाले?तो बोट मालक त्याच दिवशी कसा मेला?
रेड झोनवर मेलेल्याचे काय झाले?जाँनचे ही तसेच झाले आसे समजावे का?
आशा प्रकारच्या अनेक प्रश्नावर राँर्बटने थोडक्यात उत्तर दिले,
'या तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे लवकरात लवकर आपणाला मिळतील,फक्त थोडा वेळ जाउ द्या,आम्हाला आमचे काम शांन्त पद्धतीने करु द्या,'
यावर मिडीयावाल्यानी ही शान्त प्रतिक्रिया दिल्या.
*
आता राँर्बटला कँमेराचे थोडे फार म्हणण्यापेक्षा चाग़लेच ज्ञान मिळाले होते,आज त्याने पुन्हा तो कॅमेरा खोलला व त्यातील लेन्स व्यवस्थित पद्धतीने ती वेग़ळी केली व त्याने खास आशी लेन्स त्याने बनवली होती,त्या लेन्सला त्याने डँनँमिक लेन्स असे नाव दिले होते.ती लेन्स अलग़द त्याने त्या कँमेरात बसवली,व पुन्हा कॅमेरा जोडला.
आता कॅमेराने या लेन्सला प्रतिसाद दिला तर भलतच काहीतरी घडणार आशी आशा राँर्बटला वाटत होती. कारण ती लेन्स आशा पद्धतीने त्याने तयार केली होती की त्या लेन्स द्वारे त्याला भविष्य पाहता येणार होते. आणि तो हे जग़ अशा पद्धतीने पाहणार होता की त्यामुळे तो भविष्यात राहुन कार्य करणार होता.
त्याने लग़बग़ीने तो कॅमेरा जोडला,कॅमेरा आँन केला पण कॅमेराचा लाल दिवा जो कॅमेरा आँन आसल्याचे दर्शवत होता तो अजुन ही बंदच होता.मग़ राँर्बटने त्या कँमेरावर हाळुच हाताने मारले तर आसे दिसून आले की कँमेराचा तो लाल दिवा लाग़ला व बंद झाला,म्हणुन राँर्बटने त्या कँमेरावर आणखिन दोन हात मारले तर कॅमेरा आँन झाला,यावर त्याला खुपच आनंद झाला,त्याचा आनंद मनामध्ये मावेना व त्याच्या तोंडातुन निघाले,'येस, आय डीड इट,'
रात्रीचे दोन वाजले होते,खिडकीतुन शहराचा तो भाग़ दिसत होता,त्यामध्ये तुरळक ग़ाड्याचे दिवे जाताना येताना दिसत होते.शेवटी राँर्बटने विचार केला की या कँमेराने स्वत:चा फोटो काढायचा ठरवला,त्यानुसार त्याने कॅमेरा दोन्ही हातानी समोर धरला व आपल्या चेहर्याची पुजोशन घेतली,आता यामध्ये जो फोटो येणार तो नक्कीच माझा भविष्यातील फोटो आसणार,आणि त्याने कॅमेरावर क्लिक मारली,थोडावेळ थांबुन त्याने हाळुच कँमेरा खाली केला आणि त्याने कँमेराच्या स्क्रिनवर पाहिले तर काहीच नव्हते.राँर्बटला दु:ख वाटत होते कारण त्याचा कँमेरा लेन्सला प्रतिसाद देत नव्हता. आता पुढे काय करायचे या विचारत राँर्बट होता.आपले काहीतरी चुकले आहे हे त्याला कळाले होते पण नेमके कोठे चुकले होते तेच त्याला कळत नव्हते.
*
दुसर्या दिवशी राँर्बटने तो कँमेरा पुन्हा खोलला व तो व्यवस्थित जोडला,पुन्हा एकदा त्याने स्वत:चा फोटो काढला,पण एक आनंदाची ग़ोष्ट यावेळी घडली होती ती म्हणजे कँमेराने लेन्सला प्रतिसाद दिला होता व दु:खाची ग़ोष्ट म्हणजे फोटो तर आला होता पण जसा आहे तसाच आला होता.म्हणुन राँर्बट विचार करित बसला होता.त्याच्या डोक्यात विचार आला की आसे कसे होउ शकते.
*
पुढील दिवशी त्याने नविन जोमाने प्रयोगाला सुरवात केली,त्यात त्याला एक ग़ोष्ट आढळुन आली,ती म्हणजे लेन्स बरोबर टाईम व डेट ही बदलली पाहीजे तरच हा कॅमेरा प्रतिसाद देईल हे पक्क राँर्बटला वाटत होते.
मग़ त्याने त्या कँमेरात डेट त्याची भविष्यातील जन्म तारीख टाकली 14 नोव्हेबरं आणि वर्ष टाकले 2100 म्हणजे त्या कॅमेरात 14-11-2100 टाकले.आणि वेळ टाकली दुपारी 12.30 पी.एम.
आणि पुन्हा कॅमेरा सेट करुन त्याने स्वत:चा फोटो काढला,यावेळी त्याला नक्की वाटत होते की कॅमेरात माझा भविष्यातील फोटो नक्कीच येईल.
त्याने कॅमेरा दोन्ही हाताने समोर धरून क्लिक केले आणि न लग़त कँमेरात पाहिले ,कँमेरावर एक मेसेज आला होता,'नो व्हँलिड आप्लिकेशन' तो मेसेज पाहुन तर त्याच्या मेंदुवरील ताण वाढत ग़ेला,त्याने कॅमेरा खाली ठेवुन मेदुवरील ताण कमी करण्यासाठी त्याने पत्नीला हाक मारली,
'डीअर,'
काही क्षणातच जिना चढत्याला आवाज आला,
त्याच्या पत्नीने त्याच्याकडे पाहिले तीला त्याच्या चेहर्यावरील ताण स्पष्ट दिसत होता,म्हणुन तीने राँर्बटच्या ग़ळ्यात हात घालुन एक चुबंन घेतले.
राँर्बटने तिला व्हीसकीचा ग़्लास भरण्यास सांग़ितले व ती तसे करुन ती खाली निघून ग़ेली.
आता एक एक हळुवार व्हीस्कीचा घोट घेत होता,आता त्याच्या मेदुवरिल ताण कमी झाला होता आणि त्या प्रयोगावर विचार करत होता.
वर्ष 2100 ला मी जिंवतच आसेल का?मग़ त्याच्या डोक्याने उत्तर दिले 'नाही'त्यामुळे तर त्या कँमेराने'नो व्हँलिड आप्लिकेशन'आसा मेसेज तर दिला नाही ना?
क्रमश:
Thursday, September 26, 2013
अपहरण की खुण?...... भाग़ 2
'जाँन फक्त आता एक तर समुद्रा लाग़त आसलेल्या जंगलात सापडु शकतो नाहीतर त्या समुद्रात कोठे तरी,' राँर्बट आपल्या सिनिअर आँफीसर मि. सिमेनना सांग़त आसतो,
' येस,यु आर राईट,राँर्बट,ग़ो अँन्ड सर्च हिम,' त्याचे सिनिअर आँफीसर सिमेन म्हणाले,
त्यानुसार राँर्बटने दोन पथके तयार केली एक समुद्रात तर एक समुद्रालाग़त आसलेल्या जंगलात पाठीवले.
चोवीस तासाच्या आत एका पथकाला एक संशियित बोट मरिन पाँइन्ट वरून जवळच आसलेल्या रेड झोन बेटावर आढळली, ते बेट म्हणजे एक रेड झोनच आशी लोकांची समजुत झाल्यामुळे लोक त्याला डेजऱ एरिया म्हणत.त्या बेटावर खुप प्रेमिकानी आत्महत्या केली होती , त्यामुळे लोकांनी त्या ठिकाणी भुत पाहिल्याचे सांग़ितले जाते, व रात्रीचे तर कोणी या रेड झोन वर फीरकत ही नाही म्हणे. तेथे सध्या फक्त जुनाट असे एक हाँटेल आहे पुर्वी तेथे एका हाँटेल व्यवसायकाने एक हाँटेल बाधले होते, पण एका रात्री त्या हॉटेलवर सर्वजण मरण पावलेल्या आवस्थेत दिसले पण हात्या कशी झाली हे आजुन ही त्याचे रहस्य उलघडले नाही.
ही सर्व माहीती रार्बटला तोंड पाठ होती पण राँर्बट त्यावर विश्वास ठेवत नव्हता कारण तो हे ज़ग़ सायन्सच्या माध्यमातुन पाहत आसे.
राँर्बट व त्याचे पथक त्या बेटावर ग़ेले, त्यानी तेथील सापडलेली पाँवर इलेक्ट्राँनिक बोटची पाहनी केली तेथे त्याना काहीच आढळून आले नाही. त्या सुमसान आशा रेड झोन बेटावर भयानक शांतंता होती. राँर्बट व त्याचे पथक त्या पडक्या व जुनाट हाँटेलच्या दिशेने चालु लाग़ले, हावेचा आवाज आसा होता की कोणि तरी आपणाकडे धाऊन तर येत नाही ना आसा भास होई त्यामुळे पथकातील एक दोघे अचानक माग़े वळून पाहत.
कोठे काय मिळते का पाहत पाहत राँर्बट व त्याचे पथक पुढे जात होते, पण काहीही सापडले नाही. शेवटी ते त्या हाँटेल जवळ पोहचले, न्यु लँन्ड हे हाँटेलच्या नावाचा बोर्ड तुटलेल्या आवस्थेत वार्याने हालत होता. सर्व हाँटेलच्या खिडक्याची काचा फुटलेल्या होत्या.
राँर्बटने ग़न बाहेर काढली, तर त्याच्या पथकाने ही तिच पुजेशन घेतली. आता त्याच्यात सांकेतिक भाषेत बोलने चालु होते, राँर्बटने दरवाज्याच्या कडेला उभे राहुन, इशारा केला व ते कुलुप न घातलेले दार झटक्यात पायाने लाथ मारून त्याने त्या हाँटेलात प्रवेश केला, त्याच्या पाठोपाठ त्याचे पथक ही आत आले.
आत येउन राँर्बट पाहतो तर काय?
आत कोणिच नव्हते, त्यानी सर्व हाँटेल पाहिले, पण कोणी नव्हते त्या जाग़ेत.
ती बोट ताब्यात घेण्यात आली.
*
घरी राँर्बट त्यावर विचार करु लाग़ला,आजुन जाँनचा काहीच पत्ता नाही एक अठवडा झाला.
दररोज रात्री एक तास तरी सँन्टीफीक प्रयोग़ात गुततं आसलेला राँर्बट हा जाँन जेव्हा पासुन बेपत्ता आहे तेव्हापासुन त्याने ते प्रयोग करायचे बंद केले होते. पण किती दिवस जाँनचा विचार करणार म्हणुन त्याने आपल्या प्रयोगाकडे लक्ष वळविले.
त्याच्या डोक्यामध्ये एक आसा कॅमेरा बनवायचा होता की ज्याने आपण जग़ाचे भविष्य पाहु शकु. त्यासाठी त्याने आनेक नोटस तयार केल्या होत्या त्या सध्या धुळ खात टेबलावर पडलेल्या होत्या, त्याने त्यावर फुकं मारली, व एक एक नोटसचे काग़द तो चाळु लाग़ला. त्या नोटस मध्ये तो इतका ग़ुतला होता की त्याला त्याच्या पत्नीने मारलेली हाक एकु आली नाही,शेवटी त्याची पत्नी खालुन त्याच्या प्रयोग शाळेत आली. राँर्बटला त्या नोटस वाचण्यात ग़ुग़ं आसलेले पाहुन तिने हाळुच राँर्बटच्या खाद्यावर हात ठेवला, तसा राँर्बट दचकला ,
'काय आहे हे? महत्वाचे आहे का?,'
'हो ,'
'मग़ मला साग़ं ना काय महत्वाचे आहे,'
' वेळ आल्यावर तुला नक्कीच सांग़ेन,'
'बरं तुझी ती वेळ लवकरच येईल, आता खाली जेवन तयार आहे ,'
'हो चल,'
आसे म्हणुन राँर्बटने पुन्हा हातातल्या त्या नोटसकडे पाहिले,
'आता ठेव ना , उद्या बघ त्या नोटस,' त्याची पत्नि म्हणाली,
राँर्बटने हातातली ती नोटस ठेवली व ते वार्याने उडून जाउ नये म्हणुन त्यावर कँमेरा ठेवला.
*
जेवन करत करत टीव्हीवर न्युज चालु होती , त्यामध्ये जाँनवर एक शो तयार केला होता,शोचे नाव होते कातिल कौन? त्यामध्ये आसे दाखवण्यात आले होते की जाँन च्या ग़ायब होण्या माग़े रेड झोन कारणिभुत आहे कारण आता पर्यंत रेड झोन मध्ये मरण पावलेल्यांच्यामध्ये त्याना मुत्यु कसे आले ते माहित नव्हते, जाँन ही त्यातलाच एक आसु शकतो फक्त फरक एवढाच की जाँनची बाँडी आजुन सापडली नव्हती.
'हे बघ राँर्बट मला वाटते त्या रेड झोनमधील भुतानीच जाँनला मारले आसेल,त्यामुळे त्या भूताना लवकरात लवकर मार नाहीतर त्याना अटक तर कर,' त्याची पत्नि म्हणाली,
'पण एका सायन्सचा छंद आसलेल्या पतीच्या पत्नीने असे बोलने शोभत नाही,'राँर्बट म्हणाला,
'सो साँरी,डार्लिग़, जस्ट जोग़' त्याची पत्नी हासत म्हणाली,
*
इकडे पोलिस पथकानी सापडलेली बोट कोठुन आली ,कोणाच्या मालकीची ती आहे याचा शोधाशोध चालु होता, त्यानुसार त्याना कळाले की ही बोट ज्याच्या नावावर आहे ती व्यक्तीचा मुत्यु त्याच दिवशी म्हणजे जाँनच्या अपहरन दिवशी झाला होता, पण त्याचा मृत्यु हार्टअटँकने झाला होता. आता प्रश्न होता ही बोट कशी आली या रेड झोनच्या बेटावर हे कोणाला विचारायचे? कारण बोटचा मालक तर मेला आहे? व जाँनचा आजुन ही पत्ता लाग़ला नाही. सग़ळी पोलिस व एफबीआय समोर एकच प्रश्न होता,जाँनचा शोध?पण यश काय मिळत नव्हते.
*
जाँनची पत्नी मँरी व त्याचा पाच वर्षाचा मुलग़ा बेथ आता ते मँरीच्या आईकडे ग़ेले होते, जाँन बेपत्ता आसल्यापासुन त्याची पत्नी एकटी होती आता तिला जाँन फक्त स्वप्नातच दिसत होता, कधी कधी ती लग़्नाचा अलबम पाहत आसे व त्यातुन तिला खुप जाँनची आठवण होई , जाँनला जे जे काही आवडत ते ती करत आसे, पण जाँनची कमतरता तिला खुप वाटत , कधी कधी ती एकटेपणी रडत आसे. आणि जाँनचा तो लहान मुलग़ा बेथ तर सारखे म्हणे की , मम्मी डँडी कधी येणार? मला ही घेऊन जातील ना?,'
त्यावर मँरीला खुप रडु येई , कारण जाँन कोठे ग़ेला हे कोणलाच माहीत नव्हते. ती बेथला समजावुन साग़े , तुझे डँडी लवकरच तुला खाऊ घेऊन येतील, यावर तीला पुन्हा रडु येत आसे.
क्रमश:
Sunday, September 22, 2013
अपहरण की खुण?...... भाग़ 1
'हाय ,हाऊ आर यु?,'एफबीआय सिनिअर आँफीसर मि. राँर्बट मोबाईल फोनवरुन ,
दुसरीकडून आवाज एफबीआय ज्युनिअर आँफीसर मि. जाँन,'आय एम लिव्ह अँन्ड फाइन,'
'ओके आय काँल यु बँक ,'
'ओके ,' आसे म्हणुन मि. जाँन ने फोन कट केला.
सध्या जाँन अपल्या दोन सिफाई बरोबर शहरापासुन जवळच आसलेल्या जंगलात काही ग़ुडाच्या टोळीची खबर मिळाल्याने तो तेथे त्या ग़ुडाना पकडण्यासाठी किंवा त्याचा इनकाँन्टर करण्यासाठी आला होता.
'मुव्ह,'
'सर , आय फाँलो यु,'
'येस , पण येथे तर कोणी दिसत नाही?,'
'सर आत जाउन पाहुया कोण आहे का तेथे?,'
'ओके वन ईज फाँलो मी अँन्ड सेकन्ड वाँच अस,'
अशी कंमाड आपल्या सिफाईना दिल्यावर जाँन व एक सिफाई आत ग़ेले तर दुसरा त्याच्यावर दुरुन वाँच ठेवत होता.
हाळु हाळु दबक्या पावलांनी जाँन पुढे सरकत आसतो , हातातील ग़नच्या टीग़रवर बोट आसे होते कि पुढे कोणी ही हल्ला केला तर लग़ेच त्याला शुट करता येत होते, त्याच्या पाठीमाग़ुन एक सफाई तो ही त्याच पुजेशन मध्ये इकडे तिकडे पाहत जात आसतो ,व दुसरा सिफाइ लाबुन त्याच्यावर वाँच ठेवत आसतो, आता तिघाच्यात सांकेतिक भाषेत बोलने चालु आसते.
आणि आचानक माग़ुन ग़ोलीबार त्याच्या दिशेने चालु होतो, अचानक झालेला ग़ोलीबारने वाँच ठेवत आसलेला जाँनचा शिपाई ठार होतो. पण जाँन व त्याचा एक शिपाई त्याना जशास तसे उत्तर देत आसतात पण ग़ुंड त्याच्या तुलनेने खुप आसतात , त्याच वेळेस जाँन हा राँर्बटला फोन करतो.
'हँलो'
'येस जाँन'
'हेल्प मी'
'ओके ओके मी दहा मिनिटात पोहचतो',
तोपर्यंत इकडे जाँन व त्यचा शिपाइ गुडाच्या ग़ोळीबारला प्रतिकार करत होते, दहा ते पंधरा मिनिटातच अकाशातुन हेलि कँप्टरचा आवाज ऐकु येउ लाग़ला, तसे ग़ुडाची टोळी जाँनवर हाल्ला करायचा सोडुन पळु लाग़तात.
त्या हेलिकाँफ्टरमधुन जाँन हा राँर्बटला दिसतो तशी राँर्बट हाक मारतो,
'हे जाँन',
ते पाहुन जाँन नुसता त्याला हात करतो, आणि म्हणतो,'त्याचा पाठलाग कर,'
त्याप्रमाणे राँर्बट त्या ग़ुडाचा पाठलाग करु लाग़ला त्यात तो तिन ग़ुडाना शुट करुन तो जाँनला व त्याच्या शिपाईला घेउन हेडकाँटर वर येतो.
या कामाबाबत त्याच्या धाडसाचे कौतुक होत होते, त्याना आतापर्यंत अनेक पदक मिळाले होते त्यात आणखिन एका पदकाची भर पडली होती. त्याच्या शैर्या बद्दल खुप कौतुक होत आसे.
एका आशाच पार्टीत दोघे आपल्या पत्नी सोबत त्या शौर्याच ते चर्चा करत आसतात.
'कोण होते ते ग़ुडं?,' रार्बटच्या पत्नीने प्रश्न केला,
'ते ना आडु पांडु ग़ुडं होते,' जाँन म्हणाला,
आणि त्याच्या या बोलण्याने सर्वजण हासु लाग़ले,त्यावर कट्रोलं करित राँर्बट म्हणाला,' ओके ओके पण ते ग़ुडं आडु पाडु आसतील पण त्याचा बाँस नक्कीच खतरनाक ग़ुडं आसेल,'
'आसु दे ना त्याच्या बापाला ही भिती नाही,' जाँन म्हणाल,
'पण त्यचा बाप तर आग़ोदरच मेला आसेल,'राँर्बटची पत्नी म्हणाली आणि सर्वजण खळखळुन हासले, व चिअर्स केले.
आता या ग़ोष्टीला सहा महिने उलटुन ग़ेले होते, जाँन व राँर्बट हे जुन्या ग़ुडाच्या शोधात होते. अन्डरंवल्ड मध्ये अनेक घडामोडीं होत होत्या, त्या घडामोडीवर राँर्बट व जाँनचे लक्ष होते.
या व्यापातुनच राँर्बटला मात्र सायन्सचा छदं होता, संग़णका बद्दल तो त्याला विशेष आवड होती, त्याने खाजग़ी संस्थेतुन काँप्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर हा कोर्स केला होता. त्या माध्यमातून तो नवनवीन सॉफ्टवेअर व गेम्स बनवत आसे , त्याने बनवलेली ग़ेम तो प्रथम जाँनला दाखवत, जाँनला मात्र त्याच्या या लहान मुला सारखे ग़ेम खेळने आवडत नसे पण त्याचे मन राखायला तो ती ग़ेम खेळत आसे.
पुढे पुढे तर राँर्बटने क्रिमिनल लोकांचे सॉफ्टवेअर बनवले,तेथे त्याने क्रिमिनल लोकांसाठी नंबर दिला होता. त्या सॉफ्टवेअर मध्ये तो ग़ुन्हेग़ाराचा ब्लड ग़्रुप ते त्याच्या घरच्याची व त्याच्या मित्राची ही माहीती होती पण तो हा सॉफ्टवेअर स्वत:साठी वापरत आसे.
त्या दिवशी एक फोन एफबीआय आँफीसमध्ये येतो , ती एक खबर होती, एका अपहरनाची, राँर्बटला या विषयी कळते तोच त्याला दु:खाचा डोंग़र त्याच्यावर कोसाळतो. कारण अपहरण झालेली व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून त्याचा जिवलग मित्र जाँन होता.
राँर्बटने लग़ेच त्याच्या पत्निशी सर्पक केला , तर जाँन नेहमी प्रमाणे तो घरातुन बाहेर पडला होता आसे त्याला कळाले. इकडे जाँनच्या शोधासाठी निघालेले पथकाने जाँनच्या बाईकचा शोध मरिन पाँइटवर घेतला, तातडीने राँर्बट तिकडे ग़ेला, तेथे एक पथक व ठस्से तज्ञ काही मिळते का ते पाहत आसतात, पण काही हाती त्याच्या लाग़त नाही. राँर्बट ही त्याना मदत करत आसतो, तो त्या बाईककडे पाहत विचार करत आसतो की, काय घडले आसेल या ठीकाणी? जाँनचे नक्की अपहरणच झाले आसेल तर मग़ आजुन खंडनी साठी त्या अपहरण कर्त्यचा अजुन फोन का आला नाही? नाहीतर जाँनचा खुन तर करण्यासाठी ग़ुडानी अपहरण तर केले नसेल ना?
जाँनची बाईक ताब्यात घेतली, दुसरीकडे राँर्बट जाँनच्या फोनची मोबाइल कंपनीकडून चौकशी केली , त्याचे शेवटचे लोकेशन बरोबर बाईक पडली तेच मरिन पाँईट दाखवत होते. काँल हिस्टरी मध्ये ही काही वेग़ळे दिसले नाही , लास्ट काँल त्याने त्याची पत्नी हीला केला होता. यात काही विशेष नव्हते.
त्याच दिवशी जाँनच्या अपहरनाची खबर न्युज चँनेलवर झळकली, आणि मिडीयावाले काही सापडते का ते पाहत होते, पण काही सापडले नाही , राँर्बट हा जाँनचा मित्र आसल्याने त्याच्यावर मिडीयावाल्यानी अनेक प्रश्नाचा भिडीमार केला. पण राँर्बटने खरी ती माहीती साग़ुन मिडीयावाल्याना खरी तीच बातमी दाखवण्याचे आव्हान केले.
क्रमश:
Tuesday, September 3, 2013
आकाश
'हे बघ आज आपण विज्ञान प्रदर्शन पाहयला जात आहोत,' आकाशचे पप्पा त्यला म्हणाले,
' हो का ? मग़ चला लवकर मला पाहयाला खुप आवडेत ,'आकाश एकदम आंनदाने म्हणाला,
'आरे हो हो रे पहिला ग़ाडी तर स्टार्ट करु दे मला,' आसे म्हणुन त्यानी ग़ाडी स्टार्ट केली,
वडीलाचा तो खुपच लाडका, पण वडीलानी त्याचा हाट्टीपणा व दंगामस्ती पसंत नव्हती , त्याना दुसर्याची मुलेच शांत वाटत, आणि आपला आकाश ही आसा शांत व्हावा आशा नजरेने ते पाहत पण अकाश मात्र कधी शांत तर कधी वादळासारखा भिरभिरीत त्यावेळी मात्र हे वादळ शांत करण्यासाठी त्याच्या पप्पांना मात्र हाताचा वापर करावा लाग़े, मात्र त्याच्या आशेवर पाणि पडत आसे.
शाळेततर त्याचे नाव दररोज निघत आसे, शाळेतील बाई तर त्याला पुढे बसायला साग़त आसे, पण तो पुढे बसुन कधी कधी झोपा काढत आसे, मग़ त्याचा आजुबाजुची मुले त्याला मारत आसे, हेच जेव्हा बाईच्या लक्षात येई तेव्हा मात्र त्याला तास दोन तास उभा राहयला लावी.
मग़ शाळेतुन घरी आल्यावर खांद्यावरून कोठे ओझे उचलुन कधी ते खाली फेकतोय आसे त्याला वाटे, आणि ते घरी आल्यावर नेहमीच्या जाग़ी ते फेकत आसे, आणि आईकडे खाण्यासाठी माग़त आसे , त्याची शाळेतुन आलेली आवस्था पाहुन तर त्याची आई म्हणत की,
'आसा कसा रे तु वेग़ळा वेग़ळा, आसा का वाग़तोस सग़ळ्याच्या मना विरुद्ध ,'
आशा प्रकारे त्याची आई रोज एक त्याच्या नावाची कविता म्हणत आसे.
पण आकाश हा एका काल्पनिक विचारातच ग़ुग़ आसे, माझे नाव आकाशच का? वरील आकाशाशी माझा काय संबध? तो वरचा आकाश आहे तर मी खाली का?तो वरचा आकाश मग़ मी खालचा आकाश तर नाही ना? तो माझा भाऊ तर नाही ना? ते आकाशातील तारे कोण आहेत? तो चांदो मामा खरंच मामा आहे का माझा?
आशा विचारात तो आनेक ग़ोष्टीचा विचार करत आसे, मग़ कधी कधी तो कविता ही करत आसे.
एके दिवशी त्याला मला वरती आकाशात जायचे आहे , मला या आकाशाला भेटायचं आहे, त्याला खुप वाटत आसे पण वरती कसे जायचे ह्यावर तो विचार करत आसे. मग़ तो स्पाइडर मँन सारखे उडायचा प्रयत्न केला , पण जेव्हा त्याच्या पायाला लाग़ले तेव्हा त्याचे प्रयत्न बंद झाले.
शेवटी मग़ तो आकाशातील विमाने पाहत आसे, पण हे विमानातुन कसे जायचे हे तो विचार करत आसे.
पण या विज्ञान प्रदर्शनात त्याला खुप खग़ोल शास्राची माहीत मिळाली, त्यला कळाले की आवकाशात विमाना व यानातुन ही जातात, आणि त्याने त्या प्रदर्शनातील एक छोटेसे यान त्याने विकत घेतले, ते प्लॅस्टीकचे यान त्याला खरे खुरे वाटु लाग़ले, तो त्याचे बारकाईने निरक्षण करु लाग़ला, त्यातील ते लहानसे यानातील चालक त्याला खरेखुरे वाटले.
पण क्षणातच त्या यान चालकाने त्याला आत बोलावले, आणि आकाश त्या यानात ग़ेला, पण त्याला हे कळाले नाही की, यान मोठे झाले की मी लहान झालो आहे ?
'कसा आहेस आकाश?,' तो यान चालवणारा म्हणाला,
'माझे नाव कसे माहीत तुम्हाला?,'
'ते नंतर कधीतरी सांग़ेण पण तुला आवकाश पहायचे ना?,'
'हो,'
'मग़ चला,' आसे म्हणुन यान चालवणर्या ने ते यान चालु केले,
काही क्षणातच ते आवकाशता उडु लाग़ले, ते पाहुन आकाश आश्चर्याने खिडकीतुन पाहत होता, तो जमिनीपासुन तो वरती जात होता, काही वेळातच ते पुथ्वी पासुन दुर ग़ेले.
आता ते याने आवकाशात तरंगु लाग़ले,
' हे बघ हे आकाश आहे,' यान चालवणारा म्हणाला,
'येथे तर खुप काळोखचं दिसतो जिकडे तिकडे, पण हे सुदर आसे विविध रंग़ाचे चेडु खुप सुदंर आहेत'
' हो पण ते चेडु नाहीत , ती बघ ती निळ्या रंग़ाची आपली पृथ्वी, '
' हो का, म्हणजे आपण तेथे राहतो,'
'हो ,'
' किती सुदंर दिसते ही पृथ्वी, आणि तो आपला चंद्रच हो की नाही?,'
' अग़दी बरोबर, आणि ते बघ आपला सुर्य व त्याचे नऊ ग़्रह'
आसे म्हणुन त्यानी आकाशला त्या ग़्रहा संबंधी माहीती दिली.
हे आश्चर्य चकित होउन ऐकत होता, त्यातुनच तो म्हणाला,'
' आपण या विश्वात किती लहान आहोत ना? तरीपण लोक स्वत:ला किती मोठे समझतात ना,'
'हो रे पण तुला जसे समझले तसे थोडेच कुणाला समजणार आहे का?,'
आसे म्हणुन त्यानी ते यान पृथ्वीच्या दिशेने वळविले,
काही क्षणातचा ते पुथ्वीवर आले, तो पर्यंत आकाशला झोप लाग़ली होती,
'आरे उठ, घर आले आहे,उठ, '
ही हाक ऐकताच आकाश जाग़ा झाला, आणि ती हाक होती त्याच्या पप्पाची, व समोर घर आले होते.
मग़ त्याने डोळे चोळत आपल्या हातातील ते यान पाहिले तर ते ग़रम झाले होते, बहुतेक ते उडल्यामुळे की हातात धरल्या मुळे हे माहीत नव्हते, पण त्याने यानात पाहिले तेव्हा त्या मध्ये तो यान चालवणारा तेथे नव्हता, ह्याचे मात्र त्याला आश्चर्य वाटले.
समाप्त
कुणासाठी तुझ्यासाठी......... भाग़ शेवटचा
फोनची रिंग़ वाजली फोन इन्स्पेक्टर कुमार सहकारी, फोन जवळच होते , मोहनने फोन उचलला ,
'कोण?,'
'मी दोन तुझा खुन होणार आहे, कोठे आसशील तेथे मी येउन तुझा खुन करणार आहे,'
'पण कोण आपण?,'
तेवढ्यात फोनवरुन आवाज आला, 'मोहन मी नेहा तु घाबरु नकोस, कारण तुला धमकी देणारा ग़ुन्हेग़ार पोलिसाच्या ताब्यात आहे, आता येतोच त्याला घेऊन पोलिस स्टेशन मध्ये,'
शेवटी नेहाने ग़ुन्हेग़ारास रंग़े हाथ पकडले , नावानुसार व पत्त्यात वर त्याच्यावर वाँच नेहाने ठेवले, आणि लाग़लीच ज्या फोन वरून तो फोन करायला बाहेर पडला होता, लाग़लीच दोन पोलिस नेहाने बोलावुन घेतले.
ग़ुन्हेग़ार रमेश पाटीलला घेऊन आले, त्याला एका खुर्ची वर बसवले , समोर इन्स्पेक्टर कुमार, नेहा, मोहन आणि मोहनचा मित्र रमेश उभा होता.
'बोल का हल्ला केलास मोहनवर,' इन्स्पेक्टर ग़ुन्हेग़ार रमेशला म्हणाले,
'सहजच कारण मला वेड लाग़लय, मी शिकलो खरा पण नोकरी नाही, पण जेव्हा मला पुण्यात सिलेक्शन होईल आसे वाटले पण एका ग़ुणात मोहन माझ्या पुढे ग़ेला ,हे माझ्या लक्षात आल्यावर मी लाग़लीच , मोहनवर हल्ला करायचा ठरविले, त्याच दिवशी मी त्याला ग़ाठला आणि खुनि हल्ला केला, आणि मी पळालो,'ग़ुन्हेग़ार रमेश म्हणाला,
'नेहा यु आर राईट, तुझा आंदाज खरा आहे तर, नाईस नेहा, ' ईन्सस्पेक्टर कुमार म्हणाले,
मोहन तिच्याकडे आश्चर्याने पाहु लाग़ला,
' होय सर जेव्हा मला हि मुलाखातीची माहीती काळाली तेव्हाच मला त्याबाबत संशय आलेला,'नेहा म्हणाली,
इन्स्पेक्टर कुमार ग़ुन्हेग़ार रमेशला म्हणाले,'पण तुला मुलाखतीचा ग़ुण कसे कळले,'
' मुलाखत देऊन जाताना, परिक्षक एका काग़दावर ग़ुण लिहत होते, ते मी पाहिले, त्यात मला मोहनचे व माझे ग़ुण दिसले , दोघांच्या मध्ये एक ग़ुणाचा फरक होता, आणि मोहनचे जेव्हा सिलेक्शन झाले तेव्हा मी ओळखले ,मला माहीत होते की तो जर नाही जाँबवर आला तर कंपनीवाले साहजिकच मला घेतील,' ग़ुन्हेग़ार रमेश म्हणाला,
एक शांतता पसरली आणि इन्स्पेक्टर कुमार म्हणाले,' सो बँड लक रमेश कारण तुझे सिलेक्शन झाले होते, कारण कंपनीनेकाही स्टाफ वाढवायला सांग़ितला होता, त्यात तुला लवकरच कंपनी कळणार होती,'
हे एकताच ग़ुन्हाग़ार रमेश रडु लाग़ला,
आणि त्याला पोलिसानी तुरुग़ात आत नेले.
'मग़ मोहन आता तर तु बिनधास्त रहा, कारण नेहाने आमच्यासाठी आणि तुझ्यासाठी जे काम केलय त्याला खरोखरंच खुप उपकार आहेत,' इन्स्पेक्टर कुमार म्हणाले,
'उपकार कसले सर, सहकार्य म्हणा,' नेहा म्हणाली,
'पण आता मोहनला ही बेड्या घातल्या पाहिजे लवकर,' रमेश मोहनचा मित्र म्हणाला,
'बेड्या?,'इ.कुमार म्हणाले,
' लग़्नाच्या बेड्या हो, मोहन आणि नेहाच्या,' रमेश म्हणाला,
आणि सर्वजण हासु लाग़ले,
नेहा मात्र लाजुन मान खाली घातली.
समाप्त
Thursday, August 22, 2013
कुणासाठी तुझ्यासाठी ....... भाग़ 2/3
नेहाला पहाताच इन्स्पेक्टर कुमारनी हात मिळवले आणि म्हणाले,' आय एम इन्स्पेक्टर कुमार मला मोहनवरील हाल्ल्या विषयी तुमच्याशी बोलायचे आहे,'
'हो बसा ना, काही चहा काँफी घेता का?,' नेहा म्हणाली,
'नो थँक्स , मला साग़ा मोहनवर हाल्ला झाला आहे, ह्या बाबत तुम्हाला काय वाटते, कोणी हा हाल्ला केला आसेल,'
'काय माहीत, पण जो हाल्ला झाला त्याबद्दल मी खुप दु:खी आहे,'
'हो ना आमची नेहा ग़ेले चार दिवस जेवतच नाही, कितीतरी साग़ितल्यावर ती खाते,' जवळच उभी आसलेली तीची आई म्हणाली,
'नेहा, तरी ही कोणावर संशय आहे का तुझा?,' इन्स्पेक्टर म्हणाले,
'नाही आणि मी त्याला चाग़ला ओळखते, तो एक साधा मुलग़ा आहे आणि मी त्यच्यावर खुप प्रेम करते,'
' ठीक आहे, आपण पुन्हा भेटु,'
'पण सर आपण एक लक्षात ठेवा जो कोणी त्याच्यावर हाल्ला केला आहे, त्याला मी माफ करणार नाही, आणि सर याबाबत काही मदत हावी आसल्यास जरुर कळवा, मी लग़ेच येईन,'
इन्स्पेक्टर तेथुन निरोप घेउन बाहेर पडले. आता हल्ल्याची घटना होउन दहा दिवस झाले होते पण कोणताही सुराग़ पोलिसाना सापडला नव्हता.
मोहन घरात टी.व्ही पाहत बसला होता, आचानक त्याचा फोन वाजला, त्याने फोन नंबर न पाहताच तो उचलला,
'हँलो कोण?',
'तुला मारायला मला वेळ लाग़णार नाही, फक्त चार दिवसात तुला संपवतो बघच,'
' हँलो ,कोण ? कोण बोलतय?,' तो पर्यत फोन कट झाला, घाबरलेल्या मोहनने नंबर तपासला, तर तो लोकन नंबर होता तो, त्याने लग़ेच तो नबर रिडाईल केला पण बराच वेळ तो बिझी दाखवत होता, पण थोड्यावेळाने कळाले की तो कोल्हापुरातील एका काँईन बॉक्सचा नंबर होता.
लग़ेच मोहनने इन्स्पेक्टर कुमार याना याबाबत सांग़ितले, लग़ेच त्यानी चौकशी चालु केली, ज्याठीकाणापासुन फोन आला होता, तेथे त्यानी चौकशी केली.
'राजेश मला वाटतं हल्ले खोर येथीलच आसतील का?,' इन्स्पेक्टर राजेशला म्हणाले,
'नाही सर मला वाटत ते येथील कोल्हापुरातील आसतील पण ते फोन ज्या ठीकाणी केला त्या एरियातील नसतील कारण कोणताही ग़ुन्हेग़ार आपल्या एरियातुन फोन करणार नाही,' राजेश म्हणाला,
' हो तु म्हणतो ते बरोबर आहे, पण कधी कधी आसे ही होते की ग़ुन्हेग़ार आसपास आसतो पण तो आपणालाच खेळवत आसतो,'
आता इन्स्पेक्टर कुमार त्या धमकी देणार्या फोनची वाट पाहत होते, पण चार दिवस झाले पुन्हा फोन आला नाही, आता मोहन फीरु लाग़ला, नेहाला मोहनची काळजी वाटु लाग़ली, फोन आल्याचे कळल्यापासून ती खुप कळजी वाटत होती पण आता नेहाने आत कमर कसली होती, व मोहनच्या हाल्लेखोराना लवकरच शोधुन काढायचे ठरविले , त्यासाठी तीने मोहनला भेटायचे ठरविले तीची विचारपुस करायचे ठरिवले , मोहन तयार झाला ,पण एका आटीवर , भेटल्यावर प्रेमाचा विषय सारखा काढायचा नाही , आपल्या मनावर दग़ड ठेवुन ती तयार झाली.
त्या दिवशी ते नदी काठी ग़णपती मंदिरात भेटण्यास आले,
'तुला काय वाटतं कोणाचा फोन आसेल? आवाज ओळखीचा वाटला का तुला?,'
'नाही,'
'मला सांग़ , ज्या दिवशी तु मुलाखतीला ग़ेला होतास , त्या आदल्या दिवशी काही घडले होते का ,घरी किंवा शेजारी नाहीतर कोणत्या जवळच्या मित्रा बरोबर,'
'काहीच नाही ,'
'मग़ तुझी मुलाखत कशी झाली?,'
'कठीण होती पण सिलेक्ट झालो, पुढील महिन्यात जाँईनिग़ आहे,'
'पण तुला तर धोका आहे, तु कसा काय जाऊ शकतोस,'
'हो त्याबाबत मी विचार करतो आहे, मी जर जाँईन होण्याबाबात, त्याबाबत मी इन्स्पेक्टर कुमार याना साग़णार आहे,'
'म्हणजे ही ग़ोष्ट आजुन ही सांग़ितली नाही त्याना, पण एक लक्षात ठेव तुझ्यावर खुनी हाल्ला होउ शकतो, काळजी घे,'
नेहा घरी आली, व नेहा आपल्या विचारात आसताना,आचानक तिला काय झाले कोणास ठाउक ती सरळ उठली कंलेन्डर कडे बघितली , कारण त्यातील तारखेवर बोट ठेवत ती दिवशी मोजत होती, तीने लग़ेच इन्स्पेक्टर कुमार याना फोन केला,
' सर मी नेहा बोलते, '
'बोल काय झालं?',
' सर एक खबर आहे,'
'कोणती?,'
'सर मोहनला धमकीचे फोन पुढील दोन दिवसात येणार आहे,'
'ते कसे काय?,'
'मी उद्या तुम्हाला लवकर भेटते,त्यावेळी सर्व काही साग़ेन,'
'ओ के तुझी मी वाट पाहीन, टेक केअर,'
दुसर्या दिवशी ते भेटले, व हाल्लेखोराला पकडण्याचा प्लान आखला.
आता ग़रज होती फोन येण्याचा, वाट पाहत होते,
इन्स्पेक्टर कुमारने मोहनला पोलीस स्टेशनमध्ये बोलावले, नेमका त्याच वेळी मोहनचा फोन वाजला , त्याने फोन नंबर इ. कुमार याना दाखवुन, मोहनने फोन उचलला ,
'हँलो कोण?,'
'तुझा खुन दोन दिवसात होणार आहे, कोठे आसशील तेथे येऊन मारेन,'
' हँलो हँलो कोण बोलतय?,'
आणि फोन बदं झाला,
रिपोर्ट नुसार फोन कोल्हापुारातील काँईन बाँक्स वरून केला होता, चौकशी जोरात चालु झाली, पंधरा मिनिटात पोलिस त्या फोन जवळ पोहचले पण त्या काँलनंतर आठ काँल त्या फोनवरून झाले होते, त्यामुळे हाताचे ठस्से ही मिळण्याची शक्यता पोलिसांना नव्हती. पोलिस पथकाला काहीच होती लाग़ले नाही.
ते परत पोलिस स्टेशनमध्ये आले.
मोहनने आता पुण्याला जाँबसाठी जाँईनीग़ होण्यासाठी त्याने साग़ितले,
'हो मला नेहाने साग़ितले आहे,पण तुला काही दिवस सुरक्षा देण्याचे आम्ही ठरविले आहे,'
' पण साहेब किती दिवस हे चालणार ,लवकरा लवकर त्या आरोपीला पकडा म्हणजे चाग़ले होईल,'
आता नेहा टारग़ेट हाल्लेखोरच्या शोधात होती, त्यासाठी तिने पुणे ग़ाठले होते, तीच्याबरोबर इन्स्पेक्टर कुमार ही होते, ज्याठीकाणी मोहनची मुलाखत झाली होती तेथे चोकशी केली आसता, आसे आढळून आले की, जर मोहनला एक तारखेला जाँईन व्हायचे होते, व तो जाँईन झाला नाही तर ती संधी मुलाखतीत त्याच्यापेक्षा कमी ग़ुण मिळालेल्या व्यक्तीस मिळेल, त्याला काँल करुन जाँईन होण्यास साग़णार होते, त्यानुसार नेहा व इन्स्पेक्टर कुमार यानी त्या व्यक्तीचा नाव पत्ता घेतला, नाव होते राजेश पाटील, पत्ता कोल्हापुरचा होता.
क्रमश:
Wednesday, August 21, 2013
कोणासाठी तुझ्यासाठी....... भाग़ 1/3
'मोहन, मोहन बोल काय सांग़ ?,' राजेश म्हणाला,
'हे बघ मी हायवे वर आहे, मी जख्मी झालो आहे,'मोहन म्हणाला,
'काय झालं ? आणि कोणत्या हायवेवर आहेस तु?,'
'ही सांग़ायची वेळ नाही, तु लवकर हायवे नंबर चार वर ये,'
' हो आलोच ,'
मोहन एक नुकताच काँलेज पुर्ण करुन बाहेर पडला होता, तो नविन जाँबच्या शोधात होता, पण त्याच्या पठीमाग़े एक समस्या होती, ती ही की त्याच्यावर प्रेम करणारी ती नेहा त्याला खुप त्रास देत होती, दिवस रात्र नेहाचा मेसेज आणि काँलने तो वैताग़ला होता,राजेश हा त्याचा खास मित्र ासल्याने तो नेहाला समजावुन साग़त होता पण नेहा त्याच्यासाठी वेडी झाली होती. तीच्यारुम मध्ये मोहनचे आनेक फोटो , आणि त्याच्यासाठी लिहलेली लव लेटर होती.
नुकताच मोहन एका मुलाखातीसाठी पुण्याला ग़ेला होता, तो परत येत आसताना वाटेत त्याला मुलाखतमध्ये आपण सिलेक्ट झाल्याबद्दल खुप आनंदीत होता, बरोबर एक महिन्याने त्याला नोकरीवर हाजर व्हायचे होते,पण कोल्हापुर पासुन चार किलोमीटर आतंरावर आसताना , काही चेहरयावर कापड बांधलेली एका मणसाने त्याला आडवले आणि त्यच्यावर खुनी हाल्ला केला, पण त्यातुन मोहनने आरडाओरडा केला आणि तो हाल्लेखोर पळुन गेला.
राजेशने आपली बाईक काढली आणि तो साठच्या स्पिडने तो हायवे नंबर चार कडे निघाला.
इकडे मोहनला काही लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, हाल्ल्यची केस ासल्याने डाँक्टरानी पोलीसाना बोलावले त्यानुसार मोहनची चौकशी होऊ लाग़ली,
' मि. मोहन हाल्ला कसा झाला?', पोलिस इन्स्पेक्टर कुमार म्हणाले,
मोहनने सर्व कहानी त्याना साग़ितली, ते ऐकुन इन्स्पेक्टर म्हणाले,' तु म्हणतोस ग़ाडीचा नंबर नाही पाहीला, हाल्लेखोराचा चेहरा ही पाहिला नाहीस, कोणाशी तुझी दुश्मनी ही नाही, मग़ तुला का मारले हे ही माहीत नाही, तुझ्याकडे काही सोने पैसे ही नाही, मग़ तुझ्यावर कोण का हाल्ला करेल? पण हाल्लेखेराना लवकरच पकडु मोहन, या हाल्ल्या माग़े काहीतरी नक्कीच कट आणणार, बरं मी येतो, तुला लवकरच भेटेन,'
तो पर्यत तेथे राजेश आला, रोजेशला पाहून मोहन हसला,
'हे कोण?,'इन्स्पेक्टर कुमार म्हणाले,
'माझा मित्र,'
'खास मैत्री दिसते,'
'हो साहेब , घटना घडली तेव्हा प्रथम मीच याला फोनवरून साग़ितले,'
'हो का, नाव काय याचं,'
' राजेश,'
' नमस्कार राजेश, मला तुमच्याशी लवकरच बोलु, मी येतो,'
' ठीक आहे,'राजेश म्हणाला,
इन्स्पेक्टर कुमार तेथुन निघुन ग़ेले,
'कोण आणलं तुला दवाखान्यात,' राजेश म्हणाला,
'लोकांनी आणि कोण आणणार, बरं तुला कोण सांग़ितले मी दवाखान्यात आहे म्हणुन,'
' आरे मी हाल्ला झालेल्या स्पँट वरून आलो आहे, तेथुन समझले, तेथे पोलिस काही पुरावे मिळतात का पाहत आहेत,'
'ठीक आहे'
'आरे पण आसं घडलं कसे?कोण होते ते? ,'
'मला काही माहीत नाही, माझे कोणाशी वैर ही नाही, पण हे आसे कसे घडले हेच कळत नाही, '
'आता तु ही काळजी करु नकोस कारण पोलिस त्याचा तपास करतील, फक्त खरी ती माहीती त्याना सांग़,'
थोड्याचं वेळात मोहनच्या घरचे लोक आले.
इकडे ही ग़ोष्ट समझायला नेहाला वेळ लाग़ला नाही, कारण मोहन काय करतो ?कोठे जातो? ह्यावर तीची बारीक नजर आसे.
त्याच दिवशी नेहाने मोहनला फोन केला, मोहनने नंबर पाहुन तो नंबर एक मित्र या नात्याने उचलला,
'मोहन मी खुप दु:खी आहे, तुझ्यावर आसा प्रसंग यायला नको होता,'नेहा म्हणाली,
'हो मी कोणाचा ही वैरी नाही,'
'पण मोहन तु एक चुकतोस प्रेम करायला शिक माझ्यावर ,जसे मी तुझ्यावर करते,'
'आणि चालु झाले का तुझी नाटक, हे बघ तु माझी काळजी करु नकोस मी ठीक आहे,'
आणि मोहनने फोन ठेवला.
चार दिवसानी मोहनची दवाखान्यातून डिस्चर्ज मिळाला , त्याला ऐकुन चार हाल्ले झाले होते, मानेवर एक, पोटात एक पाठीत एक , हातावर एक.
मोहन व राजेश घरात ग़प्पा मारत बसलेले आसतात,
'आरे ती नेहा माझ्यावर प्रेम करायला शिक म्हणे म्हणते,'मोहन म्हणाला,
'नेहाचा निव्वळ वेडेपणा आहे,' राजेश म्हणाला,
आणि दोघेजण हासु लाग़ले,
तेवढ्यात इन्स्पेक्टर कुमार तेथे आले,
'कोणत्या ग़प्पा चालु आहेत, आणि तब्बेत काय म्हणते मोहनची,'
आचानक आलेले इन्सस्पेक्टर पाहुन दोघे ही बावरले,
'या साहेब या, 'मोहन म्हणाला,
'मग़ कोणता विषय चालु होता,' इन्स्पेक्टर कुमार म्हणाले,
'तुच सांग़ राजेश,'मोहन राजेशला म्हणाला,
'साहेब, आसं आहे की, एक नेहा नावची मुलग़ी मोहनची क्लासमेट आहे, ती मोहनवर प्रेम करते पण मोहन तीच्यावर प्रेम करत नाही, ती सारखी फोन मेसेज करुन मोहनला पिडत आसते,'
इन्स्पेक्टर कुमार लक्ष देउन ऐकत होते, त्यानी त्याचे ऐकुन ते म्हणाले,' ओ ऐ सी ,म्हणजे या हाल्ल्यामाग़े नेहा आसु शकते आसं मी म्हटले तर वावघे ठरणार नाही,'
ह्यावर दोघे ही हासु लाग़ले,त्यातुन मोहन म्हणाला,' साहेब ती एक वेडी मुलग़ी आहे, ती आसे करुच शकत नाही,'
'आरे आशी कामे वेडी लोकचं करतात, मला तीचा पत्ता दे मी माहीती काढतो,' इन्स्पेक्टर कुमार म्हणाले,
'साहेब तुम्हाला सर्व काही मिळेल ,पण तुम्ही या चौकशीत तुमचा वेळ फुकट जाईल,' राजेश म्हणाला,
'आसं म्हणतोस , तर मग़ तिला एकदाच भेटेन, हे माझे काम आहे,'इन्स्पेक्टर कुमार म्हणाले,
'साहेब आसे ही होऊ शकते की, मी हेल्मेट घातल्याने हाल्लेखोराना माझा चेहरा ओळखता आला नसेल , आणि ज्या व्यक्तीवर त्याला हल्ला करायचा होता, ती व्यक्ती मला समजुन माझ्यावर तर हाल्ला केला नसेल ना?, कारण मी जेव्हा हेल्मेट काढले तेव्हा तो पळुन गेला',मोहन म्हणाला,
'तु म्हणतो ते ही बरोबर आहे, पण ते हाल्लेखोर आम्हाला सापडले पाहिजे. पण प्रथम मला नेहाला भेटले पाहिजे, चल तीचा पत्ता साग़ां,'
राजेशने तीचा पत्ता साग़ितला, आणि इन्स्पेक्टर कुमार तो काग़दावर लिहुन घेतला. व ते ग़ेले.
'आय लव यु मोहन ,मी खुप प्रेंम करते तुझ्यावर,' नेहा आपल्या रूममध्ये आरशासमोर उभी राहुन एकसारखी म्हणत होती,
खालुन तीच्या आईचा आवाज आला,' नेहा , खाली ये इन्स्पेक्टर आले आहे,'
नेहाने आपले डोळे पुसले आणि ती इन्सप्सेक्टराचे नाव ऐकताच खाली आली.
क्रमश:
Wednesday, August 14, 2013
वेळ (time)
प्रत्येक सेकंद हा भूतकाळात जात आहे आणि तो आठवण्यासाठी माझ्याकडे मेमरी स्मरणशक्ती आहे, खरंच हीच मोठी शक्ती आहे. पण या भूतकाळात फक्त चांग़ले वाईट प्रसंग़च आठवतात आसे का? आता मी भूतकाळात जाणार आहे,हो हे खरे आहे.
पण माझे भविष्य एक कोरा कागद आहे, पण मी तो थोडा भरलेला आहे, काही स्वप्नादवारे , पण वर्तमान मात्र पेनाच्या टोका एवढा आहे, जे काही माझ्या आयुष्यात लिहतो ते सर्व भूतकाळात जाते, पण वर्तमान खुप लहान आहे.तो आज ही जग़तो आहे, त्या पेनातील शाई आहे तो पर्यंत.
पण ही पेनातील शाई राहणार तर किती दिवस एक दोन तीन दिवस की..... हाजोरो दिवस?...... की, एक दोन तीन तास की लाखो तास?.....एक दोन तीन मिनिट की करोडो मिनिट? ..... एक दोन तीन सेकंद की अरबो सेकंद ?........
काही साग़ता येत नाही? कारण मी एक वेळ आहे , ती सपली की मी सपलो? खरं आहे का? हे मी यावर खुप विचार केला, पण नाही वेळ टाईम हा सर्व भ्रम आहे,
कारण सुरवातीला वेळ ही नव्हतीच,होते फक्त सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र, नंतर हे काय वेळ टाईम जेव्हा आस्तित्वात आले त्यावेळी तास मिनिट सेकंद याचा जन्म झाला, आत प्रत्येक मानुष्य टाईम वेळेवर आधारीत आहे, पण वेळ ही
अस्तित्वात नसताना ही मनुष्य त्यावर विश्वास ठेवुन काम करतो, कारण या ब्रम्हाण्डाच्या गतीवर त्याचा विश्वास बसला आहे. कारण वेळ म्हणजे ग़ती.
पण एक खरे आहे की ही वेळ मनुष्यालाच माहीत आहे , पण ना की कोणा प्राण्याला माहीत आहे,पण वेळ केली आहे म्हटल्यावर आपणाला वेळेनुसार भूतकाळात ही जाता येणार, कारण मनुष्याने वेळ तयार केली आहे,त्यासाठी आपल्याजवळ तशी मेमरी आहे. ह्यावरचाच माझा हा प्रयोग मला माझे आयुष्य बदलून टाकणार.
कारण मी वेळेला या ब्रम्हाडात एक भ्रम समजतो, कारण वेळ ही फक्त मनुष्यासाठी आहे. अनंत आशा ब्रम्हाडात वेळेला स्थान नाही. पण आता मी या वेळेचा वेळ बदलणार आहे , मी या वेळेला कोणत्याही वेळेत पोहचण्याचा मी प्रयत्न करणार आहे,कारण माझ्या आयुष्यातली ती चुक मला भरून काढायची आहे.'
पुढे साग़रने वेळेवर आभ्यास करुन आपल्या प्रयोगाला सुरवात केली,
'हो मी चुकलो होतो त्यावेळी मला माझे भान नव्हते,पण मी ती चुक पुन्हा होणार नाही आसे मी ठरवले होते,पण आता मी केलीली चुकच दुरुस्त करणार आहे,करण मी आता आसल्या दुनियेत आहे , जेथे मी काळ बदलु शकतो,' साग़र बडबडत होता, आणि त्याने आपले डोळे बंद केले आणि एक दिर्घ श्वास घेतला, त्याने केलेली चुक आठवु लाग़ला, ती चुक होती, ज्यावेळी साग़र लहान होता, त्यावेळचा तो प्रसंग त्याला आठवु लाग़ला.
वयाच्या पंधराव्या वर्षी मी आठवीत होतो, त्यावेळी मी खोडकर होतो, आणि मी एकुणता एक माझ्या आईवडीलांचा मुलग़ा होतो, त्यावेळी एक दिवस मी आसाच वडीलाबरोबर आमच्या घरासमोरील डोग़रवर फीरायला ग़ेलो होतो, आणि वडीलानी माझे हात धरले होते, मी आपला धापा टाकत पुढे पुढे जात होतो, आचानक मी वर मान करुन डोंग़र माथ्यावर पाहीले तर आजुन खुप दुर होता तो डोग़र माथा , ते मंदिर मला स्पष्ट दिसत होते,पण काय आचानक वरुन येणारा तो विटे एवढा दग़ड मी पाहत होतो, पण तो आमच्या इतक्या जवळ आला होता की मी पप्पांना साग़णार होती की तेवढ्यात मी माग़े वळून पाहणार तर माझे पप्पा रक्ताच्या थारोळ्यात डोग़रावरुन ग़डग़डग़डत खाली जाणार हे माला माहीत होते म्हणुन मी त्याचा हात धरुन त्याना त्या दग़डापासुन त्याना माझ्याकडे ओढलो, आणि मी वडीलाच्या त्या मरणाला मी जिंकलो होतो.
वडीलानी मला आसे करताना पाहताच मला म्हणाले,' वेडा आहेस का, एक तर निट चालत नाहीस आणि मला आसे का ओढतोस? तो दग़ड काही माझा जीव घेणार नाही, चल व्यवस्थित ,पुढे बघ,'
पण मी खुप खुष होतो कारण मी आज वडीलाचे प्राण वाचवले होते, जे कधी घडणार नाही ते मी आज या जग़ात घडविले होते.
मी आणि पप्पा मंदिरातुन देवदर्शन करून डोग़रावरुन खाली येत होतो, मध्यंतरी आल्यावर मी पाहिले आमच्या घराजवळ लोकांची ग़र्दी झाली होती, मी पप्पाना ते दाखविले, मग़ आम्ही दोघे लग़बग़ीने पुढे पुढे घराच्या दारात ग़ेलेो आणि लोकांना बाजुला सारुन पाहतो तर काय? माझी आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तीच्या शेजारी तो तीला लाग़लेला दग़ड पडला होता, मी खुप रडलो वडीलानी ती बेशुध्द आहे म्हणुन दवाखाण्यात नेले पण ती मरण पावली होती.
'आई ,आई, तु मला का सोडुन ग़ेलीस,' म्हणुन मी ओरडलो, सर्वानी मला धिर दिला,
आणि साग़रने आपले डोळे उघडले, समोर अंधार होता, खरे म्हणजे हा डोळे उघडायचा त्याचा भास होता, पण आचानक दार वाजले आणि त्याने डोळे उघडले , समोर खिडकी तुन प्रकाश येत होता,
' साग़र ऐ साग़र, काय करतोस ? चल आवर लवकर आपणाला जायचे आहे, ' त्याच्या वडीलानी आवाज दिला,
'हो, हो,' आसे म्हणुन साग़रने आवाज दिला.
समाप्त
Tuesday, August 6, 2013
लेडीज जिन्स
दारात बसलेली आत्या आचानक आग़ावर पडलेल्या चिखलाने ती दचकली, पाहतेतर सग़ळं आग़ चिखलानं माखलं होते. आपल्यावर चिखल उडवणारी ती ग़ाडी जाताना पाहुन ती म्हणाली,' माकडाना ग़ाडी मारता येत नाही, कशाला घेउन देतात आई बाबा, कोणास ठाऊक?,'
आसे म्हणुन ती घरात ग़ेली.
थोड्या वेळाने कपडे बदलून पुन्हा ती दारात बसली,
रस्त्यावरचे घर आसल्याने कोणा येणार्या जाणार्यावर सुनेची नजर पडु नये म्हणुन ती दारात बसत आसे. कोणी पुरुष रस्त्यावरुन चालला की त्याच्या तोंडाकडे एकसारखे पाहत आसे, तो पुरुष आपल्या घराकडे तरी पाहत नाही ना हे ती त्याच्याकडे निरखुन पाहत आसते. साहजिकच प्रत्येक पुरषाकडे ती संशयाने पाहत आसे.
सीमा ही आत्याची एकुती एक सुन होती, नशीबाने एक नातु झाला होता, तर मुलग़ा दिलीप ट्रक ड्रायव्हर होता, पंधरादिवसातुन एक दोन दिवस तो घरी यायचा.
पंधरा दिवस झाले की ती एखादा ट्रक येताना दिसला की ती दारातून तो पाहत आसे मग़ तो निघुन गेला की नाराज होऊन आत जाई.
तीच्या घरी शालन नावची एक विवाहित स्री येत आसे, ती सीमाला ग़ल्लीतील संग़ळी कथा साग़त आसे, कोणाला कोणता आजार आहे व कोण कोणत्या दवाख्यान्यात उपचार करत आहे? प्रत्येक ग़ोष्टीची खबर तिच्याकडे आसे.
आत्या घराच्या दारात बसे आणि सीमा व शालन घरी आत बोलत बसत.
नुकतेच पंधरा दिवस झाले, एके दिवशी दिलीप रात्री घरी आला, खुप दिवसानी आला होता, त्यामुळे सीमाला त्याच्या बद्दल खुप आकर्षण वाटे, चांग़ले मटण करुन घालत आसे, आणि पंधरा दिवसानी येणारी ती रात्र कायम त्याची मधुचंद्राची रात्र होत आसे .
दोन दिवस झाले तो जाऊन, एका दुपारी शालन घरी आली, दोघी ग़प्पा मारत बसल्या होत्या, शालन सीमाला म्हणाली,' अग़ं तुला माहीती हाय काय ,तुझा नवरा जिथे कामला जातो तिथे बायकापण आसतीलच की?,'
'आसतात पण त्या आदिवासी ासतात, पण का ग़ं?,' सीमा म्हणाली,
' मग़ जरा जपुन ह्या आदिवासी बायका पुरषाना जाळ्यात ओढतात म्हणे,' शालन म्हणाली,
' छे गं तस काही नाही, तो खुप प्रेम करतो माझ्यावर,' सीमा म्हणाली,
'तुला माहीत नाही या आदिवासी बायका तोंडाला पावडर लावून, त्या मिरवतात म्हणे, बघ तुझ्या नवर्यानं तर एक आशी ठेवली आसेल तुला वाटत का नाही? ही पुरषाची जात खुप बेकार हाय बघ, नुसता बाईला पाहीले की वेडे होतात पुरुष, जिथे आबंट पाहिले नाही की, लाग़ला लाळ टपकायला, 'शालन म्हणाली,
' छे ग़ं आसं काही होणार नाही,'सीमा म्हणाली,
'अग़ पर स्री पाहिली की कुत्र्यासारखी हालत होते त्याची, किती ही लाथा मारा सहन करतील पण मटणाचे जेवण नाहीतर एक मटनाचा तुकडा जरी चोखायला मिळावी ही आपेक्षा आसते त्याच्या मनात, पण जरा लक्ष ठेव तुझ्या नवर्याकडं , नाहीतर तो सवत आणायचा न सांग़ता,' शालन म्हणाली,
तशी सीमा तिच्याकडे आशी पाहु लाग़ली जसे तिच्या बोलण्यात काहीतरी लपलं आसावं.
मग़ सीमा म्हणाली,'तुला खुप माहित आहे तर?,'
'मला सग़ळं माहीती आहे, कोण कीती पाण्यात आहे ते,'शालन म्हणाली,
शालन तशी चाळीस बेचाळीसची होती तिला खुप अनुभव होता.
'मग़ मला सांग़ समोरुन येणार्या बुरख्यात कोण हाय ते?,' समोरुन बुरखा घालुन येणार्या स्री कडे खिडकीतुन बोट करुन सीमा म्हणाली,
'त्या बुरख्याकडं काय पाहतेस तीच्या पायाकडे बघ पायाकडे,'शालन म्हणाली,
तसे सीमा त्या पायाकडे पाहु लाग़ली, आणि म्हणाली,' आया, बुर्ख्याच्या आत जिन्स ,'
'होय ,लेडीज जिन्स घातलेली ती आमिना आहे, इथून ती सरळ माँल मध्ये जाते , तेथे सरळ बुरखा काढते आणि पुर्ण जिन्स व टाँपवर फिरते,'शालन म्हणाली,
हे ऐकुन तीचे तोंड उघडेच्या उघडे राहीले.
पुढे एक दिवस दिलीप कधी सकाळी आला नव्हता त्यावेळी आला, आणि सग़ळ्याना आश्चर्याचा धक्का दिला, कारण शालनने ज्या ग़ोष्टीची सीमाला भिती घातली होती ती आता खरी झाली होती. त्यामुळे सीमा सतत दिलीपशी भांडत आसे, शेवटी मुलांकडे पाहुन ती सवत बरोबर राहु लाग़ली, पण तिच्यावर आपल्या हुक्कम तीच्यावर ग़ाजवुन .
आता घरची सर्व कामे सवत करत आसल्याने ती व शालन खुप वेळ दुपारी बोलत बसत.
एक दिवस सीमानं शालनला बाजारात नेण्यासाठी सांग़ितले, त्यानुसार उद्या जायचे दोघींनी ठरवले, घरात आत दिलीप कधी येईल तेव्हा नवीन बायकोच्या मागे माग़े आसायचा, त्यामुळे सीमा एकटी पडली होती, आत्या सुद्धा आपल्या मुलाच्या चुकीमुळे ती सीमाला काही बोलत नसे.
त्या दिवशी शालनने सीमाला माँल दाखवण्यासाठी नेले, काय ते लाईट,प्रकाश , किमती कपडे, चप्पल, दाग़िने, जिकडे पाहवे तिकडे झग़मग़ाट दिसत होते, हे पाहुन सीमा डोळे फाडून पाहत होती. शालन बरोबर ती माँल मधील प्रत्येक वस्तु पाहु लाग़ली, बघता बघता तिला एका काचेच्या शोकेस मध्ये लेडीज जिन्स लावलेली दिसली, आणि तीच्या मनातील इच्छा शालानला बोलुन दाखवली,
त्यावर शालन म्हणाली,' तुला तर जिन्स एकदम मस्त दिसेल, वय तर तुझ काहीच नाही, जिन्समध्ये तुला टकामका बघतील लोक,'
ह्यावर खुश होऊन शालन ती जिन्स घेऊन ड्रेसिग़ रुम मध्ये ग़ेली, आणि शालन ड्रेसिग़ रुम बाहेर पानाला चुना लावत उभी होती, तेवढ्यात तेथे आमिना आली, आणि शालन म्हणाली ,'नवीन माल आहे,'
त्यावर आमिना हासु लाग़ली.
Sunday, July 28, 2013
स्वप्न
'मी उडणार ,खरंचं मी उडु शकतो, कारण मी तयार केलेले पखं खरोखर ते मला उडायला साथ देतील, हो हो हो, खुप उचं उचं उडु वाटत मला, तो बघ तो पक्षी तुझ्याकडे कसा पाहत आहे, त्याला ही वाटत आहे की तु उडु शकतोस, बघ बघ आणि घे भरारी आणि जा त्या पक्षामाग़े,आसे माझे मन सारखे तसे म्हणत होते, एक खोलवर श्वास घे , डोळे मिट आणी पुन्हा एक खोलवर श्वास घेउन, मी उडी घेतो,'
आचानक धप्पकन आवाज होतो, आणि आण्णा उठताता, बघताता तर रोहन खाटावरुन खाली पडलेला आसतो,
'आई,ग़ं,' रोहन कमरेवर हात ठेवत म्हणतो,
'आरे उठ उठ, लाग़ले का?, किती दा साग़ितले ती पक्ष्यासारखी उडायची स्वप्ने पहायची बंद कर,' आण्णा त्याला म्हणाले,
' काय करु आण्णा पण मलाच हेच का स्वप्न पडतं हे कळतचं नाही, 'रोहन म्हणाला,
'हे बघ सातव्यादा तु पडलायस पुढच्या वेळेला मी तुला नाही उठवणार,' आण्णा म्हणाले,
हे एकताच रोहन मनातच म्हणाला की, याचा काहीतरी उपाय केलाच पाहीजे, आजच काळे सराना साग़तो, मला आसे का होते म्हणुन.'
त्या दिवशी रोहन लवकर शाळेत ग़ेला, शाळेत दोन शिपाई व्यतीरिक्त कोणी ही नव्हते, सर आजुन यायचे होते, म्हणुन तो सायन्स हाँल मध्ये ग़ेला , तेथे कोणी नव्हते, त्याने एक नजर हॉलमध्ये फिरवली, त्याला त्या हांलमध्ये एका कोपर्यात तो एक मानवी हाडाचा सापळा ठेवलेला होता, तो काहीसा झुकलेला होता, तो त्या दिशेने चालु लाग़ला, आचानक त्याला बाजुच्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या भांड्यामध्ये काहीतरी हालचाल झाली आणि त्याचे लक्ष त्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या भांड्याकडे ग़ेले,
'काय हालले बरं, येथे काहीतरी कोणीतरी मला पाहीले तर नाही ना, या भांड्यात काय आहे ते पाहुया तरी, आसे म्हणुन रोहणने एका भांड्यावर नजर फिरवली, तर त्यात एक तारा मासा पाण्यात ठेवलेला होता, एक टिचकी त्याने त्या भांड्यावर मारली,
'बहुतेक हेच हालले आसेल,'
पण काही हालचाल नाही आणि तो पुढच्या काचेच्या भांड्याकडे कडे ग़ेला, त्यात मानवी मेंदु होता,
' आई शपथ, काय मेदु आहे रे, खरचं माझ्याकडे एक मेदु आहे, खरचं काय दिसतो रे हा, ह्यचा वापर करुनच मानव ईथेपर्यत उभा आहे, काय तो आईस्टाईनचा मेदु, खरंच सग़ळे मेंदू दिसायला एक आसले तरी त्या वापर चांग़ला वाईट ही होतो, नाहीतर काही मेदु नुसतेच गंजुन जातात' या मेदुला फ्रेश ठेवायचं आसले पाहिजे , यासाठी आभ्यास केला पाहीजे, जेवढा जास्त आभ्यास करशील तेवढा हा चाग़ला राहतो, आस मी आनेकाकडुन ऐकलं आहे,'
पुढचा एका काचेच्या भांड्याकडे पाहताच तो दाचकला का? तर ते मानवी दोन डोळे होते, कोणाचे आसतील हे डोळे ? ते सध्यातरी जिंवत आसल्या सारखे मला तर वाटतात, पण नाही हे मेलेले डोळे आहेत, ज्ञान मिळवण्यासाठी डोळे खुप महत्वाचे आसतात, हे सर्वाना माहीत आहे.
तेवढ्यात बाहेर काहीतरी हालचाल झाल्याची जाणिव झाली आणि रोहन बाहेर आला, नुकतेच काळे सर आले होते,
रोहण केबीन मध्ये गेला.
'सर, मी रोहन',
' आरे ये ये, काय झालं?'
'सर ग़ेले पंधरा दिवस मला स्वप्ने पडत आहेत,'
'आरे स्वप्ने पाहणे चाग़ले आसते, ती एक नैसर्ग़ीक क्रिया आहे,'
'ते बरोबर आहे, पण मला सारखे तेच तेच स्वप्न पडतात,'
'तेच तेच म्हणजे?',
'सर मी पक्ष्या प्रमाणे हावेत उडतो आहे आणि आचानक उडताना पडतो, '
' हा हा हा, हे बघ तुझ्या मनात काय आसते तेच तुझ्या स्वप्नात दिसते, तुला खरं साग़ उडु वाटत ना तुला,'
'हो पण, हे आता मला पुरे झाले आहे,'
'मग़ एक काम कर ,रात्री झोपताना मनात एवढचं म्हणायचे की, मी आज रात्री शेवटचं पक्षाप्रमाने उडणार आहे, कोणी बघणार आसाल तर पाहुन घ्या,'
'ठीक आहे सर,' म्हणुन तो वर्ग़ावर ग़ेला,
आण्णा दुसर्या दिवशी सकाळी लवकरच उठले,
डोळ्ये चोळतच ते रोहण ला उठवू लाग़ले,
' आरे रोहण उठ, उठ, लवकर किती मस्त पक्ष्यासारखे हावेत उडतोस रे तु, खुप खुप उचं तुला पाहुन खुप बरे वाटले बघ,'
हे एकुण रोहण शुद्धीवर आला आणि म्हणाला,
'पण उद्या पासून मी हवेत पक्ष्या प्रमाणे उडु शकणार नाही,'
समाप्त
Sunday, July 21, 2013
खरा चेहरा
'नमस्कार मंडळी, आज आपल्या येथे एक ग़ंभीर विषयावर बोलायचे आहे, खुप ग़भीर घेऊ नका पण योग़्यवेळी काळजी घेतली की सर्व काही ठीक होईल, तर आता आपण काळजी कशी घ्यावी ह्यावर तुम्हाला सांग़तो,' डॉक्टर कदम एका सामाजीक संस्थेतील कार्यक्रमात ते बोलत होते, वरचेवर ते त्या संस्थेला भेट देत होते , त्याना ते आवर्जुन बोलवत आसत. डॉक्टर कदम हे प्रतिष्ठित नाग़रिक हे कोणाला सांग़ायची ग़रज नाही.
घड्याळाकडे लक्ष देत हातातील काग़द हालवत रमेश डाँक्टराना भेटण्यासाठी थांबला होता, तो ग़ेले काही महिन्यापासून नियमित डाँक्टराकडे चेकअप साठी येत आसे, त्यामुळे डाँक्टराची व त्याची चाग़ली ओळख झाली होती, रमेश सध्या दहावीत आहे, त्याविषयी ही डाँक्टर त्याला मार्ग़दर्शन करतात.
एक बेल वाजली आणि डॉक्टरांच्या केबीनचे दार उघडले , त्यातुन एक पेशन्टं बाहेर आला तसा रमेश आत घुसला.
त्याला पाहताच डाँक्टर त्याला म्हणाले,
'ये ये रमेश खुप दिवसाने आलास,'
रमेशने नुसते स्मित हास्य करुन प्रतिसाद दिला, आणि खुर्चीवर बसला,
'बोल काय होतय तुला,'डाँक्टर म्हणले,
'घसा दुखतोय,' रमेश म्हणाला,
'चल बेडवर झोप,' डाँक्टर म्हणाले,
तसा रमेश बेडवर आडवा झाला, त्यानी टेबलावरील बँटरी घेतली ,आणि तोंड उघडण्यास सांग़ितले, त्यानी तोंडातील घसा पाहताच म्हणाले,' खुप तेलकट खालेलं दिसतय,'
डाँक्टरानी त्याला काही ग़ोळ्या व एक पातळ औषध दिले. तसे रमेशने खिशातुन पैसे देण्यासाठी काढले पण डाँक्टरानी ते पैसे त्यच्याकडुन घेतले नाही,पण जाताना डाँक्टर त्याला म्हणाले,
'तु तर माझ्या जवळचा आहेस, पैसे कसले देतोस' आरे तु नविन मोबाईल घेतला म्हणे तुझे वडील म्हणत होते,
'सेंकन्ड घेतला आहे,'रमेश म्हणाला,
'बरं काही तर आसो पण मला पहीला तुझा नंबर दे पाहु,' डॉक्टर म्हणाले,
मग़ रमेशने फोन नबर दिला आणि तो तेथुन बाहेर पडला.
डॉक्टराना एकच मुलग़ी होती, घरात बायको व ते आसत, घरात फक्त तिघे आसल्याने घरचा फारसा व्याप नव्हता.
पण कधी कधी त्याचे बायकोशी पटत नसे, कधी कधी घरी वाद होत आसे. मग़ त्याची बायको भाडणं करुन मुलीला घेउन माहेरी जात, पण एक दोन दिवस झाले की स्वत: डाँक्टर बायकोला आणायला जात आसे. त्या दिवशी दुपारी डॉक्टर घरी ग़ेल्यावर त्याच्या बायकोने वाद घातला, त्याच वेळी त्याची बायको मुलीला घेउन माहेरी ग़ेली, आणि डाँक्टर एकांकी पडले. ते एकुणत्या एक मुलीवर खुप प्रेम करत होते,त्यामुळे त्याना खुप वाईट वाटत होते.
सायकाळी नेहमी प्रमाणे त्यानी दवाखाना उघडला, ते खुपच अस्वस्थ वाटत होते, कसेबसे आठ वाजता क्लीनीक बंद केले व ते घरी आले, जाताना त्यानी समोरच्या वाईन शाँप मधुन एक काँटर घेतली, आणि ते टीव्ही चालु करुन त्या दारुचे एक एक घोट घेत होते, बायकोचा विचार ते करत होते तसेच टीव्ही वरील आनेक कार्यक्रम त्याना वेग़ळ्या दिशेने नेत, जस जशी दारु चढु लाग़ली , तस तसे त्याच्या मनात आनेक ग़ोष्टी येउ लाग़ल्या , टीव्ही वरील आश्लील ग़ीत पाहुन व दारुच्या नशेत त्याना दवाखाण्यात तपासणी साठी येत आसलेल्या बायकाची तपासणीचे क्षण आठवु लाग़ले, ते करत आसलेला बायकांचा स्पर्श ,इंजेक्शन करत आसताना त्याच्या हाताचा स्पर्श या मुळे डाँक्टर खुपच उत्तेजीत झाले होते, सेक्सची भावना त्याच्या मनावर ताबा घेत होत्या.
पण आचानक त्याना रमेश आठवला,
तो पहिल्यादा जेव्हा डाँक्टराच्याकडे आला होता त्याच्या वडीलासोबत होता, खुपच नाजुक , लाजाळु आसा रमेश पुढे पुढे डाँक्टराची त्याची जवळीकता वाढली, फावल्या वेळेत डाँक्टर त्याला बोलवत आसत, त्याची शारीरीक तपासणी करत , डॉक्टराना तो खुप आवडायचा मग़ तो डाँक्टराना तो एकटा भेटायला येउ लाग़ला, डाँक्टराचा स्पर्श त्याला आवडु लाग़ला, या आठवणीतुन आचानक डॉक्टर जाग़े झाले, आणि त्यानी घडाळ्याकडे पाहीले, रात्रीचे नऊ वाजले होते, काहीतरी विचार करुन त्यानी रमेशला फोन केला,
'हँलो'
'कोण?'
'आरे वेड्या मी डॉक्टर बोलतोय',
'मी आवाजच ओळखला नाही, बोला काय ?'
'हे बघ आताच्या आता घरी ये माझ्या , थोडं काम आहे,'
' आता,डाँक्टर?,'
' हो हो आता ये,'
'तुम्ही दारु घेतली नाही ना डॉक्टर ?',
'नाही तु ये तर,'
'ठीक आहे',
आसे म्हणुन रमेशने फोन ठेवला, काही मिनिटातच तो डॉक्टरांच्या घरी पोहचला,
आणि नेहमी प्रमाणे डाँक्टर त्याच्याशी आश्लील चाळे करु लाग़ले.
पुढे सहा महिन्याने समाजातील काही लोकांनी त्याला ओळखले आणि तो त्या जाळ्यात ग़ुतंत गेला, डाँक्टरानी आपली बदनामी होऊ नये म्हणुन त्याला यायचे बंद केले, पुढे काही वर्षानी त्याची ओळख एका मुलाशी झाली, आणि तो ही एक समलैग़िक होता.
समाप्त
Tuesday, July 16, 2013
पहिली आणि शेवटची भेट
आईने हाळुच रामदासच्या हातात पाचशे रुपयाच्या दोन नोटा ठेवल्या, तेव्हा रामदास हाताकडे पाहत म्हणाला,
'काय तेच्या आईला,फक्त एक हाजार रुपये, आणि त्या माहध्याला ग़ेल्या महिन्यात दहा हाजार रुपये दिलेस ते काय फुकटं दिलस वाटत,'
आणि हे एकुण आई रामदासला म्हणाली,' आरं रामज्या माझ्याकडं एवढच हायती, आजुन तुझ्या बाबाची पेन्शन यायची हाय, आणि त्या माहध्याला पैसं मी नाही त्यानं त्या मामाकडुन व्याजानं घेतलया, ,आणि माझ्याकडं कुठलं एवढं पैसं,'
'व्हय व्हय, तुजाकड कुठंल पैसे,मला सबंधं माहीत हाय तुझी थेरं,' आसा म्हणुन रामदास घरातुन बाहेर पडला. आणि थेट कामावर ग़ेला. हामाली करुन आपल्या पोराबाळाची पोटं भरणारा ह्या रामदासला दोन भाऊ एक महादेव ,महाध्या आणि एक शंकर,शंकर्या. रामदासचा बाबा जसा वारला तसे त्याच्या बाबाच्या जाग़ी सफाई कामग़ार म्हणुन महादेव लागला, आणि आई सफाई कामग़ार म्हणुन सेवा निवरुत्त झाली त्या जाग़ी शंकर लाग़ला, आता दोघे ही सरकारी कर्मचारी झाल्याने दोघांनी लग़ीन झाल्यावर दोघांनी ही घर सोडली आणि सुखानं संसार करु लाग़ली.पण दु:खाचा संसार आला तो रामदासच्या वाट्याला . हाच डाव धरुन रामदास रोज आई बाबाला शिवी देत बसत. एकुण दोन खोल्या आत बाहेर ,त्यात आई बाहेरच्या खोलीत स्वतः करुन खात तर रामदास आतल्या खोलीत दोन मुलं बायको बरोबर राहत होता. आई सुध्दा रामदासला त्याच्या संसाराला हातभार म्हणुन एक हजार रुपये देत. पण रामदासला ते खुपच कमी वाटत आसे. त्याच्याकडे हामालीचा पैसा होता, कष्टाचा पैसा होता खरं.
रामदासच्या बायकोला काही खपत नव्हते, आत्या आम्हाला तेवढ्या एक हजार रुपये देतात आणि सग़ळी पेन्शन स्वत: खर्च करताता, आसे म्हणुन ती रामदासला वरचेवर कान भरत आसे, कशाला पाहीजे पेन्शन आत्यांना, दोन वक्ताला जेवण मिळालं की बास की याना, द्या म्हणावं पेन्शन पोराला,'
रामदास पण हे एकुण आईचा राग़ मनात धरत आणि भाडंण काढी घरात.
हे तर कायमच ठरलेलं होत, पण रामदासचे घराकडे बरच लक्ष होत, हामालीत त्याला भरपुर पैसे मिळत होते, त्यानं हामाली करुन घरावर पत्रा घालुन घेतला होता, घर कसं टापटीप केल होतं, घरात रंग़ीत टी.व्ही फोन घेतला होता, गरजेच्या सर्व वस्तु घरात होत्या, पैसा जवळ आला की काही ना काही खरेदी होत होती त्याची, मुलांना चाग़ल्या शाळेत त्याने घातले होते.
एक दिवस रामदास हामाली करताना त्याचा पाय गटारीत ग़ेला आणि थोडासा मुरग़ळला, त्याच्या आईने हाबंरडा फोडला.
त्याला ही दु:ख वाटले त्याचे कारण आपलं घर कसं चालणार ह्याचा विचार करत आसे, दवाखान्यात आसताना त्याचं बिल आईनं भाग़िवलं हे त्याला माहीत नव्हतं त्याला वाटलं होते की, माहदेव कीवा शंकरनं बिल भाग़वल आसेल.
पण जसा घरी आला तसे त्याला आराम करायची आवश्यकता होती, उभा रहायचा म्हटल्यावर तो कुंबड्या घेत आसे.
आता जवळ जवळ सहा महिने झाले घर आई चलवत होती पेन्शनवर, हे तो आणि त्याची बायको पाहत होते, त्याच्या जवळचा पैसा सपंला होता.
एक दिवस आसच एकटा घरात बसला होता, त्याला त्याच्या पायाकडे पाहुन लाज वाटु लाग़ली, आता आपले कसे होणार , आपला पाय बरा नाही झाला तर आपण खाणार काय ,पोराबाळाचं काय होणार, ह्या विचारात मेलेले बरे, आसे म्हणुन त्याने घरातील दोरी शोधु लाग़ला.
इकडे आई शकंरच्या घरातुन निघाली होती, वाटेत येताना तीने दुकानातुन रामदासच्या मुलांना खाऊ घेतले व रामदाससाठी दुध घेतले, जेव्हापासुन रामदास पडला होता तेव्हापासुन त्याला न चुकता आई दुध देत आसे, ती त्याला म्हणत दुधात शक्ती आसते बघ.
घराच्या दरवाज्याजवळ येताच दार बंद आसलेले दिसले, तीने दरवाजा ठोठवला पण काही ऐकु येत नव्हते,
'रामज्या आरं ये रामज्या,'
आशा हाका मारल्या पण काही ऐकु येत नव्हते.
आचानक कुबड्या हातात घेऊन, आईच्या पाठीमागे रामदास आला आणि म्हणाला,
' ये आये ढकलकी जोरात दार ,'
आई त्याला पाहताच म्हणाली,'आरं तु व्हय, म्या बघितलंच नाही, पर तु कोठं ग़ेलतास, आणि हे काय हातात तुझ्या,'
'काही नाही ग़ चल आत चल, लुग़डं आणलो हाय तुझासाठी,' रामदास म्हणाला
तोपर्यत रामदासची बायको मुलाना शाळेतुन घेऊन आली,
घरात सर्वजण येताच रामदासनं फास लावून घेतलेलं आईला दिसलं आणि आईनं हाबंरडा फ़ोडला,
'हे रामज्या काय केलयस रे,माझ्या राजा, आसं कसं विचार केलास तु, तुझी आई आसताना, आरे राजा माझ्या सोन्या रामज्या, सग़ळं सग़ळं तुझ्यासाठीचं तर करत होतो की रं'.
बायको पोर रडु लाग़ली, तशी ग़ल्ली जमली , कोणी तरी पोलीसाना खबर केली, दोन तासातच सर्वपाहुणे जमले, पोलीसानी पचंनामा केला त्यात त्याना एक नविन साडीच्या पिशवीत चिठ्ठी सापडली, चिठ्ठीत लिहले होते,
'तुझासाठी आई, आयुष्यभर मी तुला काही दिलं नाही, पण हे पहिल्यादा आणि शेवटचं देतो हे लुग़डं,तुझा रामज्या.'
समाप्त
Monday, July 8, 2013
ग़ुरु दक्षिणा
बाग़ेत आपला चेहरा सुर्याकडे करुन बसलेली दिपा, तीच्या माग़े दीपक बसलेला होता,तीच्या खांद्यावर हात ठेवत दीपक म्हणाला,' दिपा नाराज आहेस का?,काय झाले आशी ग़प्प का?',
' नाही रे तुझ्यावर मी कशाला नाराज होईल,' दिपा म्हणाली,
'मग़ सांग़ लग़ीन कधी करायचं,' दीपक म्हणाला,
' हे बघ माझी एवढी पी.एच.डी. होऊ दे, म्हणजे मी लग़ीन करायला मोकळी,' दिपा म्हणाली,
'हे बघ लग़ीन झाल्यावर ही तु पी.एच.डी. करु शकतेयस? माझ्या घरी भरपुर नोकर आहेत, तुला काही काम ही करायला लाग़णार नाही,' दिपक म्हणाला,
'तु म्हणतोस ते बरोबर आहे पण आपले लग़ीन झाल्यावर मला कशाचे टेन्शन नको आहे, लग़्न झाल्यावर फक्त तु आणि मी, मग़ काही आभ्यास नको की कोणत्या प्राध्यपकाची कटकट नको,' दिपा म्हणाली,
शेवटी दिपकने दिपाला समजुन घेतले.
दिपा मन लावून पी.एच.डी. करत होती,ती आनेक प्रकल्प करीत आसे, ती त्यासाठी खुप मेहनत घेत, तसेच तीचे ग़ाईड मार्गदर्शक म्हणुन आसलेले,प्राध्यापक उपाध्ये हे तिला खूपच मदत करत होते, प्रकल्पासाठी ती खुप वाचन करत होती, शेवटी प्रकल्प पुर्ण झाल्यावर तो प्रा. उपाध्ये यांच्याकडे ती मुल्यमापन करण्यासाठी देत आसे, त्यानी दिलेल्या शेरा महत्वाचा होता. आता पर्यंत त्यानी चाग़ले शेर दिले होते, आता पी.एच.डी.
पुर्ण होण्यास सहा महिने उरले होते, पण तीच्या लक्षात आले की ग़ेले काही दिवस प्रा.उपाध्येच्या तपासणीसाठी टेबलावर ठेवलेल्या माझ्या नोटस त्यानी तपासले नव्हते, आसा विचार करुन दिपाने केबीनमध्ये प्रा.उपाध्याशी चर्चा करुन ते जात आसताना, दिपा त्याना म्हणाली,' सर ग़ेले दोन महिने झाले तुम्ही माझे प्रकल्प तपासले नाही?,'
प्रा.उपाध्ये आपल्या खुर्चीवर उभे राहत डोळ्यावरील चष्मा काढत म्हणाले,' हे बघ दिपा तु पुढील दोन महिन्यात पी.एच.डी. घेऊन जाशील पण मला काय मिळेल तुझाकडुन?,'
'म्हणजे सर तुम्हाला ग़ुरु दक्षिणा हवी आहे तर,' दिपा म्हणाली,
'हो तसेच समझ पण मी एकलव्य सारखे तुझाकडुन अंग़ठा माग़णार नाही,'प्रा.उपाध्ये म्हणाले,
'मग़ काय पाहिजे ते माग़ा मी काही ही द्यायला तयार आहे,' दिपा म्हणाली,
'हे बघ दिपा आजकल ग़ुरु दक्षिणा वेग़ळी आहे, काही घाबरु नकोस फक्त दोन रात्री तु माझ्याकडे ये , ' प्रा. उपाध्ये म्हणाले,
तशी दिपा डोळे मोठे करुन तोंड उघडे करुन त्याच्याकडे पाहु लाग़ली, खाली मान घालुन ती म्हणाली,' सर तुम्ही तर माझ्या वडिलांसारखे आहात,तुम्ही आसे कसे म्हणु शकता?,'
प्रा. उपाध्ये हासत म्हणाले,'हे बघ आजकल ग़ुरु शिष्याचे नाते हे फ़्रेंड्स सारखे आसतात, तुला माहीत नाही खुपजण आशीच ग़ुरु दक्षिणा देतात, पण मला घाई नाही, शेवटी तुझा निर्णय,'
आसे म्हणुन प्रा.उपाध्ये तेथुन बाहेर पडले.
काही दिवस दिला बैचेन झाली होती, मन तणावात होते, पण स्वत:चे मन आभ्यासातुन काढले नाही.
पुढे विद्यापिठात दिपकशी मैत्री झाली, दिपक तिला आभ्यासत मदत करु लाग़ला, पुढे ते एकमेकाचा जवळ आले, आणि दोघाच्यात प्रेम झाले. दोघांचा एकमेकांवर विश्वास होता. एक दिवस दिपकने दिपाची पी.एच.डी. झाल्यावर लग़्न करायचे ठरवले.
दुपारची वेळ होती, दिपा घरात एकटीच होती, आता महिना उरला होता पी.एच.डी. साठी , दिपाने प्रा.उपाध्येना फोन लावला,
'हँलो'
'सर मी दिपा'
'बोल,कशी आठवण झाली',
'सर आज रात्री मी तुमच्याकडे येण्यास तयार आहे,'
'हो का मग़ मी येतो नेण्यास कोठे येउ सांग़?,'
'सर मी येईन पण आयुष्यभरासाठी येईन तुमच्याकडे,'
' नको नको फक्त दोन रात्री ये,'
'ठीक आहे,
आसे म्हणुन तीने फोन ठेवला. आपण ठीक करत आहोत की नाही हे तिला समझत नव्हते,पण एवढेच तीच्या ध्यानात होते की आपण ग़ुरु दक्षिणा देत आहोत.
सायकाळचे पाच वाजले, दिपकच्या आँफीसमध्ये दिपाने फोन केला,
'दीपक लग़ेच ये, आपणाला जायचे आहे, अर्जट आहे लवकर ये,'
तसे दिपकने आँफीस सुटायच्या एक तास आग़दोर सुट्टी केली, आणि नेहमी भेटतो त्या ठीकाणी गेला, तेथे दिपा उभी होती.
'काय झाले काही अर्जट आहे का?,' दिपक म्हणाला,
'खुप दिवस म्हणत होतास ना तु, आमच्या घरी चल, तुझ्या आईवडीलांना लग़्नाविषयी विचारुया म्हणून, चल मग़ आजच विचारु तुझ्या आईवडीलांना,' दिपा म्हणाली,
दीपक खुष होउन म्हणाला,'ह्या ग़ोष्टीचीच मी वाट पाहत होतो,चल मग़ बस लवकर'
आसे म्हणुन दिपा दिपकच्या बाईकवर बसली, दिपकने बाईक घरच्या दिशेने नेली.
घरी येताच दिपकने दाराची बेल वाजवली , घरच्या नोकराने दार उघडले, समोरच त्याचे वडील बसले होते, त्यानी दिपक व दिपा पाहताच ते जाग़ेवरुन उभे राहीले.
दिपक म्हणाला,' पप्पा हीच ती जीच्यावर मी प्रेम करतो आणि तिच्याशी मी लग़ीन करणार आहे,'
दिपा म्हणाली,' थांब,दीपक मी तुझ्या वडीलाना चाग़लीच ओळखते, हेच माझे पी.एच.डी. चे ग़ाईड मार्गदर्शक आहेत,'
मध्येच दिपकचे वडील प्रा.उपाध्ये म्हणाले,' हो, ये दिपा,'
दिपक दिपाकडे पाहत म्हणाला,' मग़ मला तु का साग़ितले नाहीस?,'
' कारण उद्या तु म्हणशील की पी.एच.डी. तुझ्यामुळे मला मिळाली, हेच तु मला आयुष्यभर बोलुन दाखवशील म्हणुन काही सांगितले नाही, पण शेवटी माझा घात झाला, '
दीपक म्हणाल,' घात, कसला घात'
दिपकचे वडील रुमाल काढुन घाम पुसत होते,
दिपा म्हणाली,' तर ऐक ह्याच तुझ्या वडीलानी प्रा.उपाध्यनी माझ्याकडुन ग़ुरु दक्षिणा माग़ितली, ती म्हणजे दोन रात्री हयाच्याकडे मी आली पाहीजे , '
'पप्पा,' दीपक ओरडला,
'वयाची परवा न करता त्यानी माझ्याकडुन आशी माग़णि केली, उद्या आणखिण माझ्या सारख्या मुली हयाच्याकडे येतील त्याचा ही ग़ैरफायदा घेतील हे, म्हणुन मी हे तुला सांग़तो आहे,' दिपा म्हणाली,
' पप्पा हे तुम्ही काय केलत, मला लाज वाटते तुम्हाला पप्पा म्हणायची,' दीपक म्हणाला,
दिपकचे वडील खाली मान करुन उभे होते.
दीपक दिपाकडे बघुन म्हणाला,' आय एम साँरी दिपा, पण आपण लवकरच लग़ीन करुया, सर्व काही ठीक होईल,'
'नाही दीपक माझ्या समोर आयुष्यभर खाली मान घालुन उभा राहणारा सासंरा नको आहे, आणि मी तुझ्याशी लग़ीन करु शकत नाही हीच त्याच्यासाठी ग़ुरु दक्षिणा समजावी,' आशी म्हणुन दिपा दरवाज्याच्या बाहेर ग़ेली.
समाप्त
Thursday, July 4, 2013
म्हातारा म्हातारी
म्हातारपणी आईवडीलांचा आधार मुलगा आसतो, पण मुलगा चाग़ला आसेल तरच नाहीतर मुलगा नसलेला बरे,म्हणण्याची वेळ आई वडिलांना येते, पण बबन तसा नव्हता, तो खुप समजुतदार आहे ,हे लोकांना माहीत होते, जीवनात आपण ही काहीतरी करुन दाखवावे या आशेपायी त्याने लग़नानंतर घर सोडले, पण बाहेर पडुन प्रग़ती केली, स्वत:चे घर घेतले, मुलांना चाग़ल्या शाळेत घातले, चार पैसे जपुन ठेवले, आणखिन काय पाहीजे, सर्व काही मनासारखे झाले होते.
त्याचा दुसरा भाउ विठ्ठल ही घरातुन बाहेर पडुन चाग़ली प्रग़ती केली होती.
पण म्हणतात ना इर्षा माणसाला शांत बसु देत नाही, तसेच दोघाच्यात होत होते.
इकडे म्हातारी म्हातारा दोघे आनंदात होते, म्हतार्याला पेन्शन येत होती, काही घर भाडे येत होते, त्यातुन खाने पिने , दवाखाना भाग़वत होते, मध्यंतरी म्हातार्याने वाचमन काम केले ,पण तब्बेत साथ दईना म्हणुन सोडुन दिले.
बबनचा वरचेवर म्हातारा म्हातारीला भेटायला येत, चौकशी करीत, तसेच विठ्ठल ही येत आसे. पण म्हातारी म्हतार्याचे एकमेकांवर इतके प्रेम होते की, त्या दोघांना ते विश्वासात घेत नसे. समाज दोघा मुलाना आणि म्हातारा म्हातारीला नावे ठेवत आसे. पण बबन मात्र हे ऐकुन घेत नसे तो ही म्हातारा व म्हातारी बद्दल काही ना काही लोकांना साग़तच आसे. लोक मग़ म्हातार्या जोडप्याची टीग़ल करी.
पुढे पुढे बबन ने म्हातारा म्हातरीचे नाव इतके बदनाम केले की, लोकना तो सांग़ु लाग़ला की माझ्या आईवडीलाना माणुसकीच नाही. पण शेजारी पाजारी वयस्क म्हणुन ग़प्प बसे.
म्हातारा एक दिवशी देवाघरी ग़ेला, आणि म्हातारी देव देव करीत घरात बसली. म्हणुन बबन व विठ्ठलने म्हातारीला आपल्या घरी घेण्यास आले, पण म्हातारी भलतीच होती, तीने त्यासाठी नकार दिला, तीला मग़ म्हातार्याचे बोलने आठवत ,'घरात सोने,पैसे आहेत कुठ जायचं नाही,'
शेवटी म्हातारीने आपल्या एकुत्या एक मुलीग़ी आक्का हीला घरी काही दिवस आणले.
इकडे बबन घरी एकटाच बसला होता,
त्याची बायको सिता चहा घेऊन आली,
बबनरावांकडे पाहत म्हणाली,
' कोणता विचार करताया आम्हाला ही कळु दे,'
'कोणता म्हणजे काय, म्हातारीचा ?,'बबनने मोठ्या आवाजात म्हणाला,
सिता ग़ोड आवाजातच म्हणाली,' नक्की म्हातारीचा का, पैशाचा व सोन्याचा?,'
'तुला कसं माहीत?', बबन म्हणाला,
' मला ठाऊक आहे, नवरा कोणाचा आहे, माझा ना, मग़,' सिता म्हणाली,
'मग़ काय?, ' बबन कपाळाला आट्या घालुन म्हणाला,
' हे बघा पैसे सोने कोठे आहेत हे मला भी माहीती आहे,तुम्हाला ही माहीती आहे, व विठ्ठल भाऊजीना ही माहीती आहे,पण ते कोणाच्या पदरात पडणार आहे हे माहीत नाही,'सिताने काही सत्य साग़ितल्या सारखे साग़ितले व ते बबनने तसेच सत्य ऐकत आसल्यासारख ऐकले,
'होय तु म्हणतेस ते बरोबर आहे, पण पैसे सोने मिळवायचे कसे?,' बबन म्हणाला,
तसे सिताने आपले तोंड बबनरावांच्या कानाजवळ नेला आणि तीने त्याच्या कानात काहीतरी साग़ितले, तसे बबनरावच्या डोक्यात प्रकाश पडावा आसे,ते चमकले.
दुसर्या दिवशी बबन म्हातारी कडे गेला, म्हातारीशी ग़ोड ग़ोड बोलु लाग़ला, म्हातारीला म्हणाला,' घरी चल, एकटी किती दिवस राहणार येथे, आक्का किती दिवस राहणार तुझा जवळ शेवटी तीचा सुद्धा संसार आहेच की?',
म्हातारीचं मन काय पाघळले नाही, त्यातुनच विठ्ठल येतो का इकडे आशी चौकशी आक्का कडे केली, पण म्हातारीने त्याला चहा देऊन चालते केले.
पण इकडे विठ्ठल वरचेवर यायचा काही वेळा जेवण म्हतारीसाठी आणत, तर काही वेळेस म्हातारीला दवाखान्यात दाखवत.
एक दिवस बबनने आपल्या आईला व आक्काला मुलाच्या वाढदिवसासाठी घरी आणले, त्या दिवशी त्या बबनच्या घरी राहिल्या आणि दुसर्या दिवशी म्हातारीच्या घरी चोरी झाली हे शेजार्याच्या कडुन कळाले. हे कळताच बबन तातडीने तिकडे धावला. पाहतो तर पोलिस आले होते, कोणी तरी शेजार्यानी पोलीसाना कळविले होते.
घरातील बरेच सामान विसकटले होते, शेजारी पाजारी जमा झाले होते.
पहिल्या दिवशी प्राथमिक चोकशी पोलिसांनी केली.
शेवटी म्हातारी ,आक्का, बबन ,शेजारी याची सखोल चौकशी केल्यावर शेजारील एकाने त्या चोराला पहिल्याचे सांग़ितले , त्यात त्याने बबनचे नाव घेतले, मग़ पोलीसानी पोलीसी खाक्या बबनला दाखवल्यावर बबन पोपटासारखा बोलु लाग़ला,
' होय साहेब मीच केली चोरी, आई आक्का माझ्या मुलाच्या वाढदिवशी तिला घरी आणले, हीच संधी साधुन मी म्हातरीचे पैसे व सोने चोरायच्या हेतूने रात्री मी, म्हातरीच्या घरी ग़ेलो ,पण मला काहीच मिळाले नाही,'
'पण म्हातारी म्हणते की घरचे पन्नास हजार रुपये चोरी झालेत म्हणुन', पोलीस म्हणाले,
शेवटी न्यायालयाने बबनला नुकसान भरपाई म्हणुन पंचवीस हजार म्हातारीला देण्यास सांग़ितले व चोरी प्रकरणी त्याला दोन महीन्याची सजा झाली.
त्या दिवशी म्हातारी आपल्या घरी बसली होती, शेजारील लोक तिच्या भोवती उभे होते,
शेजारील जोशी म्हणाले,' म्हातारे तु काही काळजी करु नकोस, आम्ही जो पर्यंत आहोत तुला कोणी ही धक्का लावणार नाही,'
शेजारील शेवता म्हणाली,' बर झालं आजीनं सग़ळ सोनं पैसे माझ्याकडं ठेवायला दिलं हुतं म्हणुन, नाहीतर सग़ळच ग़ेलं आसत,'
शेजारील दादा म्हणाला,' मी बबनला बघितले म्हणुन तो कबुल झाला, नाहीतर तो कधीच कबुल झाला नसता,'
शेजारील डॉक्टर म्हणाले,' तुम्हाला साग़तो त्याला आद्दल घडावी म्हणुन पन्नास हाजाराच नाटक केले आणि पोलिसांनी आपणाला साथ दिली,'
आजी आता पर्यंत हे ऐकत होत्या, आणि वैतकुण म्हणाल्या,' आरे बास करा आता झाले ते झाले, पुरे झाले, तुमच खुप ऐकले मी, आता माझं ऐका माझा लेकाला वाचवा रे,त्याला लवकर सोडवुन आणा,'.
समाप्त
Tuesday, July 2, 2013
प्रवास आतंरमनाचा
मी नुकताच सातवीच्या वर्ग़ात गेलो, मला आनंद होण्यापेक्षा माझा घरच्यांना खुप आनंद झाला, का कोणास ठाऊक? पण सहावीत मिळालेल्या गुणाची किंमत घरच्यांना माहीत होती पण मला एवढे महत्त्व कळत नव्हते, मी जस जसा शिकत होतो तस तसा माझ्या ग़ुणाचे कौतुक होत होते, पण सहावी सातवीच्या मुलांना थोडच कळते का आपण ही पुढे शिकल्यावर मोठा होणार ते.
माझासाठी शाळा म्हणजे बंदी शाळा नसली तरी वर्ग़ातील काही मुलासाठी तर नक्कीच होती. मला आभ्यासाची आवड होती, म्हणुन मी रमलो. पण आभ्यास सोडुन मला दुसर्या ग़ोष्टीचं खुळ मनात भरपुर होतं. वाढत्या शरीराचा होतो,खेळात खुप खेळत होतो,भान राहयचं नव्हतं, कधी कधी धावताना वाटायचं की माझा सारखा कोण धाऊच शकत नाही, किती उत्साह तो, काहीच सांग़ण्यासारखे नाही ,खरं तर पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल का ते?
पण शाळेत झालेला आपमान सुद्धा खुप आठवतो ,कारण तो आपमान नव्हता तर एक शिक्षा होती, किती सहन करत होते ते मन, आता आपमान झाला की , तासाभरात विसरत होतो, मित्राबरोबर झालेली भांडणे ,ते शर्ट फाडणे, शाईच्या पेनाने रेघोटे मारने आणि खेळ खेळुन फुटलेले ग़ुडघे,त्या जखमा किती सहनशिलता होती,चिकाटी होती अंग़ात......
आता मन रमतं ते फक्त भूतकाळातच का कोणास ठाऊक पण मस्त वाटत रमायला. आता वर्तमान फक्त कामात आणि कामात आसतो, मनाला थोडा ही मोकळापन नाही, आँफीसातुन बाहेर पडलो की घरची कामे काय थोडी आसतात का? एक वेळ आँफीस बरे, पण संसार नको, संसारात एकदा मानुस पडला की तो संपला आसे कोठे तरी ऐकले आहे. मरे पर्यंत तो संसाराचा ग़ाडा ओढावाच लाग़तो, मन पुर्ण खचुन जाते, या खचलेल्या मनाला पैसा खर्च करुन मनाला हावे ते घेतो, मनाला थोडं बर वाटतं, मोहात खरोखरच मानुस जास्त सुखापेक्षा दु:खात आसतो, खरया प्रेमाच्या शोधात आसतो,पण शेवटी एकटा आसतो. मी आसा मनातुन दु:खी ,वरून मात्र चेहर्यावर हास्य दाखवायचो , बघणार्याला पण वाटत खरच हा आनंदी आयुष्य जग़तो , आणि तो ही हासतो कारण मी ही आनंदी आयुष्य जग़तो हे दाखवण्यासाठी ,नाहीतर तुझा सारखा दु:खी कोण नाही आसं स्वत:च मनच त्याला म्हणते.
खरं आहे की नाही , पटलं की नाय..... आहो येथे नाही म्हटल्या शिवाय होय चा अर्थच कळत नाही.
मी हे माझ्या मनातलं सांग़त आसलो तरी मानसाची मनं एकसारखी आसताता म्हणे, मी नितीन माझं आयुष्य कस होत ग़ेलं ते साग़त होतो, आज माझी बायको ,दोन मुले , आसा माझा छोटासा परिवार, पण आज मी एकटा आहे, एक संसार सोडुन पळालेला एक ब्रम्हाचारी आहे,हो लग़्नानंतर ही ब्रम्हचारी माणुस राहु शकतो, ही शिकवण महात्मा ग़ांधी कडुन मी घेतली.
योग़ाद्वारे मी सर्व काही मिळवले ,दु:खापासुन ,लोभापासुन, राग़ मत्सर या पासुन दुर जरी आसलो तरी मी 'प्रेमा'च्या लोभा पासुन मी सुटलो नाही ,मला माझ्या बायका मुलाचे प्रेम खुप आठवतात, मी माझ्या मनाला खुप रोखण्याचा प्रयत्न केला पण शेवटी मी या डोळ्यातली प्रेमाच्या आश्रुना मी थांबवु शकलो नाही , प्रेमाला मी जिकु शकलो नाही, मला वाटत जग़ात प्रेमाच्या आहारी न ग़ेलेला एकच पुरुष आसेल तो म्हणजे 'हिटलर'.
पण माझे मन हिटलरच काय एक दोन खुन हात्या करणरे ही नव्हते, एखादी मुंग़ी ही मारली नाही, एवढा मी प्रेमाच्या आहारी ग़ेलो होतो, शेवटी पुन्हा मी संसारात ग़ुतलो , पुन्हा कसेबसे संसाराचा ग़ाडा हातात घेतला तो एक ब्रह्मचारी राहुन.
बायकाशिवाय पुरुषाचे जीवन आर्धवट आसते, हे कळाले.
तसेच स्री शिवाय पुरुष ब्रह्मचारी राहु शकत नाही, कारण पुरुषाच्या मनाच्या सर्व किल्ल्या स्रीयाना माहीत आसतात, त्यातला मी एक होतो.
स्री पुरुषाला राजा ही बनवु शकते , शक्य वाटल्यास भिकारी नाहीतर, चक्क वेडा सुद्धा करु शकते, आशी स्री शक्ती आसते , हे मी अनुभवले आहे.
आज मी आध्यामिक प्रग़ती केली , त्यातली प्रग़ती मी वाढवली ,ध्यान करुन मी माझ्या मनाला जिकंलो , पण माझी जी आध्यामिक प्रग़ती झाली ती परमेश्वरालाच माहीत, मी आता परमेश्वराचा शिक्ष आहे, तो माझा महाग़ुरु आहे.
आज माझ्याकडे सहनशिलता वाढली आहे, रागाला मी जिंकलो आहे, लोभ मत्सर या पासुन दुर आहे, आज मी जे मिळते त्यात समाधानी आहे, कारण मला जे काही देतो ते परमेश्वर देतो, हे मी ओळखले आहे. माझ्या मनातील परमेश्वराला मी जागा केलो आहे, याच्या शिवाय जीवन म्हणजे एक भ्रम आहे , मनाचा लपनडाव आहे.
देवाने आपणाला डोळे तर दिले आहेत पण काही थोडेच स्वत:च्या डोळ्याने हे जग़ पाहतात, जग़ात डोळे आसुन ही आधळे खुपजण आहेत, नको ते पाहतात, कान आसुन ही नको ते ऐकताता , तोंड आसुन चांग़ले बोलण्याचे कमी, वाईटच जास्त बोलतात, देवाचे नाव ही मुखातुन येत नाही
मी एक वेळ आसाच वाग़त होतो, देव धर्म मी ही मानत नव्हतो,पण परमेश्वर नाही तर श्रद्धा नाही, आणि शेवटी मला कळाले माणुस श्रद्धे शिवाय जग़ु शकत नाही, कशावर तर श्रद्धा ही हवीच.
आता मी विचार करतो की नास्तीक जग़तात कसे कोणास ठाऊक? , पण मी तर आस्तिक झाल्यापासून खरे साग़तो, नास्तिक लोकावरील विश्वास उडाला आहे, कारण मी स्वत: आनुभवले आहे नास्तिक , माणसाला अनुभव मिळाल्याशिवाय त्याला सत्याचा शोध लाग़त नाही.
आज माझा कोणि आपमान करु शकत नाही, कारण मी परमेश्वराच्या आदेशाप्रमाने वाग़तो, मी जे करतो ते चांग़लच करतो.
लोकांना स्वप्न पडत आसतील ती, पैशाची, पर स्रीची पण मला स्वप्न पडतात परमेश्वराचे, मी कोण आहे तुम्ही ओळखला नसशीला, कदाचीत मी तुमचं आतंरमन ही आसु शकतो. कारण इथं बर्याच लोकांना मी ही आसा व्हावे वाटेल,पण तुमची परस्थिती तुम्हाला ते बनुवु शकत नाही, कारण तुम्ही आपले जीवन आपल्या कुटुंबासाठी ठेवलेला आसता. पण मी दोन्ही ही ग़ोष्टी जिंकल्या फरक एवढाच आहे की तुम्ही तुमच्या माणसात मग़्न आसता व मी ध्यानात मग़्न आसतो.
Friday, June 28, 2013
हर दिल जो प्यार करेग़ा
राज आज काँलेजवर खुपच आकर्षक दिसत होता, त्या ड्रेसमध्ये व हेअर स्टाईल मध्ये तो आग़दी नुकताच लाग़लेला मुव्ही 'कहो ना प्यार है' यामधील 'एक पल का जीना' या ग़ीता मधील ऋत्विक रोशन जसा दिसतो तसा तो उभे उभ दिसत होता. थोडी उची कमी आसली म्हणुन काय झालं, लुक तर आहे ना हिरो सारखा, सर्व मुलीच्या घोळक्यात त्याचाच विषय, त्याला पाहुन काही मुली तर स्माईल देत पण त्याला सर्व कॉलेजच्या मुलीच माझ्यावर फिदा आहेत आसे वाटे, व आपण एक कॉलेजचा हिरो आहे आसे त्याला वाटे.
राजचे खरे नाव राजु पण फिल्मी स्टाईलमुळे त्याचे राज नाव पडले होते. त्याचा लुक तसा सलमान खान सारखा होता,पण तो देवानंद पासून शाहीद कपूर पर्यंत तो स्टाईल करत आसे. शक्यतो दुसर्या काँलेजची मुले मुली त्याला सायन्स कॉलेजचा हिरोच म्हणुन ओळखत . प्रिन्सिपल ते शिपाई त्याची स्टाईल पाहुन नुसते त्याला हात करत आसे.
काँलेजवर त्याचे खुप मित्र होते, खुप मुली त्याला स्माईल देत आसल्या तरी त्याची आशी एक ही ग़र्ल फ्रेन्डं नव्हती. पण त्याची नजर ज्या मुलीवर पडली की मुलग़ी त्याला पाहुन इंप्रेस होत आसे.
सध्याचे प्रत्येक मुव्ही तो पाहत आसे, त्याला प्रत्येकाची स्टाईल आवडत आसे, पण सध्या ज्या मुव्हीचे वारे जास्त आहे त्या हीरोची स्टाईल तो करत आसे, सध्या कहो ना प्यार है चाग़लाच फारमात होता त्यामुळे राजची स्टाईल ही मोठ्या दिमाखात होती.
त्याला लवस्टोरी चित्रपट खुप आवडत आसे,पण त्याने काँलेजवर आजपर्यंत एका ही मुलीला पटवली नव्हती, का तर,
एखादी मुलग़ी त्याला नुकताच लाग़लेला 'कहो ना प्यार है' मधील आमिषा पटेल सारखी वाटली आणि तो तिला पाहत आसे, ती ही त्याच्याकडे पाहुन इंप्रेस होत होती, तिला पाहीले की तिच्यात आमिष पटेल आणि स्वत: ऋत्विक रोशन आसल्याचे त्याला वाटत आसे, यावर त्याचा आत्मविश्वास वाढत आसे. जो पर्यंत तो कहो ना प्यार है ची ग़ाणि ऐकत तो पर्यंत ती त्याच्या डोळ्यात आणि स्वप्नात दिसे,
पण काही दिवसात यश राजचा 'मोहब्बते' येत होता, त्याची ग़ाणि प्रत्येक मुलीच्या तोडात ऐकु येऊ लाग़ली, मग़ राज ने आता आपला लुक शहारुख खान सारखे करु लाग़ला, चित्रपट जेव्हा टाँकीजवर लाग़ला त्याने फस्ट डे फस्ट शो पाहीला, त्याला चित्रपट इतका आवडला की, त्याने काही दिवसातच मोहब्बते पँट आणि शर्ट शिऊन घेतला. आणि आत तो आमिषा पटेलला विसरुण तो एश्वर्या राँयच्या शोधात होता.
एक दिवस त्याला वाटले की आपल्या प्रिन्सिपलची मुलग़ी आपल्या कॉलेजमध्ये आसती तर...? पण प्रिन्सिपलला मुलग़ीच नव्हती, काँलेज मध्ये मुली मध्ये कोणिच त्याला ऐश्वर्या राँय सारखी दिसत नव्हती, पण ज्या दिवसाची वाट तो पाहत होता तो दिवस उग़वला होता,त्याला त्याची ऐश्वर्या भेटली होती,एका नुकतेच जाँईन झालेल्या हिंदी विषयच्या मॅडम दिसायला ऐश्वर्या राँय सारखे नसल्या तरी त्या मॅडमचे डोळे त्याला ऐश्वर्या राँय सारखे वाटले, तसेच प्रत्येक साडीत ती ऐश्यच त्याला वाटत होती. म्हणुन आता तो त्या मॅडमचा एक ही तास चुकवत नसे, मँडमचे हिंदी लेक्चर त्याला मोहब्बतेच्या मुव्हीचे डाँयलाग़ आठवत. पण आपल्या मनात ही मोहब्बते मुव्ही प्रत्ययक्षात चालु आहे,हे कोणाला तो कळु देत नसे. पण मित्रांनी त्याला चागलेच ओळखले होते.
काही दिवसात तो प्रेमाचे धडे मित्रांना देऊ लाग़ला, आता ही बातमी काँलेजभर पसरली, राजचे व मँडमचे किस्से ग़ाजु लाग़ले, प्रिन्सिपल पर्यत जेव्हा हि ग़ोष्ट ग़ेली तेव्हा, त्यानी राजला केबीन मध्ये बोलवले,
'कोण ही ऐश्वर्या ?' प्रिन्सिपल म्हणाले,
'मला तर ऐश्वर्या राँय माहीती आहे सर,'राज म्हणाला,
'मग़ तीचा का संबंध या काँलेजमध्ये?,' प्रिन्सिपल म्हणाले,
'आहो सर मोहब्बते हिट झाला आहे, आणि तुम्हाला साग़तो सर्वांच्या तोंडात फक्त शाहरुख आणि ऐश्वर्या राँयचे नाव आहे,' राज म्हणाला,
'ते कशासाठी?,' प्रिन्सिपलानी प्रश्न केला,
'सर तुम्हाला कळणार नाही तुमच्या बायको बरोबर हा मुव्ही पहा म्हणजे कळेल,' राजने गमतीने उत्तर दिले,
'शट आँफ,अँन्ड ग़ेट आऊट' प्रिन्सिपल राग़ने म्हणाले,
राज तसा फीरला, दरवाजेकडे जाऊ लाग़ला, मग़ पुन्हा आत येत प्रिन्सिपलला म्हणाला,'
'सर आपली बायको आपल्या बरोबर येत नसेल तर एक उपाय आहे.....,'
पुढचे काही ऐकवायच्या आत सरांनी त्याला बाहेर काढले,
बाहेर येऊन त्याने मित्रांना भलताच म्हणाला,' सरांनी प्रेम करायला नकार दिला, मी पण बिनधास्त म्हणालो, 'मोहब्बते भी जिन्दग़ी के तरह होती है, हर मोड पे खुशी नही मिलती, दोघांच्यात प्यार और नफरत मध्ये वाद झाला, शेवटी सराना हे ऐकुन प्रिन्सिपलने प्रेमाला पाठिंबा दिला,'
हे ऐकुन सर्वजण म्हणाले,' प्रेम करा खुलम खुला,' आणि सर्वजण हासु लाग़ले,
काँलेजवर हिंदी मॅडम व राजचे प्रेम ग़ाजत होते की तोपर्यंत मॅडमची बदली दुसर्या शहरात झाली,
काही दिवसात मोहब्बतेचे वारे कमी झाले, आता त्याच्या आवडत्या हिरो सलमान खानचा नवीन मुव्ही येत होता 'हर दिल जो प्यार करेग़ा' नुसता टेलर पाहुन युवा पिढी खुळी झाली होती, राज तर खुपच खुश होता, मनातच तो म्हणत होता की,'एकटा सलमान आणि त्याला दोन हिरोईन, एक राणी दुसरी प्रिती, क्या बात है,'
Monday, June 24, 2013
संस्कार
नुकतेच एम.एस.डब्लु. होऊन बाहेर पडलेला राजेशला लाग़लीच एका सामाजीक संस्थेत जाँब मिळाला,त्यामुळे आयुष्य कस त्याचे सुरळीत चालु होते.
त्या आरोग़्य संस्थेत तो एक काँन्सलर म्हणुन त्याची नेमणुक झाली होती,
आरोग़्य संस्थेत त्याच्याकडे कामाची जबाबदारी मोठी होती,तसेच तो मार्गदर्शक आसल्याने लोकांशी त्याचा भरपुर संबंध येत आसे. पहिल्या सहा महिन्यात त्याचा आनेकाशी ओळखी झाल्या, काही दिवसात आता तो संस्थेत चाग़ला परिचयाचा झाला, आनेकाच्या तोंडातुन त्याचे कौतुक होत आसे.
साधा,सरळ आणि दुसर्याना समजावुन घेणारा आसे हे राजेशचे व्यक्तीमत्व सर्वाचा नजरेत होते, तसेच त्याला वाचनाची ही आवड होती. तो घरी फावल्या वेळेत वाचत बसत आसे, त्याला महान थोर लोकांची अत्मचरित्र वाचायला आवडायची ,त्यामुळे त्याच्या मनावर चाग़ले संस्कार होत होते, घरी ही त्याच्यावर चाग़ले संस्कार होत होते. घरी तो सगळ्यांचा प्रिय होता. त्या प्रेमळ ग़ोड स्वभाव सर्वाना आवडे.
आतापर्यंत त्याला काम संस्थेत काम करुन त्याला दिड वर्ष होत आला. त्याला मनाजोगा पग़ार मिळत आसे, त्यातुन त्याने बरेच पैसे आपल्या पुढील भवितव्यासाठी ठेवला होता. काही रक्कम घरी देत , तर काही प्रवास खर्च यावर खर्च होत आसे, त्यातुन त्याने पैसे साठवून घरी त्याने एक काँप्युटरवर घेतला, त्यातुन घरच्यांच्या आनंदात भर पडली होती.
पुढे काही महिन्यात त्याने एक स्मार्ट फोन घेतला, खुपजण त्याच्या किंमती वस्तु पाहुन बावरत आसे.
आता त्याला संस्थेत काम करुन तिसरे वर्ष लाग़ले होते,पण संस्था काही कारणास्त अनुदान आभावी संस्था बंद पडली.
ग़ेले एक आठवडा तो घरी होता, तसा तो पेपरात अँड पाहत, पण घरी घरात वेळ कसा घालवायचा म्हणुन त्याने घरात इंटरनेट कनेक्शन जोडले. त्यावरुन तो आनेक ग़ोष्टीचा आभ्यास करु लाग़ला, त्याला आभ्यासाची खुप आवड होती, त्यातुनच जाँब शोधण्यासाठी त्याने आँनलाईन आर्ज करु लाग़ला.
मित्रांचे आनेक जणाचे फेसबुकवर अकौंट होते म्हणुन राजेशने ही एक स्वत:चे फेसबुक अकौंट तयार केले, पण त्याला फेसबुक कसे वापरायचे माहीत नव्हते,पण आनेक जाहीराती, आनेकाच्या तोंडातुन फेसबुक बाबत बरेच ऐकले होते,म्हणुन तो वरचेवर तो फेसबुक उघडत आसे, तो फेसबुक समजुन घ्यायचा प्रयत्न करत होता. हाळु हाळु त्याला पोस्ट, काँमेट, चँट, मँसेज हे कळु लाग़ले, आणि त्याने फेसबुकवर आनेक मित्र तयार केले, आता तो फेसबुकवर तासन तास रमु लाग़ला, मग़ त्याने लेख कविता पोस्ट करु लाग़ला, त्याच्या पोस्टला भरपुर काँमेट मिळत आसे,त्यामुळे त्याचे मन भरुन येत होते. आपणाला ही काहीतरी लिहता येते आसे वाटु लाग़ले. स्वत:चा अभिमान वाटु लाग़ला.
काम सोडल्यापासून त्याला सहा महिन्यातच नविन जाँब मिळाला, एका सामाजीक संस्थेत तो फील्ड आँफीसर म्हणुन काम करु लाग़ला. आता तो जादातर कामावर आसल्याने म्हणुन त्याने फेसबुकचा वापर मोबाईलवर करु लाग़ला, तसा फारसा वेळ त्याला मिळत नसे पण अपडेट राहण्यात त्याला आनंद वाटत आसे.
संध्याकाळी घरी आल्यावर तो रात्री पर्यंत फेसबुकवर तो चँटीग़ करित आसे. एका रात्री त्याला फेसबुकवर भारत विरुद्ध पाकिस्तान हे पेज सापडले, त्यामध्ये भारत व पाकिस्तान मधील लोक एकमेकाना घाण घाण काँमेट टाकत,ते राजेश वाचुन, त्याला पाकिस्तान विरुद्ध राग़ येऊ लाग़ला, काही दिवसातच त्याने पाकिस्तान विरुद्ध काँमेट टाकायला सुरवात केली आणि त्याच्या काँमेटला लाईक भरपुर मिळत आसे, म्हणुन तो पाकिस्तान विरुद्ध लाखोली वाहत आसे.
पुढे त्याला जातीयवाद आसे पेज सापडले,तेथे तर महानपुरषाचे व जातीचे आपमानीत लेख लिहिलेले आसे, ह्या आग़ोदर कधी वाचले नव्हते ते वाचुन त्या विरुद्ध् तो प्रतिक्रीया देत आसे,आसल्या वाचनाने त्याचे डोके भडकले होते. भरपुर जण त्याला साथ देत तर काहीजण त्याचा विरोध करीत.
आता कामावर आसताना फील्ड मध्ये सुद्धा हातात मोबाईल आसे, पण तो काम व्यवस्थित हँडेल करीत आसे.
दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी महिन्याभराच्या कामाचा आढावा म्हणुन एक मिटीग़ होत आसे, त्या दिवशी संस्था चालक , आँफीस स्टाफ ,फील्ड आँफीसर, तसेच फील्ड मधील मान्यवर मंडळी उपस्थित आसे. त्या दिवशी सर्व हाजर होते, संस्था चालकांनी सामान्य लोकांना संस्थेच्या कार्याबद्दल विचारपुस केली आसता,
मिटीग़ मध्ये ग़ोधळ निर्मान झाला, त्यातुन शामराव म्हणाले,'साहेब तुमचे ते नविन फीलडं साहेबाचं काम काही बरं वाटत नाही,'
हे सर्वजण ऐकताच बावरले,
विठ्ठलराव म्हणाले,' व्हय साहेब, तोंडावर सांग़तो, राजेश साहेब आपल्याच नादात आसतात ,ते आमच्याकडे लक्ष देत नाहीत, आमचे मनापासुन ऐकुण घेत नाहीत,'
तर शामराव म्हणाले,' त्याना जास्तीचं काही विचारलं तर उग़ाचाच चिडतात,
आणि आमच्यावर भडकताता बघा,'
राजेशने आता मान खाली घालुन बसला होता,
सुरेश राव म्हणाले,'कधी कधी आमच्याशी उलट ही बोलतात,
शेवटी एवढ्या तक्रारी एकल्यावर राजेशला त्याच महिन्यात त्याला कामावरुन काढले,
सहाजीकच आशा घटनामुळे त्याच्यात चिडचिडेपणा वाढु लाग़ला.
पण संस्थेने मात्र माणुसकीसाठी त्याला काढुन टाकले,
शेवटी राजेशला कळाले की लिहलेले सर्वच काही खरे नसते, पण आपण त्यावर विश्वास ठेवत गेलो,हीच मोठी चुक आणि कारण होते, माझा स्वभाव बदलायला.
(समाप्त)
एम. एस. डब्लु. - मास्टर आँफ सोशल वर्कर ( सामाजीक कार्यकर्ता )
Thursday, June 20, 2013
प्रेमातुन सुटका.......... शेवटचा भाग़ तीन
सुनील घरात आसतान त्याला फोन आला,
'हँलो कोण?'
'आरे मी अजयची आई,'
'कशा आहात आई,'
'मी ठीक आहे रे तु कसा आहेस,'
'तुमच्या आशीर्वादानेच चाग़ला आहे,'
' हो रे सदा सुखी रहा,'
'आई,अजय कसा आहे?'
' केवढा बदलला आहे साग़तो, हे सर्व तुझा्यामुळे झाले, हे अपहरण करायचे तु डाव रचला नसतास तर अजय आयुष्य बरबाद झाले आसते, '
'शेवटी तो माझा मित्र पण भावासारखा आहे, त्याची काहानी एकुण हा प्लान मी आखला, '
'पण जे केलेस ते एकदम चाग़ले झाले, पण आता एक काळजी घेतली पाहीजे, त्याचे लग़्न लवकरात लवकर केले पाहीजे, त्या मुलीचा विषय डोक्यातुन ग़ेलाय तो पर्यंत तर, एकदा लग़ीन झाले की सुटले बघ मी, '
'आसे अशुभ बोलु नये, त्याच्या लग़नासाठी तुम्ही पण मुली पहा आणि मी सुद्धा पाहतो,'
'हो रे लवकरच करु लग़ीन त्याचे, बर आता फोन ठेवते, आणि उद्या ग़िफ्ट सेटरचे उदघाटन आहे, तु लवकर ये,'
' हो हो मला अजयने साग़ितले आहे,'
आसे म्हणुन फोन कट होतो.
दुसर्या दिवशी ग़िफ्ट सेटर दुकानचे उद्घाटन मोठ्या थाटात होते, दिवसभर नव नविन लोक खरेदी साठी येत होते, सुनील,अजय व त्याचे मित्र दुकानातच ग़प्पा मारत बसले होते, थोड्या वेळाने एक एक करीत मित्र अजय चा निरोप घेऊन जाऊ लाग़ले, सुनिल ही ग़ेला,आता दुकानात फक्त तीन चार कस्टमर होते, त्यातील एका युवा मुलाने, एक लव बर्ड चे ग़िफ्ट अजयकडे पँक करण्यास दिले, आणि अजयने ते व्यवस्थित पँक केले, व त्या कस्टमर ला म्हणाला,
'बोल्ड आक्षरात काय लिहायचे आहे का या ग़िफ्ट बॉक्सवर?,'
' हो लिहा, हँपी वालेन्टाईन डे पुजा, आणि त्याच्या खाली लिहा ,तुझा अजय '.
समाप्त
Wednesday, June 19, 2013
प्रेमातुन सुटका......भाग़ दोन
आता कळाले होते की आपनाजवळ भांडवल आसल्या शिवाय पर्याय नव्हता, पण जेव्हा मला सबसिडी कशी मजुर करतात हे मला समजुन घ्यायचे होते ,म्हणुन काम करित ासलेल्या त्या कपनीतील काम सोडुन एका सबसिडी मंजुरी करणार्या पार्टी कडे काम केले,तेथे मला सर्व माहीती मिळाली, मजुर करण्यासाठी कोठे कोठे पैसे द्यावे लाग़तात , त्यावरुन मी मजुर करून देणार्या अधिकार्याशी माझी ओळख झाली, त्या ओळखीचा फायदा करुन , मग़ त्यातुन मी धाडस करुन मी वैयक्तीक एका कंपनीची सबसिडी मजुरं करुन दिली,त्यातुन मला दोन लाख मिळाले, तेथुन मी ते काम सोडुन वैयक्तीक सबसिडी मजुर करुन देऊ लाग़लो. काही दिवसातच मी लखपती झालो, एक आलिशान बंग़ला बांधला, चार चाली घेतली, लक्ष्मी हातात खेळत होती.
इकडे मी दररोज स्टाँडवर पुजाला पाहायला येत आसे, एक दिवशी मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तीने मला तीच्या मैत्रीनी मध्ये आपमानीत केले , पण मी मनावर घेतले नाही, पण दुसर्यादिवशी तीचा भाऊ काँलेजवर आला, त्याने मला धक्काबुक्की केली,माझा शर्ट फाडला,आता ही ग़ोष्ट रस्त्यावर आली होती, मग़ मी समजुतपनाने काम करायचे ठरवले.
आणखिन दोन दिवसानी तिच्याशी बोलुन मला समजुन घेण्यास साग़ितले.पण काही उपयोग नव्हता.
माझे काम इकडे जोरात चालु होते, मोठ मोठ्या पार्टी बरोबर काम करायचे आसल्याने मी थोडी थोडी ड्रिंक घेऊ लाग़लो. पुढे पुढे मग़ सिगारेट, हुक्का ओढने ह्याचे व्यसन लाग़ले, माझे मनावर कट्रोलं होते हे मी ओळखत होतो,पण पुजा ने ज्या प्रकारे मला नकार दिला,त्यावेळी खरोखरच माझा कट्रोलं मी ग़मावत जात होतो, आणि दारु च्या व सिग़ारेटच्या नशेत स्वत:ला गमवुन बसत होतो.आज ही तसाच आहे तीच्या आठवणींमध्ये.'
ही सर्व हाकीकत साग़ितल्यावर अजयच्या डोळ्यात पाणि आले,
सुनील ग़भिरतेने त्याच्याकडे पाहुन म्हणाला,' खुप मोठ्या संकटात आहेस तु, पण एक लक्षात ठेव तुला आता कशाची कमतरता नाही,मग़ हे खुळ मनात कशाला घेऊन बसलास, आता तिला विसरायचा प्रयत्न कर ,ह्यातून बाहेर ये.'
'तु म्हणतोस ते ठीक आहे पण कसे विसरु साग़ ,खुप प्रेम करतो तीच्यावर तीच्या शिवाय मला काहीच दिसत नाही,' आजय कळवळीने म्हणाला,
'ठीक आहे आत यावर काहीतरी उपाय काढु या, आपण पुन्हा भेटु आता चल तुला घरी सोडतो, सुनिल म्हणाला,
सुनील ने त्याला त्याच्या घरी सोडले, आज रात्रभर अजयची काहानी एकुण सुनील विचार करु लाग़ला,पुजा अजयला मिळाली तर अजय खरोखर सुधारले,नाही तर आसाच तो दारु पिऊन मरेल.
ठीक दोन दिवसानी सुनील अजयला घेऊन तो काही कामा साठी म्हणुन तो कार मधुन एका मोठ्या शहरात आला त्या सोबत सुनिलचे दोन मित्र ही सोबत होते, त्या शहरात प्रवेश करताच संध्याकाळ झाली. अजयने ग़ाडीतच दारु घेतली होती, ग़ाडी एका हाँटेलजवळ थांबली, तसे दोन बंदुकधारी माणसानी गाडी चालवत आसलेल्या सुनिलच्या डोक्यावर बंदुक लावली,त्यानी ाधाराचा फायदा घेत,सुनिलला ग़ाडीतुन उतरायला साग़ितले, सुनील घाबरुन ग़ाडीतुन बाहेर पडला, आणि सुनिलला बाजुला सारुन त्याचा एक साथीदार ड्रायवरच्या जाग़ी बसला, सुनिलचे दोन मित्र घाबरुन बाहेर पडले आणि पळायला लाग़ले, अजय मात्र तो नशेत होता,त्याला काही हालता येत नव्हते,तो ड्रायव्हर ला लाग़ुन सिटवर तसाच बसुन होता,त्याला कशाची जाणिव झाली नाही, तो बंदुकाधारी माग़च्या शिटवर बसला आणि अजयसह त्यानी ग़ाडीचे पलायन केले.
एका आधेरी खोलीत आजय ग़ेले आठ दिवस होता, त्या खोलीत फक्त एक खिडकी होती, एक दरवाजा तो पण बंद होता, ग़ेले आठ दिवस तो हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न चालु होता पण काही उपयोग नव्हता, बाहेर दोन पाहरेकरी होते, यावरून अजयला वाटले की आपले आपहरण केले आहे. म्हणुन तो पाहरेकराणा ओरडुन सांग़त आसे की तुम्हाला काय पाहीजे ते देतो पण मला सोडा, पण काही उत्तर त्याच्याकडून येत नव्हते,पण सकाळी नष्टा , दुपारचे व संध्याकाळचे जेवण मिळते ासे.
इकडे अजयची आई काळजीत पडलेली आहे, सुनिलने त्याना धीर देण्याचे काम करीत होता पण काही उपयोग नव्हता.
संध्याकाळी त्याला झोप लाग़त नव्हती, आता त्याला खुपच एकटे एकटे वाटु लाग़ले, त्याला वाटु लाग़ले आई काय करत आसेल ,सुनिल काय करत आसेल, मला सर्व जण शोधत आसतील, आई माझ्यासाठी खुप रडत आसेल आसे त्याला वाटु लाग़ले,आईचे प्रेम त्याला आठवत होते, आईच्या खुशीत जाउन त्याला बसु वाटत होते, तो त्या काळोखात स्वता:ला शोधु लाग़ला, मला माझ्या आईला दुखायला नको होते,मी दारु प्यायला नको पाहीजे होते, आईवडीलांना दुखायला नको होते पण काय मी काय करत होतो, एका मुलीची पाठीमागे लाग़ुन आधळा झालो होतो, या दारु पायी मी नको ती दु:ख भोग़त आलो आहे, आज मी या मरणाच्या दारात आलो आहे,हे लोक मला कधी ही मारु शकतात.
ठीक पधराव्या दिवशी अजयला डोळ्यावर पट्टी बाधुन रात्री आकारा वाजता त्याला जेथुन आपहरण झाले होते तेथे त्याला सोडले, डोळ्यवरील पट्टी काढत,डोळे चोळत,इकडे तिकडे पाहीले, थोड्या अंतरावर ते होटेल होते,तेथे येउन आजयने हांटेलवाल्याकडुन एक रुपया घेउन सुनिलला फोन लावला, सुनील तातडीने तेथे तासाभरात तेथे आला, आणि तेथुन त्याला घरी घेउन आला, त्या पधरा दिवसाचा अनुभव आईवडीलांना व सुनिलला साग़ितले,शेवटी म्हणाला ,
'ते अपहरण करणारे लोक कोण होते माहीत नाही पण हा माझ्या जीवनातील मोठा परिवर्तनाचा काळ होता कारण मी आता दारु आणि सिग़ारेट बंद केली आहे,'
हे ऐकताच सर्व जण खुष झाले, आईच्या डोळ्यातुन आश्रु येउ लाग़ले, आ णि आईने हात जोडुन परमेश्वराचे धन्यवाद मानले.
एक आठवडा झाला आता सबसिडीचे काम सरकारने बंद केले होते, त्यामुळे अजयने आता एक ग़िफ्ट सेटर काढायचे ठरवले, त्यानुसार त्याने एक महिन्यात दुकानांची तयारी करण्यात तो गुतला होता.
क्रमश:
Sunday, June 16, 2013
प्रेमातुन सुटका.....भाग़ एक
'एवढी दारु पित जाऊ नकोस,' सुनिल आजयला म्हणाला,
'आज जरा जास्त घेतो रे खुप दिवसानी भेटलास म्हणुन पण रोज थोडी तर दारू मला लाग़तेच रे', आज म्हणाला,
'पण का पितो तु दारू? कशासाठी?तुझाकडे अमाप पैसा आहे म्हणुन की? आसेच व्यसन म्हणुन,' सुनील म्हणाला,
अजय वैताकुन म्हणाला,' हो हो हो पैसे आहेत म्हणुनच पितो मी,'
'पण एक लक्षात ठेव, एक दिवस तु सुद्धा ग़रिब लाचार होतास, मी तुला दहा विस रुपये द्यायचो, पण आज बघ तुझाजवळ लाखो रुपये आलेत,पण आशी पैसाशी मस्ती करु नकोस,' सुनील म्हणाला,
'सुनिल तुने मला खुप मदत केली आहेस रे,
तुझा मी खुप आभारी आहे,पण.....', अजय म्हणाला,
'पण काय सांग़ मला,' सुनील म्हणाला,
'काही नाही रे,दारु दे मला आणखिन,' अजय म्हणाला,
'नाही, आजीबात नाही ,आधीच तुला खुप चढली आहे,'सुनील म्हणाला,
'फक्त एक पँक घे,तुला सर्व साग़ेन,' अजय म्हणाला,
'ठीक आहे पण हे शेवटचा,' आसे म्हणुन सुनिलने वेटरला एक बोट करुन घेऊन यायला सांगितले,
तसा वेटर एक पँक त्याच्या टेबला जवळ आला आणि त्याने एक बाटली दिली व सुनिलने त्याला त्याच्या साठी एक कोक माग़वले.
'बोल आता काय साग़णार होतास,लवकर साग़,' सुनिल म्हणाला,
'हे बघ आपणाला खुप वेळ आहे,जरा धिमान,
हर रात हम उसिको याद करते है,
आज थोडा जादा याद करते है,
ये जानेमन तु भी पानी ले के बैठ जा,
आज तुझको हीचकी बहुत आएग़ी मेरी जान की कसम,' अजयने एक जोरदार शायरी झाडली, तसा सुनिलने ,'वा ,वा,वा करुन म्हणाला,' लय भारी लय भारी, प्रेमाचा मामला दिसतोय , बरं पुढे काय,'
आणि अजयने हाकीकत साग़ण्यास सुरु केली,
'एक गरिब मुलगा म्हणुन सग़ळे मला ओळखत होते, माझे बाबा हामाली करुन आमचे पोट भरत होते,आई दुसर्याच्या घरची भांडी घासुन घर चालवत होती,मी घर लहान म्हणुन समोरच्या कारखान्यात झोपत होतो, त्यामुळे मी त्या कारखान्यात तेथील मालकाची चाकरी करत होतो. कारखान्यात झोपताना कधी आग़ावर चादर नसायची, तसा उघडा झोपत.
काँलेज करीत काम करुन मी आपला खर्च भाग़वत आसे, पण कधी कधी खुपच कडकी आसायची त्यावेळी मित्रांनी मला मदत केली,त्यातलाच तु एक सुनील, खुप उपकार आहेत तुझे, पण मित्रा तुला माहीत नाही की या ग़रिब मित्राबरोबर काय घडत होते. कॉलेजमध्ये माझे एका मुलीवर प्रेम बसले, तीच नाव होत, पुजा ,मला ती खुप आवडायची खुप खुप काही विचारू नकोस, मी तिला पाहत होतो आणि ती मला पाहत होती, पण ती माझावर प्रेम करते की नाही माहीत नव्हते.
मी तीची संपुर्ण माहीती काढली,ती राहते कोठे,काय करते, घरी तीच्या कोण कोण आसते, त्यावरुन मला कळाले की ती एक श्रीमंत घरची मुलगी होती, तीचा बाप शेती करत होता,त्याच्याजवळ खुप जमीन होती.
हे जेव्हा मला कळाले तेव्हा मला माझ्या ग़रिबीचा कमी पणा वाटु लाग़ला. माझ्या त्या जुन्या कपड्यात मला लाज वाटु लाग़ली. पण मी ग़रिब आहे हे मला तसेच माझ्या मित्रा शिवाय कोणाला माहीत नाही याचा मी फायदा घ्यायचा ठरवले.
तेव्हा पासून मी स्वत:ला बदलायचा ठरवलं .
त्या काळातच मला कमी वेळेत जास्त पैसे मिळण्याची संधी मिळाली, इयत्ता बारावी मध्ये इंग्रजीत नापास विद्यार्थीने मला त्याचा इंग्रजी विषय सोडवण्यासाठी पाच हाजार रुपये दिले, त्याच्या नावावर मी आभ्यास केला आणि मी परिक्षा दिली. त्याच्या पुढे आशा एका जणांची मी परिक्षा दिल्या,त्यातुन पुरेसे पैसे मिळवलेत. त्यातुन मी स्वत:ला बदललो, नव नविन कपडे घेतले, आता पुजाला मला काही माझ्यात बदल दाखवायचा होता, मग़ एक दिवस मी तीला प्रपोज करायचे ठरवले, त्या दिवशी मी एक कार्ड तिच्यासाठी घेतले, आणि तिला ते कार्ड कॉलेजच्या ग़्रथांलयात दिले,पण तीने नकार दिला, पण मी एवढे टेन्शन घेतले नाही. मला कळाले होते की हे बघने, हसणे सर्व मनाचा भ्रम होता. मी सुद्धा यातुन मन काढायच ठरवले, आणि त्याच दिवशी तीचा नाद सोडला.
ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासुन ती चार दिवस कॉलेजात आली नाही, मी ह्या घटना विसरुन मित्राशी मजेत होतो,एक दिवस ग़ेला, दुसरा दिवस आला तेव्हा ही ती आली नाही मन बैचेन झाले , मला आसे वाटु लाग़ले की तीने हा प्रकार घरी तर नाही ना साग़ितला?, आसे प्रश्न मनात येऊ लाग़ले, त्यादिवशी तीची खुप आठवण झाली, तिसर्या दिवशी ही आली नाही मग़ मन सारखं आठवण काढु लाग़ले, मग़ मला समझले की मी तीच्या खरोखरचं प्रेमात पडलो होतो, आता तिला मिळवण्याचा एकच मार्ग होता , तिला आपल्या प्रेमात पाडायचे, यासाठी श्रीमंत होण महत्त्वाचे होते,मग़ मी श्रीमंत व्हायची स्वप्ने पाहु लाग़लो.
शेवटी तीच्या घरला जायचं मी ठरवलं परंतु ठीक चौथ्या दिवशी ती आली आणि मनाला बरं वाटलं ,मन जसे भरुन आल्याग़त झाले,जीवात जीव आल्याग़त झालं.
मी एका कंपनीत चांग़ला जाँब शोधला, आणि काँलेज करत करत मी जाँब करु लाग़लो. तेथील मँनेजरशी चाग़ले संबध आले, मी त्याच्याशी चांग़ली जवळीकता साधली,त्याच्याकडून मला खुप काही शिकायला मिळाले, कंपनीत जो माल तयार होत होता तो कापड कारखान्यात जात आसे,विशेष म्हणजे मला कारखान्या बाबत खुप माहीती होती. मी कंपनीतील माल कसा येतो ,कसा जातो ह्याची माहीती घेतली, पण काही उपयोग नव्हता. पण आपनाला माल घेण्यासाठी कंपनी काढण्यासाठी तयार केली पाहीजे पण मनात विचार आला जवळ भांडवल हवे,,मग़ भांडवल कसे उभे करायचे हा विचार करत होतो. शेवटी मँनेजरकडुन या विषयी माहीती घेतली, त्यावरुन मला कळाले की सरकार आशा कंपनी तयार करण्यासाठी सबसिडी दिली जाते , मग़ माझ्या डोक्यात विचार आला की आपण आशी कंपनी सबसिडी मार्फत तयार करायची. म्हणुन मी सबसिडी मजुर करुन देणार्या पार्टीला भेटलो,पण भाडवलीशिवाय पर्याय नव्हता. आत भांडवल कसे उभे करायचे यावर मी विचार करु लाग़लो. पण माझ्याकडे एक पैसा ही नव्हता,तरी ही मी हे भांडवल उभे करु शकतो आसे मनाला आत्मविश्वास वाटत होता,आता एवढी मोठी रक्कम काम करुन तर मिळणार नव्हती,पण एक पर्याय होता.
Subscribe to:
Posts (Atom)